Skip to content Skip to sidebar Skip to footer

ग. दि. माडगूळकर बद्दल माहिती

gd madgulkar information in marathi: गीतरामायण मधील अजरामर गाण्यांच्या रूपात तसेच मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी मधील अनेक गाण्यांच्या आणि कथेच्या रुपात सतत करोडो लोकांच्या मनात कायमचे स्थान मिळवणारे हे लेखक म्हणजे मराठी चित्रपट सृष्टी ला पडलेले सुंदर स्वप्नच !!!

मित्रांनो आपली मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी जगभर गाजलेली आहे. अर्थात यासाठी फक्त कलाकार मंडळीच नव्हे तर पडद्यामागेही हजारो लोक तितकीच मेहनत घेत असतात. आपल्याला फक्त ती दिसून येत नाही इतकेच. आज कलाकारांच्या भूमिकेमुळे सगळेच कलाकार घराघरात पोहोचले आहेत. प्रेक्षक त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात आणि हीच त्यांच्या कामाची खरी पावती असते. पण पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांचे नाव ही आपल्याला माहीत नसते किंवा ते जाणून घेण्याचा प्रयत्नही कोणी करत नाही. कारण तशी गरजच आपल्याला वाटत नाही.

आपण कधी विचार केला आहे का, एखादी प्रतिकृती जेंव्हा पडद्यावर दिसते तेंव्हा कलाकारांच्या अभिनयाव्यतिरिक्त एडिटिंग,डायलॉग कटिंग, प्रेझेंटेशन अशा बऱ्याच गोष्टी होत असतात. त्यासाठी पडद्या मागे शेकडो लोक राबत असतात. तसेच तुम्ही असा विचार केला आहे का, की कलाकार जे डायलॉग बोलत असतात ते डायलॉग लिहण्यासाठी लेखक दिवस रात्र एक करत असतात. कथा, त्याचे पात्र लक्षात घेऊन संवाद लिहण्यासाठी खूप बैठक, विचार आणि शांततेची गरज असते. यासाठी लेखक अफाट मेहनत घेत असतात. कलाकारांना दिलेले संवाद, स्क्रिप्ट हीच तर खरी त्या कथेची ताकद असते. त्यामुळे आज अशाच एका लेखकाबिषयी जाणून घेणार आहोत जे आधुनिक काळातील मराठी भाषेतील नावाजलेले साहित्यिक आणि गीतकार होते. गीत रामायण हे त्यांचे सर्वोत्कृष्ट अजरामर ठरलेली एक प्रतिकृती. यातील उत्कृष्ट आणि सदाबहार गाणी ही ज्यांची ओळख बनली अशा मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेल्या ग.दि. माडगुळकर म्हणजेच गदीमा विषयी.

गदीमा यांचे पूर्ण नाव गजानन दिगंबर माडगूळकर आहे. त्यांचा जन्म १ ऑक्टोंबर १९१९ रोजी झाला. माडगूळकर यांचे शिक्षण आटपाडी कुंडल आणि औंध येथे झाले. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील औंध संस्थानात कारकून होते. गणित विषयामुळे त्यांना दहावी पास होता आले नाही. परिस्थिती फारच नाजूक असल्यामुळे पुढचे शिक्षण घेता आले नाही. म्हणून मग पोट भरण्यासाठी आणि कमावण्याचे साधन म्हणून त्यांना चित्रपट व्यवसायात यावे लागले. विद्या पाटणकर यांच्याशी गदिमांचा विवाह झाला. विद्या ताई कोल्हापूरच्या होत्या. गदिमा ना तीन मुले, श्रीधर, आनंद, शरदकुमार आणि चार मुली वर्षा, कल्पलाता, दीपा आणि शुभदा झाल्या.

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ

वॉरेन बफे म्हणतात की यशाचे सर्वात मोठे माप म्हणजे तुमचा बँक बॅलन्स नाही, तो म्हणजे….

करोडो रुपयांची नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. आज नवऱ्यासोबत चालवतेय स्वतःची कंपनी

गदिमा चरितार्थ भागवण्यासाठी जरी चित्रपट सृष्टीत काम करण्यासाठी आले असले तरीही त्यांना आधीपासूनच नक्कल करण्याची आणि लिखाणाची आवड होती. वि. स् खांडेकर यांच्याकडे गदीमा लेखन काम करत होते कारण त्यांचे अक्षर खूप सुंदर होते. तिथूनच त्यांना अनेक प्रकारचे साहित्य वाचण्याची गोडी निर्माण झाली होती. त्यामुळे चित्रपटसृष्टीमधे या सगळ्याच गोष्टींचा त्यांना खूपच फायदा झाला.

या सोबतच त्यांनी काही चित्रपटात अभिनय सुधा केला आहे. मराठी कविता आणि कादंबरीकार व्यंकटेश माडगुळकर यांचे मोठे भाऊ म्हणजे गदिमा. गदिमा आधुनिक काळातील अग्रगण्य साहित्यिक होते. अनेक समरगीते, बालगीते, कथा, पटकथा, संवाद लेखन त्यांनी केले. त्यातील गीतरामायण मधील गाणी ही सर्वोतकृष्ट ठरलेली साहित्यकृती ठरली. कारण ही गाणी, यातील भाव, शब्द यांनी प्रेक्षकांना वेड लावले. याशिवाय अनेक लावण्या आणि चित्रपट गीतेही त्यांनी लिहिलेली आहेत. गीतरामायण मधील गाण्यांचे अनेक भाषेत अनुवाद करण्यात आले आहेत.

त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटात पुढचं पाऊल, बाळा जो जो रे, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर, संथ वाहते कृष्णामाई यांचा समावेश होतो.

गदिमांनी बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लेखनही केले आहे. हंस पिक्चर्स चित्र संस्थेच्या ब्रह्मचारी या चित्रपटात छोटी भूमिका साकारून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नवयुग चित्र संस्थेत के नारायण काळे यांच्या हाताखाली सहायक दिद्गर्शक म्हणून मग केले. गदिमानी भक्त दामाजी आणि पहिला पाळणा या चित्रपटाची गाणी लिहला. नंतर त्यांना लोकशाहीर रामजोशी चित्रपटात कथा, संवाद, गीत लेखन तसेच छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली. याच संधीचे सोने करून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपला ठसा उमटवला आणि पुढे वाटचाल सुरूच ठेवली.

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी १५७ पटकथा आणि २००० गाणी लिहला. शिवाय अनेक चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लेखन केले आहे.

त्यांच्या याच कामाला पावती म्हणून भारत सरकारने १९५७ मध्ये संगीत नाटक अकादमी उत्कृष्ठ नाट्य लेखक पुरस्कार मिळाला.
१९६९ मध्ये चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन गौरव केला.
२०१९ हे त्यांचे जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले.

तर अशा या अष्टपैलू आणि हरहुन्नरी कलाकार, लेखक, कवी आणि गीतकाराला मानाचा मुजरा.

==================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.