गाडीवरून आठवलं!..नोकरी लागून सहा महिने झाल्यावर मस्तपैकी बुलेट घेतली.रॉयल एनफिल्ड! कॉलेजला असल्यापासून स्वतःच्या दुचाकीसाठी झुरत होतो. पण जेव्हा स्वतःच्या बुलेटवल बसून तिची पहिली डरकाळी ऐकली तेव्हा काळीज खरंच सुपाएवढं झालं…
रेवतीच्या डोहाळ जेवणाची तारीख ठरल्याने नीताताई खूप आनंदात होत्या. मालतीबाईही उत्साहाने कामं करत होत्या. त्यांच्या मदतीला श्वेता आली होती. दोघींनी मिळून सारे अंगण सजवले.
लग्न मोडल्याची बातमी रेवतीपर्यंत पोहोचली आणि ती लगबगीने माहेरी आली. मुलाकडील मंडळींच्या अवास्तव मागण्या ऐकून तिलाही धक्काच बसला. तात्या आणि नीताताई नाराज होते
“नीता माझंही चुकलचं. आपली मुलगी परस्पर लग्नाचा निर्णय घेते, म्हणून दुखावलो होतो मी. वाटायचं हे प्रेम वगैरे सारं काही खोटं असतं. आपल्यावेळी असं होतं तरी कुठे?
रेवतीने नोकरीसाठी अर्ज केला आणि तिला मुलाखतीसाठी बोलावणं आलं. पहिलीच मुलाखत आल्याने रेवती थोडी अस्वस्थ झाली. नाही म्हणता म्हणता सारंग तिला ऑफिसमध्ये सोडायला गेला.
रेवती आणि सारंग तिथेच चार दिवस राहिले पण अबोला घेऊनच. एकमेकांच्या सोबत असूनही नसल्याप्रमाणे. रेवती कधी कधी सारंगशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होती. मात्र सारंग तिच्याशी बोलत नव्हता.