आनंदाचे दीप उजळले

संगीताने हॉल मधले जुने पडदे काढून त्या जागी नवीन पडदे लावले. सोफा दिवान कव्हर ही नवीन चढवले.
एकदा पूर्ण ड्राईंगरूम वर नजर फिरवली .सगळं नीट, स्वच्छ फर्निचर., खूप छान ,सजवला गेला आहे हाॅल असे डोळ्यांनी मनाला समजावले.
ती सासूबाईंच्या खोलीत डोकावली. .त्या अलमारी उघडून काहीतरी आवराआवरी करत होत्या.
संगीता तिच्या खोलीत आली तिनेही अलमारी उघडून जुन्या साड्या, व ड्रेस बाहेर काढायला सुरुवात केली.
तेवढ्यात तिचा फोन वाजला,” हॅलो म्हणत तिने उचलला.
सरिता ताईचा आवाज ऐकून संगीताला खूप आनंद झाला “काय ग संगीता कुठवर आली तयारी लग्नाची?”
” चालली आहे, राहुल भाऊजींचे कपडे शिवायला टाकले आहे, देण्या घेण्याचे कपडेही घेऊन झाले.
पण –सध्या दिवाळी मध्ये आल्याने दिवाळी चीतयारी ही चालली आहे .”
“हो ऐक ना मी काय सांगते —ताईने मध्येच तिला थांबवलं,
” मी आणि वहिनीने मिळून तुझ्यासाठी आहेराची साडी पसंत केली आहे, मी फोटो पाठवते ,पाहून रंग कोणता हवा ते सांग आणि हो ब्लाउज पण शिवून आणेन म्हणजे तुला नेसता येईल.
“हो- हो -पाहून सांगते रंग “,म्हणून संगीताने फोन कट केला.
दिवाळीनंतर धाकट्या दीरा चे, राहूल चे लग्न आहे. पंधरा-वीस दिवस च उरले आहे. अजून बरीच तयारी करायची आहे.
संगीताने अलमारीतून लग्नातला शालू ,आणि पैठणी काढली. रोलप्रेस ला द्यावी,तेवढ्यात सासूबाईं त्यांचे मोरपंखी पैठणी काठाचे लुगडे आणून तिला देत म्हणाल्या “संगीता हे घे नेस तू लग्नात तुला खूप खुलून दिसेल.”
संगीताला खूप आनंद झाला तिला तो मोरपंखी रंग खूप आवडायचा.
चला आपली लग्नाची साड्यांची तर तैयारी झाली.
आता प्रिया तिच्या मुलीचेआणि मुलाचे कपडेही पाह्यला हवे.
विचार करत करत संगीता प्रियाच्या खोलीत आली आणि अलमारी उघडून कपडे काढून पाहू लागली.
मोबाईल मध्ये डोळे लावून बसलेल्या पियू ने”आई काय करतीये “विचारले .लग्नात काय घालशील? ते पाहते .
तुला काही नवीन घ्यायला हवय कां?
“काय हवय सांग.”
” मम्मा मला यावेळेस शरारा ,आणि वन पीस फ्रॉक घ्यायचा आहे. मी ऑनलाईन ॲमेझॉन वर पाहिलं आहे , खूप नवीन फैशन चा.
“.काय नवा शरारा ?आणि हा आधिचा शरारा, हा क्रॉप टॉप अलमारीतले सगळे कपडे काढत काढत संगीता म्हणाली “ह्या सगळ्या कपड्यांचे काय करणार आहेस अजून कितीतरी नवे आहेत हे.”
“मम्मा नीट पाहिलं का तू ?प्रियाने स्वतःवर कपडे लावून दाखवत म्हटले बघ ना किती लहान झाले आहे.
संगीताने पाहिल खरच , या दोन वर्षात प्रिया कितीतरी उंच झाली नी शरीराने ही भरली आहे .पण कपडे तर दोन वर्षांपूर्वीचे आहे घेतलेले, पण– कोरोनामुळे कुठेच लग्न, रिसेप्शन साजरे झाले नाही त्यामुळे नवीन असूनही घालायला मिळाले नाही .आणि आता लहान झाले.
“काय ग बाई घातले ही नाही गेले ,आणि लहान ही झाले?”
” तुला सांगते पियू आमच्या लहानपणी आम्ही तीन बहिणी होतो, सरिता ताई चे लहान कपडे सुषमा मग मी असे वापरत असू,त्यानंतरच ते जुने होत.
” हो ग मम्मा पण मी काय करू? मला तर मोठी किंवा लहान बहीण पण नाही आणि छोटू मुलगा आहे.
” हो ग खरंच,
संगीताच्या मनात आले तो काळ वेगळा होता प्रत्येक घरात दोन-तीन सख्या किंवा चुलत बहिणी असायच्या. एकमेकींचे कपडे सहज वापरत पण आता काळ बदलला आहे प्रत्येक घरी एक किंवा दोन अपत्य.
“बरं बरं पण हा लॉन्ग फ्रॉक याला मी खालून जरीची बॉर्डर लावून जरा नवे पण आणते दिवाळीत तरी घालायला होईल. आणि दोन नवीन ड्रेस घेऊ ते लग्नात घालायला होतील ,
आणी ड्रेसला मॅचिंग ॲक्सेसरीज भाऊबीजेच्या पैशातून घेऊन देईन .
आता छोटूचेही कपडे पाहते , म्हणून संगीता ने दुसरी अलमारी उघडली.व लहान झालेले कपडे काढून वेगळे केले.
तेवढ्यात सासूबाईंचा आवाज आला “संगीता अनारसे पीठ पहा बरं तयार आहे का मी उद्या सकाळी करते.”
‘हो आई ,’म्हणत संगीता किचन मध्ये गेली फराळाचे पदार्थ करता करता डोक्यात लग्नाच्या तयारीचे विचार सुरू होते,
दिवाळीमध्ये होणारी जाऊ व तिच्या घरच्यांना फराळाला बोलवायचे आहे म्हणून एक दोन नवीन पदार्थही करून पहावे
,घराची साफसफाई ऑलमोस्ट झाली, अडगळ ही काढून झाली, लग्नाच्या, दिवाळीच्या स्वागतासाठी घर सज्ज झाले होते.
सकाळी सकाळी कोणीतरी मेन गेट पाशी आवाज देत आहे असे पाहून संगीताने दार उघडले .दारात बोहारिण भांड्यांचे मोठे टोपले घेऊन उभी होती.तिच्याबरोबर एक आठ दहा वर्षाची मुलगी आणि एक चार वर्षाचा मुलगा होता.
” तू कशी काय?”
” ताई दोन वर्षे झाली नाही येता आलं बघा जुने कपडे जमा असतील तर .”
“हो ग बाई –ठेवले आहे.”
टोपलीत बरीचशी भांडी होती थांब मी कपडे घेऊन येते म्हणून संगीता आत गेली.
बोहारिणबाई ने संगीताने आणलेल्या कपड्यातून चांगल्या चांगल्या साड्या, सूट बाजूला केले, व तिच्या प्रोफेशनल एटीट्यूड प्रमाणे “ताई अजून काही चादरी पॅन्ट शर्ट दाखवा की”म्हंटले.
“अग हे सगळे छान , नवे कपडे आहेत .संगीत म्हणाली, यात काय देते ते सांग” .बाईने कपडे परत उलट पालट केले ,तिची मुलगी कपड्यातल्या गठ्यात तिच्या कामाचं काही आहे का ते पाहत होती.
“मां,मेरे को भी दिवाली पर कुछ नया चाहिये”.
हा रे, देखते है.
संगीताने त्या मुलीकडे व त्या लहान मुलाकडे पाहिला दोघांचेही कपडे अतिशय जीर्ण झालेले होते.
संगीताकडे पाहत बोहारिण म्हणाली” दीदि और दो चार कपडे डाल दो तो ये स्टील के दो डोंगे दूंगी.”
“बापरे इतने कपडे और बस दो डोंगे?
बडी मुश्किल से गुजरा हुआ है दीदि पिछले दो बरस में.”
अच्छा चल ठीक आहे. बहारणीने दोन्ही डोंगे दिले व गठ्ठा बांधायला लागली.
तेवढ्यात प्रिया बाहेर आली तिने त्या मुलीला पाहिलं आणि आत गेली परत बाहेर येत तिच्या कपड्यांचे गाठोडे त्या मुलीला देत म्हणाली” देखो तो तुम्हारे नापं के है क्या?”
कपडे पाहून मुलीचा चेहरा क्षणात उजळला, तिने भरभर कपडे काढले व एक एक कपडा अंगाला लावून पाहू लागली, व आनंदाने म्हणाली “मां देख मुझे ऐसे ही कपडे चाहिये थे . असे म्हणून तिने त्या सर्व कपडेगट्ठाबांधून आपल्याजवळ ठेवले
“.मां ये मुझे मिले है मै तुम्हे नही दूंगी “
सर्व कपडे तिच्याच मापाचे होते आता ती खूप खुश दिसत होती.
” थँक्यू दीदि येतो एकदम नये है.
हा मेरी तरफ से दिवाली का गिफ्ट तुम्हे,असे पियुने म्हणताच तिचा चेहरा आनंदाने खुलला, तेवढ्यात छोटू नेआपले काही कपडे व काही खेळणी आणून तिच्या मुलासमोर ठेवली.” ये मेरी तरफ से” लहान मुलगा आनंदाने खेळणी पाहू लागला.
त्यातला एक ड्रेस काढूनबोहारणीने आपल्या मुलाला घातला.
छोटू ला आपण काहीतरी दिल्याचे समाधान वाटत होते
बोहारिणी च्या मुलांच्या चेहऱ्यावर आवडीच्या वस्तू मिळाल्याने जो आनंद पसरला होता ते पाहून संगीता ला त्यांच्या डोळ्यात आनंदाचे दीप उजळलेले दिसत होते.
,—————————————–लेखिका . सौ प्रतिभा परांजपे
====================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.