पुण्याला भेट देताय? मग ह्या ठिकाणी चमचमीत आणि महाराष्ट्रीयन ऑथेंटिक पदार्थ नक्की ट्राय करा.

©️®️ प्रतिभा कुलकर्णी
best thalis in pune: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून आपल्या पुण्याची ओळख आहे. पुण्यात मूळची मराठी संस्कृती आणि इतर कला-गुणांना प्रोत्साहन दिलं जात त्याचबरोबर शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही पुण्याची ओळख आहे. ‘ पुणे तिथे काय उणे ‘ अशी म्हण आपण आधीपासूनच ऐकत आलो आहोत अगदी चपखल बसावी अशी हि म्हण पुण्याच्या खाद्यसंस्कृती मधेही कमी पडत नाही. म्हणून जवळ जवळ २००० वर्षांपूर्वीचा इतिहास या शहराला आहे. त्यामुळे या शहरात काही इस्लामिक राज्यकर्ते आले काही वर्ष ब्रिटिश राजवट पुण्यात अवलंबली गेली तेव्हापसून ते आजतागायत विविध खाद्यपदार्थांची संस्कृती या शहराला आहे म्हंणूनच आज आपण पुण्यातले पारंपरिक शुद्ध शाकाहारी जेवण मिळणाऱ्या रेस्टोरंटची माहिती पाहणार आहोत.
१. दुर्वांकुर डायनिंग हॉल
अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ मिळणारे ठिकाण म्हणजे दुर्वांकुर डायनिंग हॉल च नाव आपोआपच पुढे येत. स्वादिष्ट थाळी असनाऱ्या रेस्टोरंटच्या यादीत दुर्वांकुर डायनिंग हॉल अग्रस्थानी आहे. या रेस्टोरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या यादीत गुजराती ग्राहकांची गर्दीही असते कारण महाराष्ट्रयीन थाळीबरोबरच गुजराती थाळीही याठिकाणी भेटते. येणाऱ्या ग्राहकांमध्ये विद्यार्थी,कार्यरत व्यावसायिक,कुटुंबे,नोकरदार यांचा समावेश असतो. दुर्वांकुर डायनिंग हॉल मध्ये येणाऱ्या ग्राहकाला रिकाम्या पोटी यावे लागते कारण इथल्या पदार्थांची चव ग्राहकांना खिळवून ठेवते आणि वारंवार यायला भाग पाडते तरीही काही खास पदार्थ येथे ऑर्डरही केले जातात ते म्हणजे दही वडा,बटाटा भजी,मूग खिचडी,ढोकळा,मसालेदार चना,तळलेला कोबी,कोशिंबीर,थालीपीठ हे पदार्थ ग्राहकांचे खास आहे.
दोन मोठ्या मजल्यांवर असलेला दुर्वांकुर डायनिंग हॉल हा एक अनौपचारिक वातावरण निर्माण करतो. त्यात मोठा असलेला डायनिंग हॉल नीटनेटका आणि स्वच्छ आहे त्यामुळे पाहुण्याची सेवा स्वच्छतेत केली जाते. सुसज्ज असलेले कर्मचारी आलेल्या ग्राहकांच्या गरजा विनयशीलतेने पूर्ण करतात.
ठिकाण – ११६६ गणेशकृपा,टिळक रोड सदाशिव पेठ,पुणे ४११०३० (साहित्य परिषद आणि एस.पी.कॉलेज जवळ)
वेळ – दुपारी १२:०० ते ३:३० आणि संध्याकाळी ७:०० ते ११:००
खासियत – महाराष्ट्रीयन थाळी, दही वडा, मूग खिचडी,ढोकळा,मसालेदार चना,तळलेला कोबी,थालीपीठ
सेवा आणि सुविधा – बुफे,वातानुकूलित हॉल,होमडिलिव्हरी,केटरिंग सेवा,वाढदिवस आणि गेट टुगेदर. किंमत – ७०० रुपये प्रत्येकी दोन जणांसाठी.
२. कृष्णा डायनिंग हॉल
हे एक पुण्यातील साधे रेस्टोरंट आहे जे त्यांच्या हातच्या चवीचे सार दर्शवतात अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे पदार्थ अबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडतात.दिवसामधून दोन वेळेला थाळीमधला मेनू बदलतात म्हजे जेणेकरून ग्राहक तेच तेच जेवण रोज खाऊन कंटाळू नये म्हणून थाळीमधला मेनू दोन दिवसांनी बदलला जातो. थाळीमध्ये एक कडधान्य,एक कोरडी भाजी,दोन ग्रेव्हिस असतात डाळ आणि भाताबरोबर पुलावही सर्व्ह केला जातो त्याचबरोबर ताजे ताकही या थाळीमध्ये सर्व्ह कल जातं,त्याचबरोबर एखादा गोड पदार्थ आणि पाच पदार्थांपासून बनवले गेलेली पंचरत्न कोशिंबीर ज्याला हिंदी भाषेत रायता असे म्हणतात. भाज्या चपाती,पुरी आणि थालीपिठाबरोबर सर्व्ह केल्या जातात यामधून एक तुम्ही निवडू शकता.
ठिकाण – लॉ कॉलेज रोड,शांतीशीला सोसायटी,एरंडवणे पुणे महाराष्ट्र ४११००४
वेळ – सकाळी ११:३० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ७:३० ते १०:३० पर्यंत
खासियत – महाराष्ट्रीयन थाळी साठी खास आणि वेगवेगळ्या मेनूसाठी प्रसिद्ध
सेवा आणि सुविधा – होम डिलिव्हरी,वातानुकूलित हॉल
किंमत– ७१० रुपये दोघं जणांसाठी
३. आशा डायनिंग हॉल
सर्वात जुन्या डायनिंग हॉल पैकी आशा डायनिंग हॉल जुन्या हॉटेलच्या यादीमध्ये येतो. याठिकाणी आरोग्यदायी आणि घरगुती जेवण मिळते.या थाळीमध्ये तीन प्रकारच्या भाज्या,तीन चपात्या,कोरड्या बटाटयाची भाजी,डाळ-भात,दही,लोणचे,रसम आणि पापड यांचा समावेश असतो तर ऋतूंनुसार पालेभाज्या थाळीमध्ये असतात. उपवासाच्या दिवशी उपवासाचे पदार्थही या ठिकाणी मिळतात.श्रावण महिन्यात खास अशी उपवासाची थाळीही याठिकाणी मिळते.
ठिकाण – आपटे रोडवर,डेक्कन जिमखाना पुणे महाराष्ट्र ४११००४
वेळ – सकाळी ११:३० ते ३:०० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ७ :३० ते रात्री १० वाजेपर्यंत
खासियत – श्रावण महिन्यातील खास उपवासाची थाळी, महाराष्ट्रीयन थाळी आणि चविष्ट अशी रसम
सेवा आणि सुविधा – होम डिलिव्हरी,अस्सल ब्राह्मणी जेवण
किंमत– ३०० रुपये प्रत्येकी
हेही वाचा
जेवणाची चव द्विगुणित करण्यासाठी हे पदार्थ नक्की करा.
सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्याला शिक्षणाचे माहेरघर असे का म्हणतात?
४. हॉटेल श्रेयस
हॉटेल श्रेयस हे देखील पुण्यातल्या जुन्या शाकाहारी हॉटेलपैकी एक आहे.आपटे रोडवरील हे हॉटेल खास आईने बनवलेल्या जेवणाची आठवण करून देते. या थाळीमध्ये एक कोरडी भाजी,बटाट्याच्या कातऱ्या,कोबी बटाटा,भेंडी मसाला या सगळ्या भाज्या कोरड्या भाज्या म्हणून वाढल्या जातात तर पातळ भाज्यांमध्ये भरली वांगी,पातळ मेथी,पातळ पालक अशा वेगवेगळ्या भाज्या असतात तर या सगळ्यांमध्ये लागणारी ग्रेव्ही ही टोमॅटो रस्स्याची बनलेली असते.डाळींमध्ये मूग,मटकी,मटारच्या डाळीची भाजी असे डाळींचे प्रकार आपल्याला खायला मिळतात. आमटी आणि सोलकढीही ताटात वाढलेली असते त्याचबरोबर दोन प्रकारचे फरसाण असते. एका बाजूला कोशिंबीर असते. सगळ्या भाज्या चपाती,थालीपीठ,पालक पुरी,मसाला पुरी,मसाला भात,साधं वरण,ताक,पापड,लोणची आणि चटणी यांचा समावेश एका थाळीमध्ये असतो.त्याचबरोबर उपवासाची थाळीही याठिकाणी मिळते.
ठिकाण – १२४२ बी आपटे रोड,डेक्कन जिमखाना पुणे,महाराष्ट्रा ४११०४४
वेळ – ११:३० ते ३:०० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ७:३० ते रात्री १०:३० पर्यंत
खासियत – तात्काळ सेवा,शुद्ध शाकाहारी जेवणासाठी खास
सेवा आणि सुविधा – होम डिलिव्हरी सेवा उपलब्ध
किंमत– ८०० रुपये दोन जणांसाठी
५. वसंतपुष्प डायनिंग हॉल
खूप भूक लागली आहे आणि खिशात रक्कम खूप कमी आहे यासाठी स्नॅक्स किंवा कुठलेही नूडल्स खाण्याहची गरज नाहीय तर पु.ल देशपांडे गार्डनसमोर असलेल्या वसंतपुष्प डायनिंग हॉल मध्ये कमीत कमी खर्चात आपण शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवणाचा मनसोक्त आनंद लुटू शकतो.कोकम सरबत ने सर्वात आधी जेवणाची सुरुवात होते त्यानंतर स्टार्टर म्हणून मटार कचोरी,खमण ढोकळा दिला जातो.त्यानंतर जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी मसालेदार उसळ,आलू सब्जी,पालेभाजी,पनीर कढई,डाळ,कढी आणि कोशिंबीर भाज्यांबरोबर पोळ्या वाढल्या जातात. या सर्व पदार्थांबरोबरच तुपाची धार असलेली डाळ खिचडी आणि गोड पक्वान्न म्हणून आंब्याच्या रबडीबरोबर उकडीचे मोदक वाढले जातात. रोज वेगवेगळ्या प्रकारची स्वीट डिश याठिकाणी मिळते. कमीतकमी खर्चात पोटभर जेवण हि वसंतपुष्प डायनिंग हॉलची खासियत आहे.
ठिकाण – पु. ल. देशपांडे उद्यानासमोर,शिवनेरी बिल्डिंग,०४,सिंहगड रोड,दत्तवाडी पुणे महाराष्ट्र ४११०५१
वेळ – सकाळी ११:३० ते दुपारी ३:३० संध्याकाळी ७:०० ते रात्री १०:३० वाजेपर्यंत
खासियत – गणेश चतुर्थीच्या निमित्ताने वाढला गेलेला पदार्थ म्हणजे उकडीचा मोदक तेही आंब्याच्या रबडीबरोबर
किंमत– २३० रुपये प्रत्येकी
६. विष्णूजी की रसोई

प्रसिद्ध मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्या हातच्या अस्सल चवीने सजलेले विष्णू जी कि रसोई हे रेस्टोरंट पुण्यातील एरंडवणे येथे आहे. ई टीव्ही मराठी वाहिनीवरील एका कुकरी शो मधून म्हणजेच मेजवानी एक परिपूर्ण किचन या कार्यक्रमांमार्फत घराघरात पोचलेले आणि स्वतः वेगवेगळे पदार्थ बनवून दाखवणारे शेफ विष्णू मनोहर यांच्या रेस्टोरंट मध्ये खास महाराष्ट्रीयन चवीचे पदार्थ खाण्यासाठी असंख्य खवय्यांची गर्दी झालेली आपल्याला दिसते.
स्टार्टर मध्ये आपल्याला येथे गुळाच्या पाकात मुरवले गेलेले बोरं,साबुदाणा वडा,आप्पे,आलू बोन्डा टोमॅटो सूप,कांदा भजी असे वेगवेगळे प्रकार आपल्याला स्टार्टर मध्ये खाण्यासाठी मिळतात.त्यानंतर सॅलडमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या,भाज्यांमध्ये मसाला बटाटा,ज्वारीची भाकरी, बटर नान असे प्रकार आपल्याला चाखायला मिळतात. महाराष्ट्रीयन डिश बरोबरच पंजाबी डिशेश सुद्धा या ठिकाणी मिळतात. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी मुळे विष्णूजी कि रसोई हे रेस्टोरंट हळूहळू पुण्यात प्रसिद्ध होत आहे.
ठिकाण – म्हेत्रे ब्रिज,सिद्धी गार्डन जवळ DP रोड एरंडवणे पुणे
वेळ – दुपारी १२:३० ते दुपारी २:४५ पर्यंत आणि संध्याकाळी ७:३० ते १०:१६ पर्यंत
खासियत – वेगवेगळ्या प्रकारचे भाज्यांचे प्रकार,स्टार्टर मधली विविधता यांसाठी खास
किंमत– ६०० रुपये प्रत्येकी दोघं जणांसाठी
७. पुना गेस्ट हाऊस
८५ वर्ष जुने असलेले पुना गेस्ट हाऊस हे पुण्यातील लक्ष्मीरोड वरील एक खूप जुने महाराष्ट्रीयन जेवणासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल आहे. याठिकाणी खास पुरणपोळी आणि थालीपीठ मिळते खास हे दोन पदार्थ खाण्यासाठी ग्राहकांची झुंबड या ठिकाणी असते.या ठिकाणी थाळीचे ३ मुख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. सामान्य थाळी,विशेष थाळी आणि ग्रामीण थाळी असे थाळ्यांचे प्रकार याठिकाणी आहेत आणि त्यानुसारच थाळ्यांची किंमत ठरवली जाते. तरीही दडपे पोहे या ठिकाणी उत्तम असे मिळतात. पुना गेस्ट हाऊस हे जुन्या पुणेरी वाड्यांची आठवण करून देतं. कारण संपूर्ण इमारतीचे मजले हे सागाच्या लाकडापासून बनवलेले आहे.
तरीही अळूच फतफत,बटाटा भाजी,भाजणीचे थालीपीठ हे पदार्थ खास महाराष्ट्रीयन थाळीची पूर्तता करतात. ८ प्रकारच्या पिठापासून बनवलेले भाजणीचे थालीपीठ हे या ठिकाणी खमंग बनण्यासाठी कढईमधे तळून घेतात आणि त्यावर मस्त लोणी घालून चटणीबरोबर सर्व्ह करतात. थालीपीठ सामान्यपणे आपण कापडावरती थापून त्याला तव्यावरती टाकून मस्त तेलात खरपूस भाजून घेतो पण पुना गेस्ट हाऊस या ठिकाणी मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने थालीपीठ बनवले जाते म्हणूनच ग्राहकांची झुंबड याठिकाणी असते.
ठिकाण – १०० लक्ष्मी रोड,गणपती चौक,नवीन नाना पेठ,बुधवार पेठ पुणे महाराष्ट्रा ४११००२
वेळ – ११:३० ते ३:०० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ७:३० ते १०:०० वाजेपर्यंत
खासियत – दडपे पोहे,खमंग थालीपीठ, अळूचं फतफत,आंबट गोड वरण आणि पुरणपोळी
किंमत– ३०० रुपये दोन जणांसाठी
८. सात्विक थाळी

सात्विक थाळी हे रेस्टोरंट पुण्यातील सदाशिव पेठेत आहे. उत्कृष्ट मसाले आणि अस्सल महाराष्ट्रीयन धाटणीचे पदार्थ या ठिकाणी मिळतात.अनेक महागड्या थाळी रेस्टोरंटपेक्षा कितीतरी पटीने अस्सल पुणेरी जेवण याठिकाणी मिळते बटाटयाची भाजी,कढी,कोथिंबीर वडी त्याठिकाणची खासियत आहे.घराची चव मिस करत असाल तर या ठिकाणाला अवश्य भेट द्यावी,कमी तेलकट,ताजे अन्न,जलद आणि तात्काळ सेवा या ठिकाणची खास वैशिष्ट्येय आहे .अगदी नावाप्रमाणेच सात्विक भोजनाचा आस्वाद या ठिकाणी घेण्यास काहीच हरकत नाही.
ठिकाण – opp. टिळक स्मारक मंदिर,रामाश्रम सोसायटी,पेरूगेट,सदाशिव पेठ पुणे महाराष्ट्रा ४११०३०
वेळ – सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत
खासियत – बटाटा भाजी,कोथिंबीर वडी
किंमत– ३०० रुपये दोन जणांसाठी
पुण्यात आलात तर शुद्ध शाकाहारी जेवणाचा आनंद नक्की लुटुयात या अस्सल खास महाराष्ट्रीयन थाळी सोबत
===============