Skip to content Skip to sidebar Skip to footer

सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्याला शिक्षणाचे माहेरघर असे का म्हणतात? | Pune Education Hub

Pune Education Hub: अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण आता या गरजेसोबतच अजून एक गरज मूलभूत बनली आहे आणि ती आहे शिक्षण. शिक्षण ही आजच्या काळाची अतिशय मूलभूत गरज बनली आहे. कारण यावरच पुढील सर्व आयुष्य अवलंबून आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. उत्तम शिक्षण असेल तर चांगली नोकरी किंवा व्यवसाय करता येईल, पैसे मिळवता येतील म्हणजेच आर्थिकदृष्टीने सक्षम बनू, तरच योग्य जोडीदार मिळेल, आपल्याला बाकी गरजा भागवता येतील, मुलांचे भविष्य सुरक्षित असेल आणि पर्यायाने आपणही सुखी, समाधानी राहू.

मग हे शिक्षण घेण्यासाठी चांगले कॉलेज, वातावरण आणि उत्तम शिक्षक लाभणे तितकेच गरजेचे ठरते. या गोष्टी असतील तर पाया नीट घडेल आणि आयुष्य पण. याच शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने ग्रामीण भागातून, छोट्या शहरातून मोठ्या शहरात येत असतात. इतकेच नव्हे तर एखादे ठिकाण शिक्षणासाठी योग्य आहे असे समजले तर गाव, शहरच काय तर राज्य सोडून जाण्याची पण त्यांची तयारी असते.

शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसिद्ध असलेले औद्योगिक शहर जे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात मुठा आणि मुळा नदीच्या किनारी वसलेले, प्रशासकीय मुख्यालय असलेले भारतातील सातवे मोठे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर म्हणजे पुणे.

या पुण्याचा शैक्षणिक इतिहास खूप जुना आहे. याची सुरुवात होते ती ई. स. ७५० पासून जेंव्हा पुण्यावर राष्ट्रकूटांचे राज्य होते. त्यानंतर सतराव्या शतकाच्या मध्यावर यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची हुकमत होती. त्यानंतर पुणे पेशव्यांची राजधानी झाले. आणि याच काळात पुण्याचा विस्तार होऊन शिक्षणाची सुरुवात झाली.

त्यावेळी पुण्याचे शिक्षण हे गुरुकुल पद्धतीचे होते. बारा बलुतेदार म्हणजे सुतार, लोहार, कुंभार, सराफ, शेतकरी असे असल्याने प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रातील व्यवसाय आपल्या संततीला म्हणजे मुलांना शिकवत असे. वर्ष १८१८ मध्ये पेशवाई संपली आणि इंग्रजांनी पुण्याचा ताबा घेतला. त्याचबरोबर पुण्याच्या शिक्षणाच्या इतिहासातील तिसरे पर्व सुरू झाले.

इ. स. १८३२ मध्ये रेव्हरंड मिचेल यांनी पुण्यात पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. नंतर १८५१ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली मराठी माध्यमाची शाळा सुरू केली. आजची हुजूरपागा ही पुण्याची शाळा भारतातील दुसरी मुलींची शाळा आहे. वर्ष १८८२ पर्यंत पुण्यात ८४ शिक्षणसंस्था सुरू झाल्या होत्या.

स्वातंत्र्यपूर्व काळात सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले, महर्षी अण्णसाहेब कर्वे, पंडिता रमाबाई, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर अशा अनेक राजकारणी आणि समाजकारणी व्यक्तींनी शिक्षणाचा पाया रोवून पुण्याला भारतात एक वेगळे स्थान मिळवून दिले.

आपल्या पुण्यावर इंग्रजांचे वर्चस्व होते, त्यावेळी हा शैक्षणिक विस्तार मर्यादित होता. खाजगी संस्थाची संख्या कमीच होती. त्याच वेळी पुण्यात शिक्षण संचालाणायाची स्थापना झाली. वर्ष १८८५ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. ई. स १९४७ मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला आणि पुण्याची प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण क्षेत्रात प्रगती झाली.

पुण्यातील औद्योगीकरनामुळे पुण्याची हद्द झपाट्याने वाढत आहे. माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात पुणे इतके विकसित झाले आहे की संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे. पुण्यात फक्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक व्यवहारी शिक्षण मिळत नाही तर या शिक्षणाला व्यवसायाची जोड मिळाल्यामुळे त्याचा प्रभाव जास्त वाढत आहे. तंत्र शिक्षण, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम, आणि माहिती तंत्रज्ञान हे पुण्यात माध्यमिक शाळातून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एका आर्थिक पाहणीनुसार औद्योगिक विकासात पुण्याचा देशात सातवा क्रमांक आहे. कारण वाढत्या औद्योगीकरणामुळे आणि तंत्रज्ञान प्रगतीमुळे देशाच्या आर्थिक विकासात भरच पडत आहे. आजही अनेक नवीन कंपन्या सुरू होत आहेत. ही प्रगती अशीच चालू राहणार आहे.

पुण्याला भेट देताय? मग ह्या ठिकाणी चमचमीत आणि महाराष्ट्रीयन ऑथेंटिक पदार्थ नक्की ट्राय करा.

प्रिवेडींग आणि मॅटर्निटी फोटोशूटसाठी प्रसिद्ध असणारी पुण्यातील खास ठिकाणे

आज पुण्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी व्यवस्थापन ( अनुदानित ), खाजगी व्यवस्थापन ( विनाअनुदानित ) अशा शाळा आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची सोय मराठी, उर्दू, गुजराती, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ आणि तेलगू इतक्या भाषेतून आहे. महाराष्ट्र राज्य मंडळ, सीबीएसइ, आयसइ आणि आयबी इत्यादी मान्यताप्राप्त बोर्डाच्या शाळा कार्यरत आहेत. संपूर्ण देशभरातून पुण्यात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे त्यांच्या साठी निवासी शाळांचे प्रमाण वाढले आहे. या निवासी शाळांत योगशिक्षण, परदेशी भाषा, कलाशिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि प्रकल्प पद्धत अशा बुद्धिमत्ता विकसित करणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

पुण्याजवळ खडकवासला येथे नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्करातील अधिकारी तयार करण्याची जागतिक पातळीवरील सर्वोत्तम संस्था आहे. इथे प्रवेश घेण्यासाठी विविध राज्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहेत. रेग्युलर शिक्षणाबरोबरच बाहेरून म्हणजे ( फक्त परीक्षे पुरते कॉलेज ) मिळण्याची सोय देखील पुण्यात आहे. त्यासाठी राष्ट्रीय मुक्त विद्यालय, राज्य मुक्त विद्यालय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांचीही अनेक केंद्र बाह्य शिक्षणासाठी पुण्यात आहेत. नेट, जेईई आणि सीईटी सारख्या स्पर्धा परीक्षांचे खाजगी वर्ग पुण्यात उत्तम मार्गदर्शन करत आहेत तसेच एमपीएससी यूपीएससी चे निकाल इतके चांगले आहेत की शासकीय सेवेत निवड होणारे कित्येक अधिकारी पुण्यातले आहेत.

३.१ उच्चशिक्षण

आज पुण्यात पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक विद्यापीठ, आयटी, सिम्बायोसिस आणि डी. वाय पाटील अशी उच्चशिक्षण देणारी नामांकित विद्यापीठे आहेत. पुण्यात मूलभूत शिक्षणाबरोबरच व्यावसायिक विषयाचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. केवळ पुणे विद्यापीठ आवारात पन्नास पेक्षा अधिक पदव्युत्तर शिक्षण देणारे विभाग आहेत. व्यवस्थापन, इंजिनियरिंग आणि मेडिकल क्षेत्रात शिक्षण देणाऱ्या अनेक संस्थाही पुण्यात कार्यरत आहेत. मेडिकल क्षेत्रात AFMC आणि इंजिनियरिंग क्षेत्रात सीएमइ संरक्षण विभागाच्या संस्था सुरू आहेत. तर पुण्याच्या दिघीत आर्मी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आणि हडपसर आर्मी इन्स्टिट्युट ऑफ फिसिकल ट्रेनिंग संरक्षण खात्यातील जवानांना शारीरिक शिक्षण देणारी संस्था आहे.

३.२ परदेशी भाषा शिकण्याची संधी

पुण्यात कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाला तोटा नाही. जे वाटेल, ज्याची आवड असेल अशा कोणत्याही प्रकारचे शिक्षण आपण पुण्यात घेऊ शकतो. आजकाल परदेशी भाषा शिकणे आणि त्याचे भाषांतर करून देणे याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण परदेशी लोक आपल्या देशात व्यवसाय करायला उत्सुक आहेत. त्यामुळे भाषा शिकणे गरजेचे झाले आहे.जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, जॅपनीज आणि चिनी भाषा आता पुण्यात शिकणे सहज शक्य झाले आहे.

३.३ सांस्कृतिक संस्था


विविध प्रकारच्या शिक्षणाबरोबरच आपल्यातील कला गुणांना वाव देणाऱ्या सांस्कृतिक आणि अभिनय क्षेत्रातील मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत. अभिनय, प्रशिक्षण, दिग्दर्शन, पटकथा लेखक, संकलक यासाठी विद्यार्थी अनेक ठिकाणाहून येतात. या अभिनय सोबतच संगीत, नृत्य, नाटक यांचे मार्गदर्शन देणाऱ्या संस्था पण आहेत. फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ही संपूर्ण भारतात एकमेव असलेली संस्था पुण्यात आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे.

३.४ संशोधन संस्था

या बाबतीत तर पुणे जागतिक पातळीवर अग्रेसर आहे. नॅशनल केमिकल लॅब, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, राष्ट्रीय विषाणू संशोधन, भांडारकर संशोधन संस्था, नॅशनल माहिती सेंटर, राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था, एक्सप्लो जीव रिसर्च आणि लॅब, अर्मामेंट, तंत्रज्ञान आणि बँकांशी संबंधित नॅशनल इ्स्टिट्यूट ऑफ बँक मनाजमेंत अशा संस्थाही पुण्यात कार्यरत आहेत. ५-६ वर्षापूर्वी ज्या आयसर संस्थेची निर्मिती झाली, त्यातून विद्यार्थांना विज्ञानातील मूलभूत विषयाकडे संशोधन करण्यासंबंधी मार्गदर्शन केले जात आहे. हे मार्गदर्शन इतके प्रभावी आहे की आयआयटी पेक्षा उत्तम करीयर आयसार मधून घडताना दिसून येत आहे.

इतक्या सोयी सुविधा उपलब्ध असल्यामुळे अनेक विद्यार्थी जगभरातून पुण्यात शिक्षणासाठी येतात आणि पालक सुद्धा मुलांना इथेच प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात. पाहिजे त्या क्षेत्रातील उत्तम करीयर शिक्षण, मुलांच्या राहण्यासाठी छान निवासी व्यवस्था, पुण्याचा भौगोलिक भाग आणि आल्हाददायक वातावरण,सुसह्य हवामान, स्वच्छ आणि शुध्द पाणी पुरवठा, उत्तम आरोग्य व्यवस्थापन या सगळ्यामुळे इतिहास काळापासून ते आजपर्यंत महाराष्ट्रसह भरतातातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पिण्याची निवड करतात.

म्हणूनच पुण्याला विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर, ऐतिहासिक परंपरा, दख्खनची राणी, शिक्षणाचे आगार, पूर्वेकडील ऑक्सफर्ड आणि आता आयटी शहर अशा विशेषणांनी ओळखले जाते.

===============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.