Skip to content Skip to sidebar Skip to footer

होळी सणाची माहिती | holi information in marathi

holi information in marathi : holi mahiti : आपला भारतदेश विविधतेने नटलेला आहे. वेगळ्या वेगळ्या जातीचे, धर्माचे लोक आपल्या देशात गुण्यागोविंदाने राहतात आणि सगळे सण समारंभ वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतात. आपल्याकडे वर्षभर अनेक सण समारंभ असतात. प्रत्येक सणाचे, समारंभाचे विशेष महत्त्व आहे आणि त्यामागे काही रंजक कहाणी आहे तसेच काहीना काही कारणे आहेत. आपण सगळे सण समारंभ का साजरे करतो ?? कारण माणसामाणसातील मतभेद, दूरावे, चूकभूल विसरून सर्वांनी अशा निमित्ताने एकत्र यावे आणि आनंदात रहावे. आपल्या भारतीय संस्कृतीत असे खूप सण आपण साजरे करतो आणि त्याचे महत्त्व टिकवून ठेवतो. असाच एक सण आहे ज्याने असत्यावर सत्याचा विजय केला आहे, अधर्मावर धर्माचा विजय केला आहे, अंधारावर प्रकाशाचा विजय केला आहे,जो सण आपल्यातील सगळी नकारात्मकता सगळ्या वाईट गोष्टी आणि सवईंचे दहन करायला लावतो आणि सकारात्मकता देतो एक नवी ऊर्जा देतो आणि हा सण म्हणजेच “होळी”.

होळी हा हिंदूंचा सण असला तरीही संपूर्ण जगात विविध जाती धर्माचे लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतात. वसंत ऋतुत आणि मराठी वर्षाच्या शेवटी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी साजरी करतात.इंग्रजी कालनिर्णय नुसार हा सण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो तर काही भागात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. हा सण होलिकादहन, धुलीवंदन,होळी, धुलवड,शिमगा अशा विविध नावांनी ओळखला जातो.

हिवाळा संपल्यावर येणाऱ्या वसंत ऋतूचे आगमन करण्यासाठी हा सण साजरा करतात. वसंत ऋतुत झाडांना नवी पालवी फुटते,झाडे फळ देतात आणि सगळीकडे हिरवळ पसरते आणि त्यासाठी देखील हा सण साजरा करण्यात येतो.
या सणात रंगांची उधळण होते,नृत्य आविष्कार होतो,संगीत कार्यक्रम सादर केले जातात तर काही ठिकाणी देवाची पालखी निघते आणि सगळ्या भक्तांना दर्शन घेण्याचा लाभ दिला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रुढी परंपरेप्रमाणे हा सण साजरा होतो. पण उत्साह,आनंद आणि श्रद्धा मात्र सारखीच असते. आपल्या भारतात मुख्यतः शेतकरी वर्ग हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. कारण शेतकऱ्यांनी लावलेली पिके,धान्य जमिनीतून उगवायला सुरुवात होते ती वसंत ऋतुत त्यामुळेच हा सण कृषी महोत्सव म्हणून ओळखला जातो. तसेच आपल्यातील हिंदू लोकांचा असा समज आहे की, येणाऱ्या वसंत ऋतुचा आणि भरपूर रंगांचा आनंद घेण्यासाठी हा सण साजरा केला जातो आणि हिवाल्याला निरोप दिला जातो.

हा सण एक दिवसाचा नसून काही भागात दोन तर काही भागात तीन दिवस साजरा केला जातो. तसेच याची साजरा करण्याची पद्धत सुद्धा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळी वेगळी आहे.

होळीच्या पहिल्या दिवशी घरातील माणसे लाकडे आणि गौऱ्या जमा करून मोठी होळी तयार करतात. होळीच्या भोवताली रांगोळी काढली जाते. या दिवशी लोक होलिका आणि प्रल्हादची गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी होलिकाची प्रतिमा जाळतात. तसेच प्रकाशझोत लावण्यात येतात. आणि अग्निदेवाचे आशीर्वाद घेण्यासाठी माता आपल्या मुलांना सोबत घेऊन अग्नी भोवती पाच फेऱ्या मारतात. यालाच प्रदक्षिणा असेही म्हणतात. या दिवसाला काही जण “पूनो” असे म्हणतात. या दिवसाला “होलिका” असेही म्हटले जाते.

पौर्णिमेच्या दिवशी थाळीत किंवा लहान पितळी भांड्यात रंग आणि पाण्याची व्यवस्था केली जाते. घरातील मोठ्या( ज्येष्ठ ) माणसांपासून उत्सवाला सुरुवात होते. हे मोठे लोक घरातील बाकी लहानांना रंग लावतात आणि रंगाची उधळण करतात.

तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या दिवशी रंग आणि पाणी यांची उधळण एकमेकांवर केली म्हणून ओळखले जाते. तर या तिसऱ्या दिवसाला पर्व म्हटले जाते. तर यालाच रंगपंचमी असेही म्हटले जाते.

होळी हा प्राचीन हिंदू सण आहे. हा उत्सव रंगांचा आहे,प्रेमाचा आहे आणि यालाच वसंत उत्सव म्हणूनही ओळखले जाते. भगवान विष्णु यांनी नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपू या असुरचा वध केल्यापासून हा सण साजरा केला जातो.

बंगाल मध्ये होळी खेळण्यास सुरुवात झाली असली तरी संपूर्ण भारतात आणि जगातही हा खेळ उत्साहात साजरा होतो. विशेष करून ब्रज प्रदेशातील होळी उत्सव पाहण्यासाठी लोक खूप गर्दी करतात. ब्रज प्रदेशातील कृष्णाच्या मथुरा, वृंदावन, बरसाना आणि नंदगावात मोठ्या प्रमाणात होळी खेळली जाते आणि म्हणूनच इथे पर्यटकांची गर्दी होते.

आपल्याकडील प्रत्येक सणाची वेगळी अशी कथा आणि त्यामागे काहीतरी इतिहास,काहीतरी कारणे आहेत. होळीच्या सणाला सुद्धा एक सुंदर कथा आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूचे परम भक्त होते. पण प्रल्हादचे वडील म्हणजेच हिरण्यकश्यपू हा एक क्रूर असुर होता. भक्त प्रल्हाद सतत विश्र्नुंचे नाव घेत असत जप करत असत हे हिरण्यकश्यपूल अजीबात आवडत नसे. कित्येकदा सांगूनही भक्त प्रल्हाद मात्र विश्र्नुंच्या नावाचा जप सोडण्यास तयार नव्हते. त्यामुळे हिरण्यकश्यपू खूप चिडला आणि भक्त प्रल्हाद ल आपल्याच मुलावर त्याने अनेक अत्याचार केले,त्यांना मारण्याचा प्रयत्न केला,खूप भयानक प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. कधी उंचावरून कडेलोट,तर कधी साखळीने बांधून टाकणं, कधी भल्यामोठ्या सापांच्या समोर सोडणे तर कधी आपल्या सैनिकांना त्यांना मारण्यास पाठवणे असे एक ना अनेक प्रकारे प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूने केला पण कोणत्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले नाही.

प्रल्हादाला विष्णु भक्ती पासून विमुक्त करण्यासाठी हिरण्यकश्यापूने त्याची असुर बहीण होलिका हिला बोलावले आणि ही कामगिरी तिच्यावर सोपवली. होलिकाल एक वरदान प्राप्त झाले होते त्यानुसार तिचे शरीर अग्नीत जळू शकणार नव्हते. प्रल्हादल मारण्यासाठी होलिका प्रल्हादला घेऊन आगीत उभारली. प्रल्हादच अफाट भक्तीमुळे त्यांना काहीच झाले नाही पण होलिका मात्र जळून राख झाली आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली ज्यावेळी वरदनाचा तू गैरवापर करशील त्यादिवशी जळून राख होशील आणि तसेच झाले. ज्या दिवशी ही घटना घडली तो दिवस होता फाल्गुन पोर्णिमेच्या. आणि म्हणूनच त्या दिवसापासून होळी साजरी केली जाते.

आपल्या संपूर्ण भारत देशात आणि नेपाळ मध्ये तसेच आग्रा,दिल्ली,जयपूर, बांगला देश तसेच पाकिस्तान मध्येही आपला होळी सण धूमधडाक्यात साजरा केला जातो.

बांगला देश : इथे होळी सणाची सुरुवात रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेरणेतून शांतिनिकेतन येथे झाल्याची दिसून येते. इथे होळी समोर गाऱ्हाणे, नवस बोलण्याची प्रथा आहे.

ब्रज : येथे होलीदिवशी पुरुष महिलांना रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात. ही उत्तर भारतातील प्राचीन तसेच प्रसिद्ध प्रथा आहे. ही प्रथा पाहण्यासाठी लोक दुर दुरून आवर्जून येतात. राधा कृष्णाने ही प्रथा पाडली आहे.

मध्य भारत : मध्या भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा रंगपंचमी या दिवसाला खूप महत्त्व आहे. लोक टोळी बनवून एकमेकांच्या घरी जाऊन रंग लावतात आणि “बुरा ना मानो होली है” असे म्हणतात.

उत्तर भारत : उत्तर भारतातील इंदौर मध्ये होळीची वेगळीच शान आहे. येथील सगळे लोक होळी दिवशी एकत्र येऊन राजवाडा या ठिकाणी जमतात आणि रंगीत पाण्याच्या टाक्या भरून या पाण्याने होळी खेळतात.

काही ठिकाणी भांग पिणे हा होलीचाच एक भाग आहे. नशेत मदमस्त होऊन एकमेकांची चूक माफ करून होळी साजरी केली जाते.

तर काही ठिकाणी लोक फुलांनी होळी खेळतात.

भारतातील काही व्रत-वैकल्ये आणि सण – २०२२

जाणून घ्या करवा चौथ व्रत, पूजा विधी आणि उद्यापन कसे करावे

आपल्या महाराष्ट्रात पहिल्या दिवशी होळीच्या गौर्या आणि लाकडे आणून होळी पेटवली जाते आणि अग्नीभोवती घरातील सगळी माणसे फेऱ्या म्हणजेच प्रदक्षिणा घालतात. होळीच्या गौर्य पाच शिमगा घेऊन नाच. असे म्हणतात. या दिवशी सगळे लोक नवे पारंपरिक कपडे घालतात. स्त्रिया साडी तर पुरुष धोतर किंवा कुर्ता पायजमा घालून नटून थटून राधा कृष्णाची पूजा करतात. तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यात कटाची आमटी,भात वरण, भजे, कुरडया आणि कोशिंबीर यांचा समावेश असतो. दुसऱ्या दिवशी रंग खेळून रंगपंचमी साजरी केली जाते.

या वर्षी येणारा होळी सण १७ मार्च २०२२ रोजी सुरू होत आहे.
१७ मार्चला होलिका दहन असून दुपारी १:२९ नंतर कुलाचार मुहूर्त आहे.
१८ मार्चला धुलीवंदन पौर्णिमा दुपारी १२:४७ पासून सुरु होत आहे.
तर २२ मार्चला रंगपंचमी आहे.

१. या खेळात आपण रंग खेळतो, ते रंग केमिकल्स युक्त तर नाहीत ना ? याची खात्री करूनच मग रंग खेळावे. आजकाल मिळणाऱ्या रंगात खूप रसायने मिसळलेली असतात त्याचा त्वचेवर आणि शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केमिकल विरहित नैसर्गिक रंग वापरावे.

२. रंग खेळताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. कारण रंग डोळ्यात गेले तर डोळ्यांच्या तक्रारी आणि विकार उद्भवण्याची शक्यता असते.

३. काही ठिकाणी भांग प्यायली जाते. या भांगेत काही नशायुक्त पदार्थ तर मिसळले नाहीत ना याचीही खात्री करूनच मग भांग प्यावी. नाहीतर शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

४. आपण रंग खेळताना पाण्याचा अती वापर करतो. पण हे चुकीचे आहे. आजही बऱ्याच भागात पाण्यासाठी लोकांना मैलोनमैल चालत जावे लागते किंवा पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळायला च हवा.

तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात असूद्या. सण हे सनासारखे साजरे करा. त्याचे पावित्र्य,महत्त्व जपा. तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!.

Leave a Comment

error: