Ritbhatmarathi

Search
Close this search box.

“अरे ए सावकाश….. काय घाई आहे…..??” प्रीती ओरडून दीपक ला सांगत होती… पण वार्‍याचा वेगा मुळे आवाज हवे सोबतच मागचा मागे निघून जात होता…..

प्रीती दीपक ला घट्ट बिलगून बाइक वर बसली होती….. दीपक ने नवीनच बाइक घेतली होती…. आणि तो आपल्याच धुंदीत रस्त्यावरील एक एक वाहनांना मागे टाकत चालला होता…..

“अग सावकाश चालवण्या साठी बाइक नाही घेतली……” दीपक हसत बोलला…

“अरे पण पुढे सिग्नल आहे…..” प्रीतीला काहीस ओरडूनच बोलावं लागत होत…..

एवढ्यात हिरवा सिग्नल जाऊन पिवळा सिग्नल ब्लिंक करू लागतो…..

“अरे हळू घे…. बाइक थांबव….” प्रीती बोलली…..

दीपक हसतच बोलला…

“अग ग्रीन म्हणजे जा….. रेड म्हणजे थांबा….. आणि यल्लो सिग्नल म्हणजे…. खूप जोरात जा…. सिग्नल रेड होण्या आधी…” अस बोलत त्याने बाइक ची मूठ पूर्ण वाढवली……

झेब्रा क्रोस्सिंग चा पांढर्‍या पट्ट्या ओलांडून तो काहीच अंतर गेला असेल….. इतक्यात रेड सिग्नल लागला….. आणि डावीकडून उजवीकडे जाणार्‍या साठी ग्रीन सिग्नल लागला….. त्यामुळे अचानक एकदम वाहने पूर्ण वेगाने जाऊ लागली…. पण यामुळे दीपक गोंधळला….. त्याने करकचून ब्रेक मारला….. कर्कश आवाज करत बाइक थांबली….. पण शेवटी तोल गेलाच आणि बाइक पडली…… पण वेगावर नियंत्रण झाल्याने ते फक्त खाली पडले…. जास्त लागलं नाही…. पण जेंव्हा दीपक खाली पडला होता तेंव्हा एक ट्रक दीपक चा अगदी जवळून निघून गेला…… प्रीती हे पाहून किंचाळलीच…..

चौकात उभे असलेल ट्रॅफिक वाले पोलिस पळतच त्यांचा जवळ आले….. त्यांना उठायला मदत केली आणि बाजूला घेऊन बाइक ची चावी काढून घेतली…..

दीपक आणि प्रीती आता सावरले होते…..

“लायसन्स दाखवा….” पोलिस बोलले…..

दीपक ने लायसन्स दाखवलं….

त्यांनी ते पाहून खिशात ठेवलं…..

“तुम्ही सिग्नल मोडलात….. 500 रुपये दंड भरा….” पोलिस बोलले

“अहो मी कुठे मोडला सिग्नल …… थांबा एक मिनिट….” दीपक ने खिशातून मोबाइल काढला…..

“तुम्हाला दाखवतो माझे बाबा कोण आहेत ते….” दीपक कोणाला तरी फोन लावत बोलला….

पोलिस हसले……

“मघाशी जो ट्रक तुझा डोक्याचा बाजूने गेला… तोच जर 4 इंच अलिकडून…. तुझा डोक्याचा वरुन गेला असता तर आम्ही तुझा बाबांना तुझी डेड बॉडी दाखवली असती….. आणि म्हटलं असत… बघा कोण आहे ते….”

दीपक स्तब्ध झाला….. त्याने फोन कट केला आणि खिशात ठेवला…..

“पण काका…. मी तर रेड सिग्नल लागण्या आधी रस्ता पार करत होतो…..” केविळवान्या आवाजात तो बोलला…..

“अरे बाळ…. हेच तर तुम्ही लोक गफलत करून घेता…. येल्लो सिग्नल चा बाबतीत…. लाल आणि हिरवा दोनच सिग्नल ला महत्व देता…. पण खरा महत्वाचा सिग्नल आहे तो येल्लो सिग्नल….”

पोलिस समजावून सांगत होते….

“ते कस काय…” दीपक बोलला….

“हे बघ हिरवा सिग्नल म्हणजे तुम्ही जाऊ शकता…..  आणि लाल म्हणजे थांबा…. पण या दोन्ही सिग्नल चा जो दुवा आहे तो येल्लो सिग्नल…… समज फक्त दोनच सिग्नल आहेत रेड आणि ग्रीन…. तर विचार कर ग्रीन चालू असताना अचानक रेड सिग्नल लागलाय….. काय होईल मग..?? लोक जागेवर गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतील….. वेगावर नियंत्रण राहिलच अस नाही…. कितीतरी अपघात होतील…….. म्हणून असतो येल्लो सिग्नल…..ग्रीन सिग्नल चालू असताना येल्लो सिग्नल ब्लिंक करतो याचा अर्थ काही वेळाने रेड सिग्नल लागणार आहे…. म्हणून तुम्ही तुमचा वाहनाचा वेग कमी करा……आणि रेड लागला की थांबा…..”

“हो काका, आल लक्षात…. धोक्याची पूर्वसूचना म्हणजेच यल्लो सिग्नल…..” दीपक बोलला….

“चावी आणि लायसन्स द्या ना…. पुन्हा अशी चूक होणार नाही….” दीपक पुढे बोलला….

“आधी पावती…..म्हणजे परत कधी यल्लो सिग्नल विसरणार नाही….”

दीपक प्रीती आणि पोलिस हसू लागले……

दारावरची बेल वाजली……किरण अभ्यास करत बसला होता… बेल ऐकून तो उठला आणि दार उघडल…. दारात त्याचे बाबा उभे होते…..

“किती उशीर बाबा…” किरण बोलला…..

त्याचे बाबा हसतच आत आले…”अरे ट्रॅफिक पोलिस म्हणजे असच असत…..”

बाबा जाऊन सोफ्यावर बसले…..

पाणी घेऊन किरण ची आई बाहेर आली….

बाबांनी पाणी एका घोटा मध्ये संपवून टाकलं….

“का हो… आज खूपच थकल्या सारखं वाटताय…..” आई काळजी चा स्वरात बोलली….

“काही नाही ग…. नेहमीचच…… छातीत जळजळ…. अस्वस्थ वाटत….” बाबा बोलले…

“अहो मग डॉक्टर कडे तरी जाऊन यायचं….” आई बाजूला बसत बोलली….

“डॉक्टर काय करणार आता… माझी नोकरीच अशी आहे… त्याला डॉक्टर काय करणार…. दिवसभर ट्रॅफिक मध्ये उभ रहाव लागत….. वाहनांचा धूरात श्वास घ्यायचा…. कानावर सतत ते कर्णकर्कश हॉर्न…… ऊन असो वा पाऊस…. उभ राहायचं शेतातील भुजगावण्या सारखं……त्यातून पण हुज्जत घालणारे भेटतात ते वेगळेच…….” बाबांचा आवाजात नाराजी होती…..

“अहो पण बाबा… एकदा पूर्ण आरोग्य तपासणी करून घ्यायला काय हरकत आहे….” किरण बोलला…….

“अरे काही गरज नाही….. बरा आहे रे मी… पित्त झालय फक्त….येताना मेडिकल मधून घेऊन आलोय मेडिसीन मी….” बाबा टॅब्लेट दाखवत बोलले………

“ते काही नाही तुम्ही उद्याच जाऊन तपासणी करून घ्यायची….” आई बोलली…..

“ठिकय … उद्या नक्की… चला जेवू खूप भूक लागलीय…..

डॉक्टर लक्ष देऊन रीपोर्ट वाचत होते…. समोर आई बाबा आणि किरण बसले होते…..

आई काळजीचा स्वरात … “डॉक्टर… काय झालं….सर्व ठीक आहे ना…??”

डॉक्टरांनी वर पाहिलं…. रीपोर्ट टेबल वर ठेवून बाबांकडे पाहत बोलले…..

“काय काम करता तुम्ही..???”

“मी ट्रॅफिक पोलिस मध्ये आहे….” बाबा बोलले…… “हम्म…… छातीत जळजळ होणे….. अस्वस्थ वाटणे….. पाठ दुखणे….. असले त्रास होतात का….??” डॉक्टर गंभीर आवाजात बोलले……..

“हो…अगदी असच होत….” बाबा बोलले…..

“कधी पासून होतय हे…??”

“खूप दिवस झाले…. अगदी नेहमीचा त्रास आहे हा….”

“अहो मग इतके दिवस तपासणी का करून नाही घेतली……??”

“मला वाटलं पित्ता मुळे होत असेल म्हणून….पण काय झाल डॉक्टर…?? “

“तुमचा रक्तवाहिन्यांत ब्लॉकेज आहेत…. “ डॉक्टर बोलले…

“अरे देवा….” आई खूपच घाबरल्या….

“एवढं घाबरण्या सारखं नाहीये….. पण सरजरी करावी लागेल……”

“अहो पण डॉक्टर… आस अचानक कस झाल….??” बाबा स्वत:ला सावरत बोलले….

“अचानक कधीच काही होत नसत…. तुमचाच भाषेत सांगायचं म्हटलं तर मला सांगा….. ट्रॅफिक सिग्नल मध्ये किती प्रकारचे सिग्नल असतात…..??” डॉक्टर समजावत होते….

“तीन…. एक हिरवा…. लाल आणि पिवळा…. “ बाबा बोलले…

“त्यांचा अर्थ…??”

“हिरवा म्हणजे जा… आणि पिवळा म्हणजे लाल दिव्याची पूर्वसूचना……. आणि लाल म्हणजे थांबा……” बाबा बोलले….

“अगदी बरोबर…..यातील पिवळा दिवा सर्वात महत्वाचा…… म्हणजे बघा तुम्ही हेल्दी आयुष्य जगताय म्हणजे….. हिरवा दिवा चालू आहे… आणि तुम्ही आजारी पडलात म्हणजे लाल दिवा…. पण याचा मधील काळात आजारी पडण्या आधी धोक्याची सूचना म्हणून पिवळा दिवा लागलेला असतो…. पण आपण तिकडे लक्ष देत नाही….. तो पिवळा दिवा म्हणजे छातीत जळजळ…. अस्वस्थ वाटणे…. अजून बरच काही……. आपण जर का ती धोक्याची सूचना ओळखली तर सिग्नल लाल होण्या आधी थांबून स्वत:ला वाचवू शकतो…. म्हणून अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा……योग्य पथ्य पाळले आणि उपचार घेतले तर पुन्हा हिरवा दिवा चालू तुमचा…….काय बरोबर ना?”

“हो अगदी बरोबर आहे…. खूप दुर्लक्ष केल मी …पण डॉक्टर आता पुढे काय…???” बाबा बोलले….

“जास्त मोठी सर्जरी नाहीये… पण करावी लागेल… म्हणजे आता सिग्नल तोडलाय तर पावती करावीच लागेल ना…” डॉक्टर हसत बोलले….

आई बाबा आणि किरण पण हसू लागले…..