Skip to content Skip to sidebar Skip to footer

जाणून घ्या माता लक्ष्मी सोबत गणेश पूजन का केले जाते?

why ganesh and lakshmi are worshipped together:

why ganesh and lakshmi are worshipped together: मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात अनेक देव, देवता आहेत. प्रत्येक देवी, देवतेच्या आरधने मागे काही खास उद्देश असतो. जसे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता म्हणजेच संकट दूर करणारे दैवत, देवी सरस्वती ही विद्येची देवी म्हणून ओळखली जाते, भोलेनाथ शंकर हे लवकर प्रसन्न होणारे दैवत तर श्री रामांचा परमभक्त हनुमान यांची उपासना भय मुक्त होण्यासाठी केली जाते.

त्याचप्रमाणे माता लक्ष्मी ही नावा प्रमाणेच लक्ष्मी म्हणजेच धन देणारी आहे. या जगात असा एकही व्यक्ती सापडणार नाही ज्याला धनाची अपेक्षा नाही. त्यामुळे अर्थातच सारे विश्व या माता लक्ष्मी ची पूजा करते आणि पैशा साठी व्याकूळ होऊन तिच्या समोर हात पसरते. याच गोष्टीचा गर्व देवी लक्ष्मीला झाला. देवता असल्या तरीही गर्व, अहंकार, अभिमान या भावना त्यांनाही होत्याच आणि गर्व करणे हे आपल्या मानावा प्रमाणेच त्यांच्या साठीही चुकीचेच ठरले.

देवी लक्ष्मीला झालेला गर्व पाहून भगवान विष्णू त्यांना म्हणाले, देवी लक्ष्मी तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी सगळे जग तुम्हाला विनवणी करते हे खरं आहे पण जीच्याकडे धन याचना केली जाते तीच देवी अपूर्ण आहे, कारण जोपर्यंत एखादी स्त्री आई होत नाही तोपर्यंत त्या स्त्रीला पूर्णत्व प्राप्त होत नाही. तुम्हाला मुल नसल्या कारणाने तुम्ही अपूर्ण आहात. देवी लक्ष्मीला हे ऐकून खूप वाईट वाटले आणि त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला म्हणजेच पार्वतीला त्यांचे दुःख सांगितले.

१२ ज्योतिर्लिंग आणि त्यांचे महत्व

पितृपक्षामध्ये हे उपाय करून आपल्या पितरांचे आशीर्वाद घ्या

माता पार्वतीने देवी लक्ष्मीचे दुःख ऐकून स्वतःचा पुत्र म्हणजेच गणपती बाप्पा त्यांना दत्तक दिले. तेव्हापासून गणपती बाप्पा देवी लक्ष्मीचे दत्तकपुत्र म्हणून ओळखले जातात. लक्ष्मी देवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी गणपती बाप्पाला असे वरदान दिले की, जिथे जिथे माझ्या सोबत तुझी म्हणजेच गणपती बाप्पाची पूजा केली जाईल तिथे तिथे मी वास करेन. म्हणूनच माता लक्ष्मी सोबत गणपती बाप्पाची ही पूजा केली जाते.

याने पैसा जवळ रहातो आणि गणपती बाप्पाची कृपा ही रहाते.

===================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.