खरंच आयुष्य किचकट असते का ??

- अपर्णा कुलकर्णी

आयुष्य किती गुंतागुंतीचे आणि किचकट असते ना. जगणं ही एक कला आहे आणि ती कला अवगत झाली पाहिजे तर आणि तरच जगण्याचा आनंद लुटता येतो.

पण कधी कधी आयुष्य इतके अनपेक्षित वळण घेते ना ज्याची आपण स्वप्नातही कल्पना केलेली नसते. जगण्याचा रादर जीवंत असण्याच त्रास होतो.

प्रत्येकाच्या आयुष्यातील निर्णय चुकतात. माणसं आहोत आपण. चुका तर होणारच. संत महात्मे चुकले, त्यांना कष्ट भोगावे लागले तर मग आपण तर अगदीच सामान्य माणसं आहोत.

या चुकीच्या निर्णयामुळे रोज आपल्याला नको असलेल्या गोष्टींना सामोरे जावे लागते, इच्छा नसतानाही बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, मन मारावे लागते.

एक सल आयुष्यभर तशीच रहाते आणि काही चुकीच्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या की ती सल मान वर काढते.

मी असं केलं असतं तर ?? किंवा आयुष्याची काही वर्षे मागे जाता आल तर ?? अशा कधीच शक्य नसणाऱ्या शक्यता मनात यायला लागतात, खूपच त्रास होतो.

पण जरा शांतपणे विचार केला तर लक्षात येईल की हा इतका मनस्ताप अशासाठी की हा त्रास आपल्याला आपलीच माणसे देतात म्हणून होतो.

उगाचच साठवून ठेवलेला राग, तिरस्कार, रुसवे फुगवे, मान अपमान, कुरघोडी यामुळे आपले आयुष्य आपणच किचकट करतो.

खरतर आयुष्य किती क्षणभंगुर आहे. त्यात नवीन रोगांनी ते अजुनच बेभरवशी झाले आहे. आणि आपण किती छोटे, आखूड, कूंचीत विचार करून ते अजुनच अवघड करतो आहोत असे वाटत नाही का ??

त्यापेक्षा आपले मन थोडे मोठे ठेवले, विचार प्रगल्भ आणि वृत्ती समंजस ठेवली तर सगळेच सुखी राहू ना.

Thank You

Yellow Heart
Yellow Heart