वैटिंग फॉर ट्रिंग ट्रिंग

©️®️ वृषाली मोरे
टण टण टण असा आवाज येताच, सगळी गर्दी एकाच जागी येऊन थांबायची ती म्हणजे ‘शाळा’. शाळा म्हणजे काळा फळा, पांढरे खडू आणि एक डस्टर. हातात एक हजेरीची वही, एक लाकडी पट्टी आणि एक पुस्तक घेऊन येणारे शिक्षक आणि ते येताच एक साथ नमस्ते असा घुमणारा आवाज……… हे सगळं म्हणजे काल पर्यंतची शाळा….
दिवस जातील तशी बदललेली शिक्षण पद्दती आणि बदलेले मुलांचे वेळापत्रक हे सगळंच आधुनिकतेकडे वाटचाल करताना दिसत आहे, पण कुठेतरी असा विचार मनात येऊन गेला या कोरोनाच्या नावाखाली सगळ्यात मोडकळीस आलेली शिक्षण संस्था आणि शिक्षणपद्दती.
शाळा ऑनलाईन सुरु आहेत, शिक्षक विडिओ,ऑडिओ अश्या वेगवेगळ्या पद्दती वापरून मुलांना शिकवत आहेत पण यात खरंच मुलं शिकत आहेत का??? शाळा बंद असल्यामुळे पालक वर्गाकडून म्हणावा असा पैशाचा भरणा येत नाही त्यामुळे शिक्षक वर्ग हा पगारावाचून त्रस्त आहे, या सगळ्यात ऑनलाईन का होईना शिक्षण सुरु ठेवण्यात सगळ्या शैक्षणिक संस्था यशस्वी झाल्यात. खरंच या सगळ्यात मुलांचा पाया पक्का होत आहे का?
शिक्षण हा देशाच्या आर्थिक विकासाचा पाया म्हंटलं जातं, मग अश्या बदलेल्या पद्दतीने हा पाया खरंच भक्कम होता आहे का हे सगळ्या पालक वर्गाने विचार करण्याची गरज आहे. डिजिटल इंडिया या मार्गी बरेच अँड्रॉइड ऍप्लिकेशन्स आता उपलब्ब्ध आहेत आणि मुलं त्या त्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न पण करत आहेत.
कोरोनाच्या काळात या विध्यार्थी वर्ग हा फक्त अट्टेण्डन्स पुरता मर्यादित राहिलाय कारण सगळ्याच परीक्षेत उत्तीर्ण होण्याची खात्री झालीय आहे, याच गोष्टीमुळे मुले अभ्यास न करता फक्त ऑनलाईन हजेरी लावत आहेत.
पालकांवर आलेल्या या विचित्र परिस्थितीचा खरंच विचार होणं गरजेचं आहे. कोरोना आणि त्यामुळे विस्कळीत झालेला जीवन यात दोष कोणाचाच नाही, पण या उभ्या झालेल्या प्रश्नाचा पण विचार होणं गरजेचं आहे. तरीही जमेल तश्या पद्दतीने स्त्री वर्ग घरी मुलांची तयारी करून घेत आहेत, शाळा जवळ जवळ आता बंदच अश्या आनंदात असेलेला लहान मुलांचा गट आणि चिंतेत असेलेला पालक वर्ग यांची चाललेली स्पर्धा याचा मेळ बसणं अवघड झालाय, परंतु लवकरच टण टण च्या ऐवजी ट्रिंग ट्रिंग अशी बेल रिंग वाजेल आणि शाळेच्या ऐवजी स्कूल उघडतील अशी आशा ठेवू. तरी सुद्धा तमाम पालकवर्गाचा हेवा वाटावा तेवढा कमीच आहे कारण ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समजून घेण्यात ते पून्हा एकदा यशस्वी पालक म्हणून सिद्ध झाले आहेत.
=====================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/