Skip to content Skip to sidebar Skip to footer

जाणून घ्या भगवान विष्णू, ब्रह्म आणि शिव ह्यांची उत्पत्ती कशी झाली.

vishnu avatar: आपल्या हिंदू संस्कृतीत प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते. ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते, शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते. भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्याची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते. आपले जीवन सुखी आणि सोपे झाले तर जगणे सुसह्य होऊन जाते. त्यामुळेच आपण सगळे विष्णूंची उपासना करतो.

ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च देवतेच्या त्रिमूर्तीमध्ये विष्णूला “संरक्षक” म्हणून ओळखले जाते. वैष्णव परंपरेत, भगवान विष्णू हे विश्वाची निर्मिती, संरक्षण आणि परिवर्तन करण्यामध्ये सर्वोच्च स्थानी आहेत.

जेव्हा जेव्हा जगाला वाईट, अराजकता आणि विध्वंसक शक्तींचा धोका असतो, तेव्हा विष्णू अवतार घेऊन वैश्विक व्यवस्था पुनर्संचयित करतो आणि धर्माचे रक्षण करतो.

पण या देवतांची उत्पत्ती कशी झाली ?? याचा आपण कधी विचार केला आहे का ?? खरतर याचे ही पुराणिक कथेनुसर किंवा पुरणा नुसार वेगवेगळे संदर्भ आहेत.

१. विष्णुपुराणानुसार ,बाल विष्णू पिंपळाचे पानातून जन्माला आले, महाविष्णूच्या नाभीतून कमळ तयार झाले ज्यामध्ये ब्रह्मदेव आणि विष्णूचे नयनातून शिव उत्पन्न झाले.

२. पौरणिक कथेनुसार जेव्हा शिव आपल्या मस्तकावर अमृत चोळत होते तेव्हा त्यातून एक पुरुष जन्माला आले तेच श्री विष्णू देव, हे एक शिवाचे प्रतीक आहे, आणि भगवान शिवांनी श्री विष्णू नावाने हाक मारली. एकदा श्री विष्णू क्षीरसागरात झोपलेले असताना श्री विष्णूंच्या नाभीतून कमळ उत्पन्न झाले आणि त्यातून श्री ब्रम्हदेव यांची उत्पत्ती झाली. म्हणून हे शिवाच्या अंशातून झाल्यामुळे त्रिदेव म्हणून संबोधले गेले. श्री विष्णूंना संपूर्ण विश्वाचे पालनहार मानले जाते. तर ब्रम्हदेव हे विश्वाची निर्मिती करणारे आणि शिव हे संहार करणारे आहेत.

सृष्टीच्या कल्याणकारता देवी देवतांनी नेहमीच अवतार धारण करून जनतेचे रक्षण केले हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यातील भगवान विष्णू हे अवतार धारी म्हणून ओळखले जातात. कारण सृष्टीच्या कल्याणासाठी त्यांनी तब्बल चोवीस अवतार धारण केले आहेत. म्हणूनच
हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार ‘दशावतार’ स्वरूपात प्रसिद्ध आहेत.

विष्णूचे २४ अवतार (24 avatars of vishnu)

१. सनकादि
२. पृथु
३. वराह
४. यज्ञ (सुयज्ञ)
५. कपिल
६. दत्तात्रेय
७. नर-नारायण
८. ऋषभदेव
९. हयग्रीव
१०. मत्स्य
११.कूर्म
१२. धन्वन्तरि
१३. मोहिनी
१४. गजेन्द्र-मोक्षदाता
१५. नरसिंह
१६. वामन
१७. हंस
१८. परशुराम
१९. राम
२०. वेदव्यास
२१. बलराम
२२. कृष्ण
२३. श्री विठ्ठल
२४. कल्कि (kalki avatar of vishnu)

हा भगवान विष्णूंचा पाहिला अवतार म्हणून ओळखला जातो. आधुनिक जीवशास्त्राचे असे म्हणणे आहे कि सर्वप्रथम पृथ्वीवरचा एकपेशीय जीव पाण्यात जन्मला. हा जीव पेशींची विभागणी करून प्रजोत्पादन करू लागला asmk त्यातूनच मग बहुपेशीय सजीव निर्माण झाले. जे सजीव जन्माला आले ते सगळे लैंगिक प्रजोत्पादन करणारे जीव होते. मासा हा त्यातील सर्वात विकसित जीव आहे. म्हणूनच याचे प्रतीक म्हणून पाहिला अवतार हा मत्स्यावतार आहे. तसेच हा वैदिक प्रजापती व विष्णूचा पहिला अवतार आहे.

मत्स्य अवतार मागे एक रंजक कथा आहे.

सत्यव्रत मनु सकाळी सूर्यदेवला अर्घ्य देत होता तेव्हा त्याच्या कमंडलूमध्ये लहान मासा अचानक आला . माशा पाण्यात परत फेकून देण्याच्या वेळी, त्या माशाच्या बाजूने मनुला असे वाटत होते की इतर राक्षस , त्याला खाईल. त्यामुळे मनुने मासा एका छोट्या कलश मध्ये ठेवला. दया आणि धर्मानुसार हा राजा आपल्या कमंडलूमध्ये मासा घेऊन राजवाड्याचे दिशेने निघाला, पण, रात्रीच्या वेळी, मासा मोठा झाला आणि म्हणून त्याला एका कलश मधुन हलवावे लागले.नंतर तो मोठ्या कुंभामध्ये ठेवला तरीही मासे वाढतच राहिले आणि म्हणून मनुने तळ्यात फेकले. तथापि, मासे वाढतच गेला आणि विशाल आकारात वाढला की मनुला समुद्रात टाकण्यास भाग पाडले गेले. माशाने नंतर एक भविष्यवाणी केली की सात दिवसांत मोठा पूर येईल परंतु या आपत्तीबद्दल मनू तू काळजी करू नको. मग माशाने त्याला विशाल मोठी बोट पाठविली. माशाने मनुला जगातील सर्व प्राण्यांच्या जोड्या आणि सर्व वनस्पतींचे बियाणे भरण्यास सांगितले. पुराच्या वेळी, वासुकी सापाला दोर वापरून माशाला बांधली

त्यानंतर विष्णू विशाल माशाच्या रूपात पुन्हा दिसले, यावेळी सोनेरी तराजू आणि एकच शिंग घेऊन जहाज घेऊन गेले. सर्व प्रजाती तातडीने त्याच्या प्रचंड सर्व बोटीत चढले. काही काळानंतर, जसा माशाच्या अंदाजानुसार महासागर हळू हळू आणि अविश्वसनीयपणे उठला आणि जगाला पूर आला आणि म्हणूनच, पूरातून वाचून,पृथ्वीवरील जीवनाच्या सर्व प्रजाती आपत्तीजनक पूरातून वाचल्या आहेत,पुर कमी झाल्यावर सर्व प्रजातींना निर्सगमय प्रदेशात नेले आणि मासा मानवजातीचा संस्थापक बनला.

मासा या पहिल्या अवतरातून उद्भवलेल्या जलचर प्राण्यांतून उत्क्रांती होत-होत मग उभयचर प्राणी निर्माण झालेत. कूर्म हा एक उभयचर प्राणी होता. त्याचे प्रतिक म्हणून कूर्मावतार. कूर्माचे आयुष्यपण इतर प्राण्यांपेक्षा जास्तच असते.

समुद्रमंथनाचे वेळी जेंव्हा मेरू पर्वताची रवी करून देव व दैत्य हे त्यास घुसळू लागले, तेंव्हा मेरू पर्वताची उंची ही समुद्राच्या खोलीपेक्षा कमी पडली.त्यामुळे मेरू पर्वत बुडू लागला. तेंव्हा विष्णूने कूर्मावतार घेऊन आपल्या पाठीवर त्यास तोलून धरले अशी आख्यायिका आहे.

हा विष्णूचा तिसरा अवतार. उभयचर प्राणी मधूनच मग जमिनीवर राहणारे प्राणी उत्पन्न झाले. त्या प्रण्यातील एक म्हणजे वराह अवतार होय. हा प्राणी आपल्या खास चार वैशिष्ट्यांमुळे सर्व प्राण्यात उठून दिसतो.
१. त्याची प्रजननशक्ती
२. त्याचे तीक्ष्ण घ्राणेंद्रीय जे सुमारे ८ ते १० किमी अंतरावरील तसेच जमिनीच्या खाली सुमारे ८ मीटर अंतरावरील वस्तूसुद्धा वास घेऊन हुडकू शकते.म्हणजेच माग काढण्याचे कौशल्य.
३.झाडांना आपल्या सुळ्याद्वारे समूळ उखडून टाकण्याचे कौशल्य. समूळ उच्चाटन करणे हा भाव.
४. हाडांचादेखील चूरा करू शकणारा मजबूत ताकतीचा जबडा.

वराहावतारात विष्णूने पृथ्वी उचलली असा समज आहे. वराह हा राजशक्तीचे प्रतिक आहे. राजाच्या अंगी आवश्यक असणारे सर्व गुण त्यात आहेत असा समज आहे.

हा अवतार श्री विष्णूंनी भक्त प्रल्हाद साठी घेतला होता हा त्यांचा चौथा अवतार. आपल्या भक्तासाठी देव काय करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे असे म्हणायला हरकत नाही. नरसिंह म्हणजे अर्धा नर व अर्धा सिंह(वनचर). या अवतारात श्रीविष्णूने आपल्या प्रल्हाद या भक्ताची जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ही श्रद्धा व धारणा नक्की केली.

हा विष्णूंचा पूर्ण अर्थाने मानव अवतार. पुढे मानवात अजून उत्क्रांती होत गेली.तो जीवनापयोगी व जीवन राखण्यास आवश्यक ती साधने बनवू लागला. त्याने धातूचा वापर सुरू केला.परशुसाठी धातूचे पाते वापरणारा तो परशुराम. त्यांनी या परशुच्या जोरावर २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रीय केली.तसेच भारतातील कोकण गोवा व केरळ ही किनारपट्टी मागे हटवून स्वतःसाठी भूमी तयार केली. याशिवाय भीष्म द्रोण व कर्ण यांना धनुर्विद्या शिकविणारे हेच होते. हा अवतार म्हणजे ब्राह्मतेज व क्षात्रतेज याचा मिलापच होता.त्यामुळेच या अवताराला खूप महत्त्व आहे.

वामन म्हणजे बुटका, बुद्धीचा वापर करणारा असा वामन अवतार. या अवतारात विष्णूंनी आपल्या बुद्धीने पौराणिक बली असुर राजा याला पातळात पाठवले होते.

श्री विष्णूंच्या महत्त्वाच्या अवतारांपैकी असलेला हा राम अवतार. परशुराम यांच्या पुढची उत्क्रांती म्हणजे राम अवतार.
परशु हे शस्त्र असे आहे कि त्याचा शत्रुवर फार जवळून वापर करावा लागतो.त्यामध्ये शत्रुचा वार आपल्यावर देखील होण्याचा संभव असतो. यासाठी स्वतःस सुरक्षित ठेवून, दूरवर मारा करता येण्याजोगे शस्त्र धनुष्य व बाण वापरणारा हा राम. त्यामुळेच हा परशुरामाच्या पुढचा उत्क्रांतीचा अवतार ठरला. राम व कृष्ण यांना पूर्णावतार म्हणतात कारण यांनी जीवनाचे चारही आश्रम भोगले. जन्मापासून मृत्यूपर्यंत देहाच्या सर्व अवस्था पार केल्या. रामबाण हा प्रख्यात शब्द रामाच्या बाणावरूनच आला. अचूक वेध घेण्याचे कौशल्य असा या शब्दाचा अर्थ होतो.

व्रताच्या भोजनात कांदा,लसूण का वापरत नाहीत??

जाणून घ्या तुळशीचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आणि फायदे

१२ ज्योतिर्लिंग आणि त्यांचे महत्व

पंचमहाभुतांचा तेजःपुंज अवतार असलेला कोल्हापूरचा ज्योतिबा माहिती आणि कथा

पुराणानुसार विष्णूचा नववा अवतार हा हरी हा आहे अर्थात पांडुरंग. हा अवतार पण श्री विष्णूने भक्तासाठी घेतलेला होता आणि तो भक्त म्हणजे भक्त पुंडलिक. पुंडलिक हे विठोबा चे खूप श्रेष्ठ भक्त होते. त्यामुळेच श्री विष्णू भक्त पुंडलिकासाठी पंढरपूर नगरीमध्ये अवतरीत झाले होते , तसेच बाबाजी चैतन्य महाराज यांच्या ” राम कृष्ण हरी ” या मंत्रा अनुसार जर विचार केला तरीसुद्धा त्रेतायुगातील अवतार हा पुरुषोत्तम शिरोमणी भगवान राम , तर द्वापार युगातील कृष्ण आणि त्रेतायुगात पांडुरंग म्हणजेच हरी आहेत.

हा श्री विष्णूंचा आठवा आणि पूर्ण अवतार. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला.

श्री कृष्णाच्या जन्माची कथा तर सगळ्यांनाच माहीत आहे. लग्न झाल्यानंतर कृष्णाची माता देवकी आणि पिता वसुदेवला मथुरेचा राजा कंस रथात घेऊन जातात. मग आकाशवाणीत “देवकीचा पुत्र तुझा वध करेल” हे ऐकून मामा कंस भयभीत होऊन , देवकी आणि वसुदेवला कैदेत ठेवले होते आणि तिची पहिली सात अपत्ये जन्मताक्षणी ठार केली. आठवे अपत्य जन्माला येताक्षणी वसुदेवाने त्याला आपला गोकुळातील मित्र गोपमहाराज नंदचा घरी नेले.

श्री कृष्णाच्या जीवनात त्यांना अनंत अडचणी आणि दुःख भोगावे लागले होते. म्हणूनच त्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू काहीतरी शिकवण देऊन जातो. जगण्याचा मार्ग दाखवतो. श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. श्री कृष्णाने त्यांच्या पूर्ण आयुष्यात कर्तव्य पूर्ती केलेली पाहायला मिळते. कृष्ण या शब्दाचा अर्थ “काळ्या मुखवर्णाचा” आणि ” आकर्षित करणारा” असा होतो. पराक्रमी,मुष्टीयोद्धा,उत्कृष्ट सारथी, सखा आणि तत्त्वज्ञानी होता कृष्ण.

पुराणांमध्ये भगवान विष्णूचे २४ अवतार सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचं सांगितलं जातं. इंद्रद्युमन या राजाने अवंती प्रांतावर राज्य केले आणि पुरी मध्ये भगवान जगन्नाथ ची मूर्ती स्थापन केली. हाच श्री विष्णूंचा एक अवतार मानला जातो. दरवर्षी ओडिशा पुरी इथं असलेल्या जगन्नाथ मंदिरातून जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा काढली जाते. प्रत्येक वर्षाच्या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितियेला ही रथयात्रा सुरू होते. जगन्नाथ मंदिर भारतदेशातील चार धाम पैकी एक आहे. भगवान जगन्नाथची रथ यात्रा जगन्नाथपुरी येथे आषाढ शुक्ल द्वितीयापासून सुरू होते आणि दशमी तिथीला संपते.

पौराणिककथेनुसार,मोहिनी ही विष्णू हिंदू देवतांचे एकमेव स्त्री रूप आहे. तर समुद्र मंथन वेळी असुरांना अमृत मिळू नये यासाठी विष्णूंनी मोहिनी रूप नावाप्रमाणे मनमोहक धारण केले होते असेही म्हटले जाते. या रुपात विष्णूने भस्मासूराच्या वध केला, श्रीविष्णूने मोहिनीरूप घेऊन याला सुदर्शनचक्राने दैत्यासुर स्वरभानु (राहू/केतु) शिरच्छेद केला. असुर स्वरभानु (राहू/केतु) हा असुर विप्रचिती आणि सिंहिका यांचा मुलगा आहे.

स्वामी नारायण म्हणजे नार-नारायण . स्वामी नारायण यांनी बद्रीवन येथे तपश्चर्या केली होती. स्वामीनारायण संप्रदाय गुजरातमधील श्री स्वामीनारायण मंदिर, अहमदाबाद येथे आहे. तेथे नर-नारायणाच्या पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते. महाभारत पौराणिकनुसार , कृष्णा हे नारायणाचे रुप, अर्जुन हे नराचे रुप होते.

धन्वंतरी म्हणजेच औषधांची देवता आहे. आजार, रोग नष्ट करणारी देवता म्हणजे धन्वंतरी. देव आणि दैत्य समुद्रमंथन करत होते तेव्हा चौदा रत्न निघाले. त्यांपैकी एक म्हणजे विष्णू अवतार देव धन्व॔तरी होय. धन्वंतरी अमृतकुम्भ घेऊन आले होते. भारतात धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. या दिवशी पैशांची पूजा केली जाते. हा ही विष्णूचा अवतार आहे. हा अवतार घेऊन श्री विष्णूने सर्वांच्या आरोग्याचे रक्षण केले आहे.

=======================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.