
©Manu Gholap
मुरली ….साहेबांची बॅग घेऊन घरात जा… आक्काने फर्मान सोडले…गाडीतून नवीन लग्न झालेली राधा आणि समीरची जोडी बाहेर आली. आक्काच्या पाया पडत होती इतक्यात आक्कने त्यांना अडवले आणि ती म्हणाली….
अरे नाही मी तर फक्त केअर टेकर आहे या घरात…हा मान तर मोठया ताईंचा तूझ्या आई वडिलांचा..जा बघू आधी त्यांच्या पाया पड ..नको आक्का म्हणून समीर राधाला घेवून बेडरूममध्ये गेला.तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसता…… तुम्हाला एक विचारू…..तुम्ही आई बाबांना भेटायला नाही का म्हणालात??……हे बघ इथे गपचुप राहायचं… जास्त प्रश्न विचारून माझं डोकं खायचं नाही…. तुला भेटायचं तर भेट आईबाबांना….. माझं मी बघेन..
जास्तीच भाषण उगा द्यायचं नाही कळाल…. तुझं आणि माझं लग्न फक्त नावाला झालंय… मला ना तुझ्यात इंटरेस्ट आहे ना आईबाबंमध्ये…. कळलं का….अहो मग कशाला लग्न केलं माझ्याशी….काय आहे…. माझ्या आई वडीलाना तू आवडलीस आणि त्यांना नाही म्हणणं योग्य नव्हतं माझ्यासाठी कारन मी नाही म्हंटल तर मला प्रॉपर्टीतून बेदखल करण्याची सूचना दिली होती त्यांनी मला….आणि अजून एक मी मायावर प्रेम करतो तेव्हा तुला फक्त नावाची बायको म्हणून राहावे लागेल बरं….. तुला पाहिजे तर तू स्वत: हुन या नात्यातून बाहेर पडू शकतेस…
असे बोलून समीर निघून गेला. संसाराच्या स्वप्नांचे पंख पसरून उडण्याचे प्रेमबंधात अडकून स्वतःस विसरण्याचे स्वप्न पाहिले होते मी मखमली भविष्याचे तुझ्यात मला शोधण्याचे तुला माझ्यात रुजविण्याचे स्वप्न पाहिले होते मी मखमली भविष्याचे स्वप्नांच्या चंद्राला जणू ग्रहण लागले मनाच्या आनंदी कप्प्याला जणू दुःखाने घेरले पाहिलेले स्वप्न भविष्याचे आज चुर.. चुर जाहले….
पाहिलेले स्वप्न भविष्याचे आज चुर.. चुर जाहले…. स्वतः शी बोलत राधा आसवांच्या तळ्यात तिने पाहिलेले मखमली भविष्य शोधत होती. मनमोकळे होईपर्यंत ती रडली पण संसाराचा घेतलेला वसा मध्येच न सोडण्याचा निर्णय घेतला होता तिने….. त्या दिवसानंतर तिने समीरला सांगितले हे बघ तू मनाने जोपर्यंत मला आपल समजत नाही तोपर्यंत माझ्या अंगाला हात सुध्दा लावायचा नाही. कळलं..हो हो कळलं…. म्हणुन समीरने होकार भरला…आता सासुशी गप्पा मारताना तिला कळाले की राधाचे वडील तिच्या सासूचे मित्र होते. राधा एक संस्कारी मुलगी होती..आणि त्यामुळे तिचे लग्न समीरबरोबर लावले गेले…
राधाने विचारले समीर तुमच्याशी असा अडून का वागतो??? तेव्हा त्या म्हणाल्या..अग खूप जुनी गोष्ट आहे… ह्यांची मोठी कंपनी होती समीर लहान असताना..पण ती डुबली आणि कर्जाचा डोंगर उभा राहिला आमच्यासमोर… तेंव्हा एकट्याच्या कमाईने काही होणार नव्हते मग मी काळजावर दगड ठेवून एक निर्णय घेतला…मी आक्का माझी मानलेली बहीण हिच्याकडे समीरला सोपवले आणि आम्ही नवरा बायको दोघेही शहरात नोकरीसाठी गेलो.. सुट्टी आली की त्याला भेटायला यायचो असे 7 वर्ष केले आणि मग समिरबरोबर रहायला परतलो अन तोपर्यंत समीरने आमच्याबद्दल गैरसमज तयार केले आणि मनाने आमच्यापासून असा लांब गेला बघ…
सासू रडू लागली. राधाने त्यांना पाणी दिले आणि शांत केले… त्यानंतर तिच्या लक्षात आले की आक्का समीरचे कान भरते….मग तीने एक युक्ती केली सासूबाईंच्या मदतीने आक्काला कामावरून काढले आणि घर आणि समीरची जबाबदारी तीने स्वतःवर घेतली.. आता समीरच्या मनात राधाविषयी आपुलकी निर्माण झाली.. आक्का नसल्यामुळे आई वडिलांशी बोलण्यासाठी त्याला कुठल्याही मध्यस्थाची गरज राहीली नाही त्यामूळे त्याच्या मनातील गैरसमज जावून नव्याने आईच्या ममतेचे दर्शन त्याला घडले….
बाबांच्या रुपात एक मित्र भेटला आई वडीलानपासून दूर राहून भोगलेल्या गैरसमजाच्या… विरहाच्या…वेदनांचा अंत झाला आणि राधा न कळत त्याच्या ह्रुदयात विराजमान झाली… अचानक समीर आजारी पडला.. राधाने त्याची मनापासून काळजी घेतली आणि तो बरा झाला एक दिवस नुकतीच राधा आंघोळ करून आली.. तीच्यावर हिरव्या रंगाची साडी खुलून दिसत होती… ओले केस.. चमकदार चेहरा.. समीर तीच्यावर मोहित झाला आणि तिला त्याने आपल्या मिठीत घेतले तशी ती बावरली आणि म्हणाली हे बघा… तिला टोकत समीर म्हणाला…
इतक्या दिवसांचा विरह तुझ्याप्रती प्रेमाचा वर्षाव करत गेला आज तुझ्या डोळ्यांत मला नव्याने अर्थ प्रेमाचा कळला…आणि मग राधाने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले संसाराचा वसा आजन्म पाळण्यासाठी…..आणि अशाप्रकारे विरहाच्या वाटेवरती प्रेमाचा मनमोगरा खुलला..
1 Comment
enumpex
I will kill myself lasix and breastfeeding Weerapol Y, et al