Ritbhatmarathi

Search
Close this search box.

vat purnima information in marathi :

जून महिना लागताच आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते वटपौर्णिमा या सणाचे…खरं तर मराठी महिन्यांमध्ये ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून ते पौर्णिमेपर्यंत वटपौर्णिमेचे व्रत सुवासिनी बायका करतात…आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केलं जात…त्याचबरोबर धगधगता उन्हाळा संपून पावसाळ्यचे आगमनाही याच सणाच्यावेळी होत असत…झाडाझुडुपांची पूजा केली जावी…त्यांच्या दीर्घायुष्यासाठीही देवाकडे साकडं घालतात म्हणूनही वटपौर्णिमा साजरी केली जाते..पूर्वीपासून वटपौर्णिमा या सणाविषयी खूप साऱ्या कहाण्या किंवा आख्यायिका सांगितल्या आहेत…

पुराणकथेप्रमाणे बरेच दिवस भगवान शंकराचे आपल्या संसारात लक्ष नाही हे माता पार्वतीला जेव्हा कळते तेव्हा…अत्यंत क्रोधीत होऊन पार्वतीने आपल्या पतीस म्हणजेच श्री भगवान शंकरांना ‘तुम्ही वृक्ष व्हाल असा शाप दिला होता…मग तो वृक्ष म्हणजेच वटवृक्ष होय..पुढे महाप्रलय झाला…सगळी चराचर सृष्टी नष्ट झाली..तरीही वटवृक्ष आपली मुळे जमिनीत घट्ट रोवून दिमाखात उभा राहिला..

याच एका पानातून, पारंबीतून नवीन वटवृक्ष जन्म घेत असतात म्हणूनच या वृक्षाचा कधीही क्षय होत नाही…म्हणून वटवृक्षाला अक्षयवृक्ष असेही म्हणतात. असे म्हणतात आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून हे व्रत भारतीय स्त्रिया आवर्जून करतात…वटवृक्ष जसा दीर्घायुषी असतो तसं आपल्या नवऱ्यालाही दीर्घायू प्राप्त व्हावं म्हणून सुवासिनी वडाची पूजा करतात….पुराणकथेत सत्यवान आणि सावित्री याचीही कथा आपण ऐकत आलो आहोत…

अनेक वर्षांपूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा होऊन गेला त्याला सावित्री नावाची एक गुणी, सुंदर,संस्कारी अशी कन्या होती…सावित्री गुणी असल्याने अश्वपती राजाने वर निवडण्याची परवानगी तिला आधीच दिली होती…पुढे मग सावित्री उपवर झाल्यावर तिने सत्यवानाची निवड केली….

सत्यवान हा शाल्व राज्यातील धूम्रसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता…शत्रूकडून पराभव झाल्याने धूम्रसेन राजा सपत्नीक जंगलात जाऊन राहत असे…मात्र सत्यवानाच्या आयुष्याबद्दल महर्षी नारद यांना पुरेपूर कल्पना असल्याने..नेहमीप्रमाणे नारदांनी सावित्रीला सत्यवानाशी विवाह करण्यापासून अडवले…पण सावित्री आपल्या निवडीवर ठाम होती म्हणून सावित्रीने नारदांच्या म्हणण्याला दुजोरा दिला नाही…सावित्रीने मनापासून सत्यवानाचा पती म्हणून स्वीकार केला.आपल्या पतीसमवेत सावित्री जंगलात राहू लागली…

होळी सणाची माहिती | holi information in marathi

गुढीपाडवा सणाची संपूर्ण माहिती आणि महत्व | Gudi Padwa Information in Marathi

आपल्या पतीच्या सुखात आपले सुख मानू लागली…नारदांनी सांगितलेले सावित्रीला ज्ञात होते म्हणून…आपल्या पतीचा म्हणजेच सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला…तेव्हा सावित्री व्रत करावयास घेतले…तेच आपण ज्येष्ठ त्रयोदशीपासून ते पौर्णिमेपर्यंत करतो तेच व्रत सावित्रीने आरंभले तेही उपवास करून…त्यातच सत्यवान जेव्हा लाकडे आणण्यासाठी जंगलात गेला असता…लाकूड तोडता-तोडता त्याला घेरी आली आणि सत्यवान जमिनीवर पडला…तेवढ्यात साक्षात यमदेव सत्यवानाचा प्राण घेऊन जाण्यासाठी आले…

आपल्या पतीचा जीव धोक्यात आहे हे समजताच सावित्रीने यमदेवतेचा पिच्छा करायला सुरुवात केली…यमदेवाने सावित्रीला परत मागे जाण्यास अनेकदा सांगितले…पण यमदेवाचं काहीही न ऐकता सावित्री पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमदेवापाठी जातंच होती तसं पतीचे प्राण परत मिळावे असा सावित्रीने हट्टच धरला…अखेर यमदेवाने कंटाळून सावित्रीला तीन वर मागायला सांगितले…

तसे सावित्रीने आपल्या सासऱ्यांचे डोळे परत यावे म्हणजे त्यांची दृष्टी त्यांना परत मिळावी असा पहिला वर मागितला…त्यानंतर शत्रूने बळकावलेले राज्य परत मिळावे आणि तिसरा वर म्हणजे पुत्र प्राप्ती व्हावी…असे तीन वर सावित्रीने यमदेवाला मागितले…यमदेवही तथास्तु जेव्हा म्हणाले तेव्हा आपण स्वतः वचनबद्ध झालो आहोत असे प्रतीत झाले म्हणून सत्यवानाचे प्राण परत मिळाले…ज्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण सावित्रीने परत मिळवले ते वटवृक्षाचे झाड होते म्हणूनच आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतो.

आता आपल्या या धकाधकीच्या जीवनात, सिमेंट काँक्रीटच्या जंगलात वडाचं झाड मिळणं फारच मुश्किल होऊन बसलंय…वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे म्हणून वाढत्या प्रदूषणाचा धोकाही वाढलाय…

१. वडाच्या झाडामध्ये इतर झाडांच्या तुलनेत प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन चे प्रमाण जास्त असते…म्हणून वातावरणात ऑक्सिजन वायू जास्त सोडला जातो.

२. पानाची संख्या भरपूर असल्याने वातावरणातील विषारी वायू शोषला जातो

३. वडाच्या पारंब्यांचा उपयोग केशवर्धनासाठी होतो, बुद्धिवर्धक आणि शक्तिवर्धक असेही वटवृक्षाला संबोधले जाते

४. वटवृक्ष दिवसाला सुमारे दोन टन इतके पाणी बाष्प रूपात वातावरणात सोडत असते.

५. त्याचप्रमाणे गर्भधारणा होण्यासाठी आणि गर्भधारणा झाल्यानंतर वडाच्या झाडाचा उपयोग होताना दिसतो

६. वडाच्या सालीचा काढा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेशी निगडित असलयाने मासिक पाळीतील जास्त दिवस होणाऱ्या रक्तस्रावावर रामबाण उपाय म्हणून लागू होताना दिसतो.

तरीही वाढत्या शहरीकरणामुळे बायका वडाच्या फांद्या तोडून आणून त्याची पूजा करतात हि गोष्ट चुकीची आहे…कारण यामुळे वडाच्या झाडाचा ऱ्हास होत चालला आहे म्हणून आमची कळकळीची विनंती आहे शक्यतो वडाची पूजा ही झाडापुढेच करावी…फांदी काटछाट करून आपल्या नवऱ्याच्या आयुष्याची काटछाट करतो हे नक्की सूचित होते…आता आपण म्हणाल जो नवरा आपल्या बायकोच्या आयुष्याची चिंता करत नाही त्याच्या आयुष्याची काटछाट झाली तर काय हरकत असेल…तर ज्यांना आपल्या नवऱ्याला दीर्घायु लाभू नये असं वाटत असेल त्यांनी निदान झाडाला दीर्घायु लाभण्यासाठी तरी वटवृक्षाची काटछाट करू नये…ही कळकळीची विनंती.

Date: १४ जून २०२२.

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *