Skip to content Skip to sidebar Skip to footer

वटपौर्णिमेसाठी भन्नाट उखाणे

निमित्त वटपौर्णिमेचे सख्या साऱ्या जमल्या      

… रावांचे नाव घे म्हणत हट्टालाच पेटल्या

आज आहे वटपौर्णिमेचा सण     

…रावांच नाव घेते ऐका सर्वजण

सूरपारंब्या खेळताना किती येई मज्जा     

… रावांच्या सानिध्यात गालावर लज्जा

vat purnima ukhane

वटपौर्णिमा सणाला भरला हिरवा चुडा     

… राव येताहेत वाट माझी सोडा

सावित्रीने परत आणले सत्यवानाचे प्राण    

…रावांचे सदोदित गाते मी गुणगान

वटव्रुक्षाच्या सानिध्यात प्राणवायू मिळतो    

… रावांचा नं माझा स्वभाव डिट्टो जुळतो

vat purnima ukhane

वटपौर्णिमेच्या दिवशी फेरे घालते वडाला     

… रावांमुळे आहे शोभा माझ्या जीवनाला

देखणी, लालचुटूक वटव्रुक्षाची फळे    

… राव आणतात माझ्यासाठी मोगऱ्याचे कळे

वटव्रुक्ष देतो वाटसरुला सावली    

… रावांची मुर्ती पहाताक्षणी भावली

वडाच्या फांद्यांवर किलबिल पक्षी      

… रावांच्या अंगरख्यावर नाजूक नक्षी

vat purnima ukhane

वटपौर्णिमेदिवशी वडाला घातले फेरे सात    

… रावांच्या साथीने करेन हरेक संकटांवर मात

वडाच्या फांद्यांवर किलबिल पक्षी      

… रावांच्या अंगरख्यावर नाजूक नक्षी

पाच फळांच वाण सख्यांना देते      

… रावांसाठी दिर्घायुष्य देवाकडे मागते

नवरीसाठी उखाणे

पुरुषांसाठी सोपे आणि सुलभ उखाणे

वटपौर्णिमेदिवशी सजलेधजले      

… रावांच नाव घेताना चक्क लाजले

vat purnima ukhane

वटपौर्णिमेदिवशी असतो कडक उपवास      

आयुष्यभर लाभावा … रावांचा सहवास

आंबा,जांभूळ, फणस,करवंद, केळी

       पाच फळे हिरव्या पानी रचिली       

… रावांच्या नावाची महती मी गायली

वटपौर्णिमेच्या निमित्ताने निसर्गाचा सहवास      

… रावांनीही धरलाय माझ्यासवे उपवास

वटपौर्णिमेदिवशी केले श्रुंगार सोळा      

… राव  आहे माझा अगदी सांब भोळा

vat purnima ukhane

वाण देण्यातून मिळते अपुर्व समाधान      

… रावांचं नाव घेत राखते साऱ्यांचा मान

नाव घेते नाव घेते धरा थोडा धीर      

खट्याळ मैत्रिणींची सदा पीरपीर      

सण बाई सण वटपौर्णिमेचा मोठा      

रावांसोबत नाही आनंदाला तोटा

वटसावित्रीचे व्रत करते दर वटपौर्णिमेला      

आरोग्य,सुख,शांती लाभो … रावांना

लालबागचे मार्केट

सौभाग्यवस्तुंनी सजले

… रावांसोबत जाऊन मी    

वड पुजायचे साहित्य आणले

धुणी,भांडी,स्वैंपाक चारीठाव

कामं करुन निघतो सदा बाक

सणाला मात्र नटतेथटते

साडी नेसताच औरच दिसते

मला असं सजलेलं पाहून

… रावांच्या डोळ्यांचे पारणे फिटते

फणसात फणस कापा फणस

… रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस

वटव्रुक्ष कथितो सत्यवानसावित्रीची कहाणी    

… रावांची प्रिय मजला सरळ,.साधी रहाणी

वटव्रुक्षाच्या पारंब्या वाढल्या कितीही

नतमस्तक होती सदा वसुंधरेशी

… रावांचे नाव घेऊन प्रार्थना करते    

विनयशील ठेव आम्हा उभयतांसी

वडाची केली पूजा

रिमझिम पावसात

… राव वाट बघतात    

उभे राहून अंगणात

पतीच्या दिर्घायुष्यासाठी

करते वटव्रुक्षाची पुजा

… रावांसारखा भ्रतार    

जन्मोजन्मी हवा

वटव्रुक्षाला घातल्या

प्रदक्षिणा एकशे आठ

… रावांचा कणा राहो    

सदोदित ताठ

वटपौर्णिमेला काढली हातावर मेहंदी

… रावांना आवडतो दलेर मेहंदी

नेसले जांभळी इरकल

उठून दिसतोय नारिंगी काठ

… रावांचं नाव घेण्यासाठी   

उखाणे केलेत बरेच मी पाठ

वटपौर्णिमेचा सण करतो

पतीपत्नीचे नाते घट्ट

… राव पुरवतात बाई       

माझे लडिवाळ हट्ठ

वटव्रुक्षाच्या झाडात देवतांचा वास

मुळाशी ब्रह्मा, देठात विष्णू

डहाळ्यांमध्ये भगवान शिव      

… रावांवर आहे माझा अतीव जीव

सासूसासऱ्यांची द्रुष्टी,गमावलेले राज्य,

पुत्र असे यमाकडे मागितले वर तीन

चतुर सावित्रीने संकटातही मानली नाही हार

यमाला करावसास लागले तिला सौभाग्याचे दान        

… रावांचे नाव मी घेते नीट ऐका बरं लावून कान

वर्षाचे महिने बारा

बारा महिन्यांतला तिसरा ज्येष्ठ

ज्येष्ठातली पौर्णिमा

म्हणती तिला वटपौर्णिमा

वटपौर्णिमेचे भक्तीभावाने व्रत करते      

… रावांचे नाव घेऊन सर्वांना नमस्कार करते

वटपौर्णिमेला देतात एकमेकींना वाण

करवंद,जांभळं, अळू,गरे,आंबे

स्थानिक फळांना खासा मान

वडाच्या सानिध्यात काही काळ रहाते      

… रावांसोबत माझेही आरोग्य मी जपते

सावित्री जाणून होती वटव्रुक्षाचे महत्व      

… रावांची सदा वाढत राहो किर्ती व कर्तृत्व

हातात बिलवर पायांत पैंजण

गळ्यात मोहनमाळ, कानात कुडी

… रावांच्या मनगटी शोभते टायटनची घडी

वटपौर्णिमेसाठी रावांनी आणली शहाळी

मला म्हणती वडाला जा, नको आणूस डहाळी

दोन्ही घरांना जोडताना मी धागा धागा होते

बाईपणाचं वल्कल पेलून धरते

… रावांच्या साथीने सुखी संसार करते

वैशाखात केलं होतं उकाड्याने बेजार

सरसरत्या सरींनी वातावरण झालंय गार      

… रावांवर आहे माझं प्रेम जीवापाड

वडाच्या प्रत्येक अवयवास आर्युवेदात स्थान       

… रावांचे नाव घेऊन राखते तुमचा सर्वांचा मान

वटजटादी तेलाने केस माझे वाढले       

… रावांनी त्यांत तगरफुल गुंफले

वटपौर्णिमेदिवशी सुट्टी असावी सार्वजनिक

फराळाचं मागायला … राव असावे नजिक

वडाला बांधते सुताच्या शुभ्र धाग्याने

… रावांसोबत संसार करते मी सुखाने

वर्षाऋतू घेऊन येतो वटपौर्णिमेचा सण

… रावांसोबत संसार करते वाहून तन,मन,धन

नणंदा,जावा,सासूबाई साऱ्या आलो वड पुजायाला      

… रावांना आणलय सोबत झकास फोटो काढायला

वटपौर्णिमेदिवशी पुजतेय मी वड

… रावांनी आणलय माझं आवडतं कलिंगड

आजच पहिल्यांदा मी वडाला पुजले

रावांनी माझ्यासाठी मसालादूध बनवले

सासूबाई हौशी, नणंद प्रेमळ

पुतण्या खट्याळ, जाऊबाई झकास      

… रावांना ऑफिसातही माझाच भास

वटपोर्णिमेला सजले मेहंदीने तळहात

… रावांच्या साथीने करेन अडचणींवर मात

Leave a Comment

error: