Skip to content Skip to sidebar Skip to footer

वारी अशी ही …


सरोजिनीबाई घराबाहेरच्या चौकात धुणं धूत होत्या. त्यांचं चित्त काही आज थार्‍यावर नव्हतं. धुणं आटपलं तरी त्या जरा नाराज मनानेच कट्ट्यावर बसून राहिल्या त्या कपड्यांच्या पिळ्याकडे बघत. ते वाळत घालावेत असंही त्यांना वाटेना. घरात सून भक्ती स्वयंपाकाला लागली होती. सरोजिनीबाईंची मुलगी निशा माघारपणाला आली होती तीही भक्तीसोबत स्वयंपाक घरात मदत करत होती. घरातली आणि शेजारची असा मुलांचा सकाळीच खेळ सुरू होता. शाळा बंद असल्यामुळे मुलं तरी दुसरं काय करणार? त्यांचा आपला सकाळपासून खेळ चालू असे. चुकून कसा काय तो बॉल सरोजिनीताईंच्या डोक्याला लागला आणि एरवी कधीही न चिडणार्‍या, मुलांच्यात मूल होऊन खेळणार्‍या सरोजिनीताईंनी रुद्रावतार धारण केला. मुलांचा बॉल जप्त केला. मुलं पण घाबरून घरात पळाली.

विषण्ण मनाने सरोजिनीताई उठल्या. त्या धुण्याचे पिळे तसेच ठेवले आणि खोलीत जाऊन दाराला कडी लावून घेतली. निशा आणि भक्ती दोघींनाही सरोजिनीताईंच्या या वागण्याचं आश्‍चर्य वाटलं. एरवी ‘मुलांना खेळू दे, ती तरी काय करणार? तुम्ही उगाच त्यांना ओरडता’ असं म्हणणार्‍या सरोजिनीताई मुलांना कशा ओरडल्या याचंच त्या दोघींना आश्‍चर्य वाटत होतं.

थोड्यावेळाने निशाने सरोजिनीताईंना जेवायला हाक मारली. अन्नावर राग काढायचा नाही म्हणून त्या आल्या, पण त्यांचं आज जेवणात लक्ष नव्हतं. चिवडत चिवडत त्यांनी घासभर भात खाल्ला. ‘काही होतंय का?, तब्येत बरी नाही का?’ म्हणून लेकीनेपण नी सुनेनेपण आईची चौकशी केली तरी त्या काही बोलल्या नाहीत. त्या जेवत असताना भक्ती त्यांच्या खोलीत जाऊन आली नक्की काय झाले काही कळतंय का खोलीत जाऊन बघावे असं तिला वाटलं. तिथे विठोबाच्या फोटोसमोर लावलेल्या लावलेल्या उदबत्तीवरून तिच्या सारा प्रकार लक्षात आला. सरोजिनीताई आज कुणाशीच बोलत नव्हत्या. त्यांचे डोळे भरून येत होते ते जाणवत होतं, पण तसं कुणालाही काही दाखवत पण नव्हत्या. जेवणं झाल्यावर परत त्या आपल्या खोलीत पडून राहिल्या.

सगळ्यांची जेवण-खाणं झाल्यावर भक्ती आणि निशाने एक बेत आखला. सगळी साधनं जमवली, टाळ-चिपळ्या शोधल्या. छोटं धोतर, बंडी, शेला, नऊवारी साडी. शाळेतल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत वापरलेल्या वस्तूंचा उपयोग झाला.

बाहेर काहीतरी गडबड चालू आहे हे सरोजिनीताईंना कळलं त्या बघायला म्हणून खरंतर रागानेच बाहेर आल्या आणि एकदम हरकूनच गेल्या. विठोबाच्या रूपात त्यांचा नातू आणि रखमाईच्या रूपातली छोटी नात खूपच सुरेख दिसत होती. दोन मुलं वारकरी वेषात ‘विठूचा गजर हरिनामाचा’ म्हणून विठ्ठल-रखमाईभोवती फेर धरून नाचत होती. ते दृश्य बघताच सरोजिनीताईंचा बांध फुटला आणि त्यांनी भक्तीभावाने त्या विठोबा रखमाईला नमस्कार केला, मुलांच्याबरोबर भजन म्हणण्यात दंग झाल्या.

गेली वीस वर्षं नेमाने वारीला जाणार्‍या सासुबाई आज विठोबाच्या वारीच्या आठवणीने बेचैन झाल्यात हे भक्तीला समजलं. तिने निशाशी यावर चर्चा केल्यावर दोघींना मिळून एक कल्पना सुचली. त्यांनी ठरवलं की, आईला आज आपण घरातच वारीचं दर्शन घडवू. जेवण झाल्याझाल्या त्या कामाला लागल्या त्यांची ही युक्ती मात्र कमालीची यशस्वी झाली होती.

त्या दोघी भान हरपून सरोजिनीताईंकडे आनंदाने बघत होत्या. सरोजिनीताई अभंग म्हणण्यात गुंग झाल्या होत्या. डोळ्यांतून आनंदाश्रू येत होते. अतिशय तल्लीन होऊन त्या मुलांच्यात नाचत होत्या. मुलंही दंग झाली होती. जणू विठ्ठल-रखमुाई आणि सर्व वारकरी आपल्या दारात आले आहेत असा भास सरोजिनीताईंना होत होता आणि या अशा वारीचा आनंद भक्ती आणि निशा डोळे भरून घेत होत्या.

थोड्या वेळाने सरोजिनीताई भानावर आल्या. त्यांनी सर्व मुलांना जवळ घेतलं. आणि भक्ती आणि निशाला म्हणाल्या,
‘‘पोरींनो, तुम्ही माझ्या मनातलं ओळखलंत, आज खरंच वारीच्या आठवणीने फार भरून येत होतं. या कोरोनाच्या संकटामुळे वारीला जाता येणार नाही हे माहीत होतं, सगळं कळत होतं, पण वळत मात्र नव्हतं, मुलांवर उगाचंच ओरडले, पण याच मुलांनी माझे डोळे उघडले.’’

‘‘आई, असं होतंच हो कधीतरी. पांडुंगाच्या आठवणीने आज तुम्ही इतक्या कासावीस झाला होतात की, तुम्हाला काहीच सुचत नव्हते.’’ भक्ती म्हणाली.

‘‘हो ना आई, कधीही न रागावणारी तू रागावलीस म्हणून आम्हाला कळलं.’’ निशा म्हणाली.

‘‘खरंच तुम्ही मला घरच्या घरी वारीचा आनंद दिलात आणि ही बच्चे कंपनी तर खरंच किती गोड! यांच्यात मला पांडुरंग, रखुमाई आणि वारकरीच दिसले. धन्य तो पांडुरंग त्यानेच माझे डोळे उघडले आणि अशा या वारीचा घरबसल्या आनंद दिला.’’ सरोजिनीताई सद्गदित स्वरात म्हणाल्या. नातवंडं सरोजिनीताईं जवळ उभी होती.आता भक्ती आणि निशाला सरोजिनीताईंच्यात लेकुरवाळा पांडुरंग दिसत होता.


सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

==================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.