लग्न आणि त्याच्याशी निगडीत अशा परंपरा ऐकून हसाल, घाबराल नाहीतर थक्क व्हाल….

unusual wedding traditions: जगाची लोकसंख्या अफाट आहे. तरीही कोणाचा चेहरा कोणाशी मॅच होत नाही, कोणाचे स्वभाव सारखे नाहीत. प्रत्येक माणूस वेगळा असतो. मग तसेच जगातील सगळ्यांच्या पद्धती आणि परंपरा पण वेगळ्याच असणार ना. आपल्या भारतातील ठिकठिकाणच्या लग्नाच्या पद्धती वेगळ्या आहेतच तर मग पूर्ण जगातील पद्धती किती वेगळ्या असतील ??
जाणून घेण्यासाराखी गोष्ट आहे ना ?? कुठे कुठे लग्नाच्या पद्धती कोणत्या आहेत आणि का आहेत ?? लग्न ही खूप महत्त्वाची आणि आयुष्याला नवे वळण देणारी घटना आहे. त्यामुळे नको नको म्हणत सगळेच लग्न करतातच करतात. पण जर लग्नाच्या संबंधित काही विचित्र आणि भयंकर प्रथा आहेत असे जर तुम्हाला समजले तर तुम्ही काय कराल ?? चला तर मग जाणून घेऊया जगातील काही ठिकाणच्या लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती.
१. आफ्रिकेतील काँगो :
येथील लग्नाची पद्धत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण इथे लग्नात लग्न जमलेल्या मुला मुलीनेच नाही तर लग्नात येणाऱ्या कोणीही हसणे बंधनकारक आहे. कारण असे समजले जाते की हसणाऱ्या लोकांना कशाचे गांभीर्य नसते किंवा असे लोक गंभीर नसतात. इतकेच काय तर लग्नात कोणीही एकमेकांशी बोलत नाही का तर नवरा बायकोला कसलाही व्यत्यय येऊ नये म्हणून. विचित्र आहे ना ??
२. फिजी :
या देशातील परंपरा नवऱ्याशी संबंधित आहे. नवऱ्या मुलाला ज्या मुलीशी विवाह करायचा आहे तिच्या वडिलांना म्हणजे भावी सासाऱ्यांना ताबुया द्यावा लागतो. ताबूया ही एक लांब दोरखंड सारखा प्रकार असतो. जर मुलीच्या वडिलांनी तो स्वीकारला तरच लग्नाला परवानगी मिळाली असे समजले जाते. हे देण्यासाठी खूप आधीपासूनच तयारी केली जाते.
३. चीन :
चीनच्या अनेक परंपरा आहेत ज्या सगळ्या लग्नशी सबंधित आहेत. पहिली परंपरा अशी की, लग्नानंतर दोंघानी म्हणजे नवरा आणि बायकोने तीन दिवस टॉयलेट म्हणजे वॉशरूमचा वापर करायचा नाही. असे केले नाही तर लग्न टिकत नाही अशी मान्यता आहे. ही फारच भयंकर शिक्षा आहे. कारण टॉयलेटचा वापर केल्याशिवाय कसे राहू शकेल कोणीही ??
दुसरी पद्धत अशी आहे की लग्नाच्या बरोबर एक महिना आधी रोज एक तास रडायचं ते ही मुलीने. जो कोणी हा नियम पाळत नाही त्याला समाजापासून वेगळे केले जाते. मुलगी जेंव्हा रडते तेंव्हा तिच्या सोबत घरातील बाकी मंडळी पण रडतात. तुम्हाला हवी तितकी मजा मस्ती तुम्ही दिवसभर करू शकता पण एक तास रडलेच पाहिजे अशी अट असते. असे केल्याने मुलींना भविष्यात कधीही रडाव लागणार नाही अशी यामागे मान्यता आहे.
तिसरी परंपरा अशी की लग्नाची तारीख ठरवण्याआधी कोंबडीचा बळी दिला जातो, आणि कोंबडीचे लिव्हर चेक करून पाहिले जाते. जर लिव्हर चांगले असेल तरच लग्नाची तारीख ठरवण्याची परवानगी असते.
हेही वाचा
डेड स्किन घालवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा
४. जर्मनी :
ही प्रथा जरा गमतीशीर आहे. येथील लग्न जमलेले दोन्ही कुटुंबीय मुलगा मुलगी सोबत हॉटेलमध्ये जेवायला जातात आणि तेथील प्लेट, ग्लास सगळे तोडून टकतात. लग्न जमलेले जोडपे मिळून हे सगळे साफ करतात. भविष्यात मूलगा मुलगी मिळून घराची सफाई करतील अशी यामागे समज आहे.
५. साऊथ आफ्रिका :
येथे लग्न झाल्यानंतर मुलगा आणि मुलीच्या घरातून आग आणली जाते आणि जिथे लग्न झालेले जोडपे रहाते, ते याच आगीचा वापर करून जेवण बनवतात. असे केल्याने नवरा बायकोचे प्रेम टिकून राहील असे मानले जाते.
६. फ्रान्स :
येथील लग्नाची परंपरा ऐकून लग्न करण्याची भीती वाटेल. कारण इथे लग्नाच्या दिवशी मुलाला टॉयलेटच्या आकाराच्या ग्लासात खूप दारू पाजली जाते. जर मुलाने असे केले नाही तर त्यांच्या लग्नावर भुताची नजर आहे असा समज आहे. त्यामुळे आजही ही प्रथा पाळली जाते.
७. रोमानिया :
येथे मुलीला लग्नाच्या एक दोन तास आधी कीडनाप केले जाते. त्यानंतर मुलाकडून एखाद्या गोष्टीची मागणी केली जाते किंवा मग पार्टी मागितली जाते. यामागे कारण असे की मुलगा होणाऱ्या बायकोवर किती प्रेम करतो हे समजते.
८. कॅनडा :
येथील लग्नाची परंपरा अतिशय गमतीशीर आहे. लग्नाच्या दिवशी अशा लोकांना आमंत्रित केले जाते ज्यांचे लग्न झालेले नाही, सगळे लोक म्हणजे मुला मुलीचे मित्र, नातेवाईक सगळे मिळून खूप नाचतात. असे केले तर ज्यांचे लग्न झाले नाही अशांचे लग्न लवकर जमते असे मानले जाते.
९. साऊथ कोरिया :
येथे लग्नाच्या दिवशी मुलांना शिकार केले जाते. मुलांचे हात पाय बांधून नंतर त्यांना माशाने मारले जाते. कारण लग्नानंतर होणाऱ्या पहिल्या रात्रीचा त्रास नवऱ्याल समजायला हवा.
१०. स्पेन :
येथे लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लग्न झालेल्या जोडप्याला पार्टी देणे बंधनकारक आहे. पार्टीत मुलीचे म्हणजेच नवरीचे मित्र नवऱ्याचा टाय कापून टाकतात. या टायचे अनेक तुकडे करतात. त्याची किंमत ठरवली जाते आणि आलेल्या पैशातून नवरा बायकोला हनिमूनसाठी पाठवले जाते.
११. केनिया :
येथील प्रथा फारच विचित्र आहे. केनिया मधील मसाई ट्राईब येथे लग्नाच्या दिवशी मुलीचे वडील आणि इतर लोक मुलीच्या अंगावर थुंकतात. असे केल्याने मुलगी आणि जावई ठीक राहतील असे मानले जाते. याशिवाय मुलगी आपल्या मर्जीने लग्न करू शकत नाही तसेच लग्नाच्या दिवशी मुलीचे सगळे केस कापून टाकले जातात, टकले करण्यात येते. भयानक आहे ना ??
१२. स्कॉटलंड :
येथे लग्नाआधी मुलींना काळ्या रंगाने रंगवले जाते. यात तिचे मित्र यात सामील असतात. असे करण्यामागे कारण की लग्नानंतर ती बेइज्जत झाली तर मानसिक दृष्ट्या तयार असावी, अशाने तिची सहनशक्ती वाढेल असे समजले जाते.
तर या वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या परंपरा ऐकून आश्चर्य वाटले ना ??
=============