
©Swati Mali
विभा किचन मध्ये काम करत होती…आज तिच्यासाठी खास दिवस होता….आज खूप सुंदर दिसत होती विभा…. चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होत …
विभाची सासू किचन मध्ये येते….विभा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा… विभाची सासू विभाला शुभेच्छा देते…
थँक्यू आई…अस म्हणून विभा सासूबाईंना नमस्कार करते….
शुभमने शुभेच्छा दिल्या कि नाही…सासूबाई
नाही आई अजून देतील नंतर….विभा
आई…. आई….हैप्पी बर्थडे आई….विभाची मुलगी तिला येऊन विश करते….
थँक्यू बाळा….परी आज्जी सोबत बाहेर हॉल मध्ये बस ओक…मी तुला नाश्ता आणते…विभा
विभा नाश्त्याची तयारी करत असते इतक्यात शुभम हैप्पी बर्थडे बायको मागून मिठी मारत बोलतो…
अहो काय करताय कोणी तरी येईल..विभा लाजत बोलते
येऊ दे…आज सगळं चालत…बायकोचा वाढदिवस आहे ना…शुभम
थँक्यू…विभा
विभा व शुभम च बोलणं चालू असते इतक्यात विभाची मुलगी बाहेरून ओरडते…….ये आई तुला मेसेज आलाय बग बर्थडे चा…..
मेसेज आलाय ऐकल्यावर विभाच्या चेहऱ्यावरचे भावच बदलतात ती उदास होते …आणि कळत नकळत तिच्या समोर तिची आठवण उभी राहते ……
गोऱ्या रंगाची,दिसायला देखणी,पाणीदार डोळे,लांबसडक केस ,शांत, कोणालाही आपलस करणारी विभा…..12वी कॉमर्स ला होती….कॉलेजमध्ये हि सर्वांशी प्रेमाने आपुलकीने राहायची….सर्वाना मदत करायची…विभाचे वडील थोडे शिस्तीचे होते त्यांना मुलांशी जास्त बोललेलं आवडायचं नाही त्यामुळे विभा मूलांनपासून लांब लांब असायची त्यांच्याशी बोलायची नाही…ती आपल्या मैत्रिणी सोबतच राहायची… विभाचे कॉलेज लाईफ छान सुरु होत
थोड्या दिवसात त्यांची 1st सेमिस्टर होती…सगळे अभ्यासाची तयारी करत होते…आणि परीक्षेचा दिवस आला सगळ्यांना आपला नंबर कोठे पडला असेल, आपल्या मागे पुढे कोण आलं असेल ह्याची उत्सुकता होती…साहजिकच विभाला सुद्धा खूप उत्सुकता होती..
विभा व तिच्या मैत्रिणी आपला नंबर कोणत्या वर्गात आला आहे हे बघून त्या क्लास मध्ये गेल्या…प्रत्येकजण आपला नंबर पाहत होत्या… विभाला तिचा नंबर मिळाला पुढून तिसऱ्या बेंच वर नंबर आला होता …पण आपल्या मागे व पुढे कोण असेल ह्याची विभाला उत्सुकता होती… कारण रोल नंबर ने जरी नंबर पडले असले तरी ह्या वर्षी काही नवीन विध्यार्थी आले होते त्यामुळे ती एक वेगळीच उत्सुकता होती…अग विभा मिळाला का नंबर….विभाची मैत्रीण तिला विचारत तिच्या जवळ येते….
अग हो मिळाला की….हा काय इथेच आहे….विभा
अरे व्वा माझा पण इथेच आहे तुझ्या बाजूच्या बेंच वर…. आणि बग की ती नेहा व मीना माझ्या मागे पुढे आल्या आहेत…तुझ्या मागे पुढे कोण आहे ग…मैत्रीण
कोण आहे काय माहित अजून तर कोणी आलं नाहीए… विभा
अग विभा ते बग ती मुलं मुली येत आहेत बघू कोण आहे का त्यातील…
त्या घोळक्यातील दोन मुलं विभाच्या मागच्या व पुढच्या बाजूला येऊन बसली…
मुलांना बघून विभाचा चेहराच पडला…विभाचा पडलेला चेहरा बघून तिच्या मैत्रिणीला कळलं की विभा कंफर्टेबल नाहीये…
विभा तू नको टेंशन घेऊस तू फक्त पेपर कडे लक्ष दे….मैत्रीण
हो तेच करावं लागेल….विभा
बर आता एवढ्यात सर येतील मी जाते बेंच वर…मैत्रीण
विभा तिच्या बेंच वर जाऊन बसते…त्या मुलांकडे लक्ष देऊ नकोस विभा…एक्साम वर लक्ष दे…ते जास्त महत्वाचं आहे …विभा स्वतःशीच बोलत होती…थोड्या वेळात सर आले व एक्साम ला सुरवात झाली…
विभा पेपर लिहण्यात मग्न होती….बघता बघता कधी 2 तास होऊन गेले कळलंच नाही…विभाचा पेपर जवळपास होत आला होता….ती पेपर लिहीत होती…तिला सुरवाती पासून समोरच्या मुलाची चुळबुळ सुरु होती हे लक्षात आलं होतं पण ती दुर्लक्ष करत होती…पण शेवटी त्या मुलाने विभाला एका प्रश्नच उत्तर विचारलंच…पण त्यावेळी विभाने माझं अजून भरपूर लिहयायचं आहे म्हणून सोडून दिलं ….
पण थोड्याने परत त्या मुलाने विचारलं…त्यावेळी विभाच लक्ष त्याच्या पेपरकडे गेलं तर त्याने काहीच लिहलं नव्हतं….तेव्हा मात्र विभाला त्याची दया आली आणि तीन त्या मुलाला बरीच उत्तर सांगितली …
सर्व पेपर संपेपर्यंत तो मुलगा विभाला उत्तर विचारतच होता
शेवटचा पेपर होता पेपर सुरु होण्यासाठी थोडा वेळ होता विभा आपल्या बेंच वर बसली होती…तो मुलगा विभाशी बोलू लागला…. माझं नाव अजय आहे… थँक्यू तुझ्यामुळे मी फेल नाही होणार….अजय
वेलकम…. विभा
तुझं नाव काय आहे… अजय
विभा….विभा
थोडा वेळ असच गप्पा झाल्यानंतर पेपर सुरु झाला व पेपर झाल्यानंतर विभा तिच्या मैत्रिणी सोबत निघून गेली
अश्या प्रत्येक सेमिस्टर ला असेच नंबर येत होते अजय विभाच्या मागे पुढेच यायचा….त्यामुळे तो तिच्याशी बोलायचा…विभाला तो चांगला मुलगा आज अस वाटत असल्यामुळे ती त्याच्याशी बोलायची…बघता बघता 12 वी ची फायनल एक्साम झाली…विभा एक्साम देऊन येत होती तर अजय ने तिच्याकडे फोन नंबर मागितला पण विभाकडे मोबाईल नव्हता व जरी असला तरी ती देणार नव्हती…विभाने माझा नंबर नाही म्हणून सांगितलं व ती बाहेर निघून गेली….बाहेर मैत्रिणीशी गप्पा मारत होती सगळ्या आता परत कधी भेटायचं वगैरे बोलणं सुरु होत…प्रत्येकजण आपले नंबर देत असतात कोणाकडे मोबाईल नाही ते आपल्या मम्मी पप्पांचा नंबर देत होते….विभा सुद्धा तिच्या पप्पांचा नंबर देत होती….त्याच वेळी अजय ने तो नंबर ऐकला व आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह केला..
पुढे थोड्या दिवसातच विभाचा बर्थडे आला सगळेजण तिच्या पप्पांच्या मोबाईल वर फोन मेसेज करत होते विभानेही सगळ्या मेसेज ना रिप्लाय दिला व मोबाईल पप्पा ना दिला…तिचे पप्पा त्यांच्या रूममध्ये झोपायला गेले असताना परत एक मेसेज येतो….तर बर्थडे विश चा मेसेज होता एवढ्या रात्री कोण मेसेज केलं आहे हे पाहण्यासाठी ते त्या नंबर वर फोन करतात.समोरून एका मुलाचा आवाज येतो ते त्याला विचारतात कोण आहेस तुझ नाव काय वगैरे…. तर त्या मुलाने मी विभाचा मित्र आहे म्हणून सांगतो आणि फोन ठेवतो.
दुसऱ्या दुवशी विभाचे पप्पा विभाला बोलवतात कालचा घडला प्रकार सांगतात पण विभा काही बोलण्याच्या आत ते तिला मारू लागतात….ह्या सगळ्या प्रकारामुळे विभाच्या मनावर खूप वाईट परिणाम होतो…आपल्या वडिलांनी आपल्यावर विश्वास ठेवला नाही ह्याचा तिला खूप त्रास होत होता
ही वाढदिवसाची आठवण….न विसरणारी आठवण बनून राहिली….तिला प्रत्येक वाढदिवसावेळी कितीही नको असली तरी ती आठवण राहिलीच
विभा….ये विभा कुठे हरवलीस…. शुभम तिला भानावर आणत बोलतो…
आ…. काही नाही..विभा भानावर येत बोलते
विभा मला माहितेय तू कुठे हरवली होतीस…नको त्या जुन्या आठवणी आठवून त्रास करून घेऊस मी आहे ना…शुभम
आज 12 वर्ष झाली तरी सुद्धा त्यावेळी माझ्या मनावर जे घाव बसलेत ती मी नाही विसरले विसरायचं म्हंटल तरी ते नाही विसरता येत…
आपल्या मुलीवर विश्वास ठेवा दुसऱ्याचं ऐकून आपल्या मुलीवर संशय नका घेऊ….तुमच्या ह्या संशयायामुळे एका मुलीच्या मनावर वाईट परिणाम होतो….ती खचली जाते आणि तुमच्या बद्दल चे मत ही बदलू शकते
त्यामुळे आपल्या मुलीला विश्वासात घेऊन खरच तिची चूक आहे का ह्याची खात्री करून घ्या आणि मग निर्णय घ्या…ह्यामुळे दुसरी विभा होणार नाही
***
क्रमशः
(ही कथा काल्पनिक आहे ह्याचा काही सबंध अढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)
आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो….तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका…..
swati mali