नवरीसाठी उखाणे……


होळीला असतो मऊसूत पुरणपोळीचा मान
… रावांचं नाव घेऊन राखते साऱ्यांचा मान
सणासुदीला वापरतो सुवासिक अत्तर
आज्जी म्हणे..रावांच वय अवघं सत्तर
साखर असते गोड,आवळा असतो तुरट
चिंच असते आंबट, मिरची असते तिखट
… रावांना अधेमधे हवं असतं खमंग तेलकट

लाल,पिवळा,नारिंगी,केशरी
रंग खेळण्यात सारे दंग
… रावांनी भांगात सिंदूर भरुन
केलेय मला जायबंद
चितळेंची बाकरवडी आहे फेमस
… रावांना पहाताच मैत्रिणी जेलस
उपवासाला केले साबुदाणे वडे
… रावांना म्हंटले, या ना गडे

अंगणात तुळस, तुळशीला मंजिऱ्या
… राव म्हणे तू दिसतेस भारी
पण तुझ्या सख्या अधिक बऱ्या
चारीठाव स्वैंपाक केला
अहो … राव पानं वाढलीत
येताय नं जेवायला
उकड केली आंबेमोहराची
पातं वळलं नाजूक बोटांनी
सारण घातलं भरगच्च
… राव म्हणे आईच्या हातचेच मस्त

गेलो होतो सागरकिनारी
वाळूत बनविला किल्रा
…रावांना म्हंटलं लाडात
घ्यायचा नं आपण व्हिल्ला
टिकलीत टिकली शिल्पा टिकली
…रावांचं मुळगाव टिळकांच चिखली
चैत्रात प्रवेशद्वारापाशी सजते चैत्रांगण
… रावांसाठी सोडून आले माहेरचे अंगण