
अगदी व्यवस्थित असे मोदक बनवून तयार झाले होते….आईसाहेबांच्या हातून मोदकाचा नैवेद्य दाखवून झाला…नैवेद्य दाखवतानाही आईसाहेबांना मुग्धाचाच चेहरा आठवत होता…आईसाहेबांचं एवढं करून भागलं नाही तर मनातल्या मनात आईसाहेबांच्या आपल्या गणपती बाप्पांपुढे आपल्या सुनेच्या निवडीबाबाबत कौलही लावला आईसाहेबांनी अक्षता असलेले तांदूळ घेतले ते गणपतीबाप्पांच्या कपाळावर चिकटवले…आणि मनातल्या मनात डावा आणि उजवा कौल लावला म्हणजेच डाव्या बाजूला अक्षता पडली की निलीमाची निवड सून म्हणून आणि जर अक्षता उजव्या बाजूला पडल्या की मुग्धाची निवड सून म्हणून ठरलेली होती कारण आईसाहेबांच्या मनात मुग्धाच सून म्हणून हवी होती…आईसाहेबांच्या मनातलं गाऱ्हाणं देवाने ऐकलं…आईसाहेबांच्या समक्षच देवाने उजव्या बाजून ए कौल दिला होता…आईसाहेबांना तर आकाश ठेंगणं वाटू लागलं कारण देवाच्या मनातली आणि आपल्या मनातली आवड एकच आहे…आईसाहेबांना इतका आनंद झाला की गणपती बसतात त्या दिवशी दर्शनाला आलेल्या गावकऱ्यांना जेवण देऊन टाकतात…हे सगळं पाहून माधवला नवल वाटते…आपल्या आईला अगदी सहजच विचारतो…
माधव – आई….आज काय सगळ्या गावाला चूल बंद आवर्तन आहे की काय…अगदी गावातले हौसे…गौसे…नवसे जेवायला….या आधी कधी पाहिलं नाही गं…
आईसाहेब – या आधी तू इथे तरी कुठे होतास…तरीही आपल्या गणपतीचं डेकोरेशन आणि मूर्ती तुला पाठवल्याशिवाय राहत नव्हते मी…
माधव – हो लक्षात आहे माझ्या…पण गावजेवण नव्हती घालत कधी…नक्की काहीतरी आहे तुझ्या मनात…त्याशिवाय तू असं नाही उदार होणार कुणावर…
आईसाहेब – मी इतकी निष्ठुर नाहीय…
माधव – मला तसं नव्हतं म्हणायचं…
आईसाहेब – प्रश्न माझ्या औदार्याचा असेल तर मी तशी आज खूप आनंदी आहे…नीलिमा कुठे आहे…?
माधव – आता तीच काय…? आणि मी विचारेन….विचारेन….विचारेन म्हणतोय पण मला सवड भेटत नाहीय…म्हणून तर मी अजून विचारलेलं नाहीय तुला…
आईसाहेब – तुझ्यापासून लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाहीय…मी नीलिमाला मुद्दाम बोलावून घेतलंय…पण आता माझा विचार बदलला आहे…खरं तर नीलिमाला मी कोल्हापूरवरून मुद्दामच बोलावून घेतलं…
माधव – कसला विचार आई…आणि काय झालं असं अचानक नीलिमाला बोलावून घ्यायला…
आईसाहेब – मी नीलिमाचा विचार करत होते माझी होणारी सून म्हणून…
माधव – विचार करत होते….मग आता तसला काही विचार नाही ना नीलिमाला सून करून घेण्याचा…
आईसाहेब – नीलिमा सून म्हणून नको…मग काय मला सुनाच नको असं कुठं म्हटलंय मी…
माधव – आई…मला असं वाटतंय इतक्यात तरी लग्न बिग्न नको मला…या मुली सगळ्या पैशाच्या मागे हपापलेल्या असतात…आता ताज उदाहरण आहे शार्लीच…खरं तर तीच नावही घ्यायचं नाहीय मला… .नीलिमाला कसं काय सून बनवायचं डोक्यात आलं तुझ्या कुणास ठाऊक…
आईसाहेब – तुझ्या मामाचा शब्द म्हणून मी इकडे घेऊन आले तिला…पण आता मी माझा विचार बदलला आहे…
माधव – चला गंगेत घोड न्हालं…डोक्यातून विचार गेला म्हणायचा माझ्या लग्नाचा…
आईसाहेब – नीलिमाचा विचार गेला असं म्हणायचं होत मला…
आईसाहेब आपल्या माधवबरोबर आपलं मन मोकळं करत होत्या पण हे सगळं बोलणं बाहेर उभ्या असलेल्या नीलिमाने ऐकलं त्यामुळे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या नीलिमाला पटकन रडू आलं…आईसाहेबांच्या मनात आपल्याला सून करून घेणं नाही हे नीलिमाने जाणलं…आणि लागलीच आपल्या खोलीत जाऊन सामान बांधायला लागली…आता आपलं बोलणं नीलिमाने ऐकलंय याची तसूभरही कल्पना आईसाहेब नव्हती म्हणून माधवबरोबरच आपलं बोलणं पूर्ण करून त्या नीलिमाच्या खोलीत गेल्या आणि सामानाची बांधाबांध पाहून म्हणाल्या…
आईसाहेब – काय गं हे….आमच्या भाचीसाहेबांनी तर जायचं पक्के केलं म्हणायचं…
नीलिमा – आत्या…मी किती दिवस थांबणार अजून इथे निघायला नको…तसंही मला एम फार्म साठी ऍडमिशन घ्यायचं आहे…झाला की आता पाहुणचार…
आईसाहेब – पाहुणी…काय बोलती आहेस तू…कधीपासून परकी झालीस तू मला….मला मुलगी नाही म्हणून तूच मला माझ्या मुलीसारखी आहेस…बरं जायलाच पाहिजे का…?
नीलिमा – होय आत्या…मी गेली तरच तुमचे प्रश्न सुटतील…
आईसाहेब – अगं कसले प्रश्न…
नीलिमा – आत्या…हे डोक्यावर पदर…अदबीनं वागणं मला नाही झेपायच…त्यापेक्षा मला काहीतरी करायचंय लोकांसाठी…ते पुढचं शिक्षण घेऊनच करणार आहे मी …
आईसाहेब – ठीक आहे जशी तुझी मर्जी…पण तुला माझ्या रुपी एक आई पण आहे हे विसरू नकोस…
नीलिमा – आत्या…मी नेहमी तुझ्याकडे त्याच नजरेने पाहत आलीय…म्हणूनच तर मी तुला आत्या म्हणताना सुद्धा अगदी एकेरीचा वापर करते म्हणजे नेहमी अगंतुग करते…ते ही मुलीच्या नात्याने…
आईसाहेब – पण तू असा अचानक निर्णय कसा काय घेतलास…माझ्या दादाला कळवलंस की नाही निघालीयेस ते की सर्प्राईस द्यायचं आहे त्यालाही…जस मला सर्प्राईस दिलंस आता सामानाची बांधाबांध करून…
नीलिमा – आत्या…अगं त्यांना काय सांगायचं…मला माझे निर्णय घेता येतात…लग्न करून तरी काय मिळतंय एका बाईला…कायम दुसऱ्यांसाठी आपलं आयुष्य झोकून द्यायचं…
आईसाहेब – दुसरं कुणी नसत गं चिमणे…नवरा बायकोच्या नात्यात…सगळं आपलं असत…फक्त शरीराने नाही तर मनाने आणि मानानेही…जाऊ देत एकदा लग्न झालं ना की सगळं समजेल दुसऱ्यांसाठी नाही तर आपल्या माणसांसाठी झटणं काय असत ते…
नीलिमा – चल….आत्या मग काय आता दोन दिवसांनी निघते मी…पाया पडते तुझ्या…
आईसाहेब – तू काही ऐकायची नाहीस…सदा सुखी राहा…जेवणाची वेळ होईल वाट पाहतो आहोत आम्ही तुझी…
नीलिमा – ठीक आहे आत्या…तुम्ही व्हा पुढे आलेच मी…
आपली आत्या खोलीबाहेर पडताचक्षणी हृदयात दाटलेलं सगळं आसवांच्या रूपाने डोळ्यातून वाहू लागलं….आपल्या भावना आसवांच्या रूपाने ओथंबून वाहू दिल्या…नीलिमाने हमसून हमसून रडून घेतलं…दुसरीकडे आपला निर्णय नीलिमाने आपसूकच बदलला याच आईसाहेबांना बरं वाटलं…पण नीलिमाच्या मनातलं आईसाहेब नाही जाणू शकल्या… …कारण नीलिमाच्या मनात माधवबद्दल सॉफ्ट कॉर्नर होताच…पण आईसाहेबांचीच इच्छा नाहीय हे ऐकून नीलिमा आपल्या वडिलांच्या घरी म्हणजेच कोल्हापूरला जायला २ दिवसांनी निघाली खरी पण दोनही दिवस काहीही झालं नाही हा भाव नीलिमा आपल्या चेहऱ्यावर दाखवत होती….ते दोन दिवस मुग्धाही आरतीसाठी रोज निंबाळकरांच्या घरी येत म्हणून नीलिमा आणि मुग्धा अशी दोघींची जोडगोळीही जमली होती….या दोन्ही दिवशी मुग्धाने आपल्या मामाचा नंबर निलीमाला दिला आणि नीलिमाचा नंबर आपल्याकडे लिहून घेतला…जणू एक चांगली मैत्रीणच मुग्धाला मिळाली.दोघींच्या बोलण्यातून असं समजलं कि दोघींचंही संसाराव्यतिरिक्त अशी काही स्वप्न होती म्हणून एक मैत्रीचा धागाच निर्माण झाला होता…मुग्धा आणि निलीमाची मैत्री पाहून आईसाहेबांनाही खूप हायसं वाटलं…नीलिमा जेव्हा कोल्हापूरला आपल्या वडिलांकडे जायला निघाली त्यावेळेला मुग्धा जातीने आपल्या मैत्रिणीला निरोप देण्यासाठी आवर्जून आली. मुग्धाचं असं रोज बंगल्यावर येणं माधवला जरा अति वाटलं म्हणून माधव आपल्या आईला मुग्धाच्या येण्याबद्दल जाब विचारतोच…
माधव – आई…जरा बाजूला ये ना…
आईसाहेब – माधव…असं सर्वांच्यासमोर बाजूला नेऊन बोलू नये…आता बोलावलंय मग बोल काय काम आहे…
माधव – केवढं बोलतेस आई…ती व्रात्य मुलगी सारखी-सारखी इथं का येतेय….
आईसाहेब – का…? आणि तुझी तिच्याशी ओळख कधी झाली…कधी कळलं
तुला ती खोडकर आहे ते…नक्कीच तुझी काहीतरी खोड काढली असेल तिने…[ आईसाहेब आश्चर्याने आणि मस्करी करत विचारत होत्या ]
माधव – तुला आता मस्करी सुचतीय…अगं आत्ता परवाचीच गोष्ट आहे…मॅडम ने वर्गाबाहेर काढलं होत…हिला आणि तिच्या दोन-तीन मैत्रिणी होत्या…
आईसाहेब – असं…तू तिथे काय करत होतास मग..?
माधव – असं काय करतेस…तूच तर नाही का चेक सबमिट करायला सांगितलास….
आईसाहेब – अच्छा…आलं लक्षात…अरे पण जे दिसत तसं नसत तुझ्या नजरेचा गैरसमज असेल….ती मुलगी खरंच खूप चाणाक्ष आहे…आपली हि सजावट आहे ना सर्व तिनेच केली आहे…बघ तर…आणि तू या सगळ्या अरेंजमेंटच कौतुकच केलंय ना…
माधव – आई…जाऊ देत…मी तुला नंतर सांगतो या मुलीची सगळी हिस्ट्री…बाय द वे…मला आज काम आहे…तू कर तुझी काम…
आईसाहेब – तू जाऊ शकतोस…आणि परत सगळ्यांच्या समक्ष मला बाजूला घेऊन बोलणार नाहीस तू….
माधव काहीच न बोलता तिथून निघून गेला….आईसाहेब आपल्या मनातलं अजूनही लपवून ठेवत होत्या आणखी किती दिवस असं लपवून त्या ठेवणार…खरंच आईसाहेबांच्या मनातलं आपल्या मुलास तरी त्या सन्गुन बघतील का…? उत्सुकता अशीच असू द्या…पाहुयात पुढच्या भागात…

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.
1 Comment
सौ. उषा शिरीष कुलकर्णी.
खुपच छान.