Skip to content Skip to sidebar Skip to footer

तुझं माझं जमेना भाग ५

कॉलेज ला जाण्याआधीच मुग्धा निंबाळकरांच्या बंगल्यावर गेली कारण काहीही करून कॉलेजची परीक्षा फी मुग्धाला भरायची होती म्हणून कॉलेजच पहिलं लेक्चर बंग करूनच जावं लागणार होत तसाही उशिराही भरपूर झाला असल्याने पळतच निंबाळकरांच्या बंगल्यावर गेली घराच्या उंबऱ्यापाशी येऊन थबकली कारण समोरच आईसाहेब दिसल्या म्हणून खाली मान घालून उभी राहिली…मनीषा तिथेच आईसाहेबांपाशी उभी होती म्हणून मनीषानेच मुग्धाला विचारलं…

मनीषा – काय गं…इकडं काय काम काढलंस…

मुग्धा – काही नाही ते तुमच्याकडं काम आहे असं कळलं माझ्या मैत्रिणीकडून म्हणजे कमल कडून कळलं मला म्हणून कामासाठी मी आले बाकी काही नाही…

आईसाहेब – अगं मग अशी आत ये की आणि इथं बसून बोल माझ्याशी…

मुग्धा – नाही आईसाहेब…तुम्ही विचारलंत एवढंच खूप झालं मला…

आईसाहेब – अगं पण जरा बसशील तर…पाणी पि आणि बोल सावकाश…केवढा घाम फुटलाय तुला पहा जरा…!

आपल्या एका हातातल्या रुमालाने चेहऱ्यावरचा घाम टिपत मुग्धा आईसाहेबांच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसली….

मुग्धा – आईसाहेब…नमस्कार करते…[ वाकून आईसाहेबांना नमस्कार करते ]

आईसाहेब – असू दे असू दे….यंदा कितव्या वर्षाला आहेस…

मुग्धा – मी यंदा तिसऱ्या वर्षाला आहे बी ए च्या…

आईसाहेब – मग कॉलेज असेल की तुझं आज…की दांडी मारलीस…

मुग्धा – आईसाहेब…आज कॉलेजची परीक्षा फी भरण्याचा शेवटचा दिवस आहे…मग पैशाची नड आहे…

आईसाहेब – हम्म..अगं मग मला मागायचे पैसे दिले असते की मी…तू त्या रेखाची भाची ना…?

मुग्धा – हो…आईसाहेब…पण असं फुकटचे पैसे नको मला…नाहीतर तशीच सवय लागते…मी मेहनत करून पैसे घेईल तुमच्याकडून…त्यानं समाधान तरी मिळेल मला…

आईसाहेब – ठीक आहे…सजावटीचं सगळं काम तुला करायचं आहे…ते घराच्या समोर पटांगण आहे ना सगळं आपलंच आहे…बघ तुला जमेलच हे काम…

मुग्धा – माझं काम फिक्स मग आईसाहेब…?

आईसाहेब – हो…

मुग्धा – मग मला आज ऍडव्हान्स मिळेल का…त्याआधी माझं काम कसं वाटलं ते जरूर सांगा….मी आत्ताच कामाला लागते….

आईसाहेब – नाही अगं…तू कामाला येशील गं माझा विश्वास आहे…घे ऍडव्हान्स आणि कॉलेज ला जाऊन आलीस ना की ये कामाला…मग तर झालं…

मुग्धा – ठीक आहे आईसाहेब…येते मी…

आईसाहेब ठरल्याप्रमाणे मुग्धाला ऍडव्हान्स देतात…मुग्धाही कॉलेजला जाते आणि पहिलं आपली परीक्षा फी भरते….रेश्माला म्हणजेच मुग्धाच्या मामेबहिणीला याची कुणकुण लागते…कारण दोघीही एकाच वर्गात आणि एकाच कॉलजमध्ये असतात….कॉलेज सुटल्यावर रेश्मा पटकन घरी जाऊन आपल्या आईच्या कानावर हि बातमी घालते…

रेश्मा – आई…अगं किती आतल्या गाठीची आहे नाही मुग्धा…

रेखा – काय झालं…काय केलं तिने…

रेश्मा – अगं आज परीक्षा फी भरायची शेवटची तारीख होती…हिनं फी भरलीच कशी…

रेखा – दुसरं कोण देणार तिला पैसे…तुझ्या पप्पाने दिले असतील पैसे…मोठा कैवार घेतात तिचा…घेणारच तसं वचन दिलंय ना तुझ्या आत्याला त्यांनी की अगदी पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करतील तिचा म्हणून…

रेश्मा – नाही आई…पप्पानी नाही दिले पैसे तिला…

रेखा – मग काय कुठं चोरी करायला गेली की काय…

रेश्मा – मलाही तसंच वाटतंय…कारण आज लेक्चर ला पण एक तास उशिरा आली होती…

रेखा – येऊ दे तर तिला आल्यावरती चांगलाच जाब विचारते तिला…आणि खरंच चोरी बिरी केली असल ना तर आज ह्या घरातला तिचा शेवटचा दिवस…हाकलवून देईल घरामधून…

रेश्मा – [ घाई घाईने हातात पुस्तक घेते ] आई…आली…आली…

रेखा – या….महाराणी आलात…कुठे भटकत होता…तुम्ही…

मुग्धा – मामी…अहो कॉलेज मधूनच आलीय मी…उद्यापासून तीन तास कॉलेजच्या वेळेच्या आधी निघावं लागणार आहे मला…

रेखा – का बरं…चोऱ्या करायला का…?

मुग्धा – चोऱ्या…मामी काय बोलताय तुम्ही…

रेखा – अगं…पैसे नसताना परीक्षेची फी भरलीच कशी तू…?

मुग्धा – ते निंबाळकरांकडे गणपती आणि गौरी बसतात दर वर्षी तुम्हाला माहितीच आहे ना…मग त्याच कामासाठी मुली पाहिजे असं समजलं मला माझ्या फ्रेंड कडून त्याच कामाचे आईसाहेबांनी ऍडव्हान्स दिले मग तेच पैसे मी फी म्हणून भरूनही टाकले…

रेखा – पाहिलंत…तुमच्या लाडक्या भाचीचे प्रताप…आपण काय मेलो होतो का….अगं सांगून तरी जायचंस ना…लोक आमच्या तोंडात शेण घालतील ते वेगळं….

रमेशराव – रेखा…शेण घालण्यासारखं काय आता यात…फुकट काम करतीय का ती…मग मी तिला पैसे देत होतो तेव्हा का अडवलंस मला…तिनं तिच्या कष्टाचे पैसे मिळवलेत…यात तरी काही चुकीचं आहे असं मला नाही वाटत…तू नाही तिथे शंका…कुशंका काढणं बंद कर गं…

रेखा – ठीक आहे कमवा…कमवा…आम्ही आहोत इथे राबायला…घरची धुणी-भांडी करायला…

रमेशराव – माहिती आहे कोण राबत ते घरात…खरंच रेश्मा तू तुझ्या बहिणीकडून काहीतरी शिक…कुचाळक्या करणं सोडून दे यानं कुणाचं भलं होत नसत कधी हे लक्षात ठेव…

मुग्धा – मामा…जाऊ द्यात ना…बरं आज सांगा बरं काय करायचं संध्याकाळच्या जेवणाला…?

रमेशराव – नाही बाळा….आज नको करुस स्वयंपाक…या दोघीनाच करू देत दमली असशील…

मुग्धा – मामा…मी कसली दमतीय…अहो आज फक्त कामाचं बोलून आलेय…बाकी उद्यापासून सुरुवात करायची आहे कामाची…आईसाहेबांना माझी गरज सांगितली…त्यांनी तातडीने ऍडव्हान्स दिले म्हणून फीचा प्रश्न तरी मार्गी लागला…नाहीतर अवघड झालं असतं…

रमेशराव – पोरी…तुला माझ्यामुळं एवढा त्रास सहन करावा लागतोय…खरंच तुझ्या आईला दिलेलं वचन मला पाळता येईल का…?

मुग्धा – मामा…काही होणार नाही रे…होईल सगळं नीट …करता करविता वरती बसलेला आहे….ते आहे ना डायलॉग आनंद पिक्चरमधला….’ हम सब रंगमंच की कठपुतलिया है…I ‘

रमेशराव – हम्म….’ जिंदगी और मौत उपरवाले के हात मे है हम सब रंगमंच की कठपुतलिया है ‘ असा डायलॉग आहे…

मुग्धा – बाप रे….डायलॉग वरून आठवलं….माझं भाषण आहे…वक्तृत्व स्पर्धा आहे ना त्यात पार्टीसिपेट केलंय मी…मला सगळ्या पोरींनी नदी लावलं…नाहीतर माझी नव्हती तयारी भाषणाची…

रमेशराव – ऐक ना…तू तसंही उद्या तिनं तास आधीच निघणार आहेस ना मग भाषण तिथे गेल्यावर काम करता करता पाठ कर की…नाहीतर मनानेच बोलायचं…नीट समजून उमजून…तसंही भाषण करण्यात कुणीही तुझा हात धरणार नाही सगळ्या गावात…

मुग्धा – नाही एवढा कॉन्फिडन्स बरा नाही…ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात याला मग…

रेखा – कॉन्फिडन्स ने जरा स्वयंपाकात मदत करायला या….नाहीतर नाहीतर भाषण येणार नाहीय जेवण बनवायला….

रमेशराव – जा मुग्धा काय म्हणतोय ते पहा….काहीही बरळती आहे ती…

मुग्धाला त्या घरात फक्त मामाचा तेवढा आधार होता म्हणून सगळं निभावू शकत होती एकटी मुग्धा…त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून मुग्धाचं मस्त रुटीन सुरु झालं होत….तिनं तास आधीच घर सोडल्यामुळे घरातला मामींकडून होणारा जाच कमी झाला…दिवसभर काम करून रात्री अभ्यास असं मस्त रुटीन मुग्धाला जमत होत…निंबाळकरांच्या पटांगणात मस्त एक मांडव घातला होता….त्याला रंगीबेरंगी विजेच्या माळा लटकावल्या होत्या…त्यात पताके लावले होते…मंडपाच्या मध्यभागी एक मोठा ओटा असल्याने त्यावरच गणपती बसवण्याचं ठरवलं होत…मुग्धाने मस्त हिमाच्छादित पर्वतरांगा उभारल्या त्यासाठी सगळी तयारी मुग्धा अगदी हिरीरीने करत होती…हि सगळी धडपड आईसाहेब दुरून पाहत होत्या…गणपती आणि गौरीच्या दर्शनासाठी भाविक रांग लावून बसणार म्हणून ओट्याच्या मध्यभागातूनच सुंदर असं लाल रंगाचं कार्पेट अंथरलं होत….प्रवेशद्वारापाशीच केळीचे खांब उभारण्याचंही मुग्धाने सुचवलं होत…पण गणपती ज्यादिवशी बसवले जातील त्याच दिवशी केळीचे खांब उभारता येतील असं मुग्धाने सक्त बजावलं होत…बजावण्यातली ढब, बोलण्यातली शैली…दुसऱ्यांकडून काम करून घेण्याचं कसब सगळं आईसाहेब बारकाईने पाहत होत्या….

तयारी करत असताना दुसरीकडे आपलं भाषणही मुग्धा पाठ करत होती…अभ्यासातली जिद्द आणि चिकाटीही आईसाहेबांनी पहिली…म्हणून आईसाहेब तर मुग्धावर खूप खुश होत्या…तयारी करता असताना भाषणाचा दिवस कधी येऊन ठेपला हे मुग्धाला कळलंच नाही…पाहुयात खरंच भाषण आईसाहेबांपुढे होईल आणि आईसाहेबांना आवडेल की नाही आणि आवडलं तरी बक्षीस मुग्धाला मिळेल…? ते पाहुयात पुढच्या भागात….

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.