Ritbhatmarathi

Search
Close this search box.

माधवने गाडीची खिडकी खोलून समोर कोण आहे ते पाहिलं…..मुग्धा मात्र चार दोन शब्द बोलतच राहिली…कारण अचानक गाडी समोर आल्याने थोडीशी घाबरली होती….
मुग्धा – काय हे…गाडी चालवताना शिस्त लागते…उगाच माकडाच्या हाती कोलीत दिलंय असं वाटतंय एकेकाची गाडी चालवण्याची तऱ्हा बघून…[ हा सगळा प्रकार मुग्धाच्या मैत्रिणी पाहत होत्या..]

माधव – ए…पोरी खूप बोललीस…जास्त शहाणपणा करू नकोस…चालतानाही अक्कल लागते हे माहिती नाही वाटत तुला…[माधवच्या शेजारीच माधवची फॉरेन ची मैत्रीण बसलेली असते ती माधवला म्हणते आणि शांत करते ]

शार्ली – माधव…डोन्ट बी अग्ग्रेसिव्ह…लिव्ह इट….
माधवने आपल्या मैत्रिणीचं म्हणं ऐकलं आणि आपल्या आलिशान गाडीतून तडक आपल्या घरी येऊन पोहोचला….घरी आपल्या आईला पाहताच माधव ला परत ताजतवानं वाटू लागलं…आपल्या स्वागतासाठी सगळा बंगला फुलांनी सजवला असल्याचं पाहून माधवला आकाश ठेंगणं वाटू लागलं…कारण माधव आठ वर्षानंतर मायदेशात आला होता आपल्या पोटच्या पोराचं स्वागत कसं दिमाखत झालं पाहिजे असं कुठल्या आईला नाही वाटणार….आईला पाहताच माधव जणू एका वासराप्रमाणे आपल्या आईला बिलगला आणि म्हणाला…
माधव – आई…किती ग तू अजूनही हरहुन्नरी….माझ्या सगळ्या आवडी-निवडी कशा जपून ठेवल्यात कि तू…अगदी फ्लॉवर अरेंजमेंट…हे सगळं डेकोरेशन…कसं लक्षात आहे ना तुझ्या…
आईसाहेब – चांगलं उंचपूर दिसायला लागलं कि माझं पाडस…हे काय लगेच मला बिलंगलास….चल बाहेर हो आधी…दुन्यादेशाहून आलाय आणि असा थेट घरात घुसलास….
माधव – आईसाहेब…माझं काही चुकलं का….असं मला बाहेर जायला सांगितलंस म्हणून विचारलं…
आईसाहेब – अरे….माधव…आपल्या रीतीभाती विसरलास कि काय या आठ वर्षात…?
माधव – मी समजलो नाही…
आईसाहेब – आधी बाहेर हो…

माधव आपल्या आईच्या शब्दाचा मान ठेवणारा म्हणून लगेच उंबरठ्याच्या बाहेर जाऊन थांबला…आईसाहेबांनी भाकर तुकडा आणला….आणि दोन्ही बाजूनं ओवाळून टाकून दिला…भाकर तुकडा ओवाळत असताना…आईसाहेबांची नजर शार्ली वरती पडते…लेक लांबून आला म्हणून आईसाहेब घरात घेताना माधवला काही बोलत नाही…पण आईसाहेबांच्या नजरेतून सुटतंही नाही…म्हणून आईसाहेबाचं स्वतःहून माधवला विचारतात…

आईसाहेब – माधव…अरे हि कोण आलीय…ओळख तरी करून देशील कि नाही तिची…नाही म्हणजे अगदी हातात हात घेऊन उभे आहात एकमेकांच्या म्हणून विचारलं…ऑफिस कलीग आहे कि काय…?

[ आईसाहेबांना लगेच कळून जात…पण तरीही माधव असं काही करणार नाही हे त्या जाणून होत्या…]

माधव – अगं …आई नाही ग…ही शार्ली माझी जवळची…आणि खास मैत्रीण आहे

आईसाहेब – खास…मैत्रीण म्हणजे…हातात हात आणि गळ्यात गळे घालून फिरण्या इतकी खास मैत्रीण आहे तर….!

माधव – आई…तसं काही नाही आहे…तीच नाव शार्ली डिसोझा आहे…गोवन आहे ती…आणि आम्ही शिकायलाही सोबतच होतो…

आईसाहेब – असो….तू दमून आला आहेस…. …पहिलं फ्रेश होशील…मग तुझ्या आवडीचा जेवणाचा खास बेत आहे….थांब सांगते…चिंच गुळाची आमटी,भरली कारली,अळूची वडी…..

माधव – आई…थांब थांब ऐकूनच तोंडाला पाणी सुटलंय…मी आलोच फ्रेश होऊन….

माधव लगेच फ्रेश होऊन येतो….तोपर्यंत आईसाहेब स्वतः शार्लिची राहण्याची सोय करून ठेवतात…प्रशस्त घर आणि थाटमाट पाहून शार्लीला माधवच्या पैशाचा मोह आवरता येत नाही…काहीही करून माधवशी लग्न करून संसार थाटण्याचं स्वप्न शार्ली पाहू लागते…. ….दोघेही फ्रेश होऊन जेवायला बसतात…मनीषा घरातली आईसाहेबांनी खास म्हणून मनीषाचं दोघांचीही वेगवेगळी ताट वाढून ठेवते…त्याच ताटाच्या कडेनं सुंदर रांगोळीही घालून ठेवते…पण माधव मात्र घेताना एकाच ताट घेतो आणि शार्लिच दुसरं ताट परत मागे न्यायला सांगतो….कारण माधव आणि शार्ली असे दोघे एकाच ताटात जेवणार असतात…हे पाहून आईसाहेबांच्या मनात खूप राग आणि चीड येत असते…तरीही राग व्यक्त न करता शांतपणे आपल्या मुलाला काय हवं नको ते स्वतः जातीनं पाहत असतात….काही दिवस असंच आईसाहेब बघत असतात…दोघेही गावभर फिरत असतात…शार्ली तर कहरच करते…तोकडे कपडे घालून गावभर फिरत असे…खुलेआम सिगरेट ओढत असे…आईसाहेबांच्या मनात सुरुवातीपासूनच शार्लिविषयी प्रचंड संताप होता…यावर कायमचा लगाम खेचणं गरजेचं असल्याने आईसाहेब कसलीही पर्वा न करता आपल्या मुलाला याबद्दल जाब विचारायचा असतो…त्या विचारतातही…

आईसाहेब – माधव….मी हे सगळं काय पाहते आहे…परदेशात जाऊन अभ्यास केलास कि असल्या उनाडक्या करणाऱ्या मैत्रिणी बाळगल्यात…

माधव – आई….किती चीडशील…

आईसाहेब – शार्ली आणि तुझं नातं किती दिवस लपवणार आहेस तू…हे असं तोकडे कपडे घालून गावभर फिरणं शोभत नाही तुला…गावात आपली इज्जत आहे…प्रत आहे….अशी या पोरीमुळं एका क्षणात धुळीला मुलावणार आहेस का…? मला काहीच कळत नाही असं जर तुला वाटत असेल ना तर तो तुझा गैरसमज आहे….मला खार काय ते कळलं पाहिजे…

माधव – आई….आता तुला सगळं सांगितलंच पाहिजे…होय….शार्ली आणि मी लग्न करायचं ठरवलंय…मला तीच योग्य वाटते माझी बायको म्हणून…माझी सहचारिणी म्हणून….

आईसाहेब – माधवा…..काय बोलतोयस याच काही भान आहे कि नाही तुला…ही असली मुलगी या निंबाळकर घराण्याची सून होणं कदापि शक्य नाहीय…मी जिवंत असताना…

माधव – आई….का एवढा त्रागा करतेयस…शेवटी तिला आणि मलाच तर संसार करायचाय…आमची आवड-निवड एकमेकांपासून लपून नाही आहे…आम्ही समजून घेऊ शकतो एकमेकांना….दुसरं काय पाहिजे असत आयुष्यात…तुही बाबांशी लग्न केलं…तेही अरेंज मॅरेज…काय झालं…बाबा सोडून गेले तुला कायमचे…

आईसाहेब – मूर्खासारखं बोलू नकोस….आजारपणामुळे गेलेय ते…पण संसार करायचं सोडून दिल नाही मी….तुला शिकवलं…मोठं केलं…तुझ्या अपेक्षा चुटकीसरशी पूर्ण केल्या….पण तू मला काय दिलंस…? ही अशी ना जातीतली ना पातितली मुलगी….जात-पात जाऊ देत पण साधं चांगलं वळणही नाहीय तिला….माझ्या सुनेच्या बाबतीत काही अपेक्षा आहेत…

माधव – माझ्याही माझ्या भावी पत्नीकडून काही अपेक्षा आहेत…तू अशी लाजणारी मुरडणारी मुलगी आणशील…मी काय तिच्याबरोबर लाजत मुरडत बसू का…मला माझी बायको चारचौघात सुंदर दिसणारी हवीय…आणि घरकामाचं काय गं…ती काम करायला घरात भरमसाठ नोकर आहेत…

आईसाहेब- ठीक आहे…मी तयार होईल पण फक्त एका अटीवर….

माधव – कुठली अट…?

आईसाहेब – आठ दिवस देते तिला सुधारायला…त्या आठ दिवसात तिनं माझं मन जिंकलं तरच तू तिच्याशी लग्न करू शकतोस…

माधव – आईसाहेब हे जरा अति होतंय…

आईसाहेब – काही अति होत नाहीय…आयुष्याचा प्रश्न असतो लग्न म्हणजे…बाळा तुझ्या काळजीनं काळीज तीळ तीळ तुटत रे…काळजीपोटी बोलतीय मी…माझं ऐक राजा…

माधव – आई…अगं पण शर्लीला साधा चहा सुद्धा बनवता येत नाही…ती कशी काय इथं घरंदाज असल्यासारखी राहणार….त्यात गोवन आहे ती मग कसं जमेल तिला…

आईसाहेब – एक सांग माधव…शर्लीच तुझ्यावर खरंच प्रेम आहे का….?

माधव – हो आईसाहेब…तीच माझ्यावर आणि माझं तिच्यावर खरंच खूप प्रेम आहे…

आईसाहेब – तीच तुझ्यावर प्रेम आहे…तर मग प्रश्नच मिटला…तिला हे सर्व जमायला पाहिजे…

माधव – म्हणजे नेमकं काय जमायला पाहिजे तिला आईसाहेब…?

आईसाहेब – म्हणजे ते तुला चांगलंच माहिती आहे मी कशी वावरते दिवसभर तू लहानपानापासूनच पाहत आलाय…मग होणारी सून तश्याच राहणीमान असलेली असायला हवीय…फक्त राहणीमान नव्हे तर बोलण्यातून आणि वागण्यातूनही आपली छाप दिसली पाहिजे….डोक्यावर पदर घेऊन जमणार आहे तिला सगळं…?

माधव – ठीक आहे मी तिला सांगून बघतो…आणि आठ दिवसात चांगलं तयार करतो…

आपल्या मनातलं सगळं माधव शर्लीला सांगतो…या मतावर मात्र शार्ली नेहमीप्रमाणे नकारघंटा वाजवते…

शार्ली – माधव…एकदा मला विचारायचं तरी…माझं काही इम्पॉर्टन्स नाहीय का तुझ्या मनात…तू आत्ताच असा वागतोय….लग्नानंतर तर गुलामच होईल मी….आय डोन्ट डाय लाईक सेर्व्हन्ट….

माधव – ठीक आहे नको माझ्यासाठी एवढं पण करुस…किती तरी मुली माझ्या मागे लागल्यात…मी लागलोय ते फक्त तुझ्या मागे….उद्या एखादं घरंदाज स्थळ आलं ना की बस मग तशीच…

शार्ली – [ लाडात येऊन ] बेबी…कितीदा सांगितलंय तुला…असं अग्रेसीव्ह नको होत जाऊस…मी नाही म्हटलंय कुठं…काय करावं लागेल मला….

माधव – काही नाही…फक्त इथं दिवसभर साडी आणि डोक्यावर पदर घेऊन वावरावं लागेल….घरातला स्वयंपाक,साफ-सफाई असं सगळं करावं लागेल तुला…

शार्ली – काय…मला नाही येत हे सगळं…किती ऑड आहेत तुम्ही यार…

माधव – तुला करावंच लागेल…मी मदत करेल तुला…निदान साडी तरी नेसता येते ना तुला…

शार्ली – हो रे येते… मी आपल्या ऑफिसच्या एका थीम मध्ये केलंत ना इंडियन ब्युटी तेव्हा साडी वेअर केली होती..

माधव – गुड…मग रोज लवकर उठाव लागेल…आणि सर्वात महत्वाचं मला अहो…जाहो…कर म्हणजे आदर वाटतो त्यामधून सर्वांना…आईसाहेबानाही अहो….जाहो करायचं…समजलं…नाहीतर मला शरमेनं मान खाली घालावी लागेल….उद्यापासून तुला स्वतःला प्रूव्ह करावं लागेल…

एवढं बोलून माधव तिथून जातो आणि…आठ दिवसानंतर आईसाहेबांच्या मनात शार्लिविषयी आपुलकी निर्माण होतेय की नाही याची वाट पाहत बसतो….आपणही पाहुयात पुढच्या भागात खरंच शार्ली आईसाहेबांच्या मनात घर करू शकेल…