Skip to content Skip to sidebar Skip to footer

तुझं माझं जमेना भाग १०

आईसाहेबांना पाहताच मॅनेजरच्या डोळ्यासमोर भरदिवसा चांदणे दिसू लागतात…त्यातून माधव आणि आईसाहेबांचं नातं मॅनेजर ला कळून जात आपण माधववर अपशब्दांचा भडीमार केलाय याची त्यांना जाणीव होऊ लागते…कसाबसा मॅनेजर बोलू लागतो –

मॅनेजर – आईसाहेब…मला माफ करा…हे तुमचे सुपुत्र आहेत याची जराशीही कल्पना मला नव्हती…खरंच…सांगतोय मी…[ स्वतःच्या कानफटात मारून घेतो ] परत करशील अशी चूक….परत करशील…?

आईसाहेब – पहिलं हे स्वतःला मारायचं नाटक आधी बंद करा…यानं काय तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध होणार आहे कि काय…?

माधव – आईसाहेब…काहीही नाही…याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यातच शहाणपणा आहे आपला…थांबा मी पोलिसांना कॉल करतो…

मॅनेजर – [ माधवचे पाय धरून ] नाही साहेब…असं करू नका…मला मी पोरं-बाळ असलेला माणूस आहे…या वेळी दया करा माझ्यावर…

आईसाहेब – हे नाटक बंद करा आधी…माझ्या कारखान्यात जो कामात कुचराई करेल त्याला माफी नाही…माधव पोलिसांना फोन लावं…

 माधव लगेच पोलिसांना फोन लावतो…हा सगळा थरार मुग्धा आपल्या डोळ्याने पाहत असते….ती संभ्रमात पडते की आधीचा मग्रूर उर्मट माधव खरा आहे की आत्ताचा…कारण सुस्वभावी माणूस नेहमी खऱ्या बाजूने झुकतं माप देतो….आणि उर्मट माणूस खोट्या गोष्टी पाठीशी घालतो…म्हणून मुग्धाला माधवचा खरा स्वभाव पटकन कळून गेला….आपण जो माधव आधी पाहिलेला होता तो खरा माधव नव्हता म्हणून मुग्धाला माधवबद्दल एक आदर वाटू लागतो…काही क्षणातच पोलीस येतात आणि सत्यवानला म्हणजेच मॅनेजर ला अटक करून घेऊन जातात…एका अपराध्यासारखा खाली मान घालून मॅनेजर तिथून पोलिसांच्या गाडीत जातो…दुसरीकडे मात्र आपल्या  माधवच्या लग्नाची बोलणी आणि मुग्धा माधवची भेट घडवणं राहूनच जातं…आईसाहेब मात्र ही गोष्ट तसूभरही विसरल्या नव्हत्या…म्हणून माधवची आणि मुग्धाची आधी ओळख करून देतात…माधव निघण्याच्या तयारीत असतो म्हणून आईसाहेब माधवला थांबवतात….

आईसाहेब –  अरे माधव…कुठे चाललास…थांब की जरा…एवढं मोठं काम केलंस आणि आईकडून कौतुकाचे शब्दही ऐकून नाही घेणार…!

माधव – आई कौतुक नको आता राहू देत…

आईसाहेब – अरे थांबशील तर झिजशील का…थांब ओळख करून देते तुझी…गावातली हरहुन्नरी तरुण पिढी आहे…त्यांना प्रोत्साहन तरी देशील…

माधव – बरं…

आईसाहेब – [ मुग्धाला आपल्या जवळ घेऊन म्हणतात ] ही मुग्धा…एक उत्कृष्ट वक्ती…भाषण खूप छान जमतं हिला…आणि हा माझा मुलगा माधव…

मुग्धा – हो आईसाहेब…सगळं गाव ओळखत यांना…

माधव – आणि…मीही चांगलाच ओळखतो हिला…[ तिरस्काराने म्हणतो ]

आईसाहेब – अरे वाह्ह…तुम्ही ओळखता म्हणजे एकमेकांना…चांगली गोष्ट आहे…

माधव – आईसाहेब…ही एकदम व्रात्य आणि आगाऊ मुलगी आहे…अगं त्यादिवशी माझ्या गाडीसमोर येऊन धडकली…रस्त्यावरती चालत नाही वाटत कधी…का नेहमी हवेतच उडते…ओह्ह्ह….मॅनर्स कळावे लागतात थोडेसे…

मुग्धा – ओ…साहेब लई बोललात…आयुष्यभर रस्त्यावरती चालत आलीय मी…इथं आईसाहेब आहेत म्हणून ऐकून घेतोय तर फायदा घेऊ नका माझ्या कमी बोलण्याचा…

माधव – तू….आणि कमी बोलतीय….थांब आरसा देतो त्यात पाहून सांग….तेव्हा तर मारे तोंडात मठ भिजत नव्हता एवढी बडबड करत होतीस…

मुग्धा – आपलं हे असाच हाय….अंगावर याल तर शिंगावर घेऊ…अशी जात हे माझी…म्हणून कुणी नादी लागत नाही माझ्या…

माधव – आईसाहेब किती बडबड करतीय पाहिलंत ना…

आईसाहेब – अरे…दोघेही शांत बसा जरा…असं वाटतंय एखाद्या दोन पार्ट्या आल्यात आणि युती जमत नाहीय म्हणून भांडणं करत आहात…

माधव – युती आणि या पार्टीबरोबर…आईसाहेब काय बोलताय तुम्ही…?

आईसाहेब – अरे तुम्ही दोघेही भांडायचं थांबवा जरा… ..आणि माधव घरी निघऊयात आपण आता…चल मुग्धा गाडीतून सोडते तुला कॉलजमध्ये…

 आईसाब म्हणताचक्षणी मुग्धा गाडीमध्ये जायला लागते तेवढ्यात थबकते आणि आईसाहेबांना म्हणते…

मुग्धा – नाही आईसाहेब…तुम्ही जावा…मी जाते…इथून फाट्यापर्यंत गेलं कि भेटेल कुनाचीबी गाडी…

आईसाहेब – मुग्धा अगं कुणाच्याबी गाडीमधून जाणार आहेस का…एक तर लोक चांगले नाहीत…मला असं वाटत तू आमच्यासोबत यावंसं…तुला तुझ्या कॉलेज पर्यंत सोडवू की आम्ही…

माधव – हा बोलावं…जशी काय घरचीच गाडी आहे तिच्या…!

मुग्धा – साहेब…गरिबाला स्वाभिमान असतो ध्यानात ठेवा..[ आईसाहेबांकडे पाहून म्हणते ] नाही… आईसाहेब मी पायीच जाईल…इथं भेटेलच कुणीतरी…तुम्ही बिनघोरपणे जावा…

 मुग्धा जायला निघताच असते पण तेवढ्यात आईसाहेब मुग्धाच्या बकोटीला पकडून गाडीमध्ये बसवतात…आणि म्हणतात…

आईसाहेब – काहीच गरज नाहीय कुणाला घाबरायची…ये बैस माझ्या शेजारी…

 मुग्धा खूप अवघडल्यासारखी गाडीमध्ये बसते…इच्छा नसताना ती बसलेली असते…तेवढ्यात माधव ड्राइवर शेजारी बसलेला असतो त्यामुळे समोरच्या आरशामध्ये मुग्धाचा चेहरा त्याला दिसत असतो म्हणून मुग्धा आपला चेहरा चोरून बसलेली असते…आईसाहेब मुग्धाला म्हणतात…

आईसाहेब – अगं…केवढी अवघडल्यासारखी बसलेली आहेस…जरा मोकळी बस की…आणि हे काय चेहरा लपवून का बसलीय…

मुग्धा – आईसाहेब…माझी एक विनंती आहे…

आईसाहेब – हा बोल की…

मुग्धा – तुम्ही या माझ्या सीटवर बसता का…?

आईसाहेब – असं का…?

मुग्धा – आईसाहेब…अगदी मला मनामधून वाटलं तुम्ही या बाजूने बसावं…

आईसाहेब – अगं..काय बोलतेयस…मला कळेल असं बोल की…

मुग्धा – आईसाहेब…आता मला तुम्ही कॉलेज पाशी सोडणार बरोबर…मग या बाजूने बसलात तुम्ही तर तुम्हाला अगदी सहज सोप्प जाईल ना…कसंय…कॉलेजपाशी तुम्ही इतरांना दिसणार मग सगळा घोळका जमेल तुमच्या भोवती…मग तुम्ही त्यांच्याशी बोलण्यात वेळ घालवाल…नाही का..मग यापेक्षा या सीटवर बसलात निदान तुम्ही इतरांना दिसणार तरी नाहीत…

आईसाहेब – अगं पण त्याची काहीच गरज नाहीय…माझी गाडी जरी कुठे दिसली तरी गर्दी जमा होते गाडीभोवती….

मुग्धा – [ आईसाहेबांचे न ऐकताच ड्राइवर ला म्हणते ] ड्राइवर काका…गाडी थांबवा ना…

आईसाहेब – हा ठीक आहे थांबा काका…

 गाडी लगेच थांबते…मुग्धा लगबगीने गाडीबाहेर येते आणि आईसाहेबांना उठवून त्यांना तिच्याच शेजारच्या सीटवर बसवण्याचा आग्रह करते…आणि स्वतः आईसाहेबांच्या जागेवर बसते…पण काही वेळातच कॉलेज येतं आणि मुग्धा आईसाहेबांचा निरोप घेऊन निघते…मुग्धा गेल्यावर लगेच माधव आईसाहेबांना म्हणतो-

माधव – कोण समजते ग ही स्वतःला…

आईसाहेब – कोण म्हणजे काय मुग्धा आहे ती….

माधव – आई….अगं तसं नाही बघ तर केवढी नाटकं करत होती…सीट बदलण्यावरून…आता काय पहिल्या सीटवर होती म्हणून काय काटे टोचत होते की काय तिला…लगेच बदलून घेतलं सीट…तेही तुझ्याकडून…हिंमत कशी झाली तिची…आणि तुही काही एक बोलली नाही तिला…उलट तिच्या अश्या वागण्याचं समर्थनच केलं…तिला खूपच ऑवक्वर्ड वाटत होत…

आईसाहेब – हो वाटणारच…तुझ्याशी भांडली होती ना गाडीत बसण्यापूर्वी…

माधव – आई…तसं नाहीय गं…तिचा चेहरा इथं या मिरर मध्ये दिसत होता म्हणून कशी चेहरा चोरून बसली होती…जशी काय माधुरी दीक्षितच समजते स्वतःला….

आईसाहेब – अच्छा…म्हणून एवढी अवघडल्यासारखी बसलेली होती तर…जाऊ देत गेली ना ती कॉलेज ला…अरे पण तू एवढी खुन्नस का धरतोयस तिच्यावर…एक तर आईबापाविना पोर ती…

माधव – काय…आईवडील नाहीत तिला…? तरीच शिस्तीची आणि हिची हुकाचूक आहे…चांगली शिस्त लावायला आई-वडील असायला हवेत नाही का…

आईसाहेब – माधव…असं वाईटसाईट बोलू नये माहिती नसताना…[जोरात ओरडून माधवला बोलतात ]

माधव – मुलींच्या जातीला शोभत नाही असला थिल्लरपणा…

आईसाहेब – माधव…खूप बोललास…तिला थिल्लर म्हणतोस…शार्ली सारख्या मुली आवडतात नाही का तुमच्या सारख्या पोरांना…अरे काय येत नाही तिला…सगळ्या कामात तरबेज आहे मुलगी…माहितीय का तुला…आपल्या गणपतीची सगळी सजावट हिनेच तर केलीय…ज्या डेकोरेशनच तू कौतुकही करत होतास की…

माधव – काय फडतूस डेकोरेशन होतं…आणि त्याचे तू तिला पैसेही दिले…तुझी पण कमाल आहे गं…एवढी धुरंधर राजकारणी तू….

आईसाहेब – माधव…तू खरंच बुद्धू आहेस…मुग्धाची परिस्थिती खरंच खूप नाजूक आहे…मामीचा जाच सहन करत करतंच लहानाची मोठी झालीय…त्यादिवशी कॉलेजची परीक्षा फी भरायला म्हणून आपल्याकडे कामासाठी आली होती…खरंच मेहनतीचे पैसे घेतले तिने माझ्याकडून…मी तिला म्हंटलंही तुला पैसे पाहिजे असं म्हटलं तरी दिले असते…पण पोरगी स्वाभिमानी घेतले नाही पैसे माझ्याकडचे…म्हणाली….मेहनतीचे पैसे समाधान देतात…

माधव – अगं असं वागली म्हणून लगेच चांगली वाटली नाही का तुला….त्यादिवशी वर्गाबाहेर उभं केलंत सगळ्या मुलींना…त्यात हीसुद्धा होती…नक्कीच काहीतरी टवाळक्या केल्या असतील…

आईसाहेब – माधवा…दिसत तसं नसतं…एवढं लक्षात ठेव…कुना दुसऱ्यावर आलेले बालंट स्वतःवर घेतलं पोरीने…तुला नाही समजायचं…जाऊ देत..!

दोघं मायलेक घरात आली…माधव पटपट जेवण करून दुसऱ्या कामासाठी घराबाहेर पडला…पण आईसाहेबांच्या मनात दोघांचं कसं जमेल लग्नानंतर…असा विचार सारखा सारखा येत होता…आईसाहेबांना काहीही करून मुग्धाच्या मामाशी बोलून मुग्धाच्या लग्नाची बोलणी करायची होती…पण दुसरीकडे मात्र मामी एका बिजवराशी मुग्धाचं लग्न ठरवत असल्याची कुणकुण मुग्धाची मैत्रीण शमाला लागते…याचबद्दल शमा आणि मुग्धा अशी दोघींची बोलणी चाललेली असतात…

शमा – मुग्धा पार्टी…पार्टी…!

मुग्धा – अय…खुळे…कसली पार्टी…याड लागलंय की काय…

शमा – हा….याड लागलं गं याड लागलं गं….रंगलं तुझ्यात याड लागलं गं…

मुग्धा – ए…नौटंकी…बंद कर गं तुझं नाटक…पहिलं पार्टी कसली ते सांग…

शमा – तुझं लग्न होणार याची…

मुग्धा – ए….माझं लग्न होणार…मलाच माहिती नाही तुला गं कसं समजलं…

शमा – तुझी मामी…परवा दिवशी नदीवर आली होती धुणी धुवायला…तेव्हा समजलं…

मुग्धा – परवा दिवशी…धुणी तर मीच धुवत असते रोज…हि कोणती धुणी धुवायला गेली होती…..

शमा – असं…तर अगं धुणी धून म्हणजे याच्या त्याच्या चहाड्या करणं…असं तुझ्या मामीला कुठला कामाचा सोस आहे…म्हणजे नुसती बसलेली तर असती एका ढिगालासारखी…

मुग्धा – आज घरी जाऊन सोक्ष-मोक्ष लावलाच पाहिजे या सगळ्याचा…

कॉलेज सुटल्यानंतर मुग्धा रागाच्या भरातच घरी तडक येऊन पोहोचते…आल्या आल्या मुग्धा आपल्या मामीवरती बरसेल…की इथेही मुग्धाला तडजोड करावी लागेन…पाहुयात पुढच्या भागात…..

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.