Skip to content Skip to sidebar Skip to footer

जाणून घ्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन करण्याचे फायदे. सुख, समृद्धीसाठी हे नक्की करा.

turmeric in marathi : मित्रांनो आपले घर म्हणजेच जिथे आपण रहातो ती जागा, वास्तू उत्तम असावी, शांत असावी, प्रसन्न असावी असे सगळ्यांनाच वाटते. आपण बऱ्याचदा या गोष्टींचा अनुभव घेतो की एखाद्याच्या घरी गेल्यावर आपले मन उगाच अशांत, अस्वस्थ होऊन जाते काहीच कारण नसताना. हे का होते ते आपल्याला कळत नाही पण याला कारण म्हणजे त्या वास्तूतील दोष असतात. बऱ्याच जणांचा यावर विश्वास बसत नाही पण अनुभव आल्यावर मात्र विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय उरत नाही.

वास्तू ही घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध ठेवण्यास कारणीभूत असते. वास्तू जर पवित्र असेल तर घरातील वातावरण आपोआप शांत, प्रसन्न आणि लाभदायक होते. घरात कटकटी, मतभेद नसतात. पैसा टिकून रहातो, मन बेचैन अस्वस्थ होत नाही, आजारपण, विनाकारण चिडचिड, कलह, नात्यात दुरावा या गोष्टी तिथे जाणवत नाहीत. एकंदरीतच मानसिक समाधान मिळते आणि आयुष्य सुकर होते. आपल्या घरात येणाऱ्या लोकांच्या नकारात्मक विचारांचा प्रभाव पण आपल्या घरातील शांततेवर करत असतो. कारण घरात येणारे लोक कोणत्या भावनेने, विचाराने येतात ते आपण सांगू शकत नाही. त्यामुळेच आज असा एक छान उपाय घेऊन आलो आहोत जो आपल्या घरातील वातावरण तर सकारात्मक ठेवेलच पण येणाऱ्या लोकांच्या नकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्यावर म्हणजेच घरातील लोकांवर होऊ देणार नाही. चला तर बघुया काय उपाय आहे ??

लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री सुक्ताबरोबरच लक्ष्मी सूक्त ह्या स्तोत्राचेही पठण करा. श्री लक्ष्मी सूक्त पठण

जाणून घ्या तुळशीचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आणि फायदे

हा उपाय अगदी घरच्याघरी करता येण्यासारखा आहे शिवाय घरात उपलब्ध असलेल्या वस्तुनीच होईल असाच आहे. हा उपाय म्हणजे उंबरठ्यावर हळदीचे लेपन करणे हा आहे. प्रत्येकाच्या घराला उंबरठा किंवा उंबरा असतोच. आजकाल फ्लॅट सिस्टीममुळे अनेक घरांना उंबरा नसतो पण ज्यांना उंबऱ्याचे महत्व माहीत आहे असे लोक आवर्जून उंबरा बसवून घेतात. आजकाल सगळे कडाप्पा बसवतात उंबरा म्हणून. पण कुठले ही उंबरे बसवण्यापेक्षा सागवानी लाकूड वापरून किंवा कोणत्याही प्रकारचे लाकूड वापरून बनवलेला उंबरा असावा. कारण लाकडी उंबऱ्यामधे नकारात्मकता शोषून घेण्याची तसेच सकारात्मक ऊर्जा देण्याची क्षमता असते. म्हणूनच देवघर सुधा लाकडी असावे असे म्हणतात.

आता तुम्ही म्हणाल की उंबरा, का असावा घरात ?? तर घरातील उंबरा हे मर्यादेचे प्रतीक मानले जाते. तसेच उंबरठ्यात देवांचा वास असतो आणि तिथूनच देव घरात प्रवेश करतात असे मानले जाते. म्हणूनच सगळ्यांच्या घरात उंबरा असावा.

हळदीचे लेपन केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते. म्हणून हळद लेपन करावे.

कोणत्याही शुभ दिवशी किंवा मग तुम्ही उपवास करता त्यादिवशी हळद लेपन करवे. प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, गुरुवार, अमावस्या, पौर्णिमा तसेच कोणतेही शुभ दिवस, पाडवा, दसरा, दिवाळी अशा दिवशी हळद लेपन करावे.

१.सकाळी लवकर उठून स्नान पूजा आटपून उंबरा स्वच्छ करावा.
२. हळदीचे लेपन करण्यासाठी थोडी हळद, अष्टगंध, चंदन पावडर, गुलाबजल असेल तर नाहीतर घरातील पाणी वापरू शकता, गोमूत्र एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण सगळ्या उंबरठ्यावर व्यवस्थित लावावे आतून बाहेरून.
३. त्यावर स्वस्तिक, लक्ष्मीची पावले आणि उंबरठाभोवती रंगोली काढावी.
४. त्यावर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून धूप दिव दाखवावा.
उंबरठ्यावर उजव्या हाताला दिवा लावून ठेवावा.
५. उंबरठ्यावर दोन्ही हात लावून माझ्या घरातील सगळी नकारात्मकता घालवून, सुख, समृद्धी राहुदे अशी प्रार्थना करावी.
६. नंतर दुसऱ्या दिवशी अक्षता पक्षांस खायला द्याव्यात आणि फुले मातीत घालून ठेवावीत.
आणि पुन्हा हळद लेपन करण्याआधी उंबरा स्वच्छ करून घ्यावा.

तर अशा प्रकारे हा छोटासा पण प्रभावी उपाय करून बघा आणि अनुभूती घ्या.

===================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.