Skip to content Skip to sidebar Skip to footer

उत्तम आरोग्यासाठी टूना फिशचा आहारामध्ये नक्की सामाविष्ट करा.

tuna fish in marathi: आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे आणि हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कोणीही आपल्या आरोग्याकडे लक्ष देताना दिसून येत नाही. आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आहार. जेवणातून रोज आवश्यक ती पोषकतत्वे पोटात जायलाच हवीत. त्यासाठी पूर्ण पोषकतत्वे असणारे पदार्थ कोणते हे माहीत करून घ्यायला हवे. आजकाल सगळेच जंक फूड आणि फास्ट फूड जास्त खातात. त्यामुळेच तब्येतीची हेळसांड होते आहे. म्हणूनच आज आपण अशा एका पदार्थाची माहिती करून घेणार आहोत जे करोडो भारतीयांचे मुख्य अन्न तर आहेच शिवाय यात शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषकतत्वे आहेत.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असा कोणता पदार्थ आहे ?? तर सगळे पौष्टिक घटक पोटात घालण्याचा सर्वात सोपा आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे ” मासे ” आहेत.

जितके प्राणी पाण्याच्या वर राहतात तितकेच पाण्याखाली पण. मासे हा त्यातीलच एक घटक. तसे पाहायला गेले तर सगळ्याच मासे प्रकारात खूप पोषक घटक आहेत. पण त्यातल्या त्यात टूना फिश हा सगळ्यात जास्त फायदे देणारा तसच पोषक घटक असणारा मासा आहे.

टूना फिश हा समुद्रात आढळणारा खारट पाण्याचा मासा आहे. या माश्याला मॅकेरल कुटूंबाचा सदस्य मानला जातो. या माशाची लांबी ही 1 फूट ते 15 फूट पर्यंत असते. हा मासा जास्त फायदेशीर असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यात इतर माशांपेक्षा पारा जास्त असतो. या माशाला मराठीत कूपा असे म्हणतात. या माशात ओमेगा ३ आणि व्हिटॅमिन बी असते जे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

हा विशेष प्रकारचा मासा थूनिनी नावाच्या प्रजातीचा आहे. यालाच ट्यूनी असेही म्हटले जाते. याच्या अनेक प्रजाती जगभरात प्रसिद्ध आहेत. याच्या काही प्रजाती ४० ते ५० वर्षापर्यंत जगतात असे मानले जाते. शिवाय हे मासे आकार बदलतात. हे मासे खाऱ्या पाण्यात राहतात.

हा मासा समुद्राच्या खाऱ्या पाण्यात आढळतो त्यामुळे गोड्या पाण्यातील माशापेक्षा हा मासा शरीरासाठी जास्त गुणकारी आणि आरोग्यदायी असतो. गोड्या पाण्यातील माशांना जास्त वास आणि कमी पोषक तत्वे असतात. शिवाय चव पण खाऱ्या पाण्यातील माशांना जास्त चांगली असते. हे सगळेच घटक टूना माशातअसल्याने हा मासा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.सगळेच आवश्यक घटक जसे की, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12, फॉस्फरस आणि पोटॅशियम असे अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आहेत. याशिवाय त्यात थायामिन, मॅग्नेशियम आणि आयोडीन असते जे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर खूप असते. ज्यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो.

( USDA )नॅशनल न्यूट्रिएंट डेटाबेसनुसार, 100 ग्रॅम निरोगी ट्यूना फिशमध्ये खालीलप्रमाणे पौषक तत्वे अढळतात :

[tablesome table_id='17154'/]
[tablesome table_id='17158'/]
  • टूना फिश ही उत्तम प्रकारची जलतरणपटू असते. हा मासा 70 किमी/तास (43 mph) वेगाने पोहण्यास देखील सक्षम आहे.
  • पांढरे मांस असलेल्या समुद्रातील इतर माशांच्या विपरीत, ट्यूनाचे स्नायू गुलाबी ते गडद लाल रंगाचे असतात. म्हणजे टूना फिशचे मांस गुलाबी ते गडद लाल रंगाचे असते.
  • टूना फिशमध्ये ब्लूफिन ट्यूना सारख्या काही प्रजाति उबदार रक्ताच्या असतात, त्यांचा विशेष गुण म्हणजे, ब्लूफिन. टूना फिश स्नायू हलवून, आपल्या शरीराचे तापमान पाण्याच्या तापमानापेक्षा जास्त वाढवू शकतात. हा गुणधर्म त्यांना थंड पाण्यात टिकून राहण्यास आणि समुद्रातील वैविध्यपूर्ण वातावरणात सक्षम राहण्यास मदत करतो.
  • टूना फिश सामान्य चयापचयद्वारे निर्माण होणारी उष्णता वाचवून शरीरातील तापमान संतुलित करते.
  • पूर्व प्रशांत महासागरात टूना फिशच्या बहुतेक प्रजाति शार्क माशापासून आपला बचाव करण्यास साठी डॉल्फिन कळपाच्या आसपास राहतात.
  • टूना हे स्कॉम्ब्रिडे कुलातील खाऱ्या पाण्यात राहणारे मासे आहेत.
  • टूना हा मासा थुन्नुस वंशाचा आहे. थुन्नुस वंशाचे मासे हे आकाराने मोठे असतात, त्यामुळे त्यांचे व्यापारी मूल्य ही सर्वात अधिक असते.

उत्तम आरोग्य हवं असल्यास आजच तुमच्या स्वयंपाकघरातील हि भांडी वापरायची बंद करा.

इम्युनिटी वाढवायची असल्यास हे पदार्थ नक्की ट्राय करा.

१. त्वचेसाठी फायदेशीर :

टूना फिश त्वचेसाठी कसा फायदेशीर आहे या संबंधित एका संशोधनात सांगण्यात आले की टूना फिश हार्ट एक्स्ट्रॅक्टचे काही असे प्रभाव आहेत, ज्यामुळे त्वचेमध्ये कोलेजन संश्लेषण वाढू शकते. त्यात वय वाढले तरीही कळून न येणारे आणि सुरकुत्या विरोधी गुणधर्म देखील आहेत, जे त्वचेवर वृद्धत्वाचे परिणाम थांबवण्यासाठी सकारात्मक परिणाम दाखवू शकतात. चेहर्‍यावरील काळे डाग, मुरूम घालवण्यासाठी या माश्यांचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. एकंदरीतच टूना मासा त्वचेशी निगडित सगळ्याच त्रासावर काम करते.

२. प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी :

ट्यूना शरीराला भरपूर पोषक आणि प्रथिने प्रदान करते. काही अभ्यासानुसार, ट्यूना मानवी शरीराला एक चतुर्थांश पोषक तत्वे देते. शरीरातील पेशी तयार होण्यास मदत होते. तसेच शरीरातील कॅलरीज नियंत्रित करण्याचे काम हे मासे करतात.

३. ऊर्जेचा स्त्रोत :

यात अनेक पोषकतत्वे असल्याने शरीराला लागणारी ऊर्जा तसेच पोषक तत्वे मासा पुरवतो. त्यामुळेच टूना मासा उर्जेचा चांगला स्त्रोत मानला जातो. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर (USDA) द्वारे प्रदान केलेल्या माहितीनुसार, 109 kcal ऊर्जा प्रति शंभर ग्रॅम ट्यूना माशांमध्ये असते. अशा स्थितीत शरीरातील ऊर्जेची कमतरता ट्युना फिशच्या सेवनाने पूर्ण होऊ शकते. एका अभ्यासानुसार, ट्यूना फिशमध्ये असलेल्या पुरेशा कॅलरीजचे सेवन करून शरीरातील ऊर्जेची कमतरता भरून काढता येते.

४. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी :

अर्थातच हे वेगळं सांगण्याची गरज नाही की, माश्यात अनेक पोषक्तत्वे आहेत. त्यामूळे सगळ्या आजारांपासून मासे संरक्षण देतात. आणि कोणत्याही आजारा पासूनदूर राहण्यासाठी व झालेला आजार लवकर बरा होण्यासाठी आपल्या शरीरात रोगप्रतिकारकशक्तीची गरज नेहमी भासते. टूना फिशमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिड रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यास मदत करते. त्यामुळे आजारांना विरोध करण्यास शरीर तयार होते.

५. हाडे निरोगी ठेवण्यासाठी :

हाडांना निरोगी ठेवण्यासाठी कैल्शियम व ड जीवनसत्त्वाची आवश्कता असते. कारण कॅल्शियममुळे हाडे तयार होण्यास व ड जीवनसत्त्वामुळे हाडे बळकट होण्यास मदत होते. टूना फिश मध्ये ही दोन्हीं पोषक तत्व मोठया प्रमाणावर असतात. त्यामुळेच शरीरातील हाडे मजबूत आणि बळकट होतात. नाहीतर साधारण चाळिशी नंतर सर्वानाच त्यातल्या त्यात स्त्रियांना ठिसूळ हाडांच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे आहारात नेहमी मासे घेतले तर हा त्रास होणार नाही.

६. किडनीच्या आजारात आराम दायक :

मूत्रपिंड व्यवस्थित काम करण्यासाठी किंवा संतुलित ठेवण्यासाठी सोडिअम आणि पोटॅशियम यांची गरज असते. आणि टूना माशांमध्ये सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण संतुलित असते, सोडियम आणि पोटॅशियम एकत्रितपणे शरीरातील द्रव संतुलन व्यवस्थापित करतात, म्हणून मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करू शकतात. पर्यायाने किडनीचे आरोग्य उत्तम राहते.

७. स्तनाचा कर्करोग दूर ठेवण्यासाठी :

आजकाल स्त्रियांमध्ये स्तन कर्करोग ही समस्या गंभीर स्वरूपच् धारण करत आहे. दिवसेंदिवस अशा पेशंटची संख्या वाढतच आहे. स्तन कर्करोग होण्याचे मुख्य कारण म्हणजे व्हिटॅमिन डी ची कमतरता. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे स्तनाच्या कर्करोग होऊ शकतो. आणि टूना फिशमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात आहे. तसेच कोवळ्या उन्हात ही व्हिटॅमिन डी मुबलक असल्याने ऊन अंगावर घेतल्याने तसेच आहारातून घेतल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. कर्करोगासारख्या भयानक आजारावर टूना फिश कितपत फायदेशीर ठरते यावर अजूनही संशोधन सुरू आहे. त्यामुळे या आजारासाठी फिश सेवन करण्याआधी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा ही विनंती.

८. डोळ्यांसाठी फायदेशीर :

कुपा माशांमध्ये असे अनेक खनिजे असतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. ओमेगा ३ फॅटी असिड सोबत च त्या खानिजांमुळे डोळ्यांचे आरोग्य नीट राखण्यास हे मासे उपयुक्त ठरतात. जसे की डोळ्यांना अंधुक दिसणे, खाज येणे आणि मोतीबिंदू सारखी समस्या उद्भवत नाही.

९. शारीरिक विकासात मदत :

शारीरिक विकास योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. प्रथिनांमुळे मानवी शरीराच्या बाह्य व अंतर्गत जखमा देखील लवकर नीट होतात. टूना फिश मध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते. 100 ग्रॅम ट्यूना फिश खाल्ल्याने 60% ते 70% प्रथिनांची आवश्यकता पूर्ण होते. मग इतका प्रथिनांचा साठा असणारे अन्न खाल्ल्याशिवाय लोक कसे राहू शकतील ?? त्यामुळेच कूपा मासे खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.

१०. वजन कमी करण्यात मदत :

हल्ली वजन कमी करण्यासाठी लोक जिम, डायट असे प्रकार करताना दिसून येतात. यासाठी कितीतरी पैसा ओतण्याची त्यांची तयारी असते. पण महिलांनाच काय तर पुरुषांना ही सुटलेले पोट, अतिरिक्त चरबी पासून सुटका हवी असते. मग हेच काम जर मासे खाण्याने होते असे ऐकले तर सोन्याहून पिवळे होईल ना ?? कारण कूपा माशात कर्बोदक आणि चरबीचे प्रमाण कमी असते, तरीही हयात प्रथिने जास्त प्रमाणात असतात अणि हीच प्रथिन शरीरातील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी खुप महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे शारीरिक विकासासाठी प्रथिने मिळतात शिवाय चरबी वाढत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यास मासे उपयुक्त ठरतात.

११. हृदयाचे आरोग्य सुधारते :

आजकाल खूप कमी वयात म्हणजे अगदी तिशीत हृदय विकाराच्या त्रासाला अनेकांना सामोरे जावे लागत असल्याचे आपण बघतो. कुपा मासे खाण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हृदयाचे आरोग्य सुधारते. टूना फिश मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. जे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास व रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. शिवाय रक्ताभिसरण सुधारते त्यामुळे कूपा मासे खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.

प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसेच तोटे सुधा. आता आपण मासे खाण्याचे अनेक फायदे पाहिले पण तुम्हाला ऐकून नवल वाटेल कदाचित, तरीही कूपा मासे खाल्ल्याने शरीराला नुकसान ही होऊ शकते. बघुया काय होते.

१. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, ट्यूनासह मोठ्या माशांमध्ये लहान माशांपेक्षा पारा जास्त असतो. पारा असलेले मासे गर्भधारणेदरम्यान आणि जन्मानंतर बाळाच्या मेंदूचा आणि मज्जासंस्थेच्या विकासात अडथळा आणू शकतात. त्यामुळे गरोदरपणात मासे खाल्ल्याने फायदे होतात यात काही शंका नाही, परंतु काही प्रकरणांमध्ये ते नुकसान करू शकतात. अशा वेळी गर्भवती स्त्रियांनी मासे खाण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेऊन याचा सेवन करणे खूप फायदेशीर आहे.

२. ज्यांना मासे खाण्याची सवय नाही त्यांना पचनाशी निगडीत समस्या होय शकतात. परंतु याचा कोणताही शास्त्रीय पुरावा अद्याप मिळालेला नाही.

३. अती तेथे माती असतेच असते. मग ती कोणत्याही बाबतीत असो. कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे मासेच काय कुठलेही पदार्थ प्रमाणात खावेत.

आपण पाहिलेल्या माहिती वरून मासे आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेतच यात शंकाच नाही. पण जर महिला गर्भवती असतील आणि काही लोकांना मासे पचायला त्रास होत असेल किंवा मासे खाणे शरीराला सुट करत नसेल तर कृपया मासे खाणे टाळावे किँवा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य प्रमाणात खावेत. ज्यांना खाण्याची सवय आहे अशा लोकांसाठी मासे हे सर्व रोगावर छान उपचारच आहे असे म्हणावे लागेल. त्यामुळे प्रमाणात खा आणि मस्त रहा.

=======================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.