Skip to content Skip to sidebar Skip to footer

तुलसी

सौ विशाखा कित्तुर

तीन वर्षांची तुलसी आपले छोटे छोटे हात जोडून विठ्ठला ला नमस्कार करत होती आणि चांगली बुद्धी दे अश्या बोबड्या बोलाने तिने त्याला सांगितले, आणि तिथला छोटा झाडू घेऊन जसे जमेल तसे देऊळ स्वच्छ करू लागली. येणारे जाणारे कोतुकाने पाहत होते आणि कसे व्हायचे या पोरीचे म्हणून देव दर्शन घेऊन जात होते.

तुलसीला सगळे तुळशी म्हणत ती हे ऐकून नुसतीच गोड हसे. तिला यातले काहीच कळत नव्हते. हळूहळू तुशी विठ्ठलाची परमभक्त झाली . रोज देऊळ झाडने,फुले गोळा करणे, त्याचा हार करणे, जमेल तशी भक्ती गीते गाणे असा दिनक्रम तिने आखून घेतला होता. येणारा जाणारा प्रत्येक जण हळहळत असे कसं होणार या मुलीचे. कारण तुशी होतीच तशी.

अत्यंत काळी ,उंचीला कमी , तुळशी ला रोज हे ऐकून ऐकून पाठ झाले होते पण ते असे का म्हणतात हे मात्र कळाले नव्हते.
एके दिवशी एक बुआ कीर्तन करत होते त्यात काळ्या विठ्ठलाचे वर्णन ते करू लागले, त्याची मनापासून भक्ती केली तर तो कसा भक्तांना प्रसन्न होते हे ते सांगत होते आणि त्यांच्या जवळ एक फोटो होता त्यात तुळशीशी ला तिचे प्रतिबिंब दिसले आणि मग तिच्या लक्ष्यात आले लोक रोज असे का म्हणतात ते.

दुसरे दिवशी पासून तिने लोकांना सांगून टाकले मी काळी आणि तो विठ्ठल पण काळा तो माझ्याशी लग्न करेल तुम्ही कोणी माझी काळजी करू नका. लोक हसून तिची चेष्टा करू लागले आता तर तिने ध्यासच घेतला लग्न करेन तर विठ्ठलाशीच.

तिने विठ्ठलाला साद घालायला सुरवात केली रात्रंदिवस ती अखंड नामस्मरण करू लागली. हळूहळू तिच्या अंगातले त्राण कमी होऊ लागले. सगळे तिला नाद सोडायला सांगू लागले पण व्यर्थ. इकडे विठ्ठलाने रुक्मिणीला सांगितले मला धरतीवर ताबडतोब जावे लागेल माझा भक्त माझी आठवण काढतो आहे रुक्मिणी म्हणाली चला जाऊ पटकन विठ्ठलाने मनाई केली.

बायकांचा स्वभाव मुळातच संशयी मग रुक्मिणी कशी सुटेल तिने प्रश्नांचा भडिमार करायला सुरुवात केली . ती आहे का तो आहे? पण विठ्ठलाने काहीच सांगितले नाही इकडे तुळशी शेवटच्या घटका मोजू लागली विठ्ठलाचे लक्ष उडाले भक्ताला असे पाहणे त्याला जमेना तो धावत आला तो पर्यंत तुशी चे सगळे अंग थंड पडले होते तिचा प्राण फक्त तिच्या टाळूत होता केसातून तो बाहेर पडणार इतक्यात देवाने तिचे केस वरच्यावर धरले .त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याचे थेंब तुशीच्या डोक्यात पडले आणि त्याच्या मंजिऱ्या झाल्या.

देवाने तुळशी ला सांगितले तू माझी खरी भक्त आहेस तू सदैव माझ्या जवळ राहशील. तू तुझ्या भक्तीने माझ्या हृदयात स्थान मिळवले आहेस. माझ्या अश्रूंच्या ज्या मंजिऱ्या झाल्यात त्यातून तुळस उगवेल तुझ्या नावाची आणि इथून पुढे मंजिऱ्या असलेल्याच तुळशीचा हार मला घातला जाईल आणि तू माझ्या अखंड सहवासात राहशील युगानुयुगे 🙏 तेंव्हा पासून कायम विठ्ठलाला मंजिऱ्या असलेल्या हार घातला जातो.

🙏बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏

सौ विशाखा कित्तुर

==================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.