Skip to content Skip to sidebar Skip to footer

ट्रू लव्ह ऑलवेज विन्स

“सॉरी अभय, मला विसरून जा तू. मी आता कधीच हे जग बघू शकणार नाही. मी तुला बघू शकणार नाही, अभय.”

“अर्चु, शांत हो बघू. डॉक्टर म्हणालेत नं अजुनही होप्स आहेत. डॉक्टर त्यांचे प्रयत्न करताहेत अर्चु. तू फक्त धीर नको सोडूस. माझंच चुकलं, तू येत नव्हतीस तरी तुला बळजबरीने घेऊन गेलो लाँग ड्राइव्हला.”

“तुला कुठे रे ठाऊक होतं शोन्या, अपघात होणार वगैरे. तुला का कमी लागलं असणार पण तू सांगत नाहीएस आणि मला बघताही येत नाहीए राजा.”

“अर्चु, मी बरा आहे गं. फक्त उजवा हात थोडे दिवस प्लास्टरमधे राहील बस.”

“डॉक्टर, ऑपरेशन यशस्वी झालं नं. दिसेल नं माझ्या अर्चुला?”

“आय एम सॉरी, मि. अभय. अर्चना व्हील नॉट बी एबल टू सी दिस वर्ल्ड. यु ह्याव टू एनकरेज हर.”

“ओ डॉक्टर..ओ के..”

“अर्चु, अर्चु निराश नको होऊस राणी. माझ्या डोळ्यांनी तू  हे जग बघायचं आहेस.”

“अभय तू प्लीज जा इथून. तुझ्यासमोर पुर्ण आयुष्य पडलय राजा. एखाद्या गुणी मुलीशी लग्न कर नि संसार थाट. तुझ्या आईवडिलांना अशी नेत्रहीन व्यक्ती सून म्हणून चालणार नाही आणि सून तर आनंद घेऊन जाते सासरी मी काय घेऊन जाणार! माझंच आयुष्य काळोखाने भरलय. तो काळोख मी नाही पसरवू इच्छित तुझ्या दुनियेत.”

“अर्चु..अर्चु..दोनचार वाक्यांत मला परकं करून टाकलस! कुठे जाणार नाहीए मी तुला सोडून. कळलं तुला.”

दोघं एकमेकांच्या मिठीत बद्ध झाले. दोघांच्याही पाठीवर परस्परांची आसवं ओघळत होती. अचानक समोर आलेल्या संकटाला दोघंही जिद्दीने टक्कर देण्यासाठी मनोबल गोळा करत होते. सच्च्या प्रेमाला नियती वंदन करत होती.

इतक्यात डॉ. पुरंदरे आत आले,”अर्चना बेटा, तुझ्यासाठी गुडन्युज आहे. एका इसमाने म्रुत्युपुर्वी नेत्रदान केले आहे. तुला नक्की नवी द्रुष्टी मिळेल आता.

ट्रू लव्ह ऑलवेज विन्स.”

===================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: