नववधूसाठी संक्रांत ही खास असते याच खास प्रसंगी हलवा सर्वांना वाटून तोंड गोड केले जाते.त्याच हलव्याचे दागिनेही करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे.फक्त नव्या सुनेसाठी हलव्याचे दागिने न करता जावयासाठीही हलव्यापासून दागिने बनवण्याची पद्धत आहे. यामध्ये अंगठी,बाजूबंद,बिंदी,मेखला,ठुशी,चिंचपेटी,बोरमाळ,नथ,बांगड्या यासारखे दागिने बनवता येतात. याशिवाय पुरुषांसाठी फेटा,पुणेरी पगडी,लॅपटॉप,अंगठी,भिकबाळी,हातातले कडे असे दागिने बनवता येतात. त्याचप्रमाणे लहान मुलांची बोरनाहंन करण्याची पद्धतही आपल्या महाराष्ट्रात आहे. श्रीकृष्णाच्या पेहरावाप्रमाणे मोठी माळ,मुकुट,कानातल्या बाळ्या,तोडे यांसारखे हलव्याचे दागिने लहान मुलांसाठी बनवता येतात. मग मैत्रिणींनो यंदाच्या संक्रांतीला कपड्यांचा आणि हलव्याच्या दागिन्यांचा नवीन ट्रेंड नक्की करायचा.