Skip to content Skip to sidebar Skip to footer

तो सध्या काय करतो?? पार्ट ८

सुखाचे दिवस भरकरन उडून जावे तसे घर्डे कुटूंबाचे दिवस आनंदात गेले. काही दिवस गावी निसर्गाच्या सान्निध्यात राहून सगळ्यांची मने ताजीतवानी झाली होती. नवीन हुरूप आला होता. सुट्ट्या जश्या संपत आल्या तसे रोशनी आणि पल्लवी यांची बॅग भरणे सुरू केले. आता आरमाचे दिवस संपले याची जाणीव रोशनी ला झाली. आता आरामात उठून मस्त नाष्ट्या वर ताव मारण्याचे दिवस आता संपत आले आहेत. आता पुन्हा तेच सकाळी लवकर उठून आवरणे आणि हॉस्पिटल ला जाऊंन धावपळ करत काम करायची आणि तोच दिनक्रम पुढे चालू ठेवायचा.

अखेरीस तो दिवस उजाडला जेव्हा या सगळ्या परिवाराला आता तेथून आपला मुक्काम सोडावा लागेल.
घरात फार धावपळीचे वातावरण होते. शोभा काकू आपल्या बॅग भरत किचन मध्ये जाऊन थोडा खाऊ ही सोबत घेतला.

” आई घेतल ना सगळ ? काही विसरली तर नाही ना?? “
रोशनी शोभा काकू जवळ येऊन म्हणाली.

” हो ग घेतल आहे मी सगळ …तू बघ तुझ काही सामान राहील आहे का रूम मध्ये??” शोभा काकू आता बॅग ची चैन लावत म्हणाल्या.

” हो ” रोशनी तरीही आठवत होती की काही विसरले तर नाही ना.

” चार्जर आणि अजून काही असेल तर बघ ”
शोभा काकू विचार करत बसण्या पेक्षा बघून आलेलं बर अस सांगत होत्या. तेवढ्यात शोभा काकू ला पल्लवी बॅग समोर नेऊन ठेवताना दिसली.

तिला पाहून त्यांनी तिला विचारले ” घेतलंस का सगळ पल्लवी??? नीट सामान बघून घ्या बर विसरू नका काही. “

” हो आई घेतल सगळ व्यवस्थित” पल्लवी तिच्या पर्स मध्ये तीच मेकअप च सामान भरत म्हणाली.

सामान सहित घरातील मंडळी आता बस स्टँड कडे स्वार झाली. कुणाल काका, मिरा काकू आणि चिमुकली किट्टू ही त्यांच्या सोबत आली होती टाटा करायला.

काही वेळ वाट पहिल्या नंतर त्यांना बस भेटली. पण शोभा काकू , विजय काका आणि रोशनी मुंबई कडे आणि पल्लवी आणि प्रज्वल पुण्याकडे निघाले. सगळ्यांनी आपापल्या बॅग हाती घेऊन दापोलीचा निरोप घेतला.

जाताना कुणाल काका आणि मिरा काकू ने ” सांभाळून जा , वाटेत काही खाऊन घ्या आणि घरी पोहोचतच फोन करा” अस सांगितल. त्यात त्यांची मया भरून होती. इतके दिवस कसे आनंदात निघून गेले हे त्यांना सुद्धा कळाले नाही.
मिरा काकू तर अजून काही दिवस रहा असा हट्ट करत होती पण आता सगळ्यांची ऑफीस ची काम असल्या मुळे त्यांना जान भाग होत. चिमुकली किट्टू तर आपले पाणीदार मोहक डोळ्यांमधून अश्रू तरळत रडत होती जणू तिला त्यांना जावू द्यायचे नव्हते. तो क्षण सगळ्यांसाठी भावूक असलेला होता.

हा बस चा प्रवास सुरू असताना शोभा काकू आणि विजय काका सोबत सीट वर होते आणि रोशनी मागे एका सीट वर. दमुन थकून पण मन संतुष्ट असलेल्या शोभा काकू कधीच गाढ झोपल्या. विजय काका काही वेळ आपल्या मोबाईल वर काही बोधपर व्हिडिओज बघत बसले आणि काही वेळाने त्यांना सुध्दा झोप लागून गेली.

रोशनी मात्र थोडी निराश होती की तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली. पण तिला आता निराश राहून काही तिचे भले होणार नव्हते. आपला जिवलग मित्राची भेट नाही झाली याचे खंत तिला होतेच पण तिने आशा नव्हती सोडली.

सकाळी सुरू केलेला तो प्रवास संध्याकाळी संपला. आकाश हळू हळू आपल्या सप्तरंगात न्ह्यहून निघालेला सूर्य आता मावळत होता. त्या मागेच चंदेरी रंग घेऊन चंद्र आणि असंख्य टीम टिमनारे तारे आपली हजेरी लावण्यास तयार होतेच. सगळा आसमंत त्यांचे स्वागतासाठी सजून होते.

दिवसाच्या शेवटी त्यांचा प्रवास संपला आणि ते मुंबईला येऊन पोहोचले. उतरल्या नंतर रोशनी ने घरी जाण्यासाठी कॅब बुक केली होती आणि त्यातच बसून ते घरी पोहोचले.

कॅब मधून उतरताच शोभा काकू आपल्या घराकडे एकटक पाहत होत्या. गेले काही दिवस त्यांना ह्या घराची आठवण देखील झाली नाही इतके त्या गावाच्या वातावरणात गुंतून गेले होते. सरतेशेवटी आपण जिथून प्रवास सुरू केला तिथेच परतून येतो.

काही वेळात रोशनी, शोभा काकू आणि विजय काका आपल्या बॅग्स घरात एका कोपऱ्यात ठेवून ते बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी गेले.

शोभा काकू दिवसभरच्या प्रवास करून दमुन गेल्या होत्या तो थकवा घालवण्यसाठी साठी त्यांनी छान गरम पाण्याने अंघोळ केली. थोड्या वेळात त्या बाहेर येऊन त्यांनी आपल्या अंगावर कपडे चढवले आणि त्या किचन मध्ये काही नाश्ता बनवण्यासाठी गेल्या.

शिभा काकू च्या पाठोपाठ विजय काकाही फ्रेश होऊन आले. रोशनी सुध्दा अंघोळ करून आणि काही मऊ कपडे घालून किचन मध्ये गेली.

” मला काही खूप भूक नाहीये ” रोशनी प्रवासाने थकली होती. तिला आता काही खाण्याचा मूड नव्हता.

” बरं नको पोटभर पण थोडस तरी खा “. शोभा काकू आपल्या मायेने तिच्या डोक्यावरून हाथ फिरवत म्हणाल्या.

काही वेळाने शोभा काकू ने नाश्ता केला आणि तेच खाऊन ती मंडळी झोपायला गेली. तो दिवस फार धावपळ आणि लांब प्रवासाचा होता म्हणून त्यांना लवकर झोप लागून ही गेली. थकलेलं शरीर मऊ बेड च्या गादीवर पडताच आणि अंगावर उबदार ब्लँकेट घेताच त्याला आराम मिळतो. थकलेले डोळे मिटण्यासाठी आतुर झाले होते त्यांना जरा शांती भेटली. रात्रीचा गार वारा हळूच खिडकीतून डोकावून बघत पुन्हा त्याच्या सफरीस निघून जातो.

रोशनी चे जड झालेले डोळे तिच्या गजर वाजताच उघडले गेले. तिने आपला गजर बंद केला आणि ती कंटाळा करत बेड वर उठून बसली. आज तिला नेहमी प्रमाणे कामावर जायचे होते. तिने आपला आळस झटकून टाकत ती बाथरूम मध्ये गेली आणि तिने तिचे दात घासले, फ्रेश होऊन ती किचन मध्ये गेली आणि गरम पाणी पिले. हे तिची नेहमीची सवय, आरोग्यासाठी चांगले असते यासाठी तिने ते सवय लावून घेतली.

काही वेळात तिने अंघोळ करून तिने कपडे घातले. आज इतका वेळ झाला तरी शोभा काकू , विजय काका काही अजून उठले नव्हते. रोशनी ला त्याची ती गोड झोप मोडायची नव्हती म्हणून तिने हळूच तिचे सामान घेऊन ती घराबाहेर पडली.

आपल्या कार मध्ये बसून तिने तिची कार नेहमीप्रमाणे ओळखीच्या रस्त्यावर चालवली. ती तिच्या हॉस्पिटल पार्कींग लॉट मध्ये तिची कार पार्क करून ती सरळ कॅन्टीन मध्ये गेली.

आधी पोटोबा मग विठोबा अस म्हणतात तीच रितभात रोशनी पाळे. भूक लागली असेल तर माणसाचे कामात लक्ष राहत नाही म्हणून ती पोटभर नाश्ता करून दिवसभर उपाशी राहिले तरी चालेल असे तिचे म्हणणे.

नाश्ता करुन नेहमी प्रमाणे तिच्या डिपार्टमेंट मध्ये गेली.

एक नर्स तिला पाहून खुश झाली ” अरे वा …कोण आल पाहा…”

” छान तर आज नेहमी प्रमाणे लेट केलच ना….” वृषाली ने नेहमप्रमाणेच चिडवायला सुरुवात केली.

” कुठे लेट बरोबर आले आहे मी ” रोशनी आज एका नवीन डॉक्टर ला बघितले. तो आता सगळ्या पेशंट चे राऊंड घेत होता. ते पाहून रोशनी ने बाजूच्या वृषाली नर्स ला विचारले
” हे काय नवीन जॉइन आहे का”

” हो ” ती उत्तरली.

” काय नाव त्याचं ” रोशनी ने पुन्हा प्रश्न केला.

” आराध्य ” वृषालीच्या तोंडून ऐकलेले ते उत्तर ऐकून रोशनी चकित झाली.

क्रमश:


Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.