Ritbhatmarathi

Search
Close this search box.

काही दिवस गेले आणि हॉस्पिटल मध्ये असलेल्या सर्व स्टाफ सोबत आराध्याची चांगली ओळख झाली. हॉस्पिटल मध्ये अनेक सोबत असलेल्या इतर डॉक्टर सोबत सुद्धा आराध्याची चांगलीच मैत्री झाली.

बघता बघता आराध्य आणि रोशनी ची ही चांगली मैत्री जुळली होती. त्यांच्या गप्पा गोष्टींमध्ये अधिक साम्य होते. आराध्या आणि रोशनी चा बोलण्याचा काळही वाढला होता. रोज रात्री व्हाट्सअप वर चॅट करणे हा त्यांचा दैनंदिन दिनक्रम झाला होता.

कदाचित त्यांच्या असलेल्या मैत्रीमुळे त्यांचा संवाद वाढत चालला असावा असं रोशनीला वाटे, तरीही मनाच्या एका कोपऱ्यात आता ह्या नवीन आराध्या साठी तिच्या मनात नवीन भावना फुलं सारख्या उमलत होत्या तिला कळेना की कोणाचे ऐकावे सांगत होते किती ज्या व्यक्तीच्या शोधात आहे ती व्यक्ती हा आराध्या नाही त्यामुळे रोशनी मनात नवीन फुलणाऱ्या भावनांच्या कळ्यांना मनाप्रमाणे उमलू देत नव्हती.

आराध्य आणि रोशनीच्या मैत्रीला बरेच दिवस झाले होते आराध्याला आधीपासूनच माहीत होते की रोशनी ज्या व्यक्तीच्या शोधात आहे तो तीच आहे आणि रोशनीच्या मनात त्या व्यक्तीसाठी अनेक भावना दडून आहेत हे सुद्धा आराध्याने हेरले होते खरंतर आराध्याच्या म्हणी ही तिच्यासाठी प्रेमळ भावना होत्या बालपणाची ही मैत्रीण कधी प्रेमात रूपांतर झाले याचे त्याला नवल वाटे.

आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती ही आपल्यावर तेवढच जिव्हाळा आणि प्रेम करते या गोष्टीवरुन दुसरी कोणतीही गोष्ट आनंद पोहोचवणारी नाही याची जाणीव आराध्यालाही होती आणि म्हणून त्याने हे सत्य आता रोशनीला सांगण्याचा प्रयास सुरू केला.

आज संडे होता, रोशनी आणि आराध्या यांची साप्ताहिक सुट्टी होती रोशनी तिच्या घरी दिवसभर तिच्या आई आणि वडिलांसोबत तिने छान प्रकारे तिचा दिवस घालवला.

रोशनी आज नेहमी प्रमाणे लवकर न उठता उशीरा उठली. शोभा काकू संडे स्पेशल म्हणून घरी मसाला डोसा बनवीत होत्या. त्या छोट्याशा परिवाराने मसाला डोसा चा मेनू छान पणे गप्पा मारत फस्त केला त्यानंतर त्यांनी काही वेळ चर्चा केली. गप्पांच्या ओघात त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चाही केली. त्यानंतर रोशनी ने काही ऑनलाईन मासिके वाचली मेडिकल विषयावर आधारित होते त्यामुळे तिला नवनवीन विषयांवर होणाऱ्या रीसर्च विषयी माहिती भेटत असत. त्यानंतर तिने आपला काही वेळ मोबाईलवर इतर काही गोष्टीत घालवला आणि बघता बघता सुट्टीचा तो दिवस लवकर निघूनही गेला.

आजचा सुट्टीचा दिवस आराध्य साठीही आरामदायी ठरला आज तोही रोशनी प्रमाणे उशिरा सुटला कामाला जाण्यासाठी रोज सकाळी उठावे लागते आणि रोज रात्री उशिरा मुळे त्यामुळे इतर दिवसांपेक्षा सुट्टीच्या दिवशी मिळणारी जास्त झोप ही जास्त महत्त्वाची. आज आराध्य सकाळी उशिरा उठून त्याने त्याची नेहमीची कामावर आली आणि काही वेळातच त्याच्या दरवाजाची बेल वाजली आराध्य बेडवरून उठून दरवाजा ओपन करायला गेला आणि त्याच्या नजरेस थकून-भागून असलेल्या सुद्धा काकू पडल्या.

सुधा काकूंना तो आपल्या दारात बघून थोडा बिचकला पण क्षणात आनंदित ही झाला. त्याने स्वागत केले आणि तोंड हात पाय धुण्यासाठी गरम पाण्याचा नळ चालू करून दिला. सुधा काकू आणि शैलेश काका फ्रेश होऊन समोरच्या घरात बसले होते तेवढ्यात किचनमधून आराध्य आपल्या हातात एका ट्रेमध्ये काही नाश्त्याचे पदार्थ घेऊन आला होता.

” आधी मला तरी सांगायचं मी आलो असतो घ्यायला ” असं म्हणत आराध्याने ट्रे त्यांच्यासमोर ठेवला.

” असुदे आम्हाला तुझ्या पडमन चा पत्ता माहिती होता म्हणून थेट इथेच आलो.” शैलेश काका म्हणाले.

” आणि तू तो म्हणाला होता की आज सुट्टी आहे म्हणून आम्ही आजच यायचं ठरवला म्हणजे निदान सुट्टीच्या दिवशी तरी तुझा वेळ आमच्या सोबत घालवशिल. “

” तरीपण आहे आधी एकदा तरी सांगायचं पुणे तुमच्यासाठी नवीन आहे म्हणून. ” आराध्याने त्याची काळजी व्यक्त केली.

” बरं चला काय सामान आणायचा आहे ते जाऊन आणून द्या किचन मध्ये आणि काही खूप सारे सामान्यज्ञान असेच बाहेरच खात असशील आता मी आले आहे तर करेन मी सगळं काही स्वयंपाक. आराध्य चे पप्पा तुम्ही जाऊन सर्व सामान आणण्याची व्यवस्था करा. ” सुधा काकूंना तिथे तसं फक्त बसून राहणार जमेना मुळात त्यांना कामाची असलेली सवय ही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पुढे त्याची बायको सुद्धा येथे येऊन राहिला तेव्हा तिला नको काय सर्व गोष्टी इथे उपलब्ध असायला आणि शिवाय हा एकटा जरी राहत असेल तरी काही वेळेस हा स्वतःच करून खाऊ शकतो. सगळ्या गोष्टी घरात उपलब्ध असले पाहिजे अशी त्यांची खटपट सर्व नाही निदान गरजेच्या तरी.

” आई तू आत्ताच इथे आधी आहेस थोडा थोडा बाहेर जाऊन सर्व सामान आणू ठीक आहे. ” असा मनात आराध्याने त्यांना एक रुम दाखवली तिथे सुधा काकू आणि शैलेश काका यांनी थोडावेळ आराम केला.

दिवसभर केलेल्या प्रवासानंतर आता आराम हा सर्वात सुखद असतो काही वेळाच्या विश्रांतीनंतर सुधा काकूंच्या अंगात ऊर्जा आली होती. संध्याकाळी त्यांनी बाहेर जाऊन घरासाठी लागणारे काही साहित्य खरेदी केले. तो दिवस सुद्धा काकूंनी सर्व किचनचे साहित्य लावण्यासाठी घालवला ऑनलाईनच जेवणाची व्यवस्था केली होती. रात्री जेवण करून माजघरात गप्पा मारत बसले होते. बरेच दिवसांनी आपला मुलाला सुधा काकू यांनी बर्‍याच दिवसांनी आराध्याला पाहिल्यामुळे त्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद होत होता.

बोलता-बोलता सुधा काकूंनी रोशनी चा विषय काढला आणि आराध्याने सुधा काकूंना सांगितले की उद्या तो रोशनीला घरी घेऊन येईल. हे ऐकून सुद्धा काकू अगदीच आनंदित होऊन गेल्या आणि त्यांनी रोशनी साठी काय जेवण्यासाठी बनवावे याचा विचारही सुरू केला. आराध्य या गोष्टीसाठी फार उत्सुक होता की सरतेशेवटी रोशनीला तिचा खरा आराध्य कळेल.

रात्र होत आली आणि सुधा काकू शैलेश काका प्रवासाने थकल्या कारण लवकर झोपून गेले आराध्य नेहमीप्रमाणे आपल्या बेडवर लोळून तो सोशल मीडियावर काही व्हिडिओज बघत होता. थोड्याच वेळात त्याला रोशनी चा कॉल आला.

” हाय हाऊ आर यू ” रोशनी ने विचारले

” एम फाईन अँड यू”

” सेम हियर “

” उद्या घरी येशील माझ्या रोशनी ” आराध्या ने शेवटी विचारले.

” काही विशेष आहे का? ” अस अचानक विचारल्यामुळे रोशनी गोंधळात पडली.

” नाही पण माझ्या आईला तुला पाहायचं होतं म्हणून मी बऱ्याच वेळा बोलताना तुझं नाव घेत असतो त्याच्यामुळे तिथे तुला पाहण्याची इच्छा आहे. ” आराध्या तिला समजावून सांगत होता.

” हो नक्कीच मला ही तुझ्या आई-वडिलांना भेटायचं आहे आणि खरं म्हटलं तर माझ्या आई-वडिलांना तुझ्याशी बोलण्याची भेटण्याची इच्छा आहे. “

” ठीक आहे तर मग उद्या ड्युटी संपल्यानंतर तू माझ्या घरी चल आपण इथेच जेवून नंतर घरी सोडून देईल मी तुला. “

” ओके डन पण त्यानंतर माझ्या घरी यायचं आणि जेवून जायचं”

” नक्कीच. ” असं म्हणत आराध्यने कॉल ठेवला आणि थोड्याच वेळात तो झोपण्यासाठी त्याच्या बेडवर आडवा झाला.