
नऊ वाजून गेले आणि रोशनी तिच्या घरी निघून गेली तरी आराध्य अजून तिथेच होता. आज आराध्य चा दुसरा दिवस होता तिथे डॉक्टर म्हणून जॉइन झाल्या चा. इथून पुढे ही काही दिवस त्याला तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यास वेळ जाईल.
आराध्य गेली दोन दिवस तिथल्या नवीन स्टाफ सोबत ओळख करून घेण्यात व्यस्त होता. नवीन हॉस्पिटल, नवीन वातावरण, नवीन माणसे या सगळ्यांशी जुळवून घेण्यास त्याला काही काळ लागेल. रोशनी शी मात्र मैत्री करण्या साठी आराध्य ला जास्त वेळ लागला नाही. रोशनी शी बोलताना जणू ती आपलीच कोणी जुनी नाते संबंध असलेली व्यक्ती आहे असे त्याला वाटे.
आराध्य कॅन्टीन मधेच जेवून तो त्याच्या नवीन अपार्टमेंट जाण्यासाठी टॅक्सी केली.
काही वेळात तो त्याच्या अपार्टमेंट मध्ये पोहोचला. ते हॉस्पिटल नजदीक होते. घरात शिरताच त्याने आधी गरम पाण्याने अंघोळ करून त्याचे कपडे बदलले. आपले ओले केस पुसत तो आता बेड वर जाऊन बसला आणि आपला मोबाईल हातात घेतला. मोबाईल च्या स्क्रीन वर त्याचा आई चे त्याला पाच मिस्ड कॉल होते. ते बघतच त्याने आई ला कॉल केला.
” हॅलो आई …बोल काय म्हणते??”
” मी इतके कॉल केले तुला एक ही उचलता नाही आला का???” फोन च्या स्पीकर मधून आराध्य ची आई म्हणजे सुधा काकू बोलत होत्या.
” मी थोडा बिझी होतो ग”
” बरं जेवला का?? तिथले वातावरण कसं आहे?? आणि सर्व सामान शिफ्ट केलं का ????” सुधा काकूंनी आपल्या मुलाला अस स्वतः पासून दूर कधी नाही ठेवले म्हणून त्यांना काळजी वाटे.
” हो तरी किचन च बाकी आहे ते तू आली की करून देशील, बाकी मी अगदी मस्त आहे. ” नागपूर मधून मुंबईत शिफ्ट झाल्या पासून आराध्य ने गरजेनुसार वस्तू घेतल्या. आता घरात कोणी अजून दुसरा व्यक्ती नाही म्हणून त्याने ती किचन साहित्य आपल्या आई साठी वाचवून ठेवली.
” मी आता येईल पुढच्या महिन्यात, तू तुझी नीट काळजी घे आता, आणि घरडे काका यांचा काही कॉन्टॅक्ट भेटतो का बघ ते ही मुंबई ला राहतात ना…” सुधा काकू मुलगा मुंबई ला मोठ्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर म्हणून लागला याचे फार कौतुक करत आणि मुंबई म्हंटले तर आता शोभा काकू यांची नक्की भेट होईल असे त्यांना मनोमनी वाटे.
” हो ग आई करतो मी, तू पण तुझी काळजी घे. ” असे काही वेळ माय लेकराचे काही वेळ बोलणे झाले.
हातातला फोन ठेवून आराध्य त्याच्या ब्लँकेट मध्ये शिरला.
दिवसभर काम करून तो थकला होता. डोळे मिटल्यावर काही वेळात त्याला गाढ झोप लागून गेली.
सकाळी आराध्य लवकर उठला आणि त्याची सर्व कामे आटोपून तो हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी तयार झाला. त्याने त्याचे गरजेचे सामान घेतले आणि त्याने टॅक्सी केली. नवीन ठिकाणी सेट ल होण्यासाठी काही वेळ लागेलच तेव्हा डॉक्टर म्हंटल्यावर आपली कार असावीच असा हट्ट आराध्य चा नव्हता. तो आपले काम टॅक्सी वर भागवू शकत होता.
हॉस्पिटल मध्ये जाताच त्याने आपले पाय कॅन्टीन कडे वळवले. घरी काही साहित्य उपलब्ध नसल्यामुळे तो शक्यतो बाहेरच खाई.
आराध्य कॅन्टीन मधून नाश्ता करून तो डिपार्टमेंट मध्ये जाण्यासाठी रेडी झाला.
डिपार्टमेंट मध्ये जाताच त्याने तिथल्या नर्स सोबत थोड बोलून त्याची नजर आता पेशंट ला चेक करणाऱ्या रोशनी कडे गेलं. रोशनी पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांसोबत खूप गोड बोले, त्यात आपलेपणा वाटे. रोशनी तिचा कामात चोख होती. आराध्य ही नागपूर मध्ये हॉस्पिटल ला काम करीत पण तो काही कारणास्तव मुंबई ला शिफ्ट झाला.
रोशनी ला बघून आराध्य ही तिच्या सोबतीने पेशंट राऊंड घेण्यास सुरुवात केली.
” गूड मॉर्निंग आराध्य, हाऊ आर यू??” रोशनी ने विचारले.
” गूड मॉर्निंग रोशनी, आय एम फाइन. ” आराध्य मात्र एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत होता.
” चाल काम फटाफट खतम करते हैं ” अस म्हणत रोशनी ने त्यांच्या उत्साह जगवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आपल्या कामास सुरुवात केली.
रोशनी आणि आराध्य ने पेशंट राऊंड पूर्ण करून झाल्या नंतर रोशनी त्याला डॉक्टर्स ऑर्डर, डॉक्टर्स नोट्स या बद्दल माहिती देत ऑनलाईन पेशंट बद्दल माहिती कशी भरायची ते समजावून सांगत होती.
काही वेळात पेडियाट्रिक डिपार्टमेंट चे सिनियर डॉक्टर आले आणि त्यांनी आपला राऊंड घ्यायला सुरुवात केली. रोशनी आणि आराध्य हि सोबत होते. प्रत्येक पेशंट ची तपासणी करताना डॉक्टर पाटील त्याविषयी आणखी काही माहिती देत असत.
डॉक्टर पाटील एक अनुभवी चाइल्ड स्पेशालिस्ट होते. त्यांनी जवळपास 20 वर्ष या हॉस्पिटल मध्ये सर्व्हिस केली होती. ते नेहमी त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत. नवीन जॉइन झालेल्या आराध्य मध्ये एक विशेष चुणूक आहे हे डॉक्टर पाटील यांना लक्षात आली.
डॉक्टर पाटील यांचे राऊंड संपताच त्यांनी रोशनी आणि आराध्य ला काही कामे दिली आणि ते त्यांच्या ऑफीस कडे निघून गेले.
पेशंट ची तपासणी करत, त्याची औषधे देत, आणि इतर कामे करत दुपार कधी झाली हे आराध्य ला समजले नाही.
” तुला भूक नाही लागली का?” रोशनी ने आराध्य ला विचारले.
” हो …” आराध्य जरा कचरत म्हणाला.
” चल मग टिफीन खाऊ, नाहीतर पुन्हा नवीन पेशंट येईल आणि मग आपल्याला नंतर वेळ नाही भेटणार. ” रोशनी त्यांना आपल्या सोबत जेवण करण्यासाठी मनवत म्हणाली.
” पण मी टिफीन नाही आणला.” आराध्य ला तसे म्हणणे जरा अवघड गेले पण खोटं बोलण्या पेक्षा, खरं ते सांगून मोकळे होणे त्याला बरे वाटले.
” ठिक आहे … आपण माझा टिफीन शेअर करू ” रोशनी ला आराध्य एकटा राहतो याची कल्पना नव्हती.
” नाही नको …” आराध्य ला आता कसतरी वाटत होत.
” चल रे, माझी आई तशी रोजच एक्स्ट्रा टिफीन देते. ” अस म्हणत रोशनी ने आराध्य ला त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये स्टाफ ला खाण्यासाठी असलेली रूम मध्ये घेऊन गेली.
रोशनी एका छोट्या टेबल वर तिचा टिफीन ठेवला. तिने तो उघडला तर खमंग बटाट्याची भाजी पाहून आराध्य ला आता चांगलीच भूक लागली. त्या दोघांनी सोबत गप्पा करत जेवण केले.
” रोशनी हे बॅंड किती जुनं आहे ” रोशनी च्या हातातलं ते जुनाट फ्रेंडशिप बॅंड पाहून आराध्य ला काही जुन्या आठवणी त्याच्या डोळ्यात तरळून गेल्या.
” हो ते माझ्या एका बेस्ट फ्रेंडने दिलं होत. ” रोशनी त्या बॅंड कडे प्रेमाने बघत म्हणाली.
” काय आहे त्या बेस्ट फ्रेंड च नाव ” आराध्य आता उत्सुक होता.
” सेम तुझ नाव आहे ” रोशनी त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली.
” अच्छा …छान आहे मग …आता काय करतो ” आराध्य अजून उत्सुक होता. जणू त्याला हे सर्व काही ऐकुन कसलातरी आनंद होत असावा.
” नाही माहित म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा गवी राहत होतो तेव्हा आम्ही बेस्ट फ्रेंड होतो नंतर आम्ही मुंबई ला शिफ्ट झालो तर आता काही कॉन्टॅक्ट नाहीये. ” रोशनी च्या आवाजात आता थोड दुःख लपलेलं होत.
” अच्छा. इट्स फाइन तो पण तुझी आठवण काढत असेल ”
आराध्य ने रोशनी चे मन हेरले.
” काय माहित आता …मेबी त्याचं कोणी नवीन बेस्ट फ्रेंड असू शकते आता. “
” पता नहीं …पण भाजी छान झाली आहे. काकू ना बोल की खूप मस्त चव आहे त्यांच्या हाताला. काय नाव त्याचं ” आराध्य ने विषय बदलला.
” शोभा ” रोशनी तिचा टिफीन बंद करत म्हणाली.
” आणि वडील तुझे “
” शिक्षक आहे माझे वडील, विजय त्याचं नाव. ” तिची बॅग उचलत रोशनी बाहेर निघताना म्हणाली.
रोशनी चे उत्तरे ऐकुन आता आराध्य ला खात्री झाली की तो ज्या व्यक्तीसाठी मुंबई मध्ये आला ती रोशनी च आहे. आराध्य मनोमनी खुश होता. त्याला वाटले नव्हते की ज्या व्यक्ती साठी तो इथे आला ती व्यक्ती त्याला इतकी सहजासहजी भेटून जाईल.
रोशनी च्या हातातील ते फ्रेंडशिप बॅंड पाहून आराध्य थोडा चकित होताच. ज्या रोशनी च्या शोधात होता ती नक्की हीच आहे का म्हणून त्याने तिला त्या फ्रेंडशिप बॅंड आणि तिच्या आई वडील यांबद्दल विचारले. जेव्हा रोशनी ने आपल्या आई वडीलांची माहिती दिली तेव्हा आराध्य ला अतोनात आनंद झाला.
Post navigation

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.