
रात्र होताच सूर्याचा तेज मावळला आणि चंदेरी रंगाचा चंद्र आकाशात असंख्य टीम टीम करणाऱ्या चांदण्या सह नटून बसला होता. काळ्याभोर अवकाशात रात्रीचे ते थंड वारे झाडांना खट्याळ रीतीने हेलकावे देत असत. झाडेही प्रतिसाद म्हणून आपली पाना फुलांनी सजविलेल्या फांद्या वाऱ्या समवेत झुलवत असत. डोळ्यांना आकर्षित करणारे हे दृश्य मोकळ्या वातावरणात अनुभवता येते. हा गार वारा हळूच आता घरडे कुटुंबाच्या घराकडे वळला. उघड्या असलेल्या खिडकीतून डोकावून तो आता शिरला आणि एखाद्या परी सारखी भासणारी रोशनीच्या अंगावर शहारे आले. तिने झोपेतच आपल्या अंगावर उबदार ब्लँकेट ओढून घेतले.
रोशनी आता स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेली होती. तिने स्वतःला एका छोट्या ओढ्याच्या काठी पाहिले. दूरवरून तिने एका अंधुकाशा आकृतिला पाहिले ती. ती व्यक्ती जवळ येताच रोशनी च्या चेहऱ्यावर हसू उमटले.
ती व्यक्ती जरी पुसटशी दिसत असली तरी तिचा आवाज मात्र ओलखण्याजोगे होता.
” रोशनी तुला घरचे सगळे जण पिल्लु का म्हणतात??”
त्या गोंडस मुलाने त्याच्या कमरेवर हात ठेवून विचारले.
” आरु ते मला लाडाने म्हणतात ” चिमुकल्या रोशनी ने त्याचं उत्तर दिलं.
” पण मला ते पिल्लु म्हंटल की छोटू माऊ ची पिल्ल आठवतात …मग मी तुला रोशनी च म्हणेल ठिक आहे “
” हो मी पण तुला आराध्य बोलेल ” छोटीशी रोशनी तिचे गोंडस हसू खेळवत म्हणाली.
आणि हळू हळू तिच्या कानी कसले तरी गाणे कानावर पडत होते. त्या चिमुकल्या रोशनी पासून आराध्य आता अंधारात आणि दूर जात होता. सर्वत्र काळोख पसरला तरी दूरवर कुठून तरी गाण्याचा आवाज कानी पडत होता.
रोशनी चे डोळे जड झाले होते. मोठ्या कष्टाने तिने तिचे डोळे उघडले आणि ते मिचकावत तिने गोंगाट करणारा तिचा मोबाईल चा गजर बंद केला.
” काय माझी झोप मोड झाली ” रोशनी तीच कपाळ चोळत ती पुटपुटली. तिने मोबाइल मध्ये वेळ पहिली तर अजून पाच वाजले होते.
” अजून वेळ आहे, झोपतो मी थोड” अस म्हणत तीने आपल्या अंगावर ब्लँकेट अंगावर ओढून घेतले.
काही वेळात घरातील बाकीची मंडळी उठून नेहमी प्रमने त्यांची कामाला सुरुवात केली.
मिरा काकू आणि शोभा काकू उठून त्यांची अंघोळी वेगे रे आवरून त्या नाश्ता ची तयारी करू लागल्या. कुणाल काका त्याचं सगळ आवरुन आणि नाश्ता करून तो त्याच्या कामाला निघून गेला.
विजय काका फ्रेश होऊन सकाळी फिरायला गेले. तिकडे सर्वत्र रस्ते विविध प्रकारच्या झाडे झुडुपे यांनी नटून समृध्द आहेत. दूरवर कुठून तरी कानी पडणारा झऱ्याचा खळखळ आवाज कानास बरा वाटे. बोलकी पाखरे तिथेच त्यांचा देरा टाकत जिथे वनांचे स्वागत निसर्गाने केले आहे. मुंबई पुणे इकडे हल्ली कुठे पक्षी पहावयास मिळते. पण या उलट कोकण विभागात अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातचे दर्शन होते. किलबिलाट करणारे हे पक्षी विजय काकांचे मन मोहून टाकत. मनातून एक अलग प्रकारचा आनंद त्यांना अनुभवास मिळे.
प्रज्वल आणि पल्लवी हे जोडपे अजून उठलेले नव्हते. पण काही वेळाने पल्लवी मात्र उठून तीच आवरायला लागली. चांगली सून होणे तीच कर्तव्य पार पाडण्यासाठी नवीन विचारांची जुळवाजुळव करीत ती आपले नाते सर्वांशी घट्ट करत होती.
रोशनी ही काही वेळाने उठली, उठून तिने आधी टाईम पहिला .. आठ वाजून गेले होते. ती ही मग आवरायला लागली.
समोर तिकडे मिरा काकू आणि शोभा काकू यांचा नाश्ता करता करता गप्पा रंगत आल्या होत्या त्यात भर म्हणून शेजारच्या जगताप आजी ही मैफिल मांडून होत्या. जगताप
आजीचे वय बरेच वाढले होते पण बोलायला आणि काम करायला त्या अजूनही पुढाकार घेत.
रोशनी आणि पल्लवी त्यांच्या सोबत नाश्ता करायला बसल्या.
” सूनबाई छान दिसते तुमची ….” जगताप आजी पल्लाविकडे एक नजर टाकत म्हणाल्या.
” होय …आणि स्वयंपाक हि छान करते.” शोभा काकुच्या मते माणसाने फक्त दिसण्याला नव्हे तर कामातही चोख असले पाहिजे.
” बरोबर बोलक्या …आजकालच्या मुलींना स्वयंपाकात मात्र रस राहिला नाहीये …बाकी काय उंच भरारी घेतात त्यातच त्यांना संसार आहे असे वाटते. ” जगताप आजी त्यांचे मत मांडत एका नवीन विषयाला बांधा फोडला.
” अरे कश्या आहेत आजी तुम्ही?? तबीयत बरी ना??” प्रज्वल सोफ्यावर बसून आजीला विचारले. बऱ्याच दिवसांनी जगताप आजी भेटल्या याचा त्याला आनंद होता.
” मी तर छान आहे तुझ कस चालू बाबा नवीन संसार ???”
” अगदी सुरळीत ” अस म्हणत प्रज्वल ही त्यांच्या गप्पा मध्ये सामील झाला.
असच सूर्य डोक्यावर येई पर्यंत त्यांनी मनसोक्त चर्चा रंगवल्या.
शोभा काकूंना त्यांची जुनी मैत्रीण सुधा यांची आठवण झाली आणि त्यांनी लगेच जगताप काकू ना विचारले ” सुधा येते आली होती का इकडे??”
” तुम्ही इथून कायमचे मुंबई ला निघून गेलात आणि काही दिवसांनी ते ही तिकडे नागपूर कडे त्यांची बदली झाली म्हणून ते निघून गेले. सुधा मागे एकदा आली होती भेटायला, ती ही अशी तिच्या संसारात सुखी आहे. ” जगता आजींनी बरेच उन्हाळे पावसाळे आणि माणसे पाहिले आहेत त्यात मनात घर करून बसलेली लोक दूर गेली तरी त्यांची आठवण कायम येत असतेच.
विजय काका बाहेर च्याच खोलीत त्यांचे पुस्तक वाचत होते. नाश्ता करून त्यांनी आपले पुस्तक आज संपवण्याचा विचार केला. शांता शेळके यांनी पुस्तकात अतिशय उत्कृष्टपणे पात्रांची मांडणी आणि वर्णन केले आहेत.
एका वाचण्याच्या दुनियेत हरवून गेले की वेळ कसा रेती सारखा निसटून जातो हे सुध्दा कळत नाही. विजय काका वाचण्यात मग्न असताना त्यांच्या पोटात मात्र आता भुकेची जाणीव झाली.
” अरे शोभा आज काही जेवणाच करणार की नाही ?? ” विजय काका गप्पांच्या ओघात असलेल्या मंडळींना म्हणाले.
” हो करतो आत्ताच जगताप बाई येऊन गेल्या, बसल्या होत्या थोड्या वेळ गप्पा करत. “
” पण वेळेचं भान नको का?? वाजले बघ किती ” विजय काका जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतं.
” धा मिनिट थांबा करतो लगेच ” शोभा काकू किचन मध्ये गेल्या आणि स्वयंपाकाची तयारी करू लागल्या.
दुपारची वेळ …सूर्य आता त्याचा ज्वाळा ओकत होता. जगताप आजी त्यांच्या घरी निघून गेल्या. इकडे स्वयंपाकाची तयारी होऊन जेवणे ही झाले. विजय काका त्यांच्या पुस्तकात व्यस्त होते आणि रोशनी किट्टू सोबत खेळत होती. प्रज्वल आणि पल्लवी थोडे भटकंती करून आले.
आजचा दिवस थोडा आरामात गेला. गापागोष्टी आणि भरपेट चविष्ट जेवण आपल्या कुटुंबासोबत …यातच सुख सामावले आहे, घट्ट नाते विश्वास आणि खरेपणा यामुळेच मजबूत बांधल्या जाते.

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.