Ritbhatmarathi

Search
Close this search box.

To sadhya kay kartoy? part ६

आकाशात सूर्य आगीच्या गोळ्याप्रमाने आग ओकत होता, त्याने वातावरणात दमट पणा पसरत होता. त्या विलक्षण गरमी मध्ये अंगाला जाऊन भिडणारे ते थंड समुद्राचे पाणी एक प्रकारचा सुखद अनुभव देत होते.

सगळ्यांच्या मनात बसलेली छोटीशी किट्टू किनाऱ्यावर वाऱ्यासारखी धावत ” मला पकड दादा….” अस खोडकर हसत आपले दोन्ही हाथ उंचावरून तिची भरारी घेणं सुरू होत.

” थांब आलोच ….” प्रज्वल त्यांचा मोबाइल पल्लवी कडे देत
किट्टू मागे धावत सुटला. त्याने चिमुकल्या किट्टू ला उचलून घेतले आणि ते दोघे थोड अजून पाण्यामध्ये गेले. तिथे त्यांची खूप मस्ती झाली. त्यांना पुढे मिरा काकू आणि शोभा काकू नी जॉइन केलं. पल्लवी मात्र त्यांचे फोटो काढत होती.

काही वेळाने पल्लवी आणि प्रज्वल ने वेगळ्या वेगळ्या पोझ देऊन अनेक सुंदर, डोळ्यांना आकर्षित करणारे फोटो काढले.

विजय काका आणि कुणाल काका गोंडस किट्टू ला घेऊन आता मातीचा किल्ला तयार करत होते. मातीचा किल्ला बनवणे एक प्रकारची कलाच आहे, सगळ्याच लोकांना ती अवगत नाही पण कुणाल काका मात्र त्यात तरबेज होते. बघता बघता त्यांनी एक माध्यम आकाराचा अप्रतिम कलेचा नमूना उभा केला.

मिरा आणि शोभा काकू किनाऱ्यावर ते क्षण भरभरून जगून घेत होत्या, जणू ते क्षण काही परत एकदा अनुभवता येणार नाही.

सगळे जण पाण्यात भिजून मनसोक्त खेळून घेत होते पण त्यातही एका व्यक्तीची अनुपस्थिती होती. होय ती व्यक्ती म्हणजे रोशनी. रोशनी ला पाण्यात जायची भीती …तिला वाटे की ती जास्त खोल वर पाण्यात गेली की बुडून जाईल ह्या भीतीने ती कधी पाण्यात जाऊन भिजली नाही की मनसोक्त खेळली नाही. रोशनी ला किनाऱ्यावर येऊन पडलेले शंख शिंपले गोळा करण्याचा छंद होता. किनाऱ्यावरील त्या ओलसर मातीवर अनवाणी पायाने चालणे तिला आवडे. ती मऊ मऊ वाळू पायांना स्पर्श करून तिच्या मायेची आणि ओलेपनची जाणीव करून देत असे.

रोशनी किनाऱ्यालगत असलेल्या त्या खारट पाण्याने भिजलेल्या वाळू वर आपले पायाचे ठसे उमटवत होती. खूप दूरवर एकटी चालत असताना तिला अचानक कोणाची तरी आठवण झाली. जरी ती व्यक्ती तिच्या सोबत नव्हती तरी त्या व्यक्तीचा पुसटसा चेहरा तिला आठवत होता.

” कुठे आहेस तू मला माहित नाही ….पण आपली नक्की भेट होईल याची मला खात्री आहे ” रोशनी स्वतः ला म्हणत ती आता समुद्रकिनारी लागून असलेल्या दगडावर जाऊन बसली. आपले पाय खाली पाण्यात सोडून तिने दूरवर पसरलेल्या त्या महाकाय समुद्राकडे निरखून पाहिलं. समुद्राच्या त्या उंच उंच लाटा उसळत होत्या जणू त्यांना या धरती मातेच्या कुशीत शिरायचे होते. हळू हळू त्या लाटेचा प्रवाह कमी होत ते आपला वेग मंदावत किनाऱ्यावर पसरून जात …..तोच पुन्हा एक मोठी लाट येऊन आपला एक प्रयत्न करून जमीनदोस्त होत.

रोशनी खोल श्वास घेत हवेतील नमी अनुभवत होती. रोशनी तिच्या बालपणीच्या मित्राची फार आठवण येत होती. रोशनी च घर शिफ्ट झाल्यामुळे ते अलग झाले आणि काही वर्षात आराध्य चे कुटुंबही कामानिमित्त नागपूर ला शिफ्ट झाले म्हणून त्यांची काही भेट झाली नाही. इतक्या दिवसा नंतरही रोशनी ला आराध्यची आठवण होती. पण आराध्यला तिची आठवण येत असेल की नाही याचं रोशनी ला नेहमीच कुतूहल वाटे. आराध्य ही त्यांच्या बालपणीच्या आठवणी त्याच्या मनात साठवून असेल की एका बुडत्या जहाजे प्रमाणे त्याच्या मनाच्या कोणत्या कोठडीत जाऊन डांबले गेले असतील याचे विचार रोशनी ला नेहमी यायचे. आपला बालपणीचा तो जिवलग मित्र आता कसा असेल, कुठे असेल …ह्या नवीन जगामध्ये त्याचे आता नवीन जिवलग मित्र झाले असतील. त्याच्या मनी कोणा प्रती प्रेमाच्या भावना तर निर्माण झाल्या नसतील?? ह्या प्रश्नांनी तिचे डोक पोखरण चालू झालं.

रोशनी तिथेच बसल्या बसल्या स्वतः च्याच विचारांमध्ये गुंग झाली.

” किती सुंदर आणी थेट मनाला स्पर्श करणारे वातावरण आहे ! अथांग सागराकडे बघितल तर वाटते की हा जणू काही पृथ्वीचा शेवट नी त्यासमोर स्वर्गाला जाणारा मार्गच असावा. अस वाटत की पृथ्वीच्या काठेवर येवून थांबलोय. एक निवांत श्वासाची नी सहवासाची अनुभुती होत आहे. कदाचित आराध्य पण माझ्या सोबत असता इथे तर किती छान वाटले असते. ” अस तीच मन तिला म्हणू लागले.

” आपली पुन्हा भेट व्हावी अन् मी तुझ्या त्या चेऱ्हऱ्याला मन भरून पहावे.” रोशनी आता स्वतःला घट्ट मिठी मारून घेतली होती. तिला तिच्या त्या जिवलग मित्राला भेटण्याची आतुरता आता शिगेला पोहोचली होती.

रोशनी तिचे डोळे बंद करून ते क्षण भरभरून जगून घेत होती. तोच तिला प्रज्वल चा आवाज कानी पडला ” रोशनी चल परत जायचं आहे ….उशीर झाला. “. ते ऐकताच रोशनी उठून उभा राहिली आणि परतीच्या वाटेवर निघाली.

परतीच्या प्रवासात सर्वजण मस्त आज दिवसभर केलेल्या मज्जा मस्तीचे वर्णन करून सांगत होते. त्यांचा गप्पांचा शेवट हा घर गाठल्यावर झाला.

” अरे या या …..कशी झाली मग ट्रीप ???”
कुणाल काका समोरच बसून होते.

” पप्पा ” अशी आनंदाने आरोळी ठोकत किट्टू त्यांच्या कडे धावत गेली आणि त्यांच्या कुशीत शिरली.

” अरे कुणाल आज लवकर आला तू घरी?”

” दादा माझ थोड बाहेरगावी काम होत मणून… पण तुम्ही लोक चला …लवकर जाऊन फ्रेश व्हा. ते खारट पाण्याने तुमचं अंग खाजवत असेल आता. ” कुणाल काका हसत म्हणाले.

” मी आता जाऊन अंघोळ करणार ” रोशनी तिच्या हातातलं सामान टेबलवर मांडत होती.

” तू कुठे पाण्यात भिजली तरी ….तुला काय गरज ” प्रज्वल आता ओला चिंब झाला होता. त्याला आता कसतरी वाटत होत. समुद्रातील त्या खाऱ्या पाण्याने त्याला आता इरिटेड फील होत होत.

” पाणी गरम करून ठेवलं आहे मी ” अस म्हणत कुणाल काका सोफ्यावर बसले.

” मी जातो ” प्रज्वल खोलीत जाऊन त्याचे कपडे घेऊन आला आणि बाथरूम मध्ये गेला.

काही वेळात ते सर्व जण फ्रेश होऊन समोरच्या घरात बसून आजच्या दिवसभरातील गप्पा गोष्टी करत होते.

या सगळ्यामध्ये संध्याकाळ कधी होऊन गेली त्याचे कोणाला भान राहिलं नाही. अशी ही रम्य संध्याकाळ गप्पागोष्टीच्या ओघात लुप्त होऊन गेली.

संध्याकाळी मिरा काकू आणि शोभा काकू किचन मध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. त्यांच्या मदतीला रोशनी आणि पल्लवी ही गेल्या. सासू सुनेने जुन्या आणि नवीन पद्धतींचा मिलाफ करून सुरेख जेवण तयार केले.

विजय काका आणि कुणाल काका त्यांच्या चर्चा रंगवत होते त्यात प्रज्वल ही सामील होता.

” चला जेवून घेऊ ” मिरा काकू जेवणाच साहित्य आणत म्हणाल्या.

” चला उठा हो आता तुम्ही ….बस झाल्या तुमच्या गप्पा आता ” शोभा काकू विजय काकांकडे डोळे मोठे करून म्हणाल्या. त्यांच्या आवाजात एक प्रकारचा दाब होता आणि तो विजय काकांनी ओळखून घेतला.

” हो …. उठतो” विजय काका त्यांच्या हातातील मोबाईल ठेवून ते बेसिन जवळ हाथ धुवायला गेले.

सर्व जेवणाचे साहित्य तिथे मांडून ठेवले होते आणि मिरा काकू ने ताट वाढायला सुरुवात केली होती.

तिथेच सर्वांनी बसून मग गप्पा गोष्टी करत त्यांनी जेवण केले.