Skip to content Skip to sidebar Skip to footer

तो सध्या काय करतो?? पार्ट ५

ते सर्वजण जुन्या आठवणी आणि त्यांचे बालपणीचे ते सुखद दिवस या गप्पागोष्टी करत, हसत खेळत वेळ छान रंगवला. अनेक जुन्या आठवणींना अंकुर फुटले आणि आपल्या त्या विश्वात ते सामावून गेले. ते घर, त्या आठवणी , ते दिवस , ती माणसे , तो काळ, सगळ्या गोष्टी कश्या पुन्हा जगू वाटत होत्या. आपल्या जगात रमलेल्या त्या गप्पामुळे तिथल्या वातावरणामध्ये एक अलग प्रकारचा आनंद दरवळत होता.

गप्पामध्ये गुंगलेले ते मोबाइलच्या आवाजाने बिचकुन गेले. मोबाईलची रिंगटोन कानी येताच रोशनी चटकन उठली आणि समोर टेबल वर ठेवलेला मोबाइल वरच कॉल उचलून ” हा दादा बोल …कुठ पर्यंत आला आहात तुम्ही ???” रोशनी ने प्रश्न केला.

रोशनी तिच्या तोंडून दादा हा शब्द ऐकल्यावर शोभा आणि मिरा काकू ना हायस वाटले.

” अच्छा या मग लवकर आम्ही कधीच पोहोचलो ” रोशनी ने प्रजवळच्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले.

रोशनी फोन हातात घेऊन परत तिच्या जागेवर येत ” दादा म्हणे पोहोचला तो दापोलीला ….येईल थोड्या वेळात इकडे “

” बरं झालं बाई लवकर आला, मला वाटल की रात्री आता किती उशिरा पर्यंत येतो की काय…..”

” शोभा त्या पोरांना त्यांची काम पाहून सर्व यावं लागलं असेल…” विजय काकांना कामा विषयीचे नियम कडक पाळायची सवय म्हणून रिटायर झाले तरी जुन्या अंगवळणी पडलेल्या सवयी काही जात नाहीत.

” बरं तुम्ही बोला मग मी स्वयंपाकाचं बघते” अस म्हणत मिरा काकू किचन मध्ये गेल्या.

” काय एकटी करशील इतकं ….मी पण आले ” शोभा काकूंना स्वयंपाक अतिशय सुरेख जमतो, त्यांच्या हातची चव त्यांच्या सर्व कुटुंबीयांना आवडते. शोभा काकूंच्या हातचं जेवण म्हणजे हॉटेल पेक्षाही अधिक न्यारी अन् चविष्ट मेजवानी असते.

रोशनी आणि किट्टु मस्त मोबाईल मध्ये कार्टून पाहत सोफ्यावर बसून होते.

” अरे रोशनी ….सामान घ्यायला ये जरा….”

प्रज्वल चा आवाज ऐकू येताच रोशनी आणि विजय लक घराबाहेर पडले. त्यांनी प्रज्वल आणि पल्लावीच्या हातातील सामान घेऊन ते घरात गेले.

” थकलो मी ….” प्रज्वल सोफ्यावर अंग टाकीत म्हणाला.

” मला तर गरगरायला होत आहे आता ” पल्लवी तीच कपाळ चोळत म्हणाली.

” ओये तुम्ही दोघं जाऊन फ्रेश व्हा, मी काहीतरी खायला आणते म्हणजे मग बर वाटेल. ” रोशनी त्यांच्या बॅग अतामधल्या खोलीत नेऊन ठेवताना म्हणाली.

थोड्या वेळात प्रज्वल आणि पल्लवी दोघेही फ्रेश होऊन त्यांनी गप्पा गोष्टी करत चहा नाश्ता केला.

” पल्लवी कस चालू आहे मग तुमचा संसार ??” मिरा मावशी खुर्चीवर बसली.

” एकदम मस्त” पल्लवी तिच्या चेहऱ्यावर एक गोंडस स्मितहास्य खेळवत म्हणाली. पल्लवी जरी मॉडर्न विचारांची असली तरी नाती जपन तिला अगदी सहज जमते. तिचे सुरेख विचार कोणत्याही माणसाच्या मनात घर करून राहते.

” काय जेवायला केलं आहे ? मला खूप भूक लागली आहे” प्रज्वल त्याच्या पोटावर हाथ फिरवत म्हणाला. दिवसभर च प्रवास करून त्याचं शरीर थकून गेलं होत, त्यात त्याला पित्ताचा त्रास त्यामुळे त्याच्या जेवणाच्या वेळा ह्या ठरलेल्या आणि कोकणाचा प्रवास म्हणजे गर्द हिरव्या रंगाच्या झाडांनी व्यापलेले ते विशाल डोंगर पायथ्याशी नागमोडी वळणे असलेले घाट. ही घाट म्हणजे कोकणची जणू ओळखच होय.

” तुझी फेवरेट डिश बनवली आहे ” रोशनी तीच मोबाईलमध्ये खुपासलेल डोकं वर करत म्हणाली.

” अच्छा, पण मला खूप साऱ्या गोष्टी आवडतात …. ” प्रज्वल हाताची घडी करून बसला.

” मच्छी केली आहे … फ्रायवाली ” शोभा काकूंनी प्रज्वल ची वाढलेली ओढ पाहून त्यांनी शेवटी सरप्राइज चा नास करून दिला.

” ए आई काय ग का सांगितल त्याला ” रोशनी ला मात्र ही गंमत अशी फुटल्या गेली म्हणून तिचा मूड खराब झाला.

” आता जेवणावर कसल आला तुझी गम्मत???” शोभा काकू त्यांच्या कमरेवर हात ठेवत म्हणाल्या.

” जेवुया का मग ??” विजय काकांनी प्रश्न केला.

” विचारणं झालं का ते ….” प्रज्वल आता खाली मांडी मारुन बसला.

” चला बाई जेवून घेऊ ह्यांना यायला उशीर होईल.” मिरा काकू किचन मधले जेवणाचे साहित्य आणत होत्या.

” कुणाल ला का इतका उशीर झाला??”

” ते जरा कामानिमित्त बाहेर गेले म्हणून ….हल्ली खूप काम असतात त्यांना.” मिरा काकू नी विजय काकांचं समाधानकारक उत्तर दिलं.

झणझणीत रस्सा आणि मच्छी यावर सगळ्यांनी मस्त ताव मारला. प्रवासाच्या गप्पागोष्टी करत त्यांनी आपली मेजवानी संपवली.

रात्रीच ते जेवण झाल्यानंतर सर्वजण आता आपल्या शरीराला अंथरुणाला खिळून गेले. दिवसभर प्रवास केल्याने थकलेले डोळे आता काही वेळ विश्रांती घेणार होते. थकलेले हे शरीर उद्याच्या दिवसासाठी पुन्हा तारोताजे आजच्या शांत झोपेने होणार होते. जड झालेली ती डोळे मिटून गाढ झोपेत स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेले.

दुसऱ्या दिवशी रोशनी ला शोभा काकू उठवत होत्या. रोशनी उठून बसली आणि बाजूला तिची वहिनी अजूनही गाढ झोपेत पाहून रोशनी ने तिलाही उठवले. काही वेळात सर्व मांडली नेहमप्रमाणेच फ्रेश होऊन, त्यांची सर्व काम आवरून त्यांनी नाश्ता केला. नाश्ता करत असताना फिरायला कुठे जायचं या विषयी चर्चा रंगली.

” कुठे जायचं फिरायला??”. प्रज्वल म्हणाला.

” गुहागर कडे अजून कोणत तरी बीच आहे ….तिकडे जाऊया….” रोशनी ला तिच्या एका मैत्रिणीने ने सांगितले होते, म्हणून तिला तिथे भेट द्यायची होती.

” रोशनी गुहागर किती लांब पडेल …आज पण नुसता प्रवासच करायचं का??” प्रज्वल ला आज दूरवर प्रवास नको होता.

” मग तू सांग दादा तुला कुठे जाऊ वाटते??”

” इकडेच फिरू दापोलीला … बर पडेल “

” बरं मग इकडेच जाऊ कोणत्या तरी बीच वर” रोशनी ने प्रजवलला दुजोरा दिला.

” आई तुला काय वाटते??”

” पजु कुठे पण चालेल आम्हाला फक्त जास्त दगदग नको आता”

” हा तर मग इकडेच फिरू जवळपास” प्रज्वल च्याच निर्णयाला सगळ्यांनी होकार दिला.

सगळ्यांनी नाश्ता झाल्यावर त्याती केली आणि ते त्यांच्या सफरवर निघाले ते थेट एका बीच वर जाऊन पोहोचले.

तिथे जाताच सगळ्यांची मन तो अथांग समुद्र पाहत तृप्त झाली होती. किनाऱ्यावरी ल ती मऊ ओलसर वाळू पायांना गुदगुल्या करू पाहत होती. प्रज्वल किट्टु ला घेऊन पाण्यात गेला तिथे त्यांनी मनसोक्त खेळून घेतले.

 

रोशनी अचानक समुद्राला लागून असणाऱ्या दगडावर जावून बसली व विचार करू लागली, “किती सुंदर आणी थेट मनाला स्पर्श करणारे वातावरण आहे ! अथांग सागराकडे बघितल तर वाटते की हा जणू काही पृथ्वीचा शेवट नी त्यासमोर स्वर्गाला जाणारा मार्गच असावा. अस वाटत की पृथ्वीच्या काठेवर येवून थांबलोय. एक निवांत श्वासाची नी सहवासाची अनुभुती होत आहे. कदाचित आराध्य पण माझ्या सोबत असता इथे तर किती छान वाटले असते. आम्ही दोघे हातात हात धरून इथे बसलेलो असतो. मी त्याचा खांद्यावर डोके ठेवून त्याचाशी गप्पा मारल्या अस्त्या. या सागरकाठच्या वाळूवर आम्हा दोघांच्या पावलांचे ठसे उमटले असते. तो पुढे मी त्याचा पाठोपाठ अगदी त्याचा पावलांच्या उमटलेल्या ठस्यांवर माझी पाउले टाकत चालताना. त्याने मागे वळून बघावे नी माझ्या बलिशपणावर त्याला अचानक प्रेम यावे. तो माझ्या कडे धावत यावा नी आम्ही दोघे जण खूप घट्ट मिठी मारावी. एकमेकांचा स्नेहपूर्न स्पर्श आम्ही अनुभवावा. खरंच, किती छान! आराध्य मला तुझी खूप आठवण येत आहे. आपली पुन्हा भेट व्हावी अन् मी तुझ्या त्या चेऱ्हऱ्याला मन भरून पहावे.” रोशनी आता स्वतःला घट्ट मिठी मारून घेतली होती.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.