Skip to content Skip to sidebar Skip to footer

तो सध्या काय करतो?? पार्ट ४

रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. हवेत एक वेगळ्या प्रकारचा आनंद मंद गतीने चहूकडे पसरत होता. आपल्या कानामध्ये हेडफोन्स घालून रोशनी तिच्या सीट बाजूची खिडकी उघडून ती बाहेरच जग न्याहाळून पाहत होती. जुनी हिंदी मराठी गाणी रोशनी ची आवडती. गाण्याचे बोल जणू तिच्या मनात घर करुन बसलेल्या आठवणींना जाग करत होते. रोशनी च्या डोळ्यांसमोर आता तिचे ते बालपणीचे गोंडस क्षणांची उधळणाची सुरुवात झाली होती. आपले सुखात गेले ते निरागस क्षण आठवून तिच्या ओठांवर हसू खेळून गेलं. मध्येच एक वाऱ्यची झुळूक येऊन तिच्या केसांवर मायेची ऊब देऊन जात होती.

तिच्या मनात असलेल्या अनेक गूढ प्रश्नांची उत्तरे तिला शोधायची होती जे तिला तिच्या अभ्यासक्रमात कधी नाही भेटली. आपली हीच उत्तरे शोधण्यासाठी ती उत्सुक होती. रोशनी तिचे नेहमीचे ते डॉक्टर सारखे धावपळीचे काम सोडून आज ती मोकळे पणाने श्वास घेत, आपल्या काल्पनिक जगामध्ये हरवून गेली.

शोभा काकू त्यांची आवडत्या गायकांची गाणी ऐकता ऐकता कधी झोपेच्या कुशीत जाऊन त्यांनी आपले गाव बघण्यासाठी आतुर झालेले ते पाणीदार डोळे मिटून होते.

विजय काका पुस्तक वाचण्यात इतके मग्न की त्यांना आजूबाजूच्या परिसराचा काही भानच राहिले नव्हते, ते
त्या पुस्तकातील पत्रात इतके गुंतून होते की जणू ते लेखिकेने लिहिलेलं प्रत्येक शब्द विजय काकांच्या डोळ्यांसमोर एका चालत्या बोलत्या दृष्याप्रमाने प्रकट झाली होती.

अखेरीस त्यांचा तो दीर्घ प्रवास संपला. विजय काकांनी आपले हातातले पुस्तक त्यांच्या बॅग मध्ये ठेवत त्यांनी आपल्या बॅग्स बसच्या वरच्या कप्प्यात ठेवलेले काढण्यात जुंपले होते. आपल्या सीट वर बसत विजय काकांनी शोभा काकूला उठवण्यासाठी हाक मारत त्यांच्या खांद्यावर अलगद थाप दिली.

” शोभा …..उठ …आपला स्टॉप आला. “

शोभा काकू इतक्या गाढ झोपेत होत्या की त्यांना काही वेळ आपण स्वप्न पाहत आहोत असा भास होत आहे अस त्यांना वाटल. आपले अवजड झालेले डोळे हळूच उघडले तर विजय काकांचा अंधुक चेहरा त्यांच्या नजरेस पडला आणि घाई गरबडीने त्या उठून बसल्या.

” काय काय झालं ….पोहोचलो का आपण???” शोभा काकू आपले डोळे चोळत विचारले.

” हो पोहचण्यात आहोत “

” पिल्लु काय करत आहे …..झोपली असेल बघा बर ….” अस म्हणून शोभा काकू आपल्या कोरड पडलेल्या घश्यात दोन घोट पाण्याचे पित होत्या.

काही वेळात ते त्यांच्या मुक्काम ठिकाणी पोहोचले होते. दापोलीच्या बस स्टँडवर उतरताच शोभा काकूंना आपल्या अंगात उत्साह संचारला आहे अशी जाणीव होत होती. तोच एकीकडे रोशनी तिच्या जिवलग मित्राला भेटेल ह्या आशेने होती. विजय काका आपले जुने मित्र आणि नातेवाईक यांना भेटायला उत्सुक होते.

रस्त्यावर येताच विजय काकांनी एक रिक्षा बोलवली आणि ते आपले सर्व समान त्यात नीट ठेवून त्यावर स्वार झाले.
काही वेळात ती रिक्षा त्यांच्या जुन्या घरासमोर येऊन थांबली होती. रिक्षाचा आवाज कानी येताच त्या घरातून मिरा काकू बाहेर आल्या.

” अग बाई सांगायचं तरी येणार आहोत म्हणून…..” मीरा काकू त्यांची नाराजगी दाखवत पुढे आल्या.

” काकी तुला सरप्राइज द्यायचं होत म्हणून नाही नाही सांगितल. ” रोशनी तिच्या हातातली ती जड बॅग ओढत ओट्यावर नेऊन ठेवली.

” कशी आहे तू ? आणि कुणाल कुठे आहे? ” शोभा काकू त्यांच्या हातातील बॅग घरात घेऊन जात विचारल.

” रोशनी दीदी …काका …काकू …..तुम्ही आले….” एक गोंडस मुलगी किचन मधून पळत शोभा काकू ला जाऊन बिलगली.

” हा बाय कशी आहे मग तू ..???” विजय काका आपल्या कडक आवाजात मऊ पणा आणत म्हणाले.

” काका मी छान आहे ” ती गोंडस परी आता तिच्या आईच्या कुशीत जाऊन शिरली होती.

” तुम्ही अंघोळ करून घ्या मी थोडा नाश्ता आणि चहा करते” मिरा काकू अस म्हणत किचन मध्ये गेल्या.

शोभा काकू आणि रोशनी यांनी आधी फ्रेश होऊन त्यांनी आपले कपडे बदलले आणि त्या समोरच्या घरात असलेला मोठ्या आरामदायक सोफ्यावर जाऊन बसल्या.

” रोशनी दीदी तू कशी आहे??” ती गोंडस परी आता रोशनी ला जाऊन बिलगली होती.

” मी मस्त आहे किट्टु आणि तू??” रोशनी किट्टु ला जवळ घेत म्हणाली.

” मी पण मस्त आहे” छोटीशी ती किट्टु रोशनी चे अनुकरण करत म्हणाली.

विजय काका ही फ्रेश होऊन आले होते. ते ही बाकी सगळ्यांसोबत सोफ्यावर दिवसभर थकलेले ते शरीर सैल सोडत त्यांनी आपला थकवा दुर्लक्षित केला.

तेवढ्यात मिरा काकू मस्त पैकी गरम उपमा आणि चहा त्यासोबत इतर अजून खाऊ घेऊन आल्या.

” बरं कसा झालं मग प्रवास …. काही अडचण तर नाही झाली???” मिरा काकू आपल्या हातात कडक चहाचा कप हातात घेत म्हणाल्या.

” अगदी उत्तम.” शोभा काकू तो उपमा खात उत्तर केले.

” बरं काय मग किट्टु किती वर्षाची झाली तू??”


आपल्या त्या चिमुकल्या चेहऱ्यावर आपले एक बोट ठेवत …जणू ती काही विचार करत असल्याचे दाखवून ……..” अ…म…मी ना पाच वर्षाची आहे ” अस आपल्या हाताची पाच बोटे पुढे करत ती उड्या मारत म्हणाली.

” अरे वा ….छान बोलायला शिकली तू ” विजय काका हसत म्हणाले.

” दिवसभर मोबाईल नाहीतर टीव्ही पाहिजे असतो तिला….” मिरा काकू त्यांच्या ह्या गोंडस चिमुकलीच्या अंगवळणी पडलेल्या सवयीने त्यांना वैताग आला होता.

” प्रज्वल नाही येणार का???” मिरा काकूंना त्यांच्या एका हिऱ्याची अनुपस्थिती जाणवली.

” हो येणार आहे तो पण म्हणे उशीर होईल …..उद्या पोहोचतो म्हणे ..तुम्ही जरा एकदा त्याला कॉल करून पाहा बर हो ..कधी निघणार ते तरी कळू दे .” शोभा काकू आपली चिंता व्यक्त करत होत्या.

” तो काही आता लहान नाही राहिला …करेल तो फोन ” विजय काकांना आता आपल्या मुलांच्या संसारात ढवळू पाहत नव्हते.


त्यांनी काही वेळ आपला गप्पागोष्टी करत, हसत खेळत वेळ छान रंगवला. अनेक जुन्या आठवणींना अंकुर फुटले आणि आपल्या त्या विश्वात ते सामावून गेले. ते घर, त्या आठवणी , ते दिवस , ती माणसे , तो काळ, सगळ्या गोष्टी कश्या पुन्हा जगू वाटत होत्या. आपल्या जगात रमलेल्या त्या गप्पामुळे तिथल्या वातावरणामध्ये एक अलग प्रकारचा आनंद दरवळत होता.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.