
रोशनी लगबगीने आपली कार तिच्या हॉस्पिटलच्या पार्कींग लॉट मध्ये जाऊन पार्क केली. रोशनी स्पर्श चिल्ड्रेन हॉस्पीटल मध्ये एमबीबीएस करून बालतज्ञाची सखोल अभ्यास करत होती. रोशनीला लहानपणापासून बायोलॉजी हा विषय आवडत होता. तिला मानवी शरीराचे विशेष आकर्षण वाटत होते. पुढे हीच आवड तिने आपल्या करिअर साठी निवडली आणि तिने यशस्वी पने आपली एमबीबीएस डिग्री ही आत्मसात केली. पुढे तिला आता बालतज्ञ म्हणून आपले शिक्षण पूर्ण करायचे होते.
रोशनी आपली बॅग घेऊन ती तिच्या डिपार्टमेंट मध्ये गेली. आपली बॅग आपल्या रूम मध्ये ठेवून आणि आपले डॉक्टर चे ते निळ्या रंगाचे कपडे चढवून ती आता लहान मुलांच्या वार्ड मध्ये आली.
” आज का बर उशीर??” रोशनी ला पाहून तिथे काऊंटर वर लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत असलेली एक नर्स म्हणाली.
” वृषाली कुठे जास्त लेट झाल मला…”
” ओके…सर आले नाही अजून म्हणून वाचलीस तू….” एक सिनियर नर्स म्हणाल्या.
” बरं झालं…नाहीतर आज ओरडा खावा लागला असता.” रोशनी एक सुस्कारा टाकत म्हणाली.
” रोशनी लग्न करणार आहेस की नाही??” त्या सिनियर नर्स फाईल्स टेबल वर नीट मांडत म्हणाल्या.
” अश्विनी सिस्टर ….मी काय खूप म्हातारी झाली आहे का?? आत्ताच नाही…..हे पेडियाट्रिक च झालं की बघू मग….” रोशनी आपले मत मांडत होती.
” मग बॉयफ्रेंड तरी आहे का ??” वृषाली आपल्या चेहऱ्यावर एक खट्याळ हसू खेळवत म्हणाली.
” नाही आहे कोणी…. आता पुन्हा पुन्हा विचारू नको.” रोशनी वृषाली च्या ह्या प्रश्नाला कंटाळली होती.
“ओह किसने दिल तोडा हमारे रोशनी मॅडम का जो अब प्यार करने से दूर भगती हे…” वृषाली आता सिनेमा स्टाईल चिडवत होती.
” चूप कर तू …आणि ह्या सगळ्या पेशन्ट चे फाईल्स वर नोट्स टाक. ” रोशनी वृषालीला काम देऊन आता पेशन्ट्स चे राऊंड घ्यायला गेली.
त्या वॉर्ड मध्ये अनेक लहान मुले वेगळ्या वेगळ्या रोगांनी त्रस्त होते आणि त्यांना पूर्णपणे ट्रीटमेंट चा योग्य फायदा व्हावा म्हणून त्यांना ह्या स्पेशल युनिट मधे भरती केले होते.
रोशनी त्या सगळ्यांचे चेक अप करत त्यांच्या सोबत गप्पा मारत होती. त्यांच्या आईवडिलांशी हसून बोलत त्यांचे दुःख काळजी कमी करण्याचा प्रयत्न करत होती.
तेवढ्यात त्यांचे सिनियर सर आले आणि त्यांनी आपला राऊंड सुरू केला. रोशनी ही त्यांना जॉइन झाली आणि सर कोणते औषधी कोणत्या पेशंट साठी आहे ते नोट्स made लिहून घेत तिने ते डॉक्टर्स ऑर्डर मध्ये टाईप केले.
रोशनीचा दिवस नेहमी असच कामात व्यस्त असतो, पेशंट आणि त्यांच्या पालकांसोबत बोलत ती तीचे काम मन लावून करत असते शिवाय तेथील सर्व स्टाफ सुद्धा खूप छान आहे. तिथे असलेल्या नर्सेस आणि रोशनी यांचं नातं वेगळं आहे. रोशनी जे काम करते त्याचा तिला समाधान आहे.
सर्व काम करता करता कधी रात्र होते याची रोशनी ला खबर ही होत नाही. लॅपटॉप वर काहीतरी टाईप करत असताना तिची नजर घड्याला कडे गेली. नऊ वाजून गेले होते आणि रोशनीची निघायची वेळही.
” अश्विनी सिस्टर …वृषाली….मी येते ” रोशनी आपले सामान हातात घेऊन म्हणाली.
आपले कपडे बदलून आणि बॅग घेऊन रोशनी नर्सेस ला बाय करून तिथून निघाली.
रोशनी घरी पोहचली, आपली कार पार्क करून ती तिच्या घराकडे निघाली. दरवाजाची बेल वाजवताच शोभा काकूंनी दरवाजा उघडला.
” लवकर हाथ पाय धुवून ये आम्ही पण जेवायचं थांबलो आहोत.” शोभा काकू म्हणत किचन मध्ये गेल्या.
” आई जावून घेत जा ना…माझी वाट पाहत नका राहू तुम्ही….मला कधी पण उशीर होतो….” रोशनी ला आपले आई वडील असे तिच्यासाठी उशिरा पर्यंत जागलेले आवडत नाही. पण त्यांचा इतका जीव आहे की ते त्यांच्या लाडक्या पिल्लु शिवाय जेवत नाही.
” बरं आता जा लवकर आवरा….” विजय काका म्हणाले.
” आलेच …तुम्ही बसून घ्या मी येते …” रोशनी आपल्या रूम मध्ये जाताच बाथरूम मध्ये गेली. तिने पटकन अंघोळ करून काही मऊ कपडे घातले आणि समोरच्या घरात येऊन बसली.
शोभा काकूंनी जेवणाचे साहित्य टेबल वर मांडून ठेवले आणि त्यांनी विजय काका आणि रोशनी ला ताट वाढून दिल.
” वाव बटाट्याची भाजी…” रोशनी खुश होत म्हणाली.
” आणि माझ्यासाठी बासुंदी आहे…” विजय काका हसत म्हणाले.
” आई तू का आज खुश आहे इतकी??”
” अरे तूच तर बोलली की जाऊ म्हणून दापोलीला…..म्हणून मी खुश आहे…. बरं विचारले का तुझ्या डिपार्टमेंट मध्ये सुट्टी भेटेल की नाही म्हणून..???”
” अरे यार आई तू आधी का नाही आठवण करून दिली….मी विसरले विचारायची….” रोशनी आल्या डोक्याला हात लावून म्हणाली.
” ठिक आहे काही हरकत नाही…उद्या विचार…” विजय काका आपला घास घेत म्हणाले.
” हा ..उद्या मी पक्का विचारेल.” रोशनी ठामपणे म्हणाली.
” बरं दादा चा काही कॉल???”
” हो तुझी आई सांगत होती त्याला ते सुट्टीच ….” विजय काका आता आपले भाषण सुरू करणारच होते पण शोभा काकूंनी आपले बोलणे सुरू केले आणि त्यांना थांबवले.
” हो सांगीतलं मी त्याला की आम्ही जाणार आहोत गावी तुला आणि पल्लवी ला सुट्टी भेटत असेल तर तर ये म्हणलं सोबत…. आता आपण जाणार आहोत तर त्याला सोडून जायचं का???
” पण त्याची काम असतात ….त्याला काही लगेच सुट्टी भेटत नाही….” विजय काका आपले बोलणे स्पष्ट करत होते.
“अहो मी काही त्याला जबरदस्ती नाही केली …मी फक्त त्याला विचारले…. “
” हो आई बरोबर केलं तू……नाहीतरी मी विचारणार होती त्याला. ” रोशनी तिच्या आई वडील यांचे ते chotuse भांडणं सुरू होण्या पूर्वीच बंद केले.
त्यांनी आपले जेवण संपवले आणि ते झोपायला गेले. रोशनी आज दिवसभरच्या धावपळीतून थकली होती आणि उद्या ही तेच होईल म्हणून एक छान झोप गरजेची आहे अस विचार करून ती आपल्या अंगावर अंथरुण घेऊन झोपली.
दुसऱ्या दिवशी आपला मोबाईलचा गजर वाजताच तिला जाग आली, ती उठली आणि बाथरूम मध्ये जाऊन आपली सकाळची सर्व काम आटोपून ती किचन मधे गेली.
“गुड मॉर्निंग मम्मी “
” गूड मॉर्निंग माझं पिल्लु…चल आवरलं असेल तर नाश्ता करून घे मग तुला पुन्हा उशीर होतो.” शोभा काकू नाश्त्याची प्लेट तिच्या पुढे करत म्हणाल्या.
” हो…” रोशनी आता तिचा मोबाईल बघत खात होती.
” तो मोबाईल दूर ठेव आधी….आणि खाण्या कडे लक्ष दे….” शोभा काकू थोड्या चिडून म्हणाल्या.
” आई …मी काय लहान आहे का आता ….काहीतरी महत्वाचं पाहत आहे…”
” हो ग पण आधी खाऊन घे आणि मग काय पहायचं ते बघ…”
” हम…ठेवला दूर …” रोशनी आपला मोबाईल फोन दूर सरकवत म्हणाली.
” बरं आज नक्की विचार हा …..सुट्टी च..” शोभा काकू मंद हसत म्हणाल्या.
” हो ग आई ..” रोशनी ला तिच्या आई ची उत्सुकता जाणवत होती …आणि तिला सुद्धा काही कारणास्तव गावी जायची उत्कट उत्सुकता होती.
आज रोशनी थोडी लवकर तिच्या डिपार्टमेंट मध्ये पोहोचली होती. कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता ती थेट आपल्या एचआर डिपार्टमेंट मध्ये जाऊन सुट्टीचा अर्ज केला. काही वेळात तो मंजूर झाला. रोशनी समाधानाचा हास्य चेहऱ्यावर फुलवत ती आपल्या डिपार्टमेंट मध्ये गेली.
” हॅलो…..” रोशनी जाताच तिथल्या नर्सेस ला विश करते.
” बापरे आज कोणीतरी खुश आहे…” वृषाली आपले डोळे मिचकावत म्हणाली.
” मला एका हप्त्याची सुट्टी भेटली आहे…” रोशनी आपल्या चेहऱ्यावर खोडकर हसू खेळवत म्हणाली.
” कुठे जाणार आहे ???” अश्विनी सिस्टर ने विचारले.
” गावी जाणार आहोत काही दिवस म्हणून …” रोशनी आपले कारण स्पष्ट करत म्हणाली.
त्यांनी आपले नेहमीचे काम सुरू केले. रोशनी ने तिचा राऊंड घेतला. आणि काही वेळात त्यांचे सिनियर सर आल्यावर त्यांच्या सोबत पेशंट चा राऊंड घेतला.
रोशनी लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत असताना वृषाली तिच्या सोबत गप्पा करत होती. वृषाली रोषणीचा हातात असेल एक ब्रेसलेट पाहून ” हे कुठे घेतल???” तिने विचारलं.
” अग ते मला गिफ्ट दिल होत. खूप जून झाल आहे ते आता…..” रोशनी त्या जुन्या ब्रेस्लेट कडे पाहत म्हणाली. तिच्या अनेक बालपणीच्या आठवणी त्या ब्रेसलेटशी जुळल्या होत्या.
” कोणी दिल होत….???”
” माझ्या बेस्ट फ्रेंड ने…”
“अच्छा मग काय करतो तुमचं ब्रेस्ट फ्रेंड ??? “
” नाही माहित मला….आम्ही गावी राहत होतो तेव्हा सोबत शाळेत जात होतो …आता मी इकडे शिफ्ट झाली आहे तर मला नाही …”
रोशनी सुद्धा नेहमी तिच्या ह्या बालपणीच्या मित्रा बद्दल विचार करत असते…तो कुठे असेल, काय करत असेल….कसा असेल…अशी असंख्य प्रश्न तिच्या मानत घर करून होते. आणि या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तिला गावी जाण्याची ओढ तिच्या मानत कायम होती. रोशनी च्या मानत एक प्रश्न कायम होता तो म्हणजे ” तो सध्या काय करतो????’
Post navigation

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.
1 Comment
सौ. उषा शिरीष कुलकर्णी.
खुपच छान.