Ritbhatmarathi

Search
Close this search box.

रोशनी चे उत्तरे ऐकुन आता आराध्य ला खात्री झाली की तो ज्या व्यक्तीसाठी मुंबई मध्ये आला ती रोशनी च आहे. आराध्य मनोमनी खुश होता. त्याला वाटले नव्हते की ज्या व्यक्ती साठी तो इथे आला ती व्यक्ती त्याला इतकी सहजासहजी भेटून जाईल.

रोशनी च्या हातातील ते फ्रेंडशिप बॅंड पाहून आराध्य थोडा चकित होताच. ज्या रोशनी च्या शोधात होता ती नक्की हीच आहे का म्हणून त्याने तिला त्या फ्रेंडशिप बॅंड आणि तिच्या आई वडील यांबद्दल विचारले. जेव्हा रोशनी ने आपल्या आई वडीलांची माहिती दिली तेव्हा आराध्य ला अतोनात आनंद झाला.

रोशनी नंतर तिची नेहमी प्रमाणे काम करत होती आणि त्या सोबत आराध्य ला ही ती वेवेगळ्या गोष्टींची माहिती देत होती. आराध्य आता स्वतः मध्ये गुंगलेला वाटत होता. ते पाहून रोशनी ने त्याला विचारले ” यू ओके??”

” हो , आय एम गूड ” अस म्हणत आराध्य ही त्याचे काम करत होता.

नेहमी सारखी रोशनी ची निघायची वेळ झाली आणि ती सगळ्यांना ‘ बाय ‘ करून डिपार्टमेंट मधून बाहेर निघाली.

आराध्य रोधंन गेल्याच्या काही वेळाने निघाला. त्याने नेहमी प्रमाणे टॅक्सी केली आणि त्याच्या अपार्टमेंट मध्ये पोहोचला. टॅक्सी मध्ये असतानाही तो विचारांत गुंतलेला होता. तो कधी त्याच्या अपार्टमेंट समोर येऊन पोहोचला ते सुद्धा तो नाही ओळखू शकला.

” भैय्या हम पोहोचले गये .” टॅक्सी वाला आराध्य चे लक्ष वेधण्यासाठी म्हणाला.

” हा ” अस म्हणताना आराध्य आपली मान होकारार्थी हलवत त्याने आपल्या पाकिटातून पैसे काढून त्याला दिले आणि तो टॅक्सी मधून उतरला.

आराध्य आज ही कॅन्टीन मधून खाऊन आला होता. तो घरात शिरताच त्याने अंघोळ केली आणि आपले कपडे बदलून तो त्याच्या बेड वर बसला.

त्याचे मन एक थारेवर नव्हते, जणू ते एक फुलपाखरू होऊन विचारांच्या फुलांवर फेर धरून होते. कधी इथे तर कधी तिथे.

आराध्य आज फार खुश होता. त्याला आनंद होता की ज्या प्रकारे तो रोशनी ची क्षणोक्षणी आठवण करत त्याचं प्रकारे रोशनी ही त्याची आठवण करत पण एक चांगला मित्र म्हणून याची खंत त्याला वाटे.

” मी तिला सांगू का ?? तिचा जो बालपणी चा मित्र आहे तो मीच आहे म्हणून…..तिला वाटणार नाही की मी खोटं बोलत आहे??? आणि ती ऐकुन शॉक होईल. मला काही सुचत नाहीये मी नक्की काय करू ?? आम्ही जरी दूर झालो होतो तरी आमची मैत्री तुटली नव्हती.. मला रोशनी ची नेहमी आठवण यायची… नवीन ठिकाणी घर घेतल तेव्हा ही …माझे अनेक चांगले मित्र झालेत पण रोशनी ची जागा कोणी घेऊ शकले नाही …. ” असे विचारांचे वादळ आराध्य च्या मनात घोंघावत होते.

आराध्य ही रोशनी ची आठवण करत असे पण एक चांगली मैत्रीण म्हणून पुढे या आठवणी चे कधी एकतर्फी प्रेम निर्माण झाले ते त्याला उमजले नाही. आराध्य दिसायला सुंदर होता. त्याच्या एमबीबस डिग्री चे शिक्षण घेताना ही त्याला अनेक मुली त्यांच्या मनातील असलेल्या प्रेमळ भावना आराध्य ला सांगे पण आराध्य त्यांना नकार देत कारण तो कोणाची तरी वाट पाहत आहे, त्याला त्या एका खास व्यक्ती ची शोध घ्यायची आहे. ती खास व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसुन रोशनी आहे याची जाणीव आराध्य ला झाली तेव्हा त्याने ठरवलं की त्याची डिग्री पूर्ण करून तो मुंबई ला येणार आणि मग रोशनी ला शोधणार.

आराध्य जेव्हा त्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर म्हणून जॉइन झाला तेव्हा त्याला याची खात्री नव्हती की रोशनी ही तिथेच असेल म्हणून.

पहिल्या दिवशी रोशनी ला त्याने पाहिले तेव्हा रोशनी च्या साधे पणाने आणि सौंदर्याने आराध्य ला भुरळ घातली. रोशनी च्या हातातील ते फ्रेंडशिप बॅंड पाहून त्याला थोडे नवलच वाटले. लहानपणी पाहिलेली ती छोटी गोंडस रोशनी चा चेहरा त्याला धूसर दिसे पण तरीही ती त्याच्या मनात कायम होती.

आराध्य त्याचे ते घालवलेले बालपण आजही त्याच्या आठवणींच्या पेटी मध्ये जपून होते. आराध्य ला आता रोशनी ला कसे सांगावे हे सुचत नव्हते.

” रोशनी चा कोणी दुसरा जिवलग मित्र असेल तर ?? तिच्या मनात कोणी दुसरा असेल तर….तिला मी अजून हि आठवतो पण एक बालपणी चा मित्र म्हणूनच …..” हा विचार आराध्य च्या मनात घोळत होती.

आराध्य चे डोळे आता जळजळ करत होते. त्याने आपले डोळे चोळले आणि मोबाईल हातात घेऊन त्याने त्याच्या आई ला कॉल केला.

” हा बाळा बोल …जेवला का तू ?? आणि कशी चालू आहे ??”

” मी छान आहे आई आणि मी जेवलो ….तुम्ही जेवले का??”

” हो आम्ही जेवलो पण सारखी तुझीच हुरहूर लागून असते …तू तुझी नीट काळजी घ्यावी हेच महत्वाचं आहे. “
सुधा काकू त्यांचे डोळे मिचकावत अश्रू लपवण्याची प्रयत्न करीत होत्या. आराध्य हा सुधा काकूंचा एकुलता एक काळजाचा तुकडा. आराध्य कधी जास्त त्यांच्या पासून दूर नव्हता राहत आणि आता नोकरी साठी म्हणून तो कायमचा दूर होत आहे असे त्यांना वाटे.

” काळजी नको करू आई …मी एकदम छान आहे तूच तुझी काळजी घेत जा आणि बाबा ची पण …आणि हो एक बातमी द्यायची होती …ती रोशनी आहे ना शोभा काकूंची…ती पण माझ्याच हॉस्पिटल मध्ये काम करते…”

शोभा काकू आणि रोशनी चे नाव ऐकताच सुधा काकू आनंदित झाल्या. सुधा काकू आणि शोभा काकू यांचे विचार जुळायचे. त्यांची मने त्यांचा मैत्रीच्या सानिध्यात जुळून गेली होती. आपली जुनी नाती कोणी सहजासहजी विसरत नाही.

” अग बाई …कशी आहे ती?? काय करते ?? मोठी झाली असेल ना आता?? ” सुधा काकू त्यांचे प्रश्न बाणाच्या तिरा प्रमाणे सोडत होत्या.

” हो ती पण एक डॉक्टर आहे …” आराध्य सांगत होता तोच सुधा काकूंनी त्याला थांबवले आणि पुण्य आपल्या प्रश्नांचा पाऊस सुरू केला.

” अरे वा छान आणि शोभा काय करते ??? ती कशी आहे?? बकीच्यांशी ओळख झाली की नाही??”

” नाही ग आई मी भेटेल त्यांच्या शी नाही तरी तू इकडे येणार आहेच ना तेव्हा भेट मग त्यांना ….” आराध्य अजून त्यांना भेटला नाही म्हणून त्याने सुधा काकू ला इकडे येण्यासाठी आता छान कारण दिले होते.

” हो आता तर की नक्की येईल येईल तिकडे ….आणि खूप दिवस राहील …माझी किती दिवसांची इच्छा आता पूर्ण होईल. मी इतकी खुश आहे हे ऐकुन ….” सुधा काकू फार आनंदित होत्या.

काही वेळ अजून बोलल्या नंतर आराध्य ने फोन ठेवला आणि तो बेड वर आडवा झाला. अंगावर उबदार ब्लँकेट ओढून घेत तो रोशनी चा हसरा नाजूक चेहरा त्याचा डोळ्यांसमोर उभा करून होता.

” लवकरच तुला तुझा आराध्य भेटेल …थोडी वाट बघ ” अस म्हणत त्याने त्याचे डोळे मिटले आणि बघता बघता आराध्य ला गाढ झोप लागून गेली.