Skip to content Skip to sidebar Skip to footer

wake up early morning खूप प्रयत्न करूनही सकाळी लवकर उठणं होत नाही? मग हे उपाय नक्की करून पहा

wake up early morning: आपले सगळ्यांचेच आयुष्या खूप धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे. रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घरातील कामे, मुलांचा अभ्यास, त्यांच्या शाळेच्या वेळा, ऑफिसच्या वेळा, टिफीनची गडबड, बस पकडण्याची धावपळ, साफ सफाई, घरातील इतर छोटी मोठी कामे, घड्याल्याच्या कट्याकडे पाहून होणारी जीवाची घालमेल हे सगळ्यांच्याच बाबतीत होते. याला लहान मुलेही अपवाद नाहीत. त्यात जर घरातील स्त्री जॉब करत असेल तर हे सगळं सांभाळून ऑफिस वर्क म्हणजे तारेवरची कसरतच असते.

वेळेत पोहचण्यासाठी पाळाव्या लागणाऱ्या वेळा बंधनकारक असतात. या धावपळीत खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवईमध्ये खूप बदल झाले आहेत. जंक फूड, नेहमी बाहेरचे खाणे, कधी कधी वेळे अभावी उपाशीच राहणे अशा गोष्टी सर्रास घडतात. अर्थातच त्याचा परिणाम आपल्या शरीरावर झाल्याशिवाय रहात नाही. त्यातही बऱ्याच जणांना घरी आल्यावर उशिरापर्यंत जागणे, रात्रीचा बराचसा वेळ टीव्ही किंवा मोबाईलवर घालवण्याची सवय असते. अशाने मग झोप न येणे, पुरेशी झोप न होणे अशा समस्या निर्माण होतात.

खरतर उशिरा उठणे ही वाईट सवय आहे त्याचे आपल्या शरीरावर विपरीत परीणाम होतात. सकाळी लवकर उठल्याने आरोग्य चांगले रहाते असे डॉक्टरांचेच म्हणणे आहे. पूर्वीची आपल्या घरातील जुनी माणसे म्हणूनच म्हणत होती, लवकर निजे, लवकर उठे, त्यास आरोग्य लाभे. ते उगाच नव्हे. आपण उशिरा उठतो याचाच अर्थ आपली झोप पूर्ण होत नाही किंवा आपण पूर्ण झोप घेऊ शकत नाही.

पण काहीही झालं तरी दुसऱ्या दिवशीचे व्यस्त रूटीन टाळता येत नाही आणि या सगळ्या गोष्टी तेंव्हाच शक्य होतात जेंव्हा आपली सकाळ वेळेत आणि फ्रेश सुरू होते. नाहीतर पूर्ण दिवसाचे रूटीन बिघडायला वेळ लागत नाही. पण दिवसभर इतकी दगदग झालेली असते की सकाळी लवकर उठण्याचा खूप कंटाळा येतो किंवा ठरवून पण आपण लवकर उठू शकत नाही. मग त्यासाठी नक्की काय करायला हवं ?? बघुया काही उपयुक्त टिप्स .

पुरेशी झोप शरीराला आवश्यक असते. तज्ज्ञांच्या म्हणण्ानुसार ७-९ तासांची झोप आपल्याला हवी असते. तुमच्या दिवसाची सुरुवात जर सकाळी ७ होत असेल तर त्या हिशोबाने तुम्ही रात्री अकरा वाजता झोपायला हवे. समजा ती सहाल होत असेल तर रात्री दहा वाजेपर्यंत आपण झोपले पाहिजे. म्हणजे ७-९ तासांच्या हिशोबाने आपण झोपलो तर सकाळी ठराविक वेळेत आपली सकाळ सुरू होईल.

आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेत. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण मोबाईलवर अलार्म लावून सकाळी उठण्याचा प्रयत्न करू शकतो. पण त्यातही बरेच लोक अलार्म वाजला तरीही तो बंद करून, किंवा उठू दहाच मिनिटात असा विचार करून पुन्हा झोपतात. पर्यायाने उशिराच उठतात त्यामुळे तुमच्या झोपण्याच्या जागेपासून अलार्म जरा दूर ठेवा. म्हणजे तो वाजला की तुम्हाला उठून काही पाऊले चालत जाऊन तो बंद करावा लागेल. अशाने तुम्ही पूर्णपने जागे व्हाल आणि लवकर उठू शकाल.

खाण्यापिण्याच्या सवईंचा परिणाम कळत नकळत आपल्या शरीरावर होत असतो. रात्रीच्या वेळी जर तुम्ही भारी भक्कम, पचायला जड, तळलेले, मसालेदार, मांसाहारी जेवण घेतले तर शरीर सुस्तावते आणि सकाळी लवकर जाग येत नाही. अंगात आळस भरून रहातो. त्यामुळे रात्री आहारात फळं, भाज्या, पोषक तत्वे असणारा भरपूर पण पचायला हलका आहार घ्या मग झोपा.

बऱ्याच लोकांना रात्री बराच वेळ टीव्ही बघण्याची किंवा मोबाईलवर वेळ घालवण्याची किंवा पार्टी करत जगण्याची सवय असते. रात्री जर तुम्ही जागरण केले तर सकाळी लवकर उठूच शकणार नाहीत. त्यामुळे रात्री लवकर झोपण्याची सवय लावून घ्या म्हणजे सकाळी लवकर उठाल.

व्यायाम करणे हे शरीरासाठी खूप उपयुक्त ठरते. व्यायाम केल्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात, जसे की अनिद्रा, जास्त विचार करण्याची सवय आणि निराशपासून सुटका होते. शरीराची एनर्जी लेवल वाढते. तसेच व्यायाम करण्याने शरीर थकते आणि लवकर शिवाय शांत झोप लागते.

माहित आहे का? रिफाईंड तेल आरोग्यासाठी खूप घातक आहे. उत्तम आरोग्यासाठी आजच आहारात हे कूकिंग ऑइल समाविष्ठ करा.

कमी खर्चात महिलांना घरच्या घरी व्यवसाय सुरु करणं झालं आता सोपं

फिरायला जाण्याची सवय ठेवा. आणि शक्यतो फिरायला जाण्याची वेळ ही स्वच्छ सूर्यप्रकाशित असावी हे लक्षात घ्या. म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी जेंव्हा तुम्ही फिरायला जाल तेंव्हा सूर्याच छान प्रकाश वातावरणात असावा. याशिवाय घराला बाल्कनी असेल किंवा अंगण असेल तर मोकळ्या हवेत नक्की बसा. अशाने मन प्रसन्न होईल आणि झोप छान लागेल.

बऱ्याच लोकांना रात्री झोपण्यापूर्वी दारू, बिअर, सिगारेट किंवा अन्य पदार्थांचे सेवन करण्याची सवय असते. यातील कोणतेच पदार्थ शरीराला लाभ देत नाहीतच उलट नुकसानच करतात. तुम्हाला लवकर उठायचे असेल आणि रात्री नशा करण्याची सवय असेल तर लवकर उठणे केवळ अशक्य आहे. नशेचा अंमल तुमच्या शरीरावर बराच वेळ रहातो, शिवाय सकाळी आळस जात नाही आणि डोकेदुखी सारखे दुखणे लागते ते वेगळेच. अशाने सगळा दिवस कंटाळवाणा जातो. त्यामुळे अशा गोष्टी पासून लांबच रहा.

संगीत ऐकायला कोणाला नाही आवडणार?? आपला खराब मुड नीट करण्याची ताकद संगीतात आहे. आपण झोपण्याच्या वेळी संगीत ऐकले तर मन तर प्रसन्न होईलच शिवाय डोके शांत राहील आणि अर्थातच छान झोप लागेल. सकाळी जेंव्हा तुम्ही उठाल त्यावेळी तुमचा मुड प्रसन्न आणि फ्रेश असेल त्यामुळे दिवस छान जाईल.

हा सगळ्याच प्रश्नांवरील उत्तम तोडगा आहे. याचे एक ना अनेक फायदे आपल्याला सांगता येतील. मन शांत राहते, वाईट विचार दूर पाळतात, एक सकारात्मक ऊर्जा देते ध्यान, जगण्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन देते ध्यान, रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यामुळे ही सवय जर आपण लावून घेतली तर अध्यात्मिक शांती मिळून झोप उत्तम लागेल आणि आपण लवकर उठू.

दिवसभराच्या धावपळीने, व्यापाने अनेक विचार डोक्यात गोंधळ घालत असतात. अशा विचारांनी झोप लागणे तर दूरच उलट रात्रभर जागरण होण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे झोपताना चांगल्या विचारांचे एखादे पुस्तक वाचा, रिलॅक्स होण्यासाठी शावर खाली बाथ घ्या किंवा जरा वेळ जप करा. त्यामुळे शरीर आणि मन शांत होऊन झोप चांगली लागेल.

हल्ली अनेक लोकांना झोपण्याआधी चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते, जी अत्यंत चुकीची आहे. यामुळे आपली झोप उडून जाते आणि अंथरुणावर पडलो तरीही झोप येत नाही. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान ६-७ तास चहा, कॉफी घेऊ नका. तसेच डोळ्यांवर निळी लाईट पडू देऊ नका. त्याने झोप खराब होऊ शकते.

मुख्यतः बऱ्याच महिलांना सकाळी उठून भांडे धुण्याची किंवा लवकर उठून मुलांचा अभ्यास घेणे, मोटार चालू करून पाणी भरणे असे कामं करण्याची सवय असते. अशा कामांमुळे आपण आपसूकच लवकर उठतो आणि कामाला लागतो.

ही खूप वेगळी आणि काम करणारी आयडिया आहे. झोपताना तुम्ही अशा ठिकाणी झोपा ज्यामुळे सूर्याची किरणे बरोबर तुमच्या तोंडावर किंवा अंगावर येतील. त्यामुळे काहीही न करता तुम्ही सहज जागे व्हाल.

तुम्ही झोपण्याआधी घरातील बाकी लोकांना त्यातल्या त्यात काही जेष्ठ मंडळी असतील तर त्यांना मला लवकर उठवा असे सांगून झोपा. जेष्ठ मंडळी लवकरच उठतात त्यामुळे ते तुम्हाला लवकर उठवू शकतात.

तुमच्यापैकी काही मित्रांना लवकर उठून अभ्यास करण्याची, बाहेर फिरायला जाण्याची किंवा व्यायाम करण्याची सवय असेल तर त्यांना फोन करून उठवायला सांगा. सोपे होऊन जाईल.

पहाटे ४-५ च्या दरम्यान सगळ्यांनाच वॉशरूमला जाण्याची सवय असते. अशा वेळी जर तुम्ही बाथरूमला कुलूप लावले तर ते बघून उघडण्यात मेहनत घ्यावी लागेल आणि तुम्ही चांगलेच जागे व्हाल.

आता वाढत्या शहरीकरणामुळे हे जरा अशक्य झाले आहे. पण तुम्ही जर छोट्या शहरात रहात असाल तर नक्कीच गच्चीवर जाऊन झोपा. त्यामुळे सकाळी सकाळी सूर्याची किरणे, पक्षांचा किलबिलाट, कोंबड्याची बाग यामुळे तुमची सकाळ लवकर होईल आणि खूप फ्रेश होईल. इतक्या नैसर्गिक आणि सुंदर वातावरणात झालेली सकाळ म्हणजे काही बोलायलाच नको. दिवस मस्तच जाईल.

तर अशा काही उपयुक्त गोष्टींचा उपयोग केलात तर तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास नक्कीच फायदा होईल आणि तुमचा दिवस योग्य वेळी सुरू होईल यात शंकाच नाही.

================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.