वैवाहिक जीवनात सतत वाद विवाद होत असतील तर हे उपाय नकी करून बघा.

tips for happy married life: मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात नाती म्हणजेच रिलेशन्स खूप महत्त्वाचे असतात. त्याच नात्यांच्या जोरावर तर आपण जगत असतो. थोड आंबट, थोड तिखट आणि खूप गोड असणारे आणि शेवटपर्यंत साथ देणारे असे नाते म्हणजे नवरा बायकोचे नाते. सगळ्याच नात्यांची गंमत वेगळी असते पण प्रत्येक सुख दुःखात सोबत असलेले आणि आयुष्याची मजा वाढवणारे नाते म्हणजे नवरा बायकोचे नाते. असे म्हणतात की, बायकोला नवरा आणि नवऱ्याला बायकोच असते काहीही झालं तरी. त्यामुळे हे नात टिकवताना, जपताना, फुलवताना काळजी घ्यायला हवी. यातला गोडवा कमी होऊ देऊ नये.
पण आजकाल नात्यांचा ट्रेण्ड बघता आणि वाढत्या घटस्फोटाचे प्रमाण बघता नात हे नात नसून केवळ व्यवहार झाला आहे असेच दिसून येते. एकमेकांकडून करण्यात आलेल्या अवाजवी अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे अपेक्षाभंग यांचा परिणाम म्हणजे वाढते घटस्फोट असे दिसून येत आहे. नात्यांची मजा ती उलगडण्यात आहे, एकमेकांना समजून घेण्यात, स्वभाव ओळखण्यात, छोटे मोठे रुसवे फुगवे घालवण्यात, प्रेमाने जवळ घेण्यात, नव्या स्पर्शाची ओढ असण्यात आहे. पण हे सगळं समजून उमजून घेण्याआधीच नात्याची वीण सैल होत आहे.
प्रत्येकच नात्यात चढ उतार येत राहतात. अगदी आई मुलांच्या नात्यात पण बऱ्याचदा वैचारिक मतभेद होतात पण म्हणून नात संपत का ?? तर नाही असे होत. मग नवरा बायकोच्या नात्यात लगेच टोकाचे निर्णय घेऊन ते संपवून टकणे हा त्यावरचा उपाय कसा असू शकतो ?? त्यासाठी एकमेकांना समजून घेण्याचा किमान एकदा प्रमाणिक प्रयत्न करायला हवा हो ना ??
आज यासाठीच असे काही खास उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे नवरा बायको मध्ये सतत होणारे वाद आणि त्याचा होणारा त्रास दोन्ही खात्रीने कमी होईल. चला बघुया.
१. कारणे समजून घ्या :
प्रत्येक कापल्स मध्ये वाद होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. पण त्याने होणारा परिणाम मात्र सारखाच असतो आणि तो म्हणजे नात्यात येणारा दुरावा. त्यामुळे आपल्यात वाद का होत आहेत याची नेमकी कारणे कोणती ?? याचा जरा शांतपने विचार करा आणि वादाच्या मुळाशी जा. एकदा का नेमके कारण समजले तर मग त्यांना ओळखून होणारे वाद टाळण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
उदाहरण द्यायचे झाले तर, एखाद्या जोडप्या मधील एखादी व्यक्ती खूप शिस्तबध्द असेल आणि त्या उलट दुसरी व्यक्ती असेल तर मग वाद होतात. तू ही वस्तू इथेच का ठेवली, मला त्यामुळे माझ्या वस्तू सापडत नाहीत, तू जरा जागची वस्तू जागच्या जागीच ठेवायला शिक. असे बरेच काही घडते. तर अशा वेळी दुसऱ्या व्यक्तीने आपल्या अंगात शिस्तबध्दपणा बाळगण्याचा प्रयत्न करावा, ते नसेल जमत तर निदान त्या व्यक्ती समोर तरी वस्तू जागच्या जागी ठेवण्याचे प्रयत्न करावा म्हणजे वाद होणार नाहीत.
२. शांत राहणे :
बऱ्याचदा निरर्थक गोष्टींवर तोंडाला तोंड देत बसण्यापेक्षा समोरचा चिडला असेल तर शांत राहण्यात शहाणपणा असतो. मग आपला मुद्दा बरोबर असला तरीही समोरची व्यक्ती चिडलेली असताना मी कशी बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करू नये. शांत रहावे आणि समोरची व्यक्ती शांत झाली की आपला मुद्दा मोजक्याच पण योग्य शब्दात सांगावा. अशाने वाद होणार नाहीत आणि समोरच्याला त्याची चूक समजेल.
३. योगा करावे :
कधी कधी परिस्थिती इतकी विचित्र होते की कळतंय पण वळत नाही अशी अवस्था होते. आपल्याला चिडचिड करायची नसते तरीही आपण आपल्या डोक्यातील विचारांचा, त्रासाचा राग कोणावर तरी काढून मोकळे होतो आणि चूक लक्षात आल्यावर मग त्याचाही त्रास होतो तो वेगळाच. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर थोडासा वेळ स्वतःसाठी काढून योगा, प्राणायाम नक्की करावे. डोक्यातील विचारांचा कचरा दूर करावा जरा शांत बसावे म्हणजे गोष्टी सुटायला लागतात.
४. दुर्लक्ष करावे :
बऱ्याचदा प्रयत्न करूनही समोरची व्यक्ती त्रास होईल असेच वागते. अशा वेळी सरळ दुर्लक्ष करावे. काही व्यक्तींना कोणतेही कारण असते चीडायला आणि वाद घालायला. अशा वेळी हा त्याचा स्वभावगुण आहे हे समजून सरळ दोन्ही कानाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.
हेही वाचा
हे करून पहा आयुष्य कधीच किचकट वाटणार नाही
खूप प्रयत्न करूनही सकाळी लवकर उठणं होत नाही? मग हे उपाय नक्की करून पहा
६. निरपेक्ष रहा :
आपल्याला आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत की मग अपेक्षा भंगाचे दुःख आणि त्यातून वाद होतात. त्यापेक्षा अपेक्षाच ठेवू नका. कोणीच कधीच परिपूर्ण नसतो. त्यामुळे तशी अपेक्षाही करू नका.
७. समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका :
काहीही झालं तरी समोरच्या व्यक्तीचा स्वभाव बदलायला जाऊच नका. खूप त्रास होईल. आपल्याला हवे त्या प्रमाणे कोणतीच व्यक्ती कधीच वागू शकत नाही. त्यामुळे जो जसा आहे तसाच त्याचा स्वीकार करा.
८. स्वतःचा आनंद शोधा :
आपल्याला काय करून आनंद मिळतो ते करा. गाणी ऐका, फिरायला जा, मनसोक्त भटकंती करा, शॉपिंग करा, कोणाशी तरी गप्पा मारा, पुस्तकं वाचा, फिल्म बघा. असे काहीही जरा ज्यामुळे तुम्हाला छान वाटेल. त्यामुळे मुड एकदम फ्रेश राहील आणि आनंदी रहाल.
९. कामात गुंतून घ्या :
स्वतःला कामात इतके गुंतवून टाका की वाद करण्यासाठी वेळच मिळणार नाही. आपल्या छंदाला आपले कमावण्याचे साधन बनवा. त्यामुळे वेळ छान जाईल, काम उत्तम होईल, पैसा मिळेल आणि मिळणारे समाधान लाख मोलाचे असेल.
१०. ईश्र्वरावर श्रद्धा ठेवा :
कधी कधी खूप त्रास होतो आपल्याला. घरातील कटकटी इतक्या मोठ्या होतात की मार्गच दिसत नाही. निराश व्हायला होते. अशा वेळी आपले श्रद्धा स्थान आठवा आणि जप, ध्यान, धारणा,मंत्र म्हणायला किंवा ऐकायला लागा. सगळे त्या परमविधात्यावर सोपवून मोकळे व्हा. स्वतःला त्याच्या ताब्यात द्या आणि शांत रहा. तुझ्या हातात स्वतःला आणि माझ्या संसाराला सोपवत आहे तूच बघ बाबा असे म्हणून मोकळे व्हा.
११. सकारात्मक विचार करा.
नेहमी वाईटातून काहीतरी चांगले उगवते यावर विश्वास ठेवा. सतत चांगलेच विचार करा, छान प्रेरणादायी व्हिडिओ पहा, काहीतरी ऐका, पुस्तके वाचा त्यात आत्मचरित्र वाचून काढा. म्हणजे जगण्याला बळ मिळेल आणि सकारात्मक रहाल.
शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या कोणतीही व्यक्ती कधीच परिपूर्ण नसते. आपल्या तही खूप दोष असतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या चुका दाखवत किंवा बघत बसू नका त. स्वतःचे ही अवलोकन करा.
आपल्याला काटा टोचला त्या मागेही पूर्व जन्मीचे किंवा या जन्मीचे काही प्रारब्ध म्हणजेच कर्म असतात. आपण कोणाला तरी आधी काटा टोचलेला असतो त्यामुळे ती शिक्षा आपल्याला मिळालेली असते. तसेच आपल्या आयुष्यात आलेली माणसे आपल्याला त्रास देत असतील तर ते आपल्या कर्माचे भोग आहेत आणि ते भोगूनच संपवावे लागणार याची जाणीव ठेवून कर्म चांगले ठेवा आणि आयुष्य शक्य तितके आनंदाने जगा.
कोणताही टोकाचा निर्णय घेण्याआधी एकदा पुनर्विचार नक्की करावा. नवरा बायको या दोन व्यक्ती पूर्णपणे वेगळ्या वातावरणातून, परिस्थितीतून एकत्र आलेल्या असतात त्यामुळे एकमेकांना समजून घेताना, सामावून घेताना त्रास होणार, वाद होणार,भांड्याला भांडं लागणार. पण म्हणून भांडतच बसू नका. मी आशा करते दिलेल्या उपायांनी नवरा बायको मधील वाद टाळण्याचे मार्ग मिळाले असतील. या उपायांनी एक जरी जोडपे समजून घेऊ शकले तरी सार्थक होईल. सर्वांना सुखी संसाराच्या खूप शुभेच्छा !!!
======================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.