Skip to content Skip to sidebar Skip to footer

ती नटी…आणि आश्वासन…

सकाळी ८-३० वाजताची लोकल…हीच वेळ पाहून देवश्री आपली काम आटोपत होती पोराबाळांसाठी आपला नाश्ता आणि जेवण सगळं कशी काटेकोरपणे सांभाळत होती आणि एका फर्ममध्ये उच्च पदावर आपला कार्यभार सांभाळत होती..मग कामं आवरता आवरता थोडा उशीर होतंच होता..पण आदल्या दिवशी ऑफिसची काम बऱ्यापैकी आटोपून ठेवली होती फक्त ऑफिसमध्ये जाऊन आपल्या प्रॉडक्ट बद्दल माहिती सादरीकरणाद्वारे सर्वांना द्यायची होती म्हणून गडबड करत होती…देवश्रीची तर गडबड चालूच होती पण अरुणही देवश्रीला कामात मदत करत होता…म्हणजे सारखे सारखे सादरीकरण देवश्रीसमोर घोकत होता..देवश्रीला अरुण म्हणाला- ”देवश्री, काय गं हे नको ना जॉबच्या मागे लागूस..केवडी दमछाक होतेय तुझी..” देवश्री आवरता-आवरता म्हणाली,”अरे आश्वासन दिलंय मामंजींना मी…घर स्वबळावर नेटाने सांभाळून दाखवील मी..आणि करतीय त्यांच्याच आशीर्वादाने, चल जाते मी पटकन..आजही उशीरच झालाय..१५ मिनिटे अगोदर जायला पाहिजे..” असे म्हणून आपली पर्स आणि डबा घेऊन देवश्री घरातून निघते…आणि अरुणची बडबड चालूच होते… ‘काय ह्या बायका…आश्वासन पाळता येतात यांना फक्त…नवऱ्याची आश्वासन केव्हा पाळणार…आज मी हिच्यासाठी वर्क फ्रॉम होम घेतलाय…याच काही नाही हीला..एक वेळ तिची तगमग पाहून कसंतरी वाटतं…म्हणून गप्प बसतो’ इतक्यात छोटी निधी पळतच आपल्या पप्पाजवळ येते आणि त्याला बिलगून म्हणते…” पप्पा..का बरं तू माझ्या मम्माला पाठीमागून बोलतोस..माहिती आहे …! ती खूप ग्रेट मम्मा आहे माझ्यासाठी…मी तिच्याचसारखं होणार” आणि अरुण निधीला जवळ घेत कुरवाळत म्हणतो..” I am sorry निधी …” आणि निधी म्हणते ”that’s like a good boy !” असं म्हणते आणि खेळायला निघून जाते …

देवश्री ऑफिसमध्ये सादरीकरण खूप छान करते आणि तिला त्याचं बक्षीस म्हणून एका हॉटेलचं फ्री कूपन भेटतं मग देवश्री संडे ला मस्तपैकी डिनरचा प्लॅन बनवते..आणि अगदी प्रफुल्लित चेहऱ्याने संध्याकाळची लोकल पकडते…आणि एवढ्यात सगळ्या गर्दीमधून धडपडत एक सडपातळ बांध्याची,चेहऱ्याला गडद मेक अप लावलेली, साधारण २०-२२ वय असेल तिचं आणि ओठांना डार्क लिपस्टिक फासलेली मुलगी देवश्रीच्या जवळ येते आणि देवश्रीचा स्टॉप येईपर्यंत तिच्याचकडे पाहत उभी असते…मग देवश्रीच्या मागोमाग येत तिला एका बाकावर बसायला लावते…त्या मुलीला बोलता येत नसतं म्हणून एक कागद देवश्रीजवळ देते आणि देवश्री तो कागद वाचते..त्या कागदावरचा मजकूर वाचून देवश्रीच्या काळजात धस्स होत…मजकूर असतो..

मी एक देहविक्री करणारी मुलगी आहे…मला बोलता येत नाही…माझ्यावर परिस्थितीमुळे असा धंदा करायची वेळ आली आहे ..रोज असंख्य लोक मला स्पर्श करतात खूप किळस वाटते…खूप छळवाद होतो माझा..मला एक मुलगीही आहे..खूप लवकर मुलगी झाली मला..ती आता ५ वर्षाची असेल तिच्या वाट्याला माझ्यासारख्या यातना नकोय…म्हणून मी रोजच कुणाची ना कुणाची मदत मागतेय…पण या जगात कुणीही कुणाच्या मदतीला धावून येत नाही…मी तुला रोज याच स्टेशन वर पाहायचे आणि तुझ्या डोळ्यात मला दिसलं कि फक्त तूच माझी मदत करशील म्हणून मी हा..कागद लिहूनच ठेवला होता…आज मी हा कागद तुझ्याकडे देतेय… …फक्त माझ्या मुलीला यातून सोडवं उपकार होतील तुझे…कारण कालच काही माणसांनी तिचा सौदा केलाय…मला फक्त माझी पोर या सगळ्या घाणीमधून मोकळी झालेली हवी आहे ..एवढच मला वाटत…मी माझ्या मुलीचा सगळा खर्च करेल फक्त मला तिला स्वतःच्या पायावर उभी राहिलेली बघायचीय…जेणेकरून तिची पुढे माझ्यासारखी एखादी वेश्या होता कामा नये..सगळी गिधाड आहेत या समाजात…बाईच्या अंगात त्राण आहेत तोपर्यंत तिचे लचके तोडतील…आणि जेव्हा तिच्यातले त्राण गेले कि कचऱ्यात फेकून देतील ही गिधाड…एकच भीक द्या…मला माझी पोरगी द्या…
देवश्रीची नजर तिच्या हातातल्या एका लिफाफ्याकडे गेली…देवश्रीने तो लिफाफा तिच्या हातातून घेतला आणि त्यातून काही फोटो पडले…कदाचित ते सगळे फोटो त्याच नराधमांचे असतील म्हणून देवश्रीने मनात एकच निश्चय केला कि काहीही करून त्या नटीच्या मुलीला वाचवले पाहिजे…आणि आपण तिला मदत करू असे आश्वासन देवश्रीने त्या नटीला दिले म्हणून एक समाधान त्या नटीच्या डोळ्यात दिसलं…आणि लगेच देवश्री बोलणार तेवढ्यात तिथून पसार झाली…देवश्री घरी उशिरा येणार म्हणून अरुण ने आधीच पार्सल घेऊन ठेवले होते…पण खूपच खिन्न मनाने देवश्री घरी पोहोचली पण…काय झालं ? हे अरुण ला न सांगताच ती फक्त पडली…झोप काही येईना मग मदत तर करायची पण अरुणला कळता कामा नये असं विचारचक्र देवश्रीच्या मनात चालूच होत…मग देवश्रीला एक कल्पना सुचली…
सकाळी लवकर उठून सगळं आवरून देवश्री ते पत्र आणि लिफाफा घेऊन तातडीने पोलीस चौकीत निघाली…कुणाशीही न बोलता निघाली म्हणून अरुणला संशय आला मग त्यानेही मागे मागे जाण्याचे ठरवले मग पोहोचल्यानंतर देवश्रीला संशय आला की आपला कुणी पाठलाग करतंय आणि नंतर समजले कि अरूणच पाठलाग करतोय..मग तिथल्या पोलिसांना देवश्रीने लिफाफा आणि पत्र दाखवले..तर काही चौकशी केल्यानंतर कळले कि एका मुलीला घेऊन काही लोक गोव्याच्या दिशेने निघाले…मग पोलिसांनी सापळा रचला…गोवा पोलीस चौकीत कळवले आणि मग गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्या गाडयांची,रेल्वे,बस,विमान याची कसून तपासणी केली आणि संबंधित लोकांचे छायाचित्र प्रसारमाध्यमांकडे सुपूर्त केल्याने आरोपीपर्यंत पोचायला जास्त वेळ लागला नाही दोन दिवसातच आरोपीना जेरबंद करण्यात आले..आणि देवश्रीला तपास पूर्ण केल्याचे कळवण्यात आले मग देवश्रीच्या आनंदाला पारावार उरला नाही..देवश्रीने घाई घाईने अरुणला सांगितले…पण अरुण मात्र न ऐकल्यासारखे करत होता…मग देवश्री बोलली,

देवश्री – अरुण…मला माफ कर..मी तुला याबद्दल कल्पना द्यायला पाहिजे होती पण माझा नाईलाज होता रे..तुलाजर सांगितलं असतं तर खूप कॉम्प्लिकेटेड होऊन बसलं असतं सगळं म्हणून नाही सांगितलं सो…सॉरी..[काकुळतीला येऊन देवश्री म्हणत होती]

अरुण – ठीक आहे ..उद्या मी येतो तुझ्या बरोबर पोलीस स्टेशनला..आणि त्या मुलीला तिच्या आईपर्यंत पोचूयात..

देवश्री – हो चालेन…आणि मला ही त्यांना भेटता येईल…
दुसऱ्या दिवशी त्याच स्टेशन वर तीच नटी दोघांनाही दिसली आणि नंतर दोघेही तिला घेऊन पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे लेडी कॉन्स्टेबलच्या ताब्यात असलेली ती चिमुकली दिसली…आईला पाहताच ती आईच्या छातीशी बिलगली आणि आईही आपल्या लेकराचे पापे घेऊ लागली…मग देवश्रीला ते दृश्य पाहून खूप गहिवरून आलं..आणि मुलीच्या संभाषणावरून असे समजले कि…’तिचे अवयव काढून घेऊन बाजारात विकणार होते आणि तिला मारून टाकणार होते..’ खूपच हृदय पिळवटून टाकणारी ती घटना होती म्हणून दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये अगदी पहिल्याच पानावर देवश्रीचे नाव आणि तिने एका अनोळखी बाईला केलेली मदत याचे वर्णन आले…आणि मग अरुणला स्वतःवर खूप वाईट वाटू लागले कारण स्वतः देवश्रीने स्वीकारलेल्या आश्वासनावर आपण तोंडसुख घेत होतो आपली बायको घरातल्यांची आश्वासन पाळतेच त्याचबरोबर इतरांचीही आश्वासन पाळतेच म्हणून आज सगळं जग देवश्रीचं नाव काढतंय याबद्दल अरुणच मन खूप गर्वाने भरून आलं.
नटीसारख्या कित्येक बायका अजूनही समाजात वावरताना दिसतात त्यांनाही असं जबरदस्तीने आपला धंदा नाईलाजाने स्वीकारावा लागतो आणि त्या परिस्थितीमुळे करतातही…पण आपल्या मुलीनेही तसाच धंदा करू नये असं खूप कमी जणींना वाटत आणि जर त्यांना यातून बाहेर पडाव असं वाटतंय तर त्यांनाही संधी द्यायला पाहिजे आपल्यासारख्या पांढरपेशी समाजानं यातच समाजहित आहे…

तात्पर्य – जर कुणी आपल्याकडून मदतीची अपेक्षा ठेवत असेल आणि आपण त्याला तसं वचन किंवा आश्वासन देऊ केलंय तर ते आश्वासन पाळलं गेलच पाहिजे मग तो नातेवाईक असो,कुणी शेजारी असो किंवा मगकुणी गरजवंत असो आश्वासन पाळली गेलीच पाहिजे.

Leave a Comment

0/5

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.