
वसुधाला आपल्या माहेरी येऊन जवळ-जवळ ९ महिने होत आलेले असतात..वीरेनशी लग्न होऊन फक्त एक ते दिड वर्षच झालेलं असत…वसुधा एकत्र कुटुंबात वाढलेली मुलगी नसते…वसुधाच्या माहेरीही आर्थिक चनचन असे…म्हणून दिड वर्ष वसुधा सासरी कसे-बसे काढलेले असतात…लग्नाआधी लांबसडक केस, रंगाने गोरी, आपल्या उंच आणि मध्यम बांध्याने अगदी खुलून दिसत असे, वय वर्ष जेमतेम २३ असेल…त्यात वसुधा खूपच लवकर नोकरीला लागली असल्याने…आपल्या आवडी-निवडीच्या वस्तू, कपडे, खाण्याचे चोचले असं आरामात आपल्या पगारात भागवत असे…आई-वडिलांनीचीही लाडकी असल्याने वडीलही न मागता आपल्या लेकीचे लाड-कोड पुरवत असे. म्हणून वसुधा अगदी पार्लर ची हौसही भागवत असे…पार्लर मध्ये जाऊन चेहऱ्याची काळजी घेणं, मॅनिक्यूर, पेडिक्यूर, नेलं आर्ट अशा हौशीच्या गोष्टी वसुधा करत असे. वसुधा आपल्या सासरी गेल्यावर मात्र या सगळ्या सुखापासून अलिप्त राहू लागते अथवा सासरी परिस्थिती काटकसरी असल्याने सासरी पार्लर चे शोक करणं वसुधाला जमलं नाही…
त्यात सासूने घरात डांबून ठेवलं होत. वसुधाला कुठेही बाहेर जायची मुभा नव्हती. सासूबाईंना जेव्हा स्वतःच्या आयब्रोज करायच्या असतात तेव्हा त्या घरीच पार्लर वालीला बोलवत आणि तेव्हाच वसुधा ही करत. पण सासूबाईंचा कटाक्ष असायचा कि मी फक्त आयब्रोज करायला बोलावलं आहे त्यामुळे आयब्रोज सोडून दुसरं काहीही करायचं नाही. जणू काही सासूबाईंची इच्छाच होती कि सून आपली सुंदर दिसता कामा नये आणि मुलगा आपला तिच्यावर भाळता काम नये. एक्दाकी मुलगा सुनेचा झाला कि माझं राज्य संपुष्टात येईल.
वीरेन वसुधाला पाहण्यासाठी म्हणून आला खरा …लगेच पाहताचक्षणी होकार आल्याने वसुधालाही आनंदाला पारावार उरला नव्हता…आपण किती सुंदर होतो ही गोष्ट लग्न झाल्यावर सारखी वसुधाला खात असे. म्हणून तिची सारखी चीड-चीड होत असे…सारखं-सारखं आपले कॉलेज मधले फोटोज पाहत बसणे हा वसुधाचा जणू छंदच झाला होता…तेव्हा आपण कसे दिसत होतो आणि आता कसे दिसू लागलोय याचं खूप वाईट वाटत होतं…म्हणून खूपच एकाकीपणा वाढला होता…
माहेरी नऊ महिने असूनही एकदाही आपल्या नवऱ्याशी वसुधाला बोलावंसं वाटत नव्हतं… याचं कारण अगदी स्पष्ट होतं…कारण बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा वीरेन वसुधावर भाळला होता…पण लग्नानंतर काही महिन्यातच त्याला ती नकोशी वाटू लागली…घराच्या जबाबदाऱ्या वसुधा पेलवत असताना स्वतःचा विसर पडू लागला होता…म्हणून मनावर धूळ साचत चालली होती. ऐन २० वयात ४० वय असल्यासारखी दिसत होती…वाढलेल्या भुवया…कंडिशनर नसल्याने पिंजारलेले केस…म्हणून वयस्कर दिसू लागली होती…एक दिवस खूप हिम्मत करून वसुधाला आपल्या नवऱ्याला जाब विचारावंस वाटलं…खूपच भीत-भीतच वसुधाने मोबाईल उचलला आणि वीरेनला कॉल केला.
वसुधा – हॅलो…वीरेन…वसुधा बोलतीय…
वीरेन – आवाज विसरलो नाही तुझा…लक्षात आहे माझ्या…
वसुधा – तुला…एकदाही मला कॉल करावासा वाटला नाही??…
वीरेन – तुही कॉल करू शकली असतीस मला..
वसुधा – वीरेन…तू अजूनही असा विचार का करतोस…माझ्या याच चेहऱ्याला तू पाहायला आलास तेव्हा भाळला होता…पण तोच चेहरा सांभाळू नाही शकलास तू…बरोबर आहे…सगळे पुरुष सारखेच असतात…एकदा का शरीर सुख मिळालं की…बाई म्हणजे कचऱ्याची पेटीच असते तुमच्यासाठी…
वीरेन – तुला मी कचरा पेटीत टाकलं नाहीय…तुझी तूच गेलीय…ते पण तुला समजुतीच्या गोष्टी सांगितल्या मी, तुला त्या का नाही पटल्या…ते तुझं तुलाच माहिती…
वसुधा – पण कशा गोष्टी सांगत होतास तू…घरात राहणारी माणसं हाताच्या बोटावर मोजण्याइतके…पण त्या सगळ्यांना…मी समजून घेण्यात कुठेच कमी पडले नाही…फक्त सगळं करता-करता मी स्वतःला वेळ देऊ शकले नाही त्यात सर्वस्वी माझी चूक नाहीय…
वीरेन – मग चूक कुणाची आहे..असं तुला वाटतं ..?
वसुधा – आपली आर्थिक परिस्थिती चांगली असूनसुद्धा…मी माझे लाडकोड पुरवू शकत नाही…आईकडे परिस्थिती वेगळी नाहीय पण तिथे सगळं करण्याची मला मुभा होती…तू मला तितकी मोकळीक देऊ शकत नाहीय…जर ती मोकळीक तू देऊ केलीस तर सांभाळता येईल असं मी म्हणेल…
वीरेन – वसुधा…आपलं या बाबतीत एकमत कधीच होऊ शकत नाही…कारण आहे त्या परिस्थितीत मॅनेज करणं ही सुद्धा एक कलाच असते…ती कला तुला अवगत नाहीय..
वसुधा काहीही ऐकून न घेता फोन ठेऊन देते आणि परत आपल्याच विचारात गढून जाते…काही वेळातच वसुधाची जिवलग मैत्रीण गायत्री येते…गायत्रीला येताच वसुधा आपला मुड बदलते आणि गायत्रीची विचारपूस करते…
वसुधा – गायत्री…किती दिवसांनी आलीस ग…
गायत्री – हो अगं…काकूने मुद्दाम मला तुला भेटण्यासाठी बोलावून घेतलंय..
वसुधा – ओह्ह…आईने बोलावलंय…तुही तसंच कर…मी बोलावलंय म्हणून कधीच येऊ नकोस…आईसाठी ये..
गायत्री – अगं असं…काय बोलतेस…तुझ्याच तर साठी आलीय मी..बोल काय म्हणतेस…
वसुधाने सगळी परिस्थिती जशीच्या तशी सांगितली….गायत्री एक ब्युटिशिअन असल्याने वसुधाला पटकन उपाय सुचवू शकली…
“वसुधा…चेहऱ्यावर कुणीही भाळू शकतं…पण तोच चेहरा सांभाळणं आपल्याच हातात असतं…आपल्या म्हण्यापेक्षा एका बाईच्याच हातात असत…एक उदाहरण सांगते..लहान मुलं असतं…ते चिखल-मातीत लोळतं…घाण करतं…मग दुसरी लोक त्या मुलाकडे पाहताना विचार करतात अरे याला कसं आपण घेऊ शकतो…केवढं गबाळ झालंय…काही वेळाने त्याची आईच त्याला अंघोळ घालून…न्हाऊ माखू घालून बाहेर आणते तेव्हा तेच मुलं सगळेजण हातात घेतात…त्याला आंजारतात-गोंजारतात…मग आपल्या बायकांचंही असंच आहे…जोपर्यंत आहे ना नवरा तोपर्यंत सज ना त्याच्यासाठी…आणि हेच तर वय आहे तुझं…”
वसुधा – चेहऱ्याचं सोड…मनाचं काय…एवढा निष्ठुर असेल असं नव्हतं वाटलं मला…या दिड वर्षात त्याला असं एकदाही वाटलं नाही माझ्याबद्दल…
गायत्री – वसुधा…आज तुला माझं ऐकावंच लागेल..हे सगळं इमोशनल ब्लॅकमेलिंग सोड…उद्या आपण तुझा मेकओव्हर करूयात…पुढचं मी तुला उद्याच सांगेन…
गायत्रीने सांगितल्याप्रमाणे…वसुधा सुंदर साडी नसते…गळ्यात एक मस्त सुंदर मंगळसूत्र, लांब केस मोकळे सोडते…मस्त अशी आवरून बाहेर पडते…दोघीही मैत्रिणी बाहेर पडतात.
गायत्री वसुधाला न सांगता परस्पर वीरेनला कॉल करून बोलावून घेते तेही वसुधाची तब्येत फार बिघडलंयअसं सांगते….कालचं बोलणं खूप मनावर घेतलंय असा सिन तयार करते …वीरेनही काळजीपोटी येतो….समोर वसुधाला पाहताच…त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही…वसुधा इतकी सुंदर दिसत असते की वीरेन फक्त वसुधाकडेच पाहत राहतो…वसुधा मात्र वीरेनकडे पाहून न पाहिल्याचं भासवते आणि आपली मैत्रीण गायत्रीला म्हणते…
”एखाद्याच्या रूपावर भाळणं खूप सोपं असतं…पण तेच रूप सांभाळणं खूप अवघड असतं…लग्न, प्रेम या दोन गोष्टीत एकच क्षण फक्त भाळण्याचा असतो. तो म्हणजे कुणी रूपावर भाळतं, कुणी मनावर भाळतं, तर कुणी कुणाच्या बोलण्यावर भाळतं….भाळण्याचे प्रकार कितीही असोत पण एकदाच भाळतात…..पण त्यानंतर मात्र सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं…तेपण एकमेकांना सांभाळणं…”
वसुधाच्या या बोलण्यावर वीरेन अवाक होऊन फक्त तिच्याकडे पाहतच राहतो…वीरेनचे शब्दच जणू गायब होतात…कॉफी घेऊन औपचारिक बोलणे करून वीरेन तिथून निघून जातो. काही दिवसातच वसुधा परत जॉब शोधते आणि तिला जॉब मिळूनही जातो. वसुधा परत नोकरीवर रुजू होते. हळू हळू वसुधा आपल्या नोकरीतल्या सहकाऱ्यांसोबत चांगली रुळते. त्यांच्या सोबत बाहेर जाणं, कुणाकडून एखादी छोटीसी आनंदाची बातमी असो व काहीही…. सगळेजण स्पेशल ओकेजनचं निमित्त साधून पार्टी करत. मग ती छोटी आईस्क्रिम पार्टी का असेना.
वसुधा आपलं आयुष्य पुन्हा एकदा जगायला शिकली होती. लग्नानंतर जवळ जवळ एक ते दिढ वर्ष वसुधा घरातच डांबून होती. वीरेनही आईचं ऐकून वसुधाला कधीच कुठे बाहेर घेऊन नाही जायचा. बस्स सकाळ ते संध्याकाळ फक्त घरातली कामं करायची….घरात टीव्ही वर एखादी आवडीची सिरीयल बघायचिही मुभा नसायची वसुधाला. त्यामुळे आता नवऱ्यासोबत राहत नसल्याचा तिळमात्र पश्चाताप नव्हता वसुधाला.
एक दिवस वीरेनला बाजारात त्याचा शाळेचा मित्र भेटला. गेले १० वर्षे तो अमेरिकेला सेटल्ड होता. १० वर्षांनी वीरेन आणि त्याची अचानक भेट होते. बराच वेळ बोलणं झाल्यावर मित्राने वीरेनला घरी यायचा खूप आग्रह केला. मित्राच्या मुलीच्या वाढदिवसाचं निमित्त साधून वीरेन त्याच्या घरी जातो. तिकडे गेल्यावर मित्र वीरेनला त्याच्या बायकोची भेट घालून देतो. मित्राच्या बायकोला बघून वीरेन अवाक होतो. तिच्या चेहऱ्यावर खूप साऱ्या टाक्यांचे निशाण असतात.
मित्र चेष्टा करतच – “अरे असं अवाक होऊन नको बघू माझ्या बायकोला…नजर लागेल तिला… अरे त्याचं काय झालं अमेरिकेत असताना हिचा एकदा ऍक्सिडेंट झाला आणि त्यात तिचा चेहरा खूप डॅमेज झाला होता. देवाची कृपा कि हिचा जीव वाचला….नाहीतर हिला काही झालं असतं तर माझं काय असतं काय माहित….जीव कि प्राण आहे माझी बायको माझ्यासाठी ….बरं तू एकटाच आला…वहिनींना नाही घेऊन आला…अमेरिकेत असल्यामुळे लग्नाला तर येता नाही आलं तुझ्या….पण लग्नाचे फोटो पाहिले तुझे फेसबुक वर….जोडी खूप सुंदर आहे हा”
मित्राची बायको – “हो भाऊजी….खूप सुंदर आहेत हा वहिनी….पुढल्या वेळी त्यांना घेऊन या नक्की….”
मित्र – “अरे विऱ्या पुढच्या महिन्यात आम्ही शिमलाला जाणार आहोत फिरायला….तू पण चल कि वहिनींना घेऊन….एकाला दोघे असले कि काही औरच मज्जा असते. “
काही वेळात वीरेनने मित्राकडून निरोप घेतला. कोण कुठला मित्र पण वीरेनच्या आयुष्यात एक ग्रीन सिग्नल घेऊन आला होता. आज पहिल्यांदा घरी गेल्यावर
वसुधाशिवाय वीरेनला घर खायला उठलं होतं. त्यालाही कळून चुकलं होतं कि त्याने आईचं ऐकून स्वतःचा संसार थाटण्यापेक्षा मोडकळीलाच जास्त नेला होता. काय हवं होतं वसुधाला….फक्त थोडीशी मोकळीकच ना? आपणही आपली बायको म्हणून वसुधाला कुठे मिरवलं नाही. का तर ती लग्नानंतर काही महिन्यातच खंगल्यासारखी झाली होती. पण ती तशी का झाली होती ह्याचा मात्र तिळमात्र विचारही आपल्या मनात नाही आला. वसुधाच्या ही बायको म्हणून काही अपेक्षा होत्या आपल्याकडून पण आपण फक्त तिला मोलकरीण म्हणून राबवून घेतलं.
दुसऱ्याच दिवशी वीरेन वसुधाला घ्यायला थेट तिच्या माहेरी पोहोचला तेही आईला न सांगता. वीरेनला पाहून वसुधाही अवाकच होते.
वसुधा – “बाबा ह्यांना तुम्ही बोलावलात का इथे? मी तुम्हाला माझी शपथ दिली होती ना कि जोवर ह्यांच्याकडून काही होकार येत नाही तोवर तुम्ही फोन करायचा नाही ह्यांना….मग तुम्ही का माझी शपथ मोडली ? का तुम्ही ह्यांना कॉल करून बोलावून घेतलं?”
वसुधाचे वडील – “मी नाही बोलावलं बेटा जावईबापूना….ते आज स्वतःच्या मनानेच आले आहेत इथे…”
वीरेन – “हो वसुधा मी स्वतःच आलो इकडे….प्लिज खूप झाला आता दोघांचाही अटीट्युड….घरी चल ना”
वसुधा – “का? मी तुमची कट्पुतळी आहे का कि जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा घरी येऊ? आणि घरी येऊन काय करू? परत तुम्ही मला घरात डांबून ठेवाल…आणि परत मी खंगल्यासारखी झाले कि परत तुम्हाला नकोशी वाटणार….मग मी मात्र कुढत दिवस काढायचे….मला आता त्या सगळ्याची खूप भीती वाटते…. “
वीरेन – “आता असं नाही होणार वसुधा…मला कळून चुकलं कि बायको शिवाय आयुष्य नाही…बायको आपल्या आयुष्यात आल्या नंतर नवऱ्याची काळजी घेऊन ….त्याला बाळासारखं जपून त्याचे सगळे लाड कोड पुरवते आणि त्याचं आयुष्य सुंदर बनवते पण नवरा मात्र तिळमात्रही तिचा विचार नाही करत. .मला माफ कर वसुधा….मी लग्नानंतरचे तुझे २ वर्षे वाया घालवले”
वीरेनने खूप मनवल्यावर वसुधा तयार झाली.
“ठीक आहे मी येते…पण माझी एक अट आहे….मी माझा जॉब कंटिन्यू ठेवणार….मी घरातली सगळी कामं करेन पण मला माझे ८ तास पाहिजे जिथे मी मनसोक्त जगू शकेन “
वीरेन – “ठरलं तर …माझी काहीच हरकत नाही….”
वसुधा – “आणि आईचं काय मग….त्या तर जॉब नाही करून देणार मला”
वीरेन – “तिची काळजी नको करू…तिला मी हॅन्डल करेन…तू चल फक्त”
मागची कुठलीच अढी मनात न ठेवता वीरेन वसुधाला आपल्या घरी घेऊन जातो. वसुधाची सासू ती सासूच होती. ती काही सुधारली नाही….पण घरातल्या आधीच्या आणि आताच्या वातावरणात खूप फरक पडला होता. आणि तो फरक फक्त नवऱ्याच्या साथ आणि सोबती मुळे शक्य झाला होता. सासूने कितीही कितीही नाही म्हटलं तरी तिला न जुमानता वीरेन वसुधासोबत आता बाहेर भटकायला शिकला होता. महिन्याभरात दोघेही शिमलाची तिकिटे बुक करून शिमलाला पलायन केलं.
सासूला ज्याची भीती होती शेवटी तेच झालं. वीरेन वसुधाचा झाला. पण वसुधा आधीही तशीच होती आणि आताही. ती आताही सासूंना मन सन्मान द्यायला विसरायची नाही. घरातली सगळी कामं आधीसारखी तीच करायची पण तरीही तिच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज आलं होतं आणि ती दिवसेंदिवस अजून सुंदर दिसायला लागली होती. मनातल्या सुंदरते बरोबरच तिचं बाह्य सौन्दर्य हि खुललं होत.
सासू मात्र अजूनही वीरेनच्या त्या मित्राला शिव्या देते ….
“जळलं मेलं लक्षण….कुठून उगवला काय माहित तो वीरेनचा नालायक मित्र…स्वतः तर बिघडलाच होता…माझ्या पोराला पण बिगडवलं”
==================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा
Post navigation

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.