Skip to content Skip to sidebar Skip to footer

हम गया नाही, हम जिंदा है – श्री स्वामी समर्थ आख्यायिका

सगुण स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज (swami samarth)

‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ‘ असे वाक्य ऐकले तर आपल्याला कुणाची आठवण होते तर… ‘श्री स्वामी समर्थ महाराजांची.’ स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात श्री गुरुदेव दत्तांचा अवतार श्री दत्त म्हणजे साक्षात तीन त्रिगुणांचा संगम साक्षात ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांचे अस्तित्व अजूनही चराचरात सामावलेलं आहे याचा अर्थ असा की अजूनही आपल्यात सत्व,रज आणि तमो गुणांचा वावर आहे. स्वामी समर्थ महाराजांचा कार्यकाळ हा १८५६ ते १८७८ या दरम्यान होऊन गेला. इ.सन १९ व्या  शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील एक संत म्हणून स्वामी समर्थांचा लौकिक आहे.

त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे फार काळ समर्थांचे वास्तव्य होते. आंध्रप्रदेशातल्या शैलम क्षेत्राजवळील कर्दळी वनांमधून स्वामी समर्थ प्रकट झाले होते. स्वामी समर्थ महाराज हे  श्री नरसिंह सरस्वस्ती यांच्यानंतरचे भगवान श्री गुरुदेव दत्तात्रयांचे तिसरे अवतार समजले जातात. गाणगापूरचे श्री नुरसिंह सरस्वस्ती हेच स्वामी समर्थ महाराज यांच्या रूपात प्रकट झाले असे म्हणतात. कारण ‘ मी नुरसिंहभान असून शैलम जवळील कर्दळी वनातून आलोय ‘ हे स्वामींचे उदगार याची साक्ष देतात.

स्वामी समर्थांची प्रकट होण्याआधीची आख्यायिकाही सांगितली गेली आहे. इ सन १४५९ मध्ये ते माघ वद्य १,शके १३८० या दिवशी नृसिंह सरस्वस्ती स्वामी यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले याच वनात ३०० वर्ष नृसिंह सरस्वस्ती स्वामी यांनी ३०० वर्ष कठोर अशी तपश्चर्या केली या ३०० वर्षात ते जिथे तपासाठी बसलेले होते त्याठिकाणी अनेक मुंग्यांनी स्वामींवर वारूळ केले.

त्यानंतर काही दिवसांनी उद्धव नावाचा लाकूड तोड्या लाकडे तोडण्याच्या निमित्ताने आला तर आपली कुऱ्हाड  त्या वारुळावरती उद्धव कडून निसटून पडली.कुऱ्हाड वारुळावर पडताच रक्ताची धार वारुळामधून वाहू लागली.उद्धवच्या निमित्ताने स्वामींना भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचेच होते म्हणून त्या वारुळामधून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला आणि उध्दवासमोर एक तेजस्वी मूर्ती प्रकट झाली तीच दिव्य मूर्ती म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज म्हणून पुढे प्रसिद्धीस आले.

सोलापूर जिल्यातील अक्कलकोट हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. स्वामी समर्थ यांचे मंदिर या ठिकाणी आहे. अक्कलकोट शहर कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असल्याने कन्नड आणि मराठी अशा दोन्ही भाषा या ठिकाणी बोलल्या जातात.ब्रिटिश राजवटीत अक्कलकोट हे राजेशाही भोसले घराण्याचे राज्य होते. गोगाव येथे असलेले स्वामींचे मंदिर (akkalkot temple) प्रसिद्ध आहे . हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आजही येथे आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून अक्कलकोट येथल्या प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांची आपण माहिती घेऊयात.

या परिसरात प्रवेश करताच क्षणी मन स्वामी चरणी गुंतून जाते.असे म्हणतात स्वामींनी अनेक लीला याच वटवृक्ष मंदिर ठिकाणी केलेल्या आहेत . याच परिसरात वटवृक्षाखाली एका छोट्याशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत.त्याला कान लावताच अनेक वाद्यांचा आवाज येतो असे अनेक भक्तांचे म्हणे आहे.स्वामींचा वावर अक्कलकोटच्या दोन ठिकाणांतच जास्त होता एक म्हणजे आपला शिष्य चोळप्पा आणि हेच ते वटवृक्ष. वटवृक्ष मंदिरात रोज सकाळी अभिषेक,रुद्रपठण चालते. येथे अनेक जुने फोटोही लावलेले आहेत.त्रिकाल आरती,कीर्तन आणि प्रवचणेही इथे चालतात.                      

वटवृक्ष मंदिरात गेल्यावर स्वामींची शांत मूर्ती पाहून भान विसरायला होते.कुठलाही मनुष्य स्वामींच्या मंदिरात जाताच त्याच अहंकार,राग,मत्सर ,द्वेष,लोभ,दंभ,संशय,चिंता सगळं काही आपसूकच गळून  पडत. माणसाचं सोडा पण मस्तीखोर लहान मुलगा जरी असला तरी स्वामींच्या गाभाऱ्यात गेला कि तो आपसूकच शांत होतो.इतकं सामर्थ्य स्वामींच्या मूर्तीमध्ये आहे.

चारधाम यात्रेचे अनन्यसाधारण महत्व आणि चारधाम यात्रेची पूर्वतयारी

जाणून घ्या महाराष्ट्रातील देवींचे साडेतीन शक्तिपीठे आणि त्यांचा इतिहास

धारवाड जिल्ह्यातील श्रीमंत सराफ बाळाप्पा वयाच्या ३० व्या वर्षी गुरु शोधार्थ संसाराचा त्याग करून अक्कलकोटला निघून आले.स्वामींचा अनुग्रह घेऊन मग बाळाप्पा यांनी स्वामींच्या आत्मलिंग पादुका घेऊन स्वामींच्या सांगण्यावरून उत्तम असा मठ स्थापन केला.अगदी त्यानुसारच बाळाप्पा यांनी मठ स्थापन केला. या मठात समर्थांचा दंड,छाटी,कंठमणी आणि माळ इत्यादी पवित्र वस्तू ठेवल्या आहेत.या मठात गुरुपौर्णिमा,दत्तजयंती,स्वामी जयंती हे अगदी उत्साहात साजरे केले जातात.

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर माहिती व इतिहास

जाणून घ्या सप्तशृंगी मातेच्या मुखात पानाचा विडा का ठेवला जातो

श्रींनि अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली बराच काळ घालवला त्या वटवृक्षाखालीच श्रींचे शिष्य जोतिबा पांडे यांनी स्वतःचे घरदार विकून,जमीनजुमला विकून मंदिर बांधले तेच हे मंदिर म्हणजेच आपण वटवृक्ष संस्थान मठ असे त्याला म्हणतो. एक दिवस त्यांचे शिष्य जोतिबा पांडे यांनी स्वामींना विचारले असता ” माझे कसे होईल ” त्यावर स्वामी म्हणाले ” तुम्ही वादाच्या पारंब्या धरून बसा.मी सदैव वटवृक्षाखाली आहे.माझे स्मरण करताच तुमच्या सानिध्य आहे ” आजही मंदिराच्या समोर सभागृहात श्रींची मूर्ती असून त्यांचे शिष्य जोतिबा यांची उभी मूर्ती आहे.आजही या मंदिरात आलेल्या भाविकांची पूजा,भोजनाची व्यवस्था आणि खोल्या या संस्थानातर्फे पुरवण्यात येतात.

स्वामींनी ज्यांच्या घरी बरेच काळ वात्सव्य केले त्या भक्त आणि शिष्य असलेल्या चोळप्पाच्या इच्छेप्रमाणे श्रींची संधी या मठात आहे .चोळप्पाच्या घराजवळ समाधी मंदिर असून त्यात श्रींनी दिलेल्या पादुका आहेत.पुढे अक्कलकोटचे संस्थापक आणि प्रशासक विंचूरकर जेव्हा श्वेतकुष्ठ झाल्यावर दर्शनास आले तेव्हा त्यांनी हिऱ्याची  अंगठी श्रींना अर्पण केली ती अंगठी विकून चोळाप्पाने या पैशांमधून हा मठ बांधला.

अक्कलकोटचे प्रशासक चिंतोपंत टोळ हा इरोज नियमाने श्रींच्या चरणी तुळसीपत्रक वाहत.या नियमात खंड पडू नये म्हणून अंतर्ज्ञानी असलेल्या श्रींनी आपली पाऊले या पाटावर उमटवली त्यांनी त्या पादुकांवर तुळसीपत्रक वाहून आयुष्यभर श्रींची सेवा केली तोच श्रींचा पाट या जोशीमठात अजूनही आहे.

हैद्राबाद शहरातील गजान्तलक्ष्मीचे जहागीरदार शंकरराव राजे रायन यांचा क्षय व ब्रह्मसंबंध बाधा श्रींनी बरी केल्याने त्यांनी श्रींच्या आज्ञेनुसार तीस हजार रुपये खर्चून हा श्रींच्या पादुकांचा मठ स्थापन केला. जुन्या राजवाड्याजवळ हा मठ आहे.

( आरती क्रमांक १ )

जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था।

आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा।।धृ।।

छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी, राया अवतरलासी।

जग्दउध्दारासाठी राया तु फिरसी।

भक्तवत्सल खरा तु एक होसी,

राया एक होसी।

म्हणुनी शरण आलो तव चरणासी।

जय देव, जय देव०॥१॥

त्रैगुण-परब्रम्ह तुझा अवतार,

तुझा अवतार।

त्याची काय वर्णु लिला पामर।

शेशादिक क्षीणले नलगे त्या पार,

नलगे त्या पार।

तेथे जडमुढ कैसा करु मी विस्तार।

जय देव, जय देव०॥२॥

देवाधिदेवा तु स्वामी राया,

तु स्वामी राया।

निरजर मुनीजन ध्याती भावे तव पाया।

तुझसी अर्पण केली आपुली ही काया,

आपुली ही काया।

शरणागता तारी तु स्वामी राया।

जय देव, जय देव०॥३॥

अघटीत लिला करुनी जडमुढ उध्दारिले,

जडमुढ उध्दारिले।

किर्ती एकूनी कानी चरणी मी लोळे।

चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले,

मज हे अनुभवले।

तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे। जय देव, जय देव०॥४॥

(आरती क्रमांक २)

जय जय सद्-गुरु स्वामी समर्था,

आरती करु गुरुवर्या रे।

अगाध महिमा तव चरणांचा,

वर्णाया मति दे यारे॥धृ॥

अक्कलकोटी वास करुनिया,

दाविली अघटित चर्या रे।

लीलापाशे बध्द करुनिया,

तोडिले भवभया रे॥१॥

यवन पूछिले स्वामी कहाॅ  है,

अक्कलकोटी पहा रे।

समाधी सुख ते भोगुन बोले,

धन्य स्वामीवर्या रे॥२॥

जाणिसे मनीचे सर्व समर्था,

विनवू किती भव हरा रे।

इतुके देई दीनदयाळा, नच तव पद अंतरा रे॥३॥

==================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.