जाणून घ्या आपल्या यशाने स्वतःचे नव्हे तर इतरांचे जीवन उत्कृष्ठ बनवणाऱ्या सुधा मूर्ती यांचे जीवनचरित्र | sudha murthy information in marathi

सुद्धा मूर्तींबद्दल माहिती | sudha murthy information in marathi
sudha murthy information in marathi: सामाजिक कार्यकर्त्या,लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या निर्मात्या तसेच विष्वस्थ म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या यशस्वी उद्योजिका म्हणजे …..
एक स्त्री काय नाही करू शकत ?? सगळेच करू शकते. मग ती अडाणी असो किंवा शिकलेली, कोणतीच गोष्ट स्त्री साठी अशक्य नाही. एक स्त्री घर सावरू शकते, सांभाळू शकते तर मग संपूर्ण देश पण चालवूच शकते ते ही अगदी सहज. कारण घर सांभाळणं हे वरवर किरकोळ वाटत असले तरीही ते सोपे नाही. जेंव्हा घरातील स्त्री काही कारणाने घराबाहेर रहाते तेंव्हाच तिची किंमत घराला, घरातील लोकांना समजते.
आपल्या भारत देशात अशा कितीतरी कर्तबगार महिला होऊन गेल्या आहेत ज्यांनी फक्त घर, नोकरी नव्हे तर पूर्ण देश सांभाळून दाखवला तो ही तितक्याच कर्तबगारीने. आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सरोजिनी नायडू, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ अशी एक ना अनेक कितीतरी नावे घेता येतील, ज्यांनी आपल्या कर्तबगारीने देश एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. अशा महिलांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे.
आज अशाच एका कर्तबगार, हुशार, उच्चशिक्षित, अभियांत्रिकी मध्ये निपुण असणाऱ्या, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या एका महीलेबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे नाव आहे ” सुधा कुलकर्णी – मूर्ती”.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
सुधा मूर्ती यांचा जन्म कर्नाटकमधील शिरगांव गावात १० ऑगस्ट १९५० रोजी झाला. त्यांचे वडील आर. एच. कुलकर्णी हे उत्तम सर्जन होते तर आई गृहिणी होत्या. त्यांचे बालपण आई, वडील, भावंडे आणि आजी, आजोबा सोबत गेले. त्यांच्या बालपणात घेतलेले अनुभव म्हणजे माझ्या उल्लेखनीय ऐतिहासिक कामाचा आधार आहेत असे सुधा मूर्ती म्हणतात. या अनुभवांना त्यांनी “मी कशी शिकवली माझी आजी आणि इतर कथा” असे नाव दिले आहे.
सुधा मूर्ती या लहान पणापासूनच खूप हुशार होत्या. शाळा, कॉलेज मध्ये असताना त्यांनी त्यांचा पहिला नंबर कधीच सोडला नाही. त्यासाठी त्यांना बक्षिसे सुद्धा मिळाली आहेत. त्यांचे अभियांत्रिकी शिक्षण त्यांनी बी. व्ही. बी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ( आताचे KLE टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी ) येथून पूर्ण केले.
त्यातही त्यांनी पहिला क्रमांक पटकावला आणि त्यासाठी त्यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्री श्री देवराज उर्स यांच्या कडून सुवर्णपदक मिळाले. पुढे त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये एम.ई अव्वल स्थान मिळवून पूर्ण केले आणि त्यासाठी पण कॉलेज कडून त्यांना सुवर्ण पदक मिळाले.
करिअर
आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टेल्को मधून केली. टाटा इंजिनियरिंग आणि लोकोमोटीव कंपनी टेल्को येथे नियुक्त केलेल्या सुधा मूर्ती या पहिल्या महिला अभियंता ठरल्या. त्यानंतर त्या पुण्यात विकास अभियंता म्हणून रुजू झाल्या आणि परत मुंबई आणि जमशेदपूर येथे त्यांनी काम केले.
त्या दरम्यान सुधा मूर्ती यांनी कंपनीच्या अध्यक्षांना पोस्टकार्ड लिहून टेल्को कंपनीत होणाऱ्या पुरुष लैंगिक भेदभाव ची तक्रार केली आणि त्यामुळे त्यांची एक विशेष मुलाखत घेण्यात आली आणि ताबडतोब पुन्हा नोकरीवर घेण्यात आले. मला वाटतं त्या वेळी लैंगिक भेदभाववर बोलणाऱ्या सुधा मूर्ती या पहिल्याच धाडसी महिला असतील.
जाहीर मुलाखतीत असे बोलणे वाटते तितके सोपे नाही यासाठी खूप हिम्मत आणि आत्मविश्वास लागतो. जो सुधा मूर्ती यांच्याकडे होता. नंतर त्या पुण्यातील वालचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज येथे वरिष्ठ प्रणाली विश्लेषक म्हणून रुजू झाल्या.
टेल्को येथे काम करत असताना सुधा मूर्ती यांची भेट तेथेच इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या एन.आर. नारायण मूर्ती यांच्याशी झाली. भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले आणि त्यांनी विवाह झाला. १९९६ मध्ये सुधा मूर्ती यांनी इन्फोसिस फाउंडेशन सुरू केले. इन्फोसिसच्य स्टार्टअप साठी नारायण मूर्ती यांनी चालू नोकरी सोडली होती. त्या वेळी टाटा कंपनीचे संस्थापक जे.आर.डी टाटा यांच्याकडून सुधा मूर्ती यांना एक मोलाचा सल्ला मिळाला होता.
सुधा मूर्ती म्हणतात की या सल्ल्यामुळे माझे आयुष्य बदलून गेले. तो सल्ला होता, कोणीही पैशाचा मालक नाही, तू फक्त पैशाची विश्र्वस्थ आहेस आणि तो नेहमी हात बदलतो. जेंव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेंव्हा तो समाजाला परत द्या ज्याने तुम्हाला खूप सदिच्छा दिल्या आहेत. हे सुधा मूर्ती यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांनी सुरू केलेल्या इन्फोसिस फाउंडेशन मध्ये आजवर त्या इन्फोसिस विश्वस्थ या पदावर कार्यरत आहेत आणि बेंगलोर विद्यापीठाच्या पोस्ट ग्राज्युएशन सेंटरमध्ये विसितिंग पोफेसर आहेत. याशिवाय त्यांनी ख्रिस्त विद्यापीठात शिकवण्याचे काम केले आहे.
कानपूरच्या आयआयटी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग आणि नारायणराव मेलगिरी मेमोरियल नॅशनल लॉ लायब्ररी सारख्या उच्च शिक्षण संस्थेचे उद्घाटन ही इन्फोसिस फाउंडेशनने केले आहे.
हेही वाचा
आयुष्याला कलाटणी देणारी सुद्धा मूर्तींची हि पुस्तके नक्कीच वाचून बघा
रतन टाटांनी देखील अपयशातून यशाची शिखरे गाठली
पुस्तके
सुधा मूर्ती यांनी कन्नड आणि इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहलेली आहेत. डॉलर बहू ही त्यांची कादंबरी आधी कन्नड मध्ये लिहाली होती नंतर ती इंग्रजीत भाषांतरित झाली. झी टीव्ही या वाहिनीने २००१ मध्ये दूरदर्शन नाटक मालिकेत त्याचे रूपांतर पण केले होते. त्यांच्या पुस्तकात मध्ये दोन प्रवास वर्णने, दोन तांत्रिक , सहा कादंबऱ्या आणि तीन उपदेशात्मक पुस्तकांचा समावेश आहे. याशिवाय मराठी चित्रपट पितृरूप आणि कन्नड चित्रपट प्रेरणा यातही त्यांनी काम केले आहे.
सुधा मूर्ती यांना चित्रपट पाहण्याची खूप आवड आहे. एका फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या माझ्याकडे पाचशे dvd आहेत ज्या मी होम थिएटर वर पाहते. संपूर्ण चित्रपट मी पहाते, त्याचे दिग्दर्शन, संपादन आणि सगळेच पैलू पहात असते. मला चित्रपट इतके आवडतात की ३६५ दिवसात ३६५ सिनेमे मी पाहू शकते. त्यामुळे मी चित्रपट पत्रकार बनू शकले असते , कारण चित्रपट पाहण्याचा मला कधीच कंटाळा येत नाही. तरीही लोक मला लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून च ओळखतात असेही त्या गमतीने म्हणतात.
सामाजिक कार्य
- गेट्स फाउंडेशनच्या सार्वजनिक आरोग्य सेवा उपक्रमांच्या सदस्या.
- अनेक अनाथ आश्रमाची स्थापना केली आहे.
- ग्रामीण विकासात भाग घेतला तसेच कर्नाटकातील सरकारी शाळांना संगणक आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या चळवळीला पाठिंबा.
- हार्वर्ड विद्यापीठात द मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया ची स्थापना.
- कर्नाटकातील शाळांना संगणक विज्ञान शिकवण दिली.
- सूधा मूर्ती यांच्या सामाजिक कार्यात आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सार्वजनिक स्वच्छता, कला आणि संस्कृती आणि तळागाळातील गरिबी निर्मूलन यांचा समावेश आहे.
- प्रत्येक शाळेसाठी एक वाचनालय या त्यांच्या संकल्पनेमुळे आतापर्यंत 50,000 ग्रंथालयांची स्थापना झाली आहे.
- बंगळुरू शहरात 10,000 सार्वजनिक शौचालये बांधून तयार केली आणि शेकडो शौचालये बांधून ती ग्रामीण भागात स्वच्छ्ता मध्ये मदत करत आहेत.
- त्यांनी स्थापन केलेली इन्फोसिस फाऊंडेशन ही 1996 मध्ये स्थापन झालेली कंपनी सामाजिक कार्य करते त्यामुळे ती धर्मादाय ट्रस्ट आहे आणि सुधा मूर्ती तेथील विश्वस्तांपैकी एक आहेत.
- या फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पूरग्रस्त भागात 2,300 घरे बांधली आहेत.
-तमिळनाडू आणि अंदमानमधील त्सुनामी, कच्छ, गुजरातमधील भूकंप, ओरिसा, आंध्र प्रदेशमधील चक्रीवादळ आणि पूर आणि कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दुष्काळ यासारख्या राष्ट्रीय नैसर्गिक आपत्तींना हाताळले आहे.
पुरस्कार
सुधा मूर्ती यांना आजवर इतके पुरस्कार आहेत की यादी वाचून कंटाळा येईल पण पुरस्कार संपणार नाहीत.
तर आपल्या यशाने स्वतःचे नव्हे तर इतरांचे जीवन उत्कृष्ठ बनवणाऱ्या सुधा मूर्ती यांचे कार्य खूपच प्रेरणादायी आणि शिकवण देणारे आहे. मिळालेली शिकवण त्यांनी आयुष्यभर जपली आणि एक आदर्श सर्वांसमोर उभा केला. त्यांचे कार्य समाज नक्कीच लक्षात ठेवेल. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!!!
===============