आयुष्यातील अनुभवांना पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यासोबत शेअर करणाऱ्या या लेखिकेची पुस्तके एकदा तरी नक्कीच वाचा

sudha murthy books in marathi: सामाजिक कार्यकर्त्या, जगातील अभियांत्रिकी क्षेत्रातील नामांकित आणि प्रतिष्ठित इन्फोसिस फाउंडेशनच्या निर्मात्या आणि लेखिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधा कुलकर्णी – मूर्ती यांनी आजवर त्यांच्या आयुष्यातील , जगण्यातील कित्येक अनुभव शब्दात मांडले आणि पुस्तकी रूपाने प्रकाशित पण केले. आज कर्तृत्वाच्या इतक्या उंचीवर असूनही जगण्यातला साधेपणा त्यांनी आणि त्यांचे पती मिस्टर नारायण मूर्ती यांनी कधीच सोडला नाही. त्यांच्या जीवन प्रवासात असामान्य कर्तृत्व असणारी अनेक लोकं सुधा ताईंना भेटले आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. ती शिकवण त्या आजही तितक्याच निष्ठेने जपतात.
अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहेच शिवाय सामाजिक कार्यकर्त्या म्हणून, एक लेखिका म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून पण त्या तितक्याच नावारूपाला आल्या आहेत. तळागाळातील अनेक लोकांचे जीवन त्यांनी मार्गी लावले आहे. त्यासाठी अनेक चळवळीत भाग घेतला आणि त्या यशस्वी करून दाखवल्या. लोकांमधे जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करणाऱ्या सुधा ताईंनी अनेक पुस्तके लिहला आहेत.
मानवी जीवन स्वभाव, समाज व्यवस्था तसेच कौटुंबिक मूल्य यावर प्रकाश टाकणारी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
सुधा मूर्ती यांच्या पुस्तकांची नावे (sudha murthy books in marathi)
– अस्तित्व
– आजीच्या पोतडीतील गोष्टी
– आयुष्याचे धडे गिरवताना
– द ओल्ड मॅन अँड हिज गॉड (इंग्रजी)
– कल्पवृक्षाची कन्या : पुराणांतील स्त्रियांच्या अनन्यसाधारण कथा.
– गोष्टी माणसांच्या.
– जेन्टली फॉल्स द बकुला (इंग्रजी)
– डॉलर बहू (इंग्रजी)-(मराठी)
– तीन हजार टाके
– थैलीभर गोष्टी
– परिधी (कानडी
– परीघ (मराठी)
– पितृऋण
– पुण्यभूमी भारत
– बकुळ (मराठी)
– द मॅजिक ड्रम अँड द अदर फेव्हरिट स्टोरीज (इंग्रजी)
– महाश्वेता (कानडी व इंग्रजी)
– वाइज अँड अदरवाइज (इंग्रजी), (मराठी)
– सामान्यांतले असामान्य
– सुकेशिनी
– हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टु रीड अँड अदर स्टोरीज (इंग्रजी)
यातील काही पुस्तकांची ओळख करून घेऊया.
१. वाईज अँड अदरवाईज :
या पुस्तकात सुधा ताईंनी त्यांच्या जीवन प्रवासातील पन्नास अविस्मरणीय किस्से म्हणजे घटना सांगितल्या आहेत. यामुळे आयुष्यात त्यांना भेटलेली आणि असामान्य कर्तृत्व असणाऱ्या सामान्य माणसांविषयी एक वेगळीच माहिती मिळते शिवाय सुधा ताईंच्या दांडग्या अनुभवांची ओळख होते.
२. गरुडजन्माची कथा :
ब्रह्मा, विष्णू आणि महेश या शक्तिशाली देवांच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आधारलेले आहे. फेअरी टेल सारखी ही कथा वाटत असली तरी एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल. कारण यात असुर, राक्षस, राजकुमार, राजकुमारी, गर्विष्ठ राजा अशी पात्रे अनुभवायला मिळतात.
हेही वाचा
मायबोली मराठी मधून रेसिपीस चे व्हिडिओज युट्युब वर टाकून आज कमावते करोडो रुपये
३. महाश्वेता :
हे सुधा ताईंचे आवडते पुस्तक आहे. या पुस्तकातील कथानक जरी कौटुंबिक असले तरीही बरंच काही शिकवून जाणारे आहे. भयंकर आजाराने ग्रस्त असलेल्या आणि नवऱ्यापासून वेगळी झालेली नायिका मुंबईत येते आणि मिळालेल्या यशामुळे ताठ मानेने जगायला शिकते अशी कथा आहे.
४. डॉलर बहू :
प्रेम आणि विश्वासाच्या जोरावरच नाती टिकतात हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून सुधा ताईंनी केला आहे. पैशामुळे माणूस एकमेकांपासून कसा दुरावतो, नात्यात कटुता कशी येते, कुटुंब कशी तुटतात हे सगळं यातून अनुभवायला मिळेल.
५. ३००० टाके :
यातही सुधा ताईंच्या आयुष्यातील अकरा खऱ्या गोष्टी आहेत. ज्या सुधा ताईंनी इन्फोसिस मध्ये काम करताना अनुभवल्या. यात कर्नाटक मधील ३००० देवदासोंचे पुनर्वसन ( म्हणूनच पुस्तकाचे नाव ३००० टाके असेल ), इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकट्या मुलीच्या दृष्टीने आलेले अनुभव, फिल्म इंडस्ट्री अशा वेगवेगळ्या विषयांवरील छोट्या छोट्या कथा यात वाचायला मिळतील.
६. आजीच्या पोतडीतल्या गोष्टी :
या पुस्तकावरूनच पुस्तक कशावर आधारित असेल हे लक्षात येईल. हे पुस्तक सर्वांना आपल्या बालपणात घेऊन जाईल. आपण आपल्या आजी आजोबा सोबत घालवलेला काळ सगळ्यात सुंदर क्षण होता याची प्रचिती देईल हे पुस्तक. अशा वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके लिहून सुधा मूर्ती यांनी समाज विकासात एका प्रकारे हातभार लावला आहे. आलेल्या अनुभवांच्या रूपाने जगण्यास उपयोगी पडणारी शिकवण दिली आहे.
==================