Skip to content Skip to sidebar Skip to footer

सूची मुखर्जी यांची यशोगाथा | suchi mukherjee success story

suchi mukherjee success story: निराशा आणि अस्वस्थता याने ग्रासलेले असताना अचानक एक कल्पना सुचली आणि स्वतःसोबत इतरांचे ही आयुष्य बदलले या यशस्वी उद्योजिकेने….

आपण ठरवलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची ताकद आपल्यात असते. पण त्यासाठी गरज असते ती हिम्मत, जिद्द आणि धेयवेडेपणाची. आजची कोणतीही स्त्री त्यासाठी अपवाद नाही. एकदा का तिने ठरवले की काहीतरी करून दाखवायचे आहे, तर मग ती करतेच अगदी कोणत्याही परिस्थितीत.

आज अशा एका यशस्वी उद्योजिकेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या निराशेने आणि अस्वस्थ होऊन बसलेल्या असताना अचानक त्यांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी स्वतःचे आयुष्य तर बदलून टाकलेच पण समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीला ही तितकाच हातभार लावला.

असे म्हणतात ना, की काहीतरी मोठे मिळवायचे असेल तर एक छोटा विचार, कृती किंवा घटना घडन्याची गरज असते आणि बाकी सगळे आपोआप सुरळीत होत जाते. आपल्या दूर दृष्टीकोनाने आणि तीक्ष्ण नजरेने भविष्यातील गरज ओळखून एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म उभाच केला नाही तर लोकांच्या पसंतीस उतरवला त्या लाईमरोडच्या संस्थापक आणि सीईओ सूची मुखर्जी बद्दल आज आपण जाणून घेऊया.

सूची मुखर्जी यांनी अर्थशास्त्रात डिग्री मिळवली आणि इलेक्ट्रॉनिक आणि अर्थशास्त्र या विषयात लंडन स्कूल ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉलेजमध्ये मास्टर्स पूर्ण केले. मास्टर्स पूर्ण केल्यावर सूची यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. लेहमन ब्रदर्स इंक ही त्यांनी जॉईन केलेली पहिली कंपनी होती. नंतर वर्जिन मीडिया मध्ये दोन वर्षे काम केले. नंतर ईबे सोबत काम केले. अशा अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम करून आपले मोलाचे योगदान सूची यांनी दिले.

त्यानंतर त्यांना स्वतःचे काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. असे काहीतरी जे समाजाच्या गरजा पूर्ण करेल, समाजातील अंतर कमी करेल आणि लोकांच्या रोजच्या जगण्यात उपयोगी पडेल.

एकदा सूची मुखर्जी लंडन येथे अशाच अस्वस्थ आणि निराश असताना मॅगझिन वाचत होत्या. त्यांची नजर मॅगझिन वरील एका ज्वेलरी पीसवर पडली आणि ते खरेदी करायचे त्यांनी ठरवले. ती ज्वेलरी मुंबई वरील एका छोट्या दुकानातून येणार असल्याने यायला खूप वेळ लागला. त्यावेळी सूची यांच्या दोन गोष्टी लक्षात आल्या

  • एक म्हणजे असे कोणतेही कन्झ्युमर टेकनिक नाही जे अशा ॲक्सेसरिज ना मॅगझिनद्वारे लोकांना दाखवू शकेल
  • दुसरे म्हणजे असा कोणताच प्लॅटफॉर्म नाही जिथे लोक प्रॉडक्ट लिस्ट बघून जे जगातील सगळ्यात मोठ्या निर्मिती केंद्राशी निगडित असेल.

म्हणूनच त्यांना असा एक मोठा प्लॅटफॉर्म म्हणजेच मंच निर्माण करायचा होता जिथे सहज शोध घेतल्यावर दैनंदिन जीवनात लागणारी उत्पादने परवडतील अशा दरात मिळतील. त्यातच त्या स्वतः एक स्त्री असल्या कारणाने त्यांना हे चांगलेच माहीत होते की स्त्रियांना रोज वेगवेगळ्या गोष्टी आऊट ऑफ बॉक्स म्हणजेच चौकटी बाहेरच्या घेणे आवडते.

असं म्हटलं जात कि जोड्या स्वर्गात बनवल्या जातात पण ह्याने तर तब्बल लाखो जोड्या बनवल्या.

करोडो रुपयांची नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. आज नवऱ्यासोबत चालवतेय स्वतःची कंपनी

पण हे सगळं करण्यासाठी उत्पादने म्हणजे प्रॉडक्ट शोधणे ही एक मोठी समस्या होती. त्यात एक जमेची बाजु अशी होती की, भारत देश त्यावेळी जगाच्या लाईफस्टाईल उत्पादनापैकी एकवीस टक्के जास्त प्रमाणात उत्पादने निर्माण करत होता. याच संधीचा सुवर्ण फायदा सूची मुखर्जी यांनी घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांना असे सगळे वेंडर्स जे लोकांना परवडतील असे उत्पादने जास्त प्रमाणात निर्माण करतात त्या सर्वांना एका इंटरफेसच्या माध्यमातून जोडायचे होते. सगळी तयारी पूर्ण झाल्यावर त्या भारतात आल्या.

सूची मुखर्जी सर्व तयारीनिशी भारतात आल्या होत्या. भारतात आल्यावर आपल्या काही पार्टनर सोबत २०१२ मध्ये त्यांनी लाईमरोड सुरू केले. हा एक सामाजिक कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे जो आजच्या महिलांना टार्गेट करतो. यात तुम्ही फॅशनेबल स्टाईल, अक्सेसरिज बघू शकता आणि खरेदी करू शकता. या लाईमरोडची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की यातील शंभर टक्के कंटेंट हा वापरकर्ताकडून निर्माण केलेला आहे.

लाईमरोड सुरू करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. या अडचणी छोट्या असल्या तरीही त्या होत्या. सगळ्यात आधी तर असे लोक शोधणे जे आपल्या कामात अगदीच निपुण आहेत. यासाठी सूची आणि त्यांच्या टीमला खूप त्रास झाला.
या कामासाठी लागणारे हाईस्पीड इंटरनेट आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करणे.
कंपनीचे रजिस्टर करणे आणि काही कायदे विषयक गोष्टी पूर्ण करणे यासाठी खूप अडचणी आल्या होत्या.
सगळ्या अडचणींवर मात करून सूची मुखर्जी यांनी त्यांचा व्यवसाय एका वेगळ्या उंचीवर नेऊन त्यांचे स्वप्न साकार केले आहे. तसेच समाजात क्रांती घडवून आणली आहे.

लाईमरोड संस्थापक सीईओ अशी ओळख निर्माण करणाऱ्या सूची मुखर्जी यांना त्यांच्या व्यवसायाची कल्पना वयाच्या ३९ वर्षी आली होती. आज लाईमरोड डॉट कॉम ही वेबसाईट जीवनशैली सहायक उपकरण देणारी नामांकित वेबसाईट आहे.

कोणत्याही वयात व्यक्ती व्यवसायाची सुरुवात करू शकतो आणि त्यात उत्तम यश संपादन करू शकतो हेच सूची मुखर्जी यांच्या प्रवासातून शिकायला मिळते.

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.