Style with Jeans..जीन्स वरचा लुक

types of jeans fit: जीन्स हा वर्षानुवर्षे चालत आलेला असा पोशाख आहे कि जो स्त्री आणि पुरुषांमध्ये प्रचलित आहे. १८ व्या शतकात जेव्हा कॉटनच्या कपड्यांची डिमांड होती तेव्हा डेनिमचे कपडे अस्तित्वात आले आणि तेव्हापासून डेनिमने कधीच मागे वळून पाहिले नाही. डेनिम वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जसे कि डेनिम जॅकेट , डेनिम स्कर्ट , डेनिम शर्ट्स मध्येहि पाहायला मिळतो.
जीन्स हा असा एकमेव पोशाख आहे कि जो कुणावरही उठून दिसतो आणि त्यामध्ये अगदी स्मॉल साईझ पासून ते प्लस साईझ पर्यंत भरपूर विविधता आणि कलेक्शन दिसतात आणि अगदी लहान मुले, टीनएजर पासून ते मिड एज , वयस्कर लोकांपर्यंत आवडीचा आणि आरामदायक अपैरल आहे.
पुरुषांसाठी जरी जीन्स वरचे स्टाईल्स लिमिटेड असतील तरी स्त्रियांसाठी खूप ऑपशन्स उपलब्ध आहेत.
बऱ्याचदा आपण जीन्स घालतो आणि त्याला मिक्स अँड मॅच करताना आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो. कुठला टॉप कुठल्या जीन्सवर चांगला दिसतोय हे डिसाईड करणं म्हणजे एक तर टाइम कन्सूमिंग…. आपल्यापैकी कुणीही तयार होताना कपाटातून नाही ५-६ टॉप्स काढले आणि ट्राय केले असतील तर सांगा….कुठला टॉप जीन्स वर जात नाही तर कुठला कुर्ता कधी इस्त्री केलेला नसतो…. आणि हेच कन्फ्यूश़न दूर करण्यासाठी आणि तुमचा वेळ वाचवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत डिफरेन्ट स्टाईल्स इन जीन्स.
जीन्स मध्ये लो वैस्ट , हाय वैस्ट, मिडीयम वैस्ट, स्किनी फिट, लूज फिट, स्लिम फिट, पलाझो जीन्स, जॉगर जीन्स, जेगिंग्स अशा तर्हे तर्हेच्या जीन्स (types of jeans fit) बाजारात सध्या मिळतात. त्या पैकीच काही निवडक आणि ट्रेंडी जीन्स आपण बघू या.

१. लो वैस्ट आणि स्किनी फिट जीन्स :
Low waist and skinny fit jeans style
जीन्सचा हा प्रकार फार जुना आणि प्रचलित आहे. आम्ही शाळा कॉलेज मध्ये असताना जीन्स ह्याच फॉर्म मध्ये यायच्या. जुना जरी असला तरी आजही मॉडेल्स पासून जवळपास सर्वच स्त्रियांमध्ये ह्या प्रकारच्या जीन्सला फारच प्राधान्य आहे.
ह्या प्रकारच्या जीन्स वर लूज टिशर्ट किंवा टॅंक टॉप पेअर करू शकता. अजून एक ऑप्शन आहे, जर तुमची फिगर चांगली असेल तर तुम्ही स्किनी फिट टिशर्ट घालू शकता आणि त्याला जोड म्हणून एखादा लेदर अथवा डेनिमचं जॅकेट सुद्धा उत्तम दिसतं. आजकाल पेपलम किंवा फ्रिल वाले लूज टॉप्स चीही फॅशन आहे . तेही टॉप्स अशा स्किनी जीन्स वर उठून दिसतात.
जर तुम्हला थोडासा इंडो वेस्टर्न टच द्यायचा असेल तर थाई लेन्थ कुर्ता तुम्ही पेअर करू शकता.

२. हाय वैस्ट अँड स्किनी फिट :
High waist and skinny fit jeans style
हाय वैस्ट जीन्सला उत्तम जोड म्हणजे साधा आणि थोडा टाईट टिशर्ट. जर तुम्ही फक्त टिशर्ट वर कम्फर्टबल नसाल तर एखादं श्रग अथवा लॉन्ग किंवा शॉर्ट जॅकेट पेअर करू शकता. तुम्ही जर लॉन्ग टॉप हाय वैस्ट वर पेअर केला तर तुमची जीन्स टॉप खाली झाकल्या जाईन आणि तुमचा एकंदर लुक चांगला नाही दिसणार. एखादा सिम्पल किंवा थोडा स्टयलिश क्रॉप टॉप देखील हाय वैस्ट जीन्स वर उठून दिसतो. तुमच्याकडे लॉन्ग टिशर्ट असेल तर तो पूर्ण इन करू शकता किंवा एका साईड ने इन करा आणि बाकी ठिकाणी मोकळा सोडा हि पण स्टाईल छान आणि सोबर दिसते हाय वैस्ट जीन्स वर.

३. वाईड लेग किंवा पलाझो जीन्स :
Wide leg or Palazzo Jeans Style
ह्या प्रकारच्या जीन्स सध्या फार चालतात. वाईड जीन्स ला स्टाईल करताना ह्यावर लूज किंवा टाईट क्रॉप टॉप पेअर करू शकता. किंवा जर तुम्ही क्रॉप टॉपवर कम्फर्टबल नसाल तर एखादा मिडीयम लेन्थ टीशर्ट इन करून घालू शकता. फक्त वाईड जीन्स वर घ्यावयाची काळजी म्हणजे लॉन्ग टॉप जरा सुद्धा नका घालू ..ते चांगला नाही दिसणार.
जीन्स वर जेवढ्या स्टाईल्स करता येतील तेवढ्या कमीच. ह्या ब्लॉग मध्ये एवढंच . आमच्या सोबत असेच बनत राहा . तुमच्या भेटीला असेच किंवा ह्याही पेक्षा मनोरंजक ब्लॉग्स तुमच्या भेटीला आम्ही नक्की घेऊन येऊ.
==================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============