स्टाईल इन सारी….

Style in Saree : साडी हा भारतामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेला एक महत्वाचा स्त्री पोशाख . त्यातही आज खूप विविधता आढळते . दक्षिणेकडे केरळ,कर्नाटक पासून ते उत्तरेकडे उत्तरप्रदेश, बिहार…. भारताच्या पूर्वेकडे पश्चिम बंगाल पासून ते पश्चिमेकडे महाराष्ट्र्र…. गुजरात…”एक पोशाख आणि शैली अनेक”
साडीचे महत्व मध्यंतरीच्या काळात कमी झालेलं दिसलं, पण आता साडी परत ट्रेंड मध्ये आली आणि तीही अजून विविधता घेऊन …. आजकाल सणवार असो व कुठला सोहळा समारंभ…. मुली साडी कॅरी करताना सर्रास पाहायला मिळतात….
महाराष्ट्रामध्ये देखील पूर्वी फार चालत असलेला साडीचा प्रकार म्हणजे नऊवार. पण नऊवार काळाच्या पडद्याआड न जाता, आज पुन्हा ट्रेंड मध्ये आला आहे . महाराष्ट्रीयन मुली खूप मोठ्या प्रमाणात लग्नामध्ये नऊवार घालताना दिसतात…. हे बघता , कुणालाही आपल्या वॉर्डरोब मध्ये एक तरी नऊवार असायला पाहिजेच !!!! असा वाटणं साहजिकच आहे..
ह्या ब्लॉग मध्ये साडीमधले ट्रेंडी आणि स्टयलिश लूक्स आपण बघणार आहोत

१. हेवी लुक
सणवार अथवा लग्न समारंभ असो, आपल्याला सगळ्यामध्ये उठून दिसायचं असतं . त्यासाठी असा थोडा हेवी लुक बेस्ट आहे.
तुम्ही सिल्क साडी कॅरी करू शकता आणि त्यावर अशी आर्टिफिशिअल ज्वेलरी …. आणि हो गळ्यात लांब किंवा गळ्याला लागून एक असा फक्त एकच नेकलेस घाला….फार दागिने घातले कि फक्त दागिनेच उठून दिसतात आणि त्या समोर आपला लुक फिका दिसतो.
नेकलेस सोबत कानात झुमके अथवा कुठलेही हेवी टॉप्स छान जातात.. हातात डझन भर बांगड्या घालण्यापेक्षा एक एक हेवी कडे घालू शकता. खूपच तुमची बांगड्या घालायची इच्छा असेल तर कड्यांसोबत एक एक साडीला मॅचिंग बांगडी तुम्ही पेअर करू शकता .. आणि बांगड्याना जोड म्हणून एकाच हाताच्या बोटात एक हेवी रिंग घाला .
बाकी नाकात नथ जर घालायची असेल तर जास्त मोठी नथ नका घालू ..अगदी छोटीसी रिंग नथ किंवा महाराष्ट्रीयन नथ घालू शकता ….हे झालं ज्वेलरी बाबत ….
बाकी तुम्ही हेवी मेकअप करू शकता फक्त एवढंच लक्षात घ्या कि जर तुम्ही हेवी आय मेकअप केला असेल तर लिपस्टिक डार्क शेड मध्ये नका लावू ..बाकी अशा लुक वर बंद केसांचा अंबाडा छान उठून दिसतो ….अशा प्रकारे तयार झालात तर बघा कसे उठून दिसाल तुम्ही..

२. लाईट साडी लुक
हा लुक सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे. असे फार प्रसंग येतात कि लग्न थोडं दूरच्या नातेवाईकांचे आहे पण मग आपण फार संभ्रमात पडतो कि काय घालावं आणि कसा लुक करायचा. कारण फार हेवी लुक आपल्याला करायचा नसतो आणि लाइट लुक फारच सिम्पल होऊन जातो मग अशा वेळी काय करायचं असा प्रश्न पडतो.
त्यासाठी तुम्ही एक सिम्पल सिल्क साडी अथवा थोडी शाईनी कॉटन साडी घाला. साडी जर सिम्पल असेल तर त्या वर हेवी ज्वेलरी तुम्ही घालू शकता. आजकाल “Oxidised jewellery” चा फार ट्रेंड चालू आहे. सिम्पल साडी वर तुम्ही थोडे हेवी ऑक्सिडाइज्ड नेकलेस घालू शकता आणि त्याला पेअर तुम्ही हेवी इअररिंग्ज ने करू शकता किंवा जर तुमच्या ब्लाउज गळा छोटा असेल तर नेकलेस नाही घातले तरी चालतील फक्त खूप हेवी आणि लांब एअररिंग्स तुम्ही घालू शकता. बाकी चित्रात दाखवल्याप्रमाणे मांगटिका /बिंदी घातली तरी चालेल किंवा नाही घातली तरीहि तुमचा लुक उठूनच दिसेल.
घरातील पूजेसाठी देखील हा लुक छान उठून दिसतो . फक्त एवढं लक्षात ठेवा कि ह्या लुक मध्ये तुमची ज्वेलरी जास्त उठून दिसते, त्यामुळे केसांची स्टाईल देखील तशीच करा जेणेकरून ज्वेलरी तुमची ठळक पणे दिसून येईल.

३. ऑफिसवेयर लुक किंवा नाईट पार्टी लुक
बऱ्याचदा ऑफिस मधेही काही सेलेब्रेशन्स होत असतात …. ऑफिस मध्ये जर ट्रॅडिशनल डे असेल किंवा तुम्ही कुठल्या नाईट पार्टी अथवा बर्थडे पार्टी ला जात असाल तर हा लुक बेस्ट आहे . सिम्पल साडी , सिम्पल मेकअप आणि लाईट ज्वेलरी…. बस्स! अजून काही करायची गरज नाही .
आणि हो जर तुमची एखादी मीटिंग असेल अथवा क्लायंट मीटिंग असेल आणि तुम्हाला साडी घालायची असेल तर सिम्पल कॉटन साडी घालू शकता त्यावर तुम्ही गळ्यात एखादी सिम्पल चैन आणि कानात साधेसे टॉप्स पेअर करू शकता… आणि हो साडी पिनअप नक्की करा आणि केसांचा बन नक्की बनवा …. असा सिम्पल लुक तुम्ही ऑफिस मध्ये इजिली कॅरी करू शकता.

आणि हो साडी म्हटलंच तर खण साडीला कसं विसरून चालेन. आजकाल खण साडीचा खूप ट्रेंड चालू आहे. खणाच्या साड्यांमध्ये बाजारात पुष्कळ प्रकार पाहायला मिळतात. अगदी ५०० रुपयांपासून सुरु होणारी साडी २५ हजारांच्या खण पैठणी मधेही उपलब्ध आहे. खण हा प्रकार पारंपरिक जरी असला तरी खणाच्या साडीला एक डिझायनर टच मिळाला. पूर्वी काही रंगातच मिळणार खण आता अनेक सुंदर रंगात मिळू लागलं.
खणाच्या साडीतला लुक आणि स्टाईल वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
https://www.ritbhatmarathi.com/khan-saree/
तुमच्या जवळ देखील जर विविध स्टाईल्स असतील तर आम्हाला नक्की कळवा
==========
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============