Skip to content Skip to sidebar Skip to footer

स्थित्यंतर

वर्षानी घरात पाय ठेवला आणि तिला वडिलांचा चिडका स्वर ऐकू आला. तिच्या आईवर ते तोंडसुख घेत होते. आईकडून वरणात मीठ जास्त झाल्याचे निमित्त. पण तिचे वडील हवे तसे बोलत होते. “तुम्हाला काय घरात बसून आयतं मिळतं. एक काम तर ठीक करत जा.” तिची आई कोपऱ्यात उभी राहून ऐकत होती. वर्षाला त्याक्षणी वाटले की ,आईने काहीतरी बोलावे. स्वतःच्या बचावा खातर दोन शब्द तरी उलटून बोलावे. पण ‘नाही ‘.ती स्थितप्रज्ञा सारखी उभी होती.

वर्षाला पुरुषप्रधान संस्कृतीचा खूप तिटकारा आला . ती स्वतः वडिलांना काहीतरी बोलून समजवू या दृष्टीने विचार करायची. पण त्यांचा धाक एवढा की ते दिसले की तिला काहीच सुचत नसे. या वातावरणात तिचा स्वतःवरचा विश्वास कमी होऊ लागला होता. प्रत्येक दिवस सारखाच असे. तिचे वडील काही ना काही कारणानी आई ला बोलत असत. तिने बरेचदा आईशी बोलण्याचा प्रयत्न केला .”अगं मी कशी उलट उत्तर देऊ? माझ्या आईने पण कधी उलट उत्तर दिले नाही. आपण नेहमीच समजून घ्यायचे.” एवढेच ती म्हणायची . वर्षा विचार करायची खरंच परंपरेनुसार हे चालत आलंय. पण किती पिढ्या चालणार?

कुठल्यातरी पिढीने स्वतःसाठी बोलणे गरजेचे आहे. पण ती कुठली पिढी ?याचे उत्तर तिला स्वतःलाच ठाऊक नसे. मोठ्यांना उलट उत्तर देऊ नये ही आपली संस्कृती सांगते पण मोठ्यांनी लहानांचा अपमान करणे हे सुद्धा चुकीचेच आहे. असे अनेक विचार तिच्या डोक्यात यायचे . आता ती ग्रॅज्युएट झाली . तिची नोकरी करण्याची फार इच्छा होती. तिला लग्नाची अजिबात घाई नव्हती. करिअर करायचे होते. पण वडिलांनी स्थळ आणले. तिला कोणी विचारलेच नाही. तिचे लग्न झाले . लग्न झाल्यावर सुद्धा तिला स्वतंत्रता म्हणजे काय हे कळलं नाही. तिचा नवरा पण अतिशय चिडका होता. तिला तिचे आई वडील व ते दोघं यात साम्य दिसू लागले.

तिने एक-दोनदा नवऱ्याला पैशांच्या व्यवहारात मत सांगण्याचा प्रयत्न केला .पण व्यर्थ. तिचे मत कोणीही विचारात घेतले नाही. ती विचार करायची की एकविसाव्या शतकाकडे वाटचाल केली तरी अजून आपल्याला वैचारिक स्वातंत्र्य मिळालेले नाही . खरे तर वैचारिक स्वातंत्र्य ,मत स्वातंत्र्य अशा अनेक गोष्टी आपल्या व्यक्त करण्याच्या सामर्थ्यावर अवलंबून असतात. कितीही कोणी आपल्यावर मत लादण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्याला कशी दाद देतो यावर आपले स्वातंत्र्य अवलंबून असते. आणि ती व्यक्त होण्याची हिम्मत आंतरिक असते व ती आपली आपल्यालाच तयार करावी लागते . अशा बऱ्याच विचारांच्या हिंदोळ्यावर बसून वर्षा भानावर आली. तिची मुलगी रिया आता मोठी होऊ लागली. तिने विचारपूर्वक स्वतःची मते तिच्यावर लादली नाहीत .

तिला पूर्ण स्वातंत्र्य दिले. अर्थात स्वातंत्र्य म्हणजे हवे तसे वागणे किंवा स्वैराचार नव्हे .वर्षानी तिला स्वतःचे मत परखडपणे व्यक्त करून दाखवण्याचे महत्त्व पटवून दिले. कुटुंबात, समाजात वागताना स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवणे किती गरजेचे असते हे तिला समजावले. लेक पंधरा वर्षांची झाली .वर्षाला ती नेहमी म्हणायची “आई तुझी स्वतःची मते असतांना तू व्यक्त का झाली नाहीस?” वर्षा म्हणायची, “बेटा कधी कधी पुढच्या व्यक्तीच्या धाकाने किंवा आदराने आपण आपली मते व्यक्त करीत नाहीत. तेच माझे झाले असावे” रिया म्हणाली “आपली मते व्यक्त करणे म्हणजे कोणाचा अपमान करणे नसते.

प्रत्येकाला स्वतःचे जीवन जगण्याचा अधिकार असतो. स्वतःच्या मतां सकट. ते कोणीही नाकारू शकत नाही. वर्षाला या विचारांचे कौतुक वाटले. ती म्हणाली “आता पुढची पिढी नक्कीच याचा विचार करेल”. वर्षाला दिसू लागले रिया तिच्या बाबांना स्वतःचे म्हणणे स्पष्ट पणे सांगते. त्यांचे न पटणारे विचार त्यांना सांगते. आताच्या काळानुसार बदलणे किती गरजेचे आहे ते नीट समजावून सांगते. वेशभूषा, विचार हे समाजानरूप व कालानुरूप हवे. हे व्यवस्थित सांगते.

ते सांगताना ती कधीही त्यांचा अपमान करीत नसे. रियाचे शिक्षण संपल्यावर तिने स्वतः निवडलेल्या मुलाशी लग्न करण्याचा निश्चय केला. अर्थात वर्षा नी तिला पाठिंबा दिला. तिच्या वडिलांनी थोडा विरोध केला. पण रियाच मतं खूप ठाम होत.लग्न झाल्यावर वर्षाने विचार केला, ज्या पिढीचा विचार ती करायची जी विचारांमध्ये स्थित्यंतर आणेल हीच ती पिढी. मला भावलेली पिढी.असे म्हणून वर्षा खूप सुखावली.


—–वैशाली देव

=================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

==========

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: