Skip to content Skip to sidebar Skip to footer

सौभाग्याचं लेणं…’ टिकली ‘…लावा पण जरा जपून…

तुम्हाला आठवतय का झी मराठी या वाहिनीवर ‘ अवघाचि हा संसार…’ नावाची सीरिअल लागायची त्यात कपाळावर विविधरंगी आणि विविध नक्षी असलेल्या टिकल्या लावणारी प्रियांका ….पात्र जरी खलनायिकेचं असलं तरी टिकल्या सहज आकर्षित करून घ्यायच्या नाही का…पण याच टिकल्या कधी कधी त्वचा रोगालाही आमंत्रण देतात नाही का…? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विवाहित स्त्रियांनी कुंकू लावण्याची प्राचीन पद्धत अजूनही आहे…सुरुवातीला हे कुंकू पिंजरच्या स्वरूपात असे आता याच कुंकवाची जागा रसायनयुक्त रंगबिरंगी टिकल्यांनी घेतली. अशा रासायनिक प्रक्रियेमधून तयार होणाऱ्या टिकल्या वापरल्यामुळे महिलांना होणाऱ्या नवीन रोगांची भर पडली आहे. संशोधनांमधूनही हे सिद्ध झाले आहे…टिकल्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम रसायनांचा जास्त वापर केला जातो…आता अशा रसायनयुक्त टिकल्या सातत्याने वापरल्याने कपाळावर पांढऱ्या रंगाचे डाग पडलेले आपल्याला दिसतात ज्या त्वचाविकाराला ‘ ल्युकोडर्मा ‘ असे म्हणतात.

आता फार पूर्वी ज्यावेळी टिकली अगदी नवीनच वापरात यायला लागली त्यावेळी नैसर्गिक गोंद चा वापर केला जाऊ लागला पण त्यात काळानुरूप बदल होत गेला आणि नैसर्गिक गोंद ज्याला आपण मेण असं म्हणतो…त्याच रूपांतर कृत्रिम रित्या तयार केलेल्या रासायनिक गोंदमध्ये झालं…अनेक प्रकारची रसायन एकत्रित केल्याने त्याचा संपर्क जेव्हा त्वचेशी येऊ लागला तेव्हा त्वचा पांढरी पडून एक्सिमा नावाचा रोग निर्माण झाला. अशा प्रकारच्या टिकल्या वापरल्या गेल्या मुळे स्त्रियांना आपल्या कपाळावर पांढरा डाग पडलाय ही गोष्ट पटकन लक्षात येतंच नाही कारण तो पांढरा डाग लपवण्यासाठी त्यावर परत मोठी टिकली लावली जात असल्याने तो पांढरा डाग तात्पुरता लपवला जाई पण असं केल्याने तो डाग वाढतच जातो ही गोष्ट महिलावर्गाच्या फार कमी लक्षात येते म्हणून या सगळ्या बारकाव्यानकडे दुर्लक्ष होत…म्हणून काही तज्ञ् लोक टिकलीऐवजी कुंकू लावण्याचा सल्ला देताना दिसतात…कुंकवामध्येही भेसळयुक्त द्रव्य मिसळले गेलेले असते हे कित्येकदा आपण पाहतो…आता कुंकवामधली भेसळ कशी ओळखावी आणि भेसळविरहित कुंकू कसे तयार करावे याचे काही मुद्दे पुढे मांडलेले आहेत –

  • सामान्यपणे कुंकू हे लाल रंगाचे असते त्यात लाल रंग दाटपणे दिसण्यासाठी [ Pb३  O4 ] या रस्यानाव्यतिरिक्त शिशाचा जास्त वापर केला जातो जेणेकरून कुंकवाला दाट लाल रंग येतो…
  • कुंकू हे भेसळयुक्त आहे हे ओळखण्यासाठी प्रथम कुंकू पाण्यात भिजवून घ्यावे हात पूर्ण लाल रंगाचा    झाल्यावर तो रंग कितीही धुतला तरीही सहजासहजी जाऊ शकत नाही…जर असे कुंकू आपण वापरात असू तर सावधान कारण त्यामध्ये रेड लीड ऑक्साईड च रसायन वापरलं जात…
  • या कुंकवाने त्वचेचे विकारही जडू शकतात म्हणून भेसळविरहित कुंकू वापरलेले उत्तम…
  • भेसळ नसलेलं कुंकू हे घरच्या घरीसुद्धा बनवता येते…एका भांड्यामधे हळद घेऊन त्यात कॅल्शिअम  हायड्रॉक्साइड त्यालाच लाईम वॉटर असेही म्हणतात असे दोन्ही पदार्थ एकत्र मिसळून घ्यावेत त्यानंतर त्या मिश्रणात गुलाब पाकळया व्यवस्थित त्याची पेस्ट करून एकत्र करून घ्यावी..तसेच मिश्रण एकत्र करताना त्याचा रंग हळू हळू बदलू लागतो…कालांतराने त्या मिश्रणाचा रंग गडद लाल होऊ लागतो…ज्यावेळी असा रंग येतो त्याचवेळी सुकण्यासाठी बाजूला करून ठेवावा म्हणजे आपल्याला घरच्या घरी कुंकू मिळू शकते…हे कुंकू फार काळ गडद राहू शकत नाही कारण फार काळ न वापरताच तसेच ठेवले तर ते फिके पडू शकते…म्हणून गरजेपुरतं अगदी थोडंसं कुंकू आपण घरी तयार करू शकतो. आपल्याकडे जर कुंकू बनवण्यासाठी कॅल्शिअम हायड्रॉक्साइड असं रसायन उपलब्ध नसेल तर बेकिंग सोडा आणि लिंबू वापरू शकतो…लिंबाचा रस जास्त असावा याची खबरदारी जरूर घ्यावी.
  • आपण जर टिकली लावत असाल तर रात्री झोपताना टिकली जरूर काढून ठेवावी…आता अजूनही आपल्यात काही बायका आहेत की ज्या टिकली कपाळावरची कधीच काढू नये अशा समजुतीच्या असतात पण मैत्रिणींनो कपाळावर जरा वेळही टिकली नसली की कुठलीही रीत किंवा परंपरा आपण मोडतोय असा समज करून घेऊ नये…
  • सौन्दर्य खुलवण्यासाठी एक सौभाग्यालंकार म्हणून आपण कुंकू आणि टिकली जरूर वापरतो पण टिकली सौन्दर्याचे किंवा शृंगाराची उणीव भरून काढते म्हणून ती जशी सोंदर्यवर्धक असते तशीच आरोग्य वर्धकही असली पाहिजे जेणेकरून आपल्या त्वचेस हानी पोचणार नाही.
  • टिकली लावल्याने ऍलर्जी होत असेल तर पुढील उपाय करावेत:
  • तिळाचे तेल – तिळाचे तेल हे टिकली लावण्यापूर्वी कपाळावर लावावे जेणेकरून टिकलीच्या चिकटपणापासून होणार दाह कमी होतो आणि त्वचा खराब होण्यापासून वाचते. नियमितपणे तिळाचे तेल लावल्यास टिकलीच्या अलार्जीपासून जरूर सुटका होऊ शकते.
  • कापूर वितळवलेलं तेल – खोबऱ्याच्या तेलामध्ये कापूर वितळवून ते तेल टिकली लावतो त्या ठिकाणी लावले असता चिकट गोंदामुळे होणार दाह कमी होऊन टिकलीच्या अलर्जीपासून मुक्ती मिळते.
  • जास्त चिकटपणा असलेली टिकली वापरू नका.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.