Skip to content Skip to sidebar Skip to footer

भारतातील काही व्रत-वैकल्ये आणि सण

# भारतातील काही व्रत-वैकल्ये आणि सण #

सण हे प्रत्येक देशात साजरे केले जातात पण भारतात प्रत्येक सणांचा एक असा वेगळाच अंदाज आहे,कौटुंबिक प्रेम,भाऊबंदकी किंवा सामाजिक व्यवस्थेला अनुसरून सणांची काही महत्वाची टोकं आहेत आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला एक अशी खासियत आहे ज्याला अनुसरून आपली सण साजरे केले जातात विशेषता अशी की निसर्गाला अनुसरून प्रत्येक सण साजरा केला जातो हवामानातील ऋतुमानानुसार प्रत्येक सण येत असतो आणि या वातावरणाला अनुसरूनच सण साजरे केले जातात.

आपल्या संस्कृतीतील व्रत-वैकल्य आणि सण –

आपल्या भारतात विविध संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत आहेत त्यामुळे अगदी विविधतेमध्ये एकता असल्यासारखं प्रत्येक भारतातल्या त्या-त्या राज्यात अगदी उत्साहात सण साजरे केले जातात त्याचंच विवरण आपण करणार आहोत-

# भारतातील महत्वपूर्ण सांस्कृतिक सण उत्सव [ तारखेनुसार ] #

 

सणाचे नाव202120222023
दिवाळी४ नोव्हेंबर२४ ऑक्टोबर१२ नोव्हेंबर
दसरा१५ ऑक्टोबर५ ऑक्टोबर२४ ऑक्टोबर
होळी२९ मार्च१८ मार्च७ मार्च
कृष्णजन्माष्टमी३० ऑगस्ट१८ ऑगस्ट६ सप्टेंबर
गणेश चतुर्थी१० सप्टेंबर३१ ऑगस्ट१९ सप्टेंबर
रक्षाबंधन२२ ऑगस्ट११ ऑगस्ट३० ऑगस्ट
ईद१३ मे९ जुलै२२ एप्रिल
ख्रिसमस२५ डिसेंबर२५ डिसेंबर२५ डिसेंबर
गुरु नानक जयंती१९ नोव्हेंबर८ नोव्हेंबर२७ नोव्हेंबर

 

भारतातील काही धार्मिक सण –

सणांची नावे202120222023
महाशिवरात्री११ मार्च१ मार्च१८ फेब्रुवारी
फुलेरा द्वितीया [पक्ष द्वितीया ]१५ मार्च४ मार्च२१ फेब्रुवारी
गुड फ्रायडे२ एप्रिल१५ एप्रिल७ एप्रिल
ईस्टर संडे४ एप्रिल१७ एप्रिल९ एप्रिल
रंगपंचमी२ एप्रिल२२ मार्च१२ मार्च
गुडीपाडवा१३ एप्रिल२ एप्रिल२२ मार्च
रामनवमी२१ एप्रिल१० एप्रिल३० मार्च
चैत्र गौरी तृतीया१५ एप्रिल१८ मार्च२४ मार्च
अक्षय तृतीया१४ मे३ मे२२ एप्रिल
बुद्धपौर्णिमा२६ मे१६ मे५ मे
गंगा दशहरा२० जून६ जून३० मे
मिथुन संक्रांति१५ जून१५ जून१५ जून
जगन्नाथ रथयात्रा१२ जुलै१ जुलै२० जून
जयापार्वती व्रत२५ जुलै११ जुलै१ जुलै
हरियाली त्रितिया११ ऑगस्ट३१ जुलै१९ ऑगस्ट
नागपंचमी१३ ऑगस्ट२ ऑगस्ट२१ ऑगस्ट
उपाकर्म२२ ऑगस्ट११ ऑगस्ट३० ऑगस्ट
कजरी तिज२५ ऑगस्ट१४ ऑगस्ट२ सप्टेंबर
बहुला चौथं२५ ऑगस्ट१५ ऑगस्ट३ सप्टेंबर
हर छठ२८ ऑगस्ट१७ ऑगस्ट५ सप्टेंबर
पर्युषण४ सप्टेंबर २६ जानेवारी
हरितालिका त्रितिया९ सप्टेंबर३० ऑगस्ट१८ सप्टेंबर
ऋषिपंचमी११ सप्टेंबर१ सप्टेंबर२० सप्टेंबर
संतान सप्तमी १४ सप्टेंबर४ सप्टेंबर२३ सप्टेंबर
राधा अष्टमी/महालक्ष्मी व्रत१३ सप्टेंबर१७ सप्टेंबर२३ सप्टेंबर
अनंत चतुर्दशी१९ सप्टेंबर३० ऑगस्ट२८ सप्टेंबर
श्राद्ध२० सप्टेंबर – ६ ऑक्टोबर१० सप्टेंबर – २५ सप्टेंबर२९ सप्टेंबर- १४ ऑक्टोबर
जीवितपुत्रिका२८ सप्टेंबर ६ ऑक्टोबर
नवरात्री७ ऑक्टोबर२६ सप्टेंबर१५ ऑक्टोबर
बटुकम्मा पूजन६ ऑक्टोबर १४ ऑक्टोबर
नवपत्रिका पूजन१२ ऑक्टोबर२ ऑक्टोबर२१ ऑक्टोबर
सरस्वतीपूजन१६ फेब्रुवारी५ फेब्रुवारी२१ ऑक्टोबर
कोजागिरी पौर्णिमा१९ ऑक्टोबर९ ऑक्टोबर२८ ऑक्टोबर
करवा चौथं२४ ऑक्टोबर१३ ऑक्टोबर१ नोव्हेंबर
अहोई अष्टमी२८ ऑक्टोबर१७ ऑक्टोबर५ नोव्हेंबर
धनतेरस२ नोव्हेंबर२३ ऑक्टोबर१० नोव्हेंबर
नरक चतुर्दशी४ नोव्हेंबर२४ ऑक्टोबर१२ नोव्हेंबर
आद्य काली पूजा ४ नोव्हेंबर२४ ऑक्टोबर१२ नोव्हेंबर
गोवर्धन पूजा / अन्नकुट५ नोव्हेंबर२६ ऑक्टोबर१४ नोव्हेंबर
भाईदुज / यमद्वितीया६ नोव्हेंबर२६ ऑक्टोबर१४ नोव्हेंबर
छठ पूजा१० नोव्हेंबर३० ऑक्टोबर१९ नोव्हेंबर
गोपाष्टमी११ नोव्हेंबर१ नोव्हेंबर२० नोव्हेंबर
अक्षय आवळा नवमी१२ नोव्हेंबर२४ नोव्हेंबर२१ नोव्हेंबर
जगद्धात्री पूजा १२ नोव्हेंबर २१ नोव्हेंबर
तुलसीविवाह१५ नोव्हेंबर२० नोव्हेंबर२४ नोव्हेंबर
वैकुंठ चतुर्दशी१७ नोव्हेंबर२७ नोव्हेंबर२५ नोव्हेंबर
मणिकर्णिका स्नान१८ नोव्हेंबर २५ नोव्हेंबर
विवाह पंचमी८ डिसेंबर२८ नोव्हेंबर१७ डिसेंबर
मांडला पूजा२७ डिसेंबर२७ डिसेंबर२७ डिसेंबर

 

एकादशी व्रत आणि तिथी –

हिंदू शास्त्रानुसार एकादशी ही तिथं खूप अनन्यसाधारण अशी समजली जाते…विशेषतः वारकरी संप्रदायात या तिथीला विशेष असे महत्व आहे…एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो…आरोग्याच्या दृष्टीने काहीजण उपवास करतात तर काही जण धार्मिक दृष्ट्या उपवास करताना दिसतात…आरोग्याच्या दृष्टीने अशासाठी म्हंटल कारण एकादशी ही १५ दिवसांनी येत असते त्यात आपल्या पचनशक्तीवर लंघन करणं हा सर्वोत्तम असा उपाय मानला जातो कारण सारखं पोटात काही ना काहीतरी खात राहणं म्हणजे पचनशक्तीला आराम न देणं असं समजलं जात म्हणून आपल्या पचनशक्तीला आराम म्हणून लंघन केले जाते…म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीने एकादशीला अनन्यसाधारण असे महत्व आहे.एकादशी ही भगवान विष्णूला स्मरून केली जाते प्रत्येक वर्षात एकूण २६ एकादशी असतात प्रत्येक एकादशीची अशी एक पौराणिक कथा आहे. खाली आपण प्रत्येक एकादशी नेमकी कधी येते हे आपण पाहणार आहोत-

एकादशीचे नावपक्ष२०२१२०२२२०२३
सफला         कृष्ण८ जानेवारी१९ डिसेंबरNo
पौष पुत्रदा     शुक्ल२४ जानेवारी१३ जानेवारी२ जानेवारी
षष्ठीला     कृष्ण७ फेब्रुवारी२८  जानेवारी१८ जानेवारी
जया     शुक्ल२२ फेब्रुवारी१२ फेब्रुवारी१ फेब्रुवारी
विजया     कृष्ण८ मार्च२७ मार्च१६ फेब्रुवारी
आमलकी     शुक्ल२४ मार्च१४  मार्च ३ मार्च
पापमोचिनी    कृष्ण७  एप्रिल२८ मार्च १८ मार्च
कामदा    शुक्ल२३  एप्रिल१२ एप्रिल१ एप्रिल
वरुठिनी     कृष्ण६ मे२६  एप्रिल१६ एप्रिल
मोहिनी        शुक्ल२२ मे१२  मे१ मे
अपरा  कृष्ण५ जून२६  मे१५ मे
निर्जला   शुक्ल२१ जून११ जून ३१ मे
योगिनी   कृष्ण५ जुलै२४ जून१४ जून
देव शयनी       शुक्ल२० जुलै१० जुलै२९ जून
कामिका    कृष्ण3 ऑगस्ट२४ जुलै१३ जुलै
पुत्रदा    शुक्ल१८  ऑगस्ट८  ऑगस्ट२७ ऑगस्ट
अजा      कृष्ण२ सप्टेंबर२३ ऑगस्ट१० सप्टेंबर
परिवर्तिनी/ डोल ग्यारस शुक्ल१७ सप्टेंबर ६ सप्टेंबर२५ सप्टेंबर
इंदिरा कृष्ण२ ऑक्टोबर२१  सप्टेंबर१० ऑक्टोबर
पापांकुशा शुक्ल१६ ऑक्टोबर६ ऑक्टोबर२५ ऑक्टोबर
रमा   कृष्ण१ नोव्हेंबर२१ ऑक्टोबर९ नोव्हेंबर
प्रबोधिनी/ देव उठनीशुक्ल१४  नोव्हेंबर४  नोव्हेंबर२३ नोव्हेंबर
उत्पन्ना   कृष्ण३०  नोव्हेंबर२०  नोव्हेंबर८ डिसेंबर
मोक्षदा शुक्ल१४  डिसेंबर३  डिसेंबर२३ डिसेंबर
पद्मिनी (अधिक मास)कृष्णblankblankblank
परमा (अधिक मास)शुक्लblankblankblank

तर अधिक महिन्यातील काही एकादशीची नावे यात दिलेली आहेत पण खरे पाहता अधिक महिना हा तीन वर्षानंतर येत असल्याने त्या एकादशीची तारीख नमूद केली गेली नाही याची नोंद वाचकांनी घ्यावी.

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन पक्ष असतात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष जे नेहमी अमावास्या आणि पौर्णिमा यामध्ये येतात किंवा पौर्णिमा आणि अमावास्या या दोन्हीच्या मध्ये येत असतात.प्रत्येक वर्षात १२ पौर्णिमा असतात.पौर्णिमेच्या दिवशी किंवा एक दिवस आधी सत्यनारायण देवाची पूजा केली जाते कारण  त्या दिवशी पूजेचे महत्व असते.पूर्णिमेच्या दिवशी चंद्र मात्र पूर्ण स्वरूपात असतो ज्या दिवशी उपवासाचे महत्व असते खूप नियमानुसार उपवास हिंदू धर्मात केला जातो.पुढील प्रमाणे पौर्णिमा हि तारखेप्रमाणे मांडलेली आहे.

महिन्यातील पौर्णिमा  महत्व२०२१२०२२२०२३
चैत्रहनुमान जयंती२७ एप्रिल१६ एप्रिल६ एप्रिल
वैशाखबुद्ध जयंती २६ मे१६ मे५ मे
जेष्ठवट सावित्री१० जून२९ मे४ जून
आषाढगुरु पौर्णिमा२३ जुलै१३ जुलै३ जुलै
श्रावणरक्षाबंधन /नारळी पौर्णिमा२२ ऑगस्ट११ ऑगस्ट३० ऑगस्ट
भाद्रपदश्राद्ध /पितृ२० सप्टेंबर९ सप्टेंबर२९ सप्टेंबर
अश्विनशरद पौर्णिमा/कोजागिरी१९  ऑक्टोबर९ ऑक्टोबर२८ ऑक्टोबर
कार्तिकगुरुनानक जयंती१८ नोव्हेंबर८ नोव्हेंबर २७ नोव्हेंबर
अग्रहन्य पौर्णिमादत्त जयंती१८ डिसेंबर७ डिसेंबर२६ डिसेंबर
पौष पौर्णिमापुशी पूणव२८ जानेवारी१७ जानेवारी६ जानेवारी
माघमाघ मेला२६ फेब्रुवारी१७ जानेवारी५ फेब्रुवारी
फाल्गुनहोळी२९ मार्च१८ मार्च७ मार्च

अमावास्या हि हिंदू कालमापनातील तिसावी तिथ आहे ज्यादिवशी पृथ्वीवरून चंद्राचा भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो ती तिथी अमावास्या असते प्रत्येक अमावास्येला आपल्या हिंदू संस्कृतीत महत्व आहे म्हणूनच दर महिन्यातल्या अमावास्येला काही ना काही तरी संबोधतात याचीच माहिती आणि अमावास्येची तारीख पुढील रकान्यात मांडलेली आहे –

महिनामहत्व२०२१२०२२२०२३
चैत्रचैत्र अमावस्या११  एप्रिल३१ मार्च २१ मार्च
वैशाखवैशाख अमावस्या११ मे३० एप्रिल२० एप्रिल
जेष्ठशनि जयंती१० जून३० मे१९ मे
आषाढसोमवती अमावस्या१२ जून२८ जून१८ जून
श्रावणश्रावण अमावस्या/दीप अमावास्या८ ऑगस्ट२७ जुलै१७ जुलै
भाद्रपदपिठोरी अमावस्या [चंद्र ग्रहण]६ सप्टेंबर२६ ऑगस्ट१४ सप्टेंबर
अश्विनसर्वपित्री अमावस्या६ ऑक्टोबर२४ सप्टेंबर१४ ऑक्टोबर
कार्तिकदिवाळी४ नोव्हेंबर२५ ऑक्टोबर१३ नोव्हेंबर
अग्रहन्य अमावस्यामार्गशीर्ष अमावस्या/वेळा अमावास्या३ डिसेंबर२४ नोव्हेंबर१२ डिसेंबर
पौष अमावस्या पौष अमावस्या १२ जानेवारी२ जानेवारी 
माघमौनी अमावस्या११ फेब्रुवारी१२ फेब्रुवारी२१ जानेवारी
फाल्गुनसूर्य ग्रहण१२ मार्च १९ फेब्रुवारी

 

शेतकऱ्यांचे काही सण-

सणांची नावे२०२१२०२२२०२३
लोहारी१३ जानेवारी५ फेब्रुवारी१३ जानेवारी
मकर संक्रांति१४ जानेवारी१४ जानेवारी१५ जानेवारी
वसंत पंचमी१६ फेब्रुवारी५ फेब्रुवारी२६ जानेवारी
बैसाखी१४ एप्रिल१४ एप्रिल१४ एप्रिल
ओणम१२ ऑगस्ट ८ सप्टेंबर२० ऑगस्ट
पोळा६ सप्टेंबर२७ ऑगस्ट१४ सप्टेंबर

 

हिंदू संस्कृतीमध्ये तिथींना विशेष असे महत्व आहे प्रत्येक तिथीवर उपवास असतो किंवा कुठल्याही देवतेची पूजा हिंदू संस्कृतीमध्ये केली जाते याचेच विवरण खालीलप्रमाणे केले आहेत.

 

नावविवरण
कालाष्टमीकृष्ण पक्ष अष्टमी
प्रदोषप्रत्येक म्हण्यातील त्रयोदशी
मासिक शिवरात्रीप्रत्येक महिन्यातील चतुर्दशी
संकष्टी चतुर्थीप्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात संकष्टी चतुर्थी येत
भानू सप्तमीजेव्हा सप्तमीच्या दिवशी रविवार असेल तेव्हा तिला भानुसप्तमी म्हणतात
स्कंद षष्ठीशुक्ल पक्ष आणि पंचमी जेव्हा एकत्र येईल तेव्हा स्कंद षष्ठी म्हणतात
रोहिणी व्रतजेव्हा रोहिणी नक्षत्र सूर्योदयानंतर प्रबळ होत
सत्यनारायण पूजाप्रत्येक पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी करतात
मंगळा गौरी पूजाश्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी येणारी पूजा
श्रावण महत्वपवित्र महिना समजला जातो
अधिक मास महत्वपवित्र महिना जो तीन वर्षामधून येतो
कोकिळा व्रतजेव्हा अधिक महिना आषाढ महिन्यात येतो असा योग १९ वर्षानंतर येतो
कार्तिक महिनापवित्र महिना समजला जातो
चातुर्मासअर्ध आषाढ,श्रावण,भाद्रपद,अर्ध कार्तिक
महाकुंभ नाशिकसूर्य आणि बुध जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतात.
महाकुंभ उज्जैनजेव्हा सूर्य किंवा बुध ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करतात.

मुस्लिम सण समारंभ

भारतामध्ये कित्येक जाती आणि धर्मांचा समावेश आहे म्हणूनच भारतात विविधतेमध्ये एकता असलेली आपल्याला दिसून येते भारत हा एकमेव असा देश आहे जिथे प्रत्येक जात आपला सण आपल्या आपल्या पद्धतीने साजरा करते म्हणजेच स्वतंत्रतेने साजरा करते कारण भारतात वैचारिक दृष्ट्या सर्व जातीपातींना आपले सण आपल्या पद्धतीने साजरे करता येतात.म्हणूनच इस्लामिक सण खालीलप्रमाणे सूचित केलेले आहेत-

इस्लामिक सण२०२१२०२२२०२३
ईद१३ मे४ मे२३ एप्रिल
रमजान१२ एप्रिल-१२ मे२ एप्रिल-२ मे२२ मार्च-२१ एप्रिल
बकरी ईद१९ जुलै११ जुलै२९ जून
अल हिजरा इस्लामिक न्यू इअर९-१० ऑगस्ट३० जुलै१९ जुलै
मोहरम ताजिया १९ ऑगस्ट२९ जुलै१९ जुलै

 

हीच तर आपल्या खऱ्या भारताची ओळख आहे विविधतेत एकता अशी. प्रेम,बंधुत्व हेच तर या सण समारंभाचे खरे स्रोत आहेत. सामाजिक हेतुपरत्त्वे सणानं एक विशिष्ट असं महत्व आहे आणि यानेच आपली संस्कृती टिकून आहे.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.