कमी खर्चात महिलांना घरच्या घरी व्यवसाय सुरु करता येईल अशा 11 आयडिया

small scale business ideas for ladies in India: आजच्या प्रगत महिला कोणत्याच क्षेत्रात आणि व्यवसायात कमी नाहीत.बऱ्याच महिलांना घरकाम, मुलेबाळे सांभाळून नोकरी करणे, त्यातील वेळा पाळणे या पेक्षा छोटासा का असेना पण स्वतःचा व्यवसाय असावा जिथे आपल्या मर्जीप्रमाणे,वेळेप्रमाणे आपण काम करू शकू असे वाटू लागले आहे आणि फक्त वाटतच नाही तर मागील काही दशकात भारताने महिला व्यावसायिकांच्या संख्येत वाढ झालेली पहिली आहे.हे देशाच्या विकासासाठी खूप हातभार लावत आहे.यामुळे अनेक महिला घरी बसून आपल्या कौशल्याचा वापर करून स्वतः तर कमावत्या झाल्याच आहेत शिवाय इतरांनाही कमावण्याची संधी मिळवून देत आहेत.स्वतःच्या जिद्द आणि कौशल्याच्या आधारावर एक उत्तम व्यावसायिक बनल्या आहेत.
महिलांना घरी बसून करता येतील असे छान,सुटसुटीत आणि उत्तम ठरणारे तसेच योग्य पैसे मिळवून देणारे काही व्यवसाय इथे पाहूया.
१. खाण्याशी संबंधित उद्योग :
छान जेवण बनवणे ही बऱ्याच भारतीय महिलांची ओळख आहे.याच कौशल्याचा उपयोग करून महिला घरात बसून छान कमाई करू शकतात.बाहेर खाणे हे आजकाल तरुणाईतच नाही तर मोठ्यांच्या सुद्धा आवडीचे काम आहे त्यामुळेच कॅफे आणि हॉटेल्स खूप लोकप्रिय ठरत आहेत.
- कॅफे : कॉलेज तरुणांसाठी याहून प्रिय कोणतीही जागा नसेल.आजकालची तरुणाई रोज केफत जाऊन बऱ्याच नवीन पदार्थांचा आस्वाद घेत असतातच.
- हॉटेल्स : उत्तम नियोजन आणि गुंतवणुकीसाठी पैसे असतील तर याहून छान व्यवसाय असूच शकत नाही.कोणत्याही काळाचे बंधन नसणारा असा हा व्यवसाय बाराही महिने चालू शकेल.
- ज्यांना पैसे गुंतवायचे नसतील तरीही याच कौशल्याचा उपयोग करून काही करायचे असेल तर घरूनच कमीत कमी भांडवलात आपण घरगुती जेवणाची डबा सर्व्हिस देऊन पैसे कमावू शकतो.
तसेच वाढदिवस, नवे वर्ष,पार्टी,मुंज अशा समारंभात ऑर्डर सुद्धा घेऊ शकतो.आजकाल हा व्यवसाय खूपच चालत आहे.
२. फ्रीलांस लेखन :
जर तुमचे भाषेवर प्रभुत्व असेल आणि लेखनाची आवड असेल तर घरी बसून करता येईल असा हा छान व्यवसाय आहे.
- तांत्रिक लेखन : आजकाल बऱ्याच आय.टी कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे क्रिएटिव्ह लिखाण करण्यासाठी लेखक शोधत असतात.भाषेवर प्रेम असेल आणि छान पद्धतीने लेखन सामग्री मांडू शकत असाल तर याचा व्यवसाय म्हणून विचार करायला आणि लेखक रुपात स्वतंत्र व्हायला काहीच हरकत नाही.
- सक्रिय लिखाण : अनेक संस्थाने आणि विज्ञानसंस्था असे लेखक शोधत असतात जे संशोधनावर आधारित काही लिहू शकतील,काही गाणी लिहू शकतील आणि इतरही गोष्टींसाठी रचनात्मक पद्धतीने लिहू शकतील.जर आपण इच्छूक असाल तर अशा ठिकाणी संपर्क साधून फ्रीलान्स स्वरूपात काम करू शकता.
- ब्लॉग लिहणे : यातीलच अजून एक पर्याय म्हणजे तुम्ही ज्या विषयावर बोलू शकता किंवा विचार मांडू शकता, म्हणजेच ब्लॉग बनवू शकता, ते विचार मांडून तो प्रसिद्ध होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी काम करू शकता.पण यासाठी तुम्हाला ज्या विषयात काम करायचे आहे त्याचे संपूर्ण ज्ञान आणि माहिती असणे आवश्यक आहे.
हेही वाचा:
करोडो रुपयांची नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. आज नवऱ्यासोबत चालवतेय स्वतःची कंपनी
बँकेची नोकरी सोडून ५० वर्षे वयामध्ये सुरु केली कंपनी…आता आहे तब्बल ८०० कोटी कंपनीची मालक
असं म्हटलं जात कि जोड्या स्वर्गात बनवल्या जातात पण ह्याने तर तब्बल लाखो जोड्या बनवल्या.
३.ग्राफिक्स डिझाईन :
आजच्या काळात सगळेच व्यवसाय इंटरनेट वर जागा बनवण्यासाठी वेबसाईट बनवतात.वेबसाईट म्हणजे एक असा फॉर्म किंवा पान असते जिथे तुमच्या व्यवसायाची सगळीच माहिती सविस्तर मांडलेली असते.या कामासाठी ग्राफिक डिझाईनर हवे असतात,जे हे काम उत्तम रीतीने करू शकतील.हे डिझायनर वेबसाईटचे रुप बदलू शकतात आणि आकर्षित बनवू शकतात.
४.व्यक्तिगत देखभाल :
महिलांना मासिक पाळीशी निगडित बऱ्याच अडचणी असतात.याच संबंधी बरीच उत्पादने बाजारात उपलब्ध तर आहेत पण त्याची माहिती मात्र खूप कमी महिलांना असते.यासाठी वैयक्तिक स्वच्छता हा मुख्य बिंदू लक्षात घेऊन मासिक धर्म स्वच्छता हा एक व्यवसायाचा उत्तम पर्याय ठरू शकतो.
नैसर्गिक नॅपकिन : हे कापासा पासून बनवले जातात,यासाठी मशीन आणि लेबरची गरज असते.यासाठी उत्तम नियोजन असावे लागते.
- मासिक धर्म कप : या उत्पादनाची माहिती बऱ्याच महिलांना नाही त्यामुळे वापरही फारसा नाही.हे सिलिकॉन पासून बनवला जात असल्यामुळे आरोग्यासाठी उत्तम आहे पण याची जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
- वेगवेगळी उत्पादने : जसे की गरम पाण्याची पिशवी, क्रेंप रोल ऑन,मासिक धर्म नियमित येण्यासाठी उपयुक्त असलेले उत्पादने म्हणजेच तेल किंवा काही गोळ्या याची विक्री करणे हा सुद्धा उत्तम व्यवसाय होऊ शकतो.
५.हेल्थ केअर :
स्वस्थ जीवनशैली जगण्यासाठी व्यायामपूर्ण जीवनाचा लोकं सहजपणे स्वीकार करत आहेत.त्यासाठीच जुंबा,एरोबिक्स आणि योग सारखे वेगवेगळे व्यायाम प्रकार प्रचलित होते आहेत.हे शिकवण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घेऊन महिला याचा उत्तम व्यवसाय करू शकतात.
- योग आणि ध्यान सेंटर : योग अभ्यास शिकून आपण योगा ट्रेनर किंवा ध्यान अभ्यासक या स्वरूपात काम करू शकतो.
- जूंबा ट्रेनर : हा एक प्रसिद्ध असा नृत्य प्रकार आहे ज्याला लोक नेहमीच्या व्यायाम प्रकारात स्वीकारू लागले आहेत.आपल्या जवळच्या एरियात राहणाऱ्या लोकांसाठी जुंम्ब क्लास सुरू करू शकतो.
याचे योग्य ते प्रशिक्षण घेऊन महिला ट्रेनर बनू शकतात आणि फिटनेस सेंटर सांभाळू शकतात.
६.फॅशन उद्योग :
यालाच आपण बुटिक किंवा कपडा व्यवसाय असेही म्हणू शकतो.सध्याचे याचे वाढते प्रमाण बघता हा अतिशय पैसे मिळवून देणारा व्यवसाय आहे असे म्हणता येईल.
- आपले स्वतःचे फॅशन ब्रँड सुरू करणे : हा व्यवसाय अशा महिलांसाठी आहे ज्यांना आपल्या आयडिया डिझाईन करून स्वतःचे नाव बाजारात आणू इच्छितात.यासाठी पैसा आणि योग्य ज्ञान आवश्यक आहे पण एकदा का नाव प्रसिद्ध झाले की मग पैसे खूप आहेत.
-बॅग आणि बाकी सामान : आपण या कपड्या सोबतच पर्स, बॅग,दागिने,बेल्ट चपला असे बरेच महिलांशी संबंधित सामान विकु शकतो.
-शिवणकाम आणि भरतकाम : या व्यवसायासाठी तर कमी किंवा शिक्षण न झालेल्या महिलाही चांगल्या प्रकारे करू शकतात.हा गुण ग्रामीण भागातील सगळ्याच महिलांकडे बघायला मिळतो.गरज असते ती फक्त त्यांच्यातील कौशल्याची.कमीत कमी भांडवलात होणारा हा व्यवसाय असून या सोबतच जर हाताने बनवलेले किंवा केलेली कपड्यांवरची सजावट म्हणजेच एम्ब्रोयदारी हे सुध्दा महिलांमध्ये खूप प्रचलित आहे.याशिवाय हे ऑनलाईन विक्री करूनही घरबसल्या पैसे देते.
७.लोणचे व्यवसाय :
आजकाल बऱ्याच लोकांना विक्रीचे लोणचे,पापड,मसाले खाण्यापेक्षा घरगुती सात्विक पद्धतीने केलेले पदार्थ खायला जास्त आवडतात.घरगुती पदार्थ चवदार आणि हितकर ठरतात.त्यामुळे खूप लोकांचा घरगुती खाण्याकडे कल असतो.ज्या महिला घरी बसून हे पदार्थ बनवू शकत असतील त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने विक्री करून चांगला इन्कम घेऊ शकतात.यासोबतच घरगुती शेवया,कुरडया,चकल्या,लाडू, चटण्या यांचाही सामावेश करता येईल.
८.आय.टी आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट :
तंत्रज्ञानाच्या या जगात प्रत्येक कामासाठी एक सॉफ्टवेअर आहे.स्वतःचा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व्यवसाय सुरू करणे ही त्यामुळेच सुंदर कल्पना आहे,जिथे तुम्ही ग्राहक मिळवू शकता आणि आपल्या प्रोजेक्ट वर स्वतंत्रपणाने काम करू शकता.
- वेब डेव्हलपर : वेगवेगळ्या व्यवसायांची आणि कार्यक्रमांची वेबसाईट तयार करणे आजकाल खूप प्रचलित आहे.याद्वारे आपण पैसे कमावू शकतो.
ऍप डेव्हलपर : मोबाईल ही आता दैनंदिन गरज बनली आहे.त्यातील ऍप किंवा फंक्शन्स रोजच्या जीवनात उपयोगी ठरत आहेत.मोबाईल हे घर बसल्या कमावण्याचे साधन बनले आहे आणि त्याच्याशी निगडित ऍप रोजच बाजारात येत आहेत.त्यामुळे सगळ्याच कंपन्या लोकांचे जीवन सोपे,सहज होण्यासाठी ऍप बनवतात.म्हणूनच ऍप डेव्हलपमेंट फार्म हा छान व्यवसाय होऊच शकतो.
९.ब्युटी सलून :
हा एक असा व्यवसाय आहे ज्याला महिलाच उत्तम पद्धतीने चालवू शकतात.सगळ्याच महिलांना नटन्याची आवड असते.शिवाय या क्षेत्रात काय चालू आहे,महिलांना काय आवडले हे सुध्दा त्यांना चांगलेच कळू शकते म्हणूनच हा व्यवसायाचा मस्त मार्ग आहे.
स्पा आणि सलून : ज्या महिलांना केसांची काळजी कशी घ्यावी आणि कोणाला कोणत्या पद्धतीचा मेकअप करावा हे समजते त्या महिला याचे सेंटर सुरू करू शकतात.
नेल आर्ट गॅलरी : आजकाल नखांची वेगवेगळ्या प्रकारे सजावट करणे ही पद्धत झाली आहे.जर तुम्हाला याची योग्य माहिती असेल, जमत असेल तर याचा व्यवसाय म्हणून विचार करायला काहीच हरकत नाही.शिवाय यासाठी लागणारा पैसा खर्च करण्याची ग्राहकांची तयारी असतेच.
ब्रायडल मेकअप स्टुडिओ : म्हणजेच नवरीचा मेकअप.ही सुद्धा आजच्या काळात प्रचलित झालेली नवी पद्धत आहे.बदलत्या काळानुसार बदलून आपणही हा व्यवसाय करू शकतो.
या शिवाय मसाज थेरपी किंवा मेहंदी चांगली काढता येत असेल तर या गुणांचाही उपयोग करून त्याचे क्लासेस घेऊन त्याद्वारे पैसे कमावता येतात.
१०.डाटा एंट्री आणि अकाउंटिंग :

जर महिला घरखर्च सांभाळतात तर मग त्या पैस्यांशी निगडित कोणतेही व्यवहार नक्कीच पूर्ण करू शकतात.या बाबतीत महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्यामुळेच सीएफएस ए मधील व्यवहार मध्ये स्त्रियांना चांगलेच समजले जाते.
११.कला आणि हस्तकला :
ज्या स्त्रियांना टाकाऊ पासून टिकाऊ बनवता येते शिवाय कागद आणि लाकडांच्या मदतीने वस्तू हाताने बनवता येतात अशा महिलांसाठी हा व्यवसाय आहे.
हाताने बनवलेले दागिने : आपल्या कौशल्याने आणि कलाकुसरीने हाताने बनवलेले दागिने खूप विकले जातात.
तसेच वाढदिवस, सण समारंभ यात उपयोगी पडणारे गिफ्ट कार्ड आणि भेटवस्तू बनवून विकल्या जाऊ शकतात.
तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मोत्याचे दागिने सुद्धा आपण बनवू शकतो,त्याचीही खूप फॅशन आहेच.
याशिवाय आपण मोबाईलवर मीशो किंवा शॉप १०१ सारखे ऍप डाऊनलोड करून त्यातील सगळ्याच प्रॉडक्ट्सची विक्री सोशल मीडियाद्वारे करू शकतो.हा सुद्धा भांडवल शिवाय चालणारा मस्त व्यवसाय आहे.
तर आपली ओळखा आणि व्यावसायिक बना.
===================
1 Comment
Marsha
Ꭲhey һave Beautiful аnd Great Product